Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल पहिलाच एपिसोड पाहिला.
काल पहिलाच एपिसोड पाहिला. सुरुवात तर भन्नाट झालेली दिसतेय. झी चेच जुना प्रोजेक्ट संपल्याने बेंच वर आलेले काही कलाकार तु.पा.रे. मधुन नव्या प्रोजेक्ट वर आल्याचे दिसले. त्यात प्रामुख्याने खुलता कळी खुलेनातली मोनिका इकडे 'मायरा' बनुन भाव खाणार हे दिसले. कारे दुरावा मधला बॉस सुबोध भावे, तुझं माझं ब्रेक मधिल समीर चे काका आणि समीर्च्या आत्याचा वकील मित्र, माझ्या नवर्याची बायको मधील राधिकाची वहीनी हे सर्वजण दिसले. एकंदर सिरियल चांगलि चालेल अशी आशा ठेवायला हरकत नाही.
मा न बा चा केड्या लेखक आहे
मा न बा चा केड्या लेखक आहे याचा मिन्स अभिजीत गुरु.
गौरी फुले, निळू फुले यांची मुलगी नायिकेची आई दाखवली आहे. ती कट्टीबट्टीमधे राजकारणी काकू आहे. अभिज्ञा भावे सेक्रेटरी आहे सुबोध भावेची.
मला थोडा बोअर झाला एपिसोड. ते साडी प्रकरण फार ताणलं. नायिका पहील्या शॉटमधे बरी वाटली, इंप्रेसिव्ह नाही वाटली पण प्रोमोपेक्षा चांगली वाटली. सु भा जास्त एजेड दाखवला आहे.
आज बघेन कदाचित कारण प्रीकॅप बरा वाटला काल शेवटी दाखवला आजचा तो. केड्या लेखक आहे ते बघून मात्र भीती वाटतेय बघायची.
मला माहित नाही का पण खूप
मला माहित नाही का पण खूप पूर्वी एक कादंबरी वाचली होती, शिरवरवळकरांची बहुतेक तीच आठवते ह्या शिरेलीचा प्रोमो बघून.
त्यात नायिका १५ वर्षांची, कॉलेजात शिकणारी असते, तर नायक ४५ वर्षांचा प्रसिद्ध उद्योजक. तो तिची कविता ऐकून तिच्या प्रेमात पडतो, तिचे खरेतर दुसऱ्या मुलावर प्रेम असते पण हलाखीची परिस्थिती असल्याने आपल्या बहीण अन आईसाठी ती त्याच्याशी लग्न करते.
कादंबरी तेव्हा आवडली होती, शिरेल बघणार नाही, पण इथले प्रतिसाद वाचेन ☺️
अशीच एक सिरियल स्टारपलसवर
अशीच एक सिरियल स्टारपलसवर होती दिल संभल जा जरा...
सेम फॉर्म्युला झी चा. एक
सेम फॉर्म्युला झी चा. एक पुरुष दोन बायका.
इथेपन तेच.
ते बाबा बोअर करतात, खूप फुटेज
ते बाबा बोअर करतात, खूप फुटेज खातात. वाईट वाटतं एकीकडे त्यांना त्या बायकांनी कसे वागवलं काल आणि आज रिक्षेचे पैसे नाहीत म्हणून भाषण लिहिलेला कागद मुलीला द्यायला लांब धावत गेले, त्यापेक्षा दुकानात बसून whats app असेल तर आख्खे भाषण लिहून पाठवू शकले असते.
सु भा ची बायको किंवा प्रेयसी
सु भा ची बायको किंवा प्रेयसी शिल्पा तुळसकर या जगात नसावी पण तिची झाक त्याला नायिकेत दिसली असावी, अंदाज काही डायलॉगजवरून.
शिल्पा तुळसकरच्या गळ्यात
शिल्पा तुळसकरच्या गळ्यात मंगळसूत्र होते.
म्हणजे बायकोच असावी.
मला हिराॅईन फार नाही आवडली.
मला हिराॅईन फार नाही आवडली. म्हणजे तिचं बोलणं ऐकलं तर छान बोलते पण जो अभिनय करते तो डोळ्यांतून नाही दिसत. डोळे कोरडे वाटतात.
तिच्या उलट सुभा. त्याने नुसतं बघितलं तरी कळतं त्याला काय म्हणायचंय ते.
मलापण नाही impressive वाटत.
मलापण नाही impressive वाटत. कधी बरी वाटते, कधी नाही म्हणजे काही ठिकाणी चांगला अभिनय वाटला पण सुबोध भावे बरोबर एखादी दुसरी हवी होती, बोलका आणि गोड चेहेरा असलेली असं वाटतं.
ती रेशम प्रशांत शोभली असती
ती रेशम प्रशांत शोभली असती इथे. अंजली मध्ये अनुराधा होती आणि मठाधिपतीवाली सिरीयल त्यातली नायिका. दुसरी माझी लाडकी स्वरदा शोभली असती पण ती हिंदीत बिझी सध्या.
मला ह्यातल्या नायिकेला
मला ह्यातल्या नायिकेला कुठेतरी बघितल्यासारखे वाटतंय, आठवत नाहीये मात्र. बालकलाकार वगैरे म्हणून होती का कशात.
अभिज्ञा खरंच बोअर. मला कट्टीबट्टीपासून कंटाळा आलाय तिचा, फार एकसुरी. आधी आवडायची मला.
ही नांदा सौख्य भरे मध्ये होती
ही नांदा सौख्य भरे मध्ये होती का लहान मुलगी म्हणून, नायिका आहे ती. मला जाम बालकलाकार म्हणून कुठेतरी बघितली असं का कुणास ठाऊक वाटतंय.
ही नांदा सौख्य भरे मध्ये होती
ही नांदा सौख्य भरे मध्ये होती का लहान मुलगी म्हणून, >>> नांदा सौख्य मधली लहान मुलगी संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका करते.
या मुलीचं नाव गायत्री दातार आहे.
सुभा समोर अभिनयात खरंच कमी पडते ही..
पण रेशम प्रशांत साधी, सोज्ज्वळ, घरगुती वाटत नाही
मला आवडली मालिका.... हिरोईन
मला आवडली मालिका.... हिरोईन पण छान वाटली. आधी नाही आवडली, पण तो रिक्षातल्या सीन मधे गोड वाटली... बाय द वे, या मालिकेचा धागा बराच उशिरा आलाय. नाही तर आधी प्रोमो आला सिरीयल चा की धागा यायचा... आता झी च्या मालिकांमध्ये फार इंटरेस्ट राहिला नाही वाटत लोकांना...
पटापट 2000 करा म्हणजे दक्षिणा
पटापट 2000 करा म्हणजे दक्षिणा जी पार्ट 2 धागा उघडतील
ती कॉलेज मुलगी म्हणजे हिरॉइन?
ती कॉलेज मुलगी म्हणजे हिरॉइन? अरेरे. आणि उद्योजक म्हणजे साहेब हेलिकॉप्टर मधून उतरले व सायकल वरून चाल्ले गेले. ती पंक्चर झाली. आणि फॉर्मल फंक्षन ला असले काय कपडे घातले ले? वयस्कर दिसतात म्हणजे पन्नाशीचे. अभिज्ञा फार बोअर तिचा अॅक्ट एकसुरी. वेस्टर्न कपडे घालणा री व इंग्रजी बोलणारी आपल्यात एकच नटी आहे का?
ती बारकी पोरगी फारच इरिटेटिंग आहे.
दुसरी माझी लाडकी स्वरदा शोभली
दुसरी माझी लाडकी स्वरदा शोभली असती पण ती हिंदीत बिझी सध्या. >>> स्वरदाची पहिलीच सिरियल 'माझे मन तुझे झाले' हयाच थीमवर तर आधारित होती. त्यामुळे ती सुद्दा नकोच हया सिरियलमध्ये.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=rfuJUPYcrAc&t=62s
छान दिसते की सिरियलच्या बाहेर
छान दिसते की सिरियलच्या बाहेर.
केड्याने मानबा संपवावी लवकर आणि इकडे काॅन्सनट्रेट करावं ब्वाॅ. तिकडचं पाणी इकडे आणि इकडचं पाणी तिकडे असं काही करु नये म्हणजे झालं.
सुलु हो पण mmtz मध्ये अंतर 10
सुलु हो पण mmtz मध्ये अंतर 10 ते 12 वर्षाचं होतं, इथे अफाट अंतर दाखवलं आहे. ती काका म्हणते त्याला इतकं.
स्वरदाचं हिंदी मध्ये पण दुसरं लग्न तिच्या mentor शीच झालंय सुलु, कसला tall आणि handsome आहे तो पण अभिनय mmtz वाल्याचा छान होता.
कच्चा लिंबु, nsb मधली आहे का
कच्चा लिंबु, nsb मधली आहे का येसुबाई, ok ok. ती शोभली असती इथे.
महा बोर आहे ती हिरवीण.
महा बोर आहे ती हिरवीण. सुभाच्या जीवावर मालिका चालवायचा विचार दिसतोय केड्याचा. होसुमीघ सारखी सुरूवात दिसतेय फक्त ईशाला माहित आहे की तो खूप श्रीमंत आहे. सरमिसळ दिसतेय ब-याच मालिकांची. संवाद शर्वरी पाटणकरचे आहेत. तिथे आशा शेलार लोभी होती ईथे गार्गी फुले आहे.
सुलु youtube वरचं आत्ता
सुलु youtube वरचं आत्ता बघितलं. तिथे काही ठिकाणी फार छान दिसतेय इशा. मालिकेत मात्र नाही. नंतर मेकओवर वगैरे करणार असतील.
पण रोज बघू नाही शकत ही सिरीयल, बोअर झाले.
ती नायिका बहुदा कलर्स च्या
ती नायिका बहुदा कलर्स च्या त्या राधा च्या सिरियल मध्ये तिची बहीण होती
ती जरा ओठ दुमडून बोलते नी ही पण..बहुदा त्या दोघी एकच आहेत
सध्या तरी वेगळा विषय म्हणुन
सध्या तरी वेगळा विषय म्हणुन मालिका आवडलीय, एवढच म्हणु इच्छिते.
झीच्या लॉन्ग लास्टीन्ग ग्रामिण पार्श्वभुमीच्या, नवर्याच्या अफेअरच्या, जावा जावा- सासु सुनान्च्या.. . मालिकेतुन नविन विषय म्हणुन आवडायलीय,.
वयात बरंच अंतर असलेले नायक
वयात बरंच अंतर असलेले नायक-नायिका आणि चाळीशीतला सुबोध भावे
अशी जाहिरात वाचली म्हणून पहिला एपिसोड पाहिला. दुसरा एपि. पाहण्याचं लक्षातच नाही राहिलं. 
नायिका खूप काही आवडली नाही. पण सुबोध भावेसमोर अगदी कोवळी दिसणारी नायिका हवी, तशी ती आहे. पुढे काम कसं करते बघू.
अभिद्न्या भावे परत एकदा अत्यंत बोअर झाली.

"मी कोण आहे? मायरा! जिच्याशिवाय विक्रम सरंजामेंचं पानही हलत नाही अशी मायरा!" - हा तिचा इंट्रो
तिच्याशिवाय वि.स.चं पान हलत नाही हे प्रसंगांमधून दाखवा की च्या मारी....
नुसती कर्कश्श आवाजात सगळ्यांवर ओरडताना दाखवली आहे. बळंच!
(‘द कलेक्शन’ मध्ये पॉल सबीनचं शार्लटविना पान हलत नाही हे किती सहज दाखवलं आहे!)
कृत्रिम न वाटणारे संवाद का लिहीत नाहीत झी वाले...
जाहिरातीत वाचलं होतं, की वि.स. काहीशे की काही हजार कोटींच्या बिझिनेस एम्पायरचा मालक असतो. आता त्याच्या ऑफिसमध्ये जर झी ने फाईल्स आणि प्रेझेंटेशनं सुरू केली ना, तर.....
झीची मालिका, म्हणजे पुढे विषयाची माती नक्की. मातीचा वास येताक्षणी बघणे थांबवणार.
<<जाहिरातीत वाचलं होतं, की वि
<<जाहिरातीत वाचलं होतं, की वि.स. काहीशे की काही हजार कोटींच्या बिझिनेस एम्पायरचा मालक असतो. आता त्याच्या ऑफिसमध्ये जर झी ने फाईल्स आणि प्रेझेंटेशनं सुरू केली ना, तर..... Angry Angry Angry<<<<
केड्या लेखक आहे म्हटल्यावर वेगळे काही अपेक्शित नाही... पण सोसतय तोवर सोसावे म्हणतेय.
ईशा निमकर चं घर आधी
ईशा निमकर चं घर आधी कुठल्यातरि सिरीयल मधे पाहिल्यासारखं वाटतय पण आठवत नाही....
वैभव्लक्ष्मी
वैभव्लक्ष्मी
Pages