Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मालिका विनोदी आणि प्रतिसाद
मालिका विनोदी आणि प्रतिसाद त्याहून करमणूक करणारे आहेत. ओव्हरऍटींगची स्पर्धा चाललीये सगळ्या स्टाफ ची। आजचा कहर विनोदी डवायलाक- ओ माय गॉड रक्कम लीक झाली ?? शी काहीतरीच वाट्ट ऐकायला!!
जबरी पन्चेस फा आणि भा!
जबरी पन्चेस फा आणि भा!
फारेंड, भा, आपल्राया काॅमेंटस
फारेंड, भा, आपल्राया काॅमेंटस वाचून सिरीअल पहाण्याचं सार्थक झालं.
धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद
या सगळ्या गोंधळात ईशाच्या आईचा आणि मुख्य म्हणजे वडलांचा रोल करणार्यांना दाद द्यायला हवी. या मॅडनेस मधे विशेषतः तिच्या वडलांचा रोल करणार्याने चांगले काम केले आहे.
मिक्सर पेक्षा जात्यावर चकलीचे पीठ लौकर दळून होते ही नवीन माहिती मिळाली. ताबडतोब "आपल्या कडे जुन्या गोष्टी कशा भारी होत्या" यावर एक व्हॉट्सॅप पोस्ट तयार केली पाहिजे. मला वाटले चाळीत चार लोकांकडून एकदम मिक्सर आणून एकदम करतील हे लोक. पण त्या करता सिरीज ला लॉजिक च्या मार्केट मधे जावे लागेल आधी. त्यात त्या डब्यात भरलेले मटेरियल जेमतेम तळाशी होते. इतक्याचे पीठ व्हायला किती वेळ लागणार?
आणि हे कथानक मुंबईत घडत आहे, की पुण्याला लाजवेल अशा शहरात? जेथे लोक अजून रात्रीचे जेवत असतात तेथे किराणा मालाची दुकाने बंद झाली? मग आमचे ८ वाजता शटर ओढणारे दुकानदार काय वाईट! मला वाटले सरंजामे ग्रूप मधली एक कंपनी भाजणीही विकत असेल बाजीराव रोडवरच्या एखाद्या बोळात. पण तसे दिसत नाही.
एकदम हायजिनिक चकली. माहीमकर मस्त वरून खोकत जातं फिरवत आहेत. हे लिहीपर्यंत तो बिपिनराव तोंडाला रूमाल बांधतोय. कढईत ज्या वेगाने चकल्या तळल्या जात आहेत तो पाहता खलबत्त्यात चिमूट चिमूट कुटून पीठ केले असते तरी फरक पडला नसता.
आणि तो- म्हणजे दुसरा- दिवस उजाड्ला! १३००० कोटीच्या कंपनीतील फायनान्स ते सिक्युरीटी सर्व विभागांचे हेड्स "ईशा चकल्या घेउन येणार" ची वाट बघत आहेत. सगळे कर्मचारी (म्हणजे ते ३-४) त्याचीच चर्चा करत आहेत.
आजच्या एपिसोड मधे दळणवळणाची साधने ६० च्या दशकातील असल्याने फोन, मेसेज वगैरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सगळे हातातील फोन कडे पाहात पण त्याचा वापर न करता केवळ वाट बघत आहेत. सिनीयर सर लंडनहून फोन करू शकतात. पण बाकीच मुंबईतल्या मुंबईत नाही करू शकत.
"सर, मी वेळेत पोचले ना?"
काल कॅलेण्डर वाल्याचे पेमेण्ट अकाउण्ट डिपार्टमेण्टकडे. पण ईशा वरती कुरूडीने लिहील्याप्रमाणे वाइल्डकार्ड असल्याने तिचे पेमेण्ट स्वतः जयदीपसर करणार.
गेटवे ऑफ इण्डिया विकत घेणे वगैरे फेल गेल्यावर ऑफिसकरता चकल्या विकत घेण्याची आयडिया "सक्सेसफुल" झाल्यामुळे जयदीपसर भलतेच खुष आहेत. ही आयडिया सक्सेसफुल झाली म्हणजे नक्की काय झाले माहीत नाही. ईशा संध्याकाळपर्यंत आली असती तरी काही फरक पडला नसता.
बाय द वे, सुभा अॅप्रूव्ह्ड मराठीत त्या दुकानदाराला "आमची मदत करा" म्हंटली ईशा.
फारएण्ड
फारएण्ड

धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना फा
धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना
फा, मस्त लिहितोयस. 
गेटवे ऑफ इण्डिया विकत घेणे वगैरे फेल गेल्यावर ऑफिसकरता चकल्या विकत घेण्याची आयडिया "सक्सेसफुल" झाल्यामुळे जयदीपसर भलतेच खुष आहेत. ही आयडिया सक्सेसफुल झाली म्हणजे नक्की काय झाले माहीत नाही. ईशा संध्याकाळपर्यंत आली असती तरी काही फरक पडला नसता. >>
मराठी मालिकांमध्ये चकल्या विकत घेण्याचाही 'इव्हेंट' होतो. चीनमध्ये लोक स्पोर्ट्सकार अलिबाबा अॅपवर विकत घेतात.
फा, भा, LOL
फा, भा, LOL
काल ती अतिशय विचित्र तोंड
काल ती अतिशय विचित्र तोंड करुन रडत होती...!! ओठ मुडपून, चंबू करुन....अगदीच लहान मुलासारखी.............................
कैच्या कैच.
आणि हो...सापडल्या तेव्हा पाचशेच्या होत्या नोटा.....मधे रस्त्यात परांजपेंनी बंदे करुन घेतले असतील पैसे!
प्रतिसात लोळ आहेत सगळे.
प्रतिसात लोळ आहेत सगळे.
फारेण्ड, तुम्ही मालिका बघताय हे बरंच झालं म्हणायचं
ह्या 'भयानक' विनोदी
ह्या 'भयानक' विनोदी मालिकेवरील प्रतिसाद एकदम तुफान!
भाचा, फा, धमाल आणली प्रतिसादांत!
सगळे प्रतिसाद भन्नाट!
सगळे प्रतिसाद भन्नाट!
मालिका खरोखर विनोदी होत
मालिका खरोखर विनोदी होत चाललीय! !
सुभा काल इशाला म्हणतो वर्ल्ड ट्रेड फेअर मधे तुझी ८ रुपयेवाली आयडीया आणि राजनन्दिनी सेल ची आयडीया बाकीच्या बिझनेसमन्स ना इतकी आवडली कि तु इकडे फेमस झाली आहेस. सगळे तुझे कौतुक करताहेत. म्हणुन मी तुला लन्डनला आणायचे म्हणत होतो.

आमच्या इशाने नशिब कमावल हो.. असे सान्गत सुटलीय.
हे पाहुन अगदी टडोपा झाले! ....
इमॅजिन! इशाबाळ साठी लन्डन बिजनेसमन्स ने रेड कार्पेट टाकलेय. तिच्याबरोबर ओळख करुन घेण्यास धडपडत आहेत... अॅट लिस्ट तिची एक छबी मिळावी म्हणुन धडपडत आहेत.
अश्या आयडीयाजसाठी तिला तिकडच्या ऑफर्स येत आहेत. मोठमोठे इन्डस्ट्रीयालीस्ट तिला अॅडव्हाएझर म्हणुन नेमणुक करण्यास उत्सुक आहेत. आणि ती त्या सगळ्यावर लाथ मारुन सरन्जामे इन्डस्ट्रीजशी एकनिष्ठ रहाणार आहे असे डिक्लेअर करते म्हणुन वि स , विसाई तिच्याकडे मोठ्या कौतुकाने, अभिमानाने पहात आहे. वि स ला तर तिला कुठे ठेउ अन कुठे नको असे झालेय. इकडे मैरा, झेन्डे जळुन खाक होत आहेत... सॉन्या कपाळाला हात लावुन बसलीय तर जयदीपशेठ वरवर आनन्दी असल्याचे दाखवत आहेत.
इशाचे बाबा (हो बाबाच) तर आरतीचे ताट घेउन डोळ्यात प्राण आणुन तिची वाट बघत आहेत.
आणि आई... छातीफुटेस्तोवर इकडे तिकडे भिरभिरत
आर्या, ती नाचरी स्मायली लय
आर्या, ती नाचरी स्मायली लय भारी आहे.
अन्जु, फार पुर्वी किती
अन्जु, फार पुर्वी किती वापरायचो या स्मायल्या, आठवल ते! सगळ्या सेव्ह केलेल्या सापडल्या.
आर्या..1 नंबर लिहिलंय.....
आर्या..1 नंबर लिहिलंय..... आणि नाचणारी smily तुफान आहे.... आणि फारेंड चे सगळे प्रतिसाद झकास....
आर्या तू इशाबाळच्या आयडियाची
आर्या तू इशाबाळच्या आयडियाची किंमत वाढवली.अग ती 2रु ची आयडिया होती.नाचणारी बाहुली मस्तच.
खरं तर ती आयड्या पण तिची
खरं तर ती दोन रु. ची आयड्या पण तिची नव्हती. सफरचंद झाडावरून पडलं तर झाडानंच शोध लावला म्हणल्यासारखं होईल ते.
परदेशातले फाॅर्मल्स म्हणजे असेल त्या अंग्यावर किंवा टी शर्टावर कोट चढवणे असं झालंय.
धूम3 मधे गाड्या कशा बदलतात तसे इथं विकयाचे व्यवसाय बदलतात. मोबाईल रिचार्ज, साड्या, कॅलेंडर, चकल्या......
हो इथले प्रतिसाद वाचून हसून
हो इथले प्रतिसाद वाचून हसून मेले मी आता .. मी अजून थोडी मागे आहे .. अजून इशा आणि तीची आई चकल्या तळतेय

नाचणारी smily तुफान आहे सेम इशा ची आई आली डोळ्यासमोर .... आणि फारेंड चे सगळे प्रतिसाद झकास....>+१११
एकंदरीत सगळा आनंदीआनंद च दिसतोय .. पण लेखक / दिग्दर्शकाला एखादा नट /नटी संवादाबद्दल सजेशन्स देऊ शकत नाहीत का ? आपल्या सारख्या सामान्य लोकांना बऱ्याच गोष्टी खटकतात त्या त्यांना नसतील का खटकत ? काम करणाऱ्या लोकांना खटकत असेल आणि सांगत हि असतील पण दिग्दर्शक किंवा लेखकाला किंवा चॅनेल वाल्याना ते चालत नसेल असं हि असेल .. पण मग अश्यावेळी मनाविरुद्ध काम करणं किती कठीण जात असेल अभिनेत्याला .. काहीही पांचटपणा आणि बावळट प्रकार चाललेला असतो कधी कधी
आर्या..1 नंबर लिहिलंय.....
आर्या..1 नंबर लिहिलंय..... आणि नाचणारी smily तुफान आहे.... आणि फारेंड चे सगळे प्रतिसाद झकास....>>>> +१.
आर्या व फारेंड मस्त प्रतिसाद
आर्या व फारेंड मस्त प्रतिसाद.
काल माझ्या वव ६ मुलाने
काल माझ्या वव ६ मुलाने विचारलं, आई हि इतकी मोठी होऊनही रडते ऑफिस मध्ये?
इशा ने दिलेल्या टुकार आयडिया
इशा ने दिलेल्या टुकार आयडिया स्किम्स साध्या साध्या दुकानात , वाण्याकडे, आयस्क्रिम पार्लर मधे पण असतात.. कुठेही असतातच की... त्यातही २ रु. ची आयडिया तिची नव्हतीच मुळी..
बाहुबली मधे प्रभास ला बघुन तो
बाहुबली मधे जसं प्रभासला बघुन तो जे करतो त्यावर विश्वास ठेवावा वाटतो तसंच इथे सुभा कडे बघुन होतं
त्यातही २ रु. ची आयडिया तिची
त्यातही २ रु. ची आयडिया तिची नव्हतीच मुळी.. >>>> idea तिची नव्हतीच मुळी. तिच्या फेमस डायलागमुळे विस ला सुचली. म्हणून तिला credit
सरंजामे कंपनी ही बहुतेक
सरंजामे कंपनी ही बहुतेक पूर्णपणे टॉप टू बॉटम एजाईल मॉडेल वर चालते. म्हणजे असे की कुणिही काहीही सुचवू शकते. खेरीज एक ठाम मॅनेजर असे कुणीच नाही. शिवाय ऊठसूठ फेरफार करणे, हवे तेव्हा जॉब डिस्क्रीप्शन्स बदलणे हे सर्व मस्त सुरू असते. एव्हडे करून नक्की कोण कधी काय काम करणार आहे हे कुणालाच माहित नसते, म्हणूनच मग चकली डिलीव्हरी असली की सगळेच एकत्रीत वाट बघत बसतात. मॅनेजर ने जुनियर्स ना चहा देणे हेही होवू शकते. अगदीइच कशाने काम झाले नाही तर कनपटी वर पिस्तूल लावाय्चा पर्याय देखिल आहे.

पण या कंपनीने त्यांचे असे बहुगुणी एजाईल मॉडेल अगदी कर्मचार्यांच्या घरापर्यंत राबवले आहे.
असो. परवा सौ. ने एकदम कोंडीत पकडले मालिकेच्या क्रियेटीव्ह हेडस ना.. ते सुभा ला इशा व पोरे व्हिडीयो कॉल करतात तेव्हा तो इशा ला म्हणतो, चल निघतो आता लगेच दुसर्या कॉंफरंस ला जायचे आहे.. आणि मागे बिग बेन च्या घडाळ्यात सहा (सकाळचे?) वाजलेले दाखवलेत.
सुभा ने हे असे ईतर बारकावे दुर्लक्षित करावे हे काही पटत नाही. म्हणजे बहुदा फंडा क्लियर आहे. मालिका म्हणजे रोजचे मिटर डाऊन, बाकी विशेष काही लक्ष द्यायचे नाही.
सरंजामे आई साहेब मात्रबोलताना नेहेमी तोंडात पान/विडा किंवा एखादी लिमलेट ची गोळी ठेवून असल्यागत दिसतात.. कुणी नोटिस केले आहे का?
फा, भा, मेधावि, आर्या
फा, भा, मेधावि, आर्या
ती इशाची आई लन्डनची विमानाची टिकिटे काढणार आहोत म्हणाली नेमके त्याचवेळी ती वाडकर बाई हजर.
ती परान्ज्पेकडे बघून खुणावत होती, 'बघा , मी म्हणत होते की नाही इशानेच फ्रॉड केला असेल ते. लन्डनला जायची तयारी चाललीये आता. इशाई आता लन्डनचा 'ल' सुद्दा काढणार नाही तोन्डातून यापुढे. 
तो चकल्यान्ची ऑर्डर देणारा माणूस आला होत्या त्या दिवशी हे इशाई विसरली वाटत सान्गायला वाडेकरबाईन्ना आणि निमकरना.
आज सुभाची हिरोसारखी एन्ट्री होणार आहे.

कुणीतरी ढकलून दिलं की दारात
कुणीतरी ढकलून दिलं की दारात किंवा रस्त्यात जाऊन पडण्याची अॅक्टींग चांगली जमायला लागलिये आता इशाच्या बाबांना.
काल इशाई घराचे दार ठोठावत
काल इशाई घराचे दार ठोठावत असते तेव्हा वाटले कि इबाबांनी तिला घराबाहेर काढले. ते आतूनच तिला ओरडत असतात. पण लोक जमा झाल्यावर ती म्हणते कि यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.
विसने आता इबाळाशी लग्न करून तिला कंपनीची मालकिण म्हणून डिक्लेअर करावे. उगा ती विलक्शण भारी दाखवायच्या नादात लेखकाने बरीच माती खाल्ली आहे.
काही स्मार्ट लोक पोलीस झडती
काही स्मार्ट लोक पोलीस झडती घ्यायला आले तरी वॉरंट आहे का विचारतात, इथे पोलीस सोडा ऑफिसमधले काका काकू येऊन झडती घेतात ???? लेखकाच्या बुद्धिबद्दल शंका घ्यायला त्याने खूप कारणं, घटना प्रसंग पुरवले आहेत, पण दिगदर्शक, ऍक्टर्स किंवा सिरियलशी निगडित कोणालाच हा कॉमन सेन्स नसावा? बरं यासाठी फार रिसर्च करून ज्ञान मिळवण्याची पण आवश्यकता नाही. हे कित्येक सिनेमा नाटकात दाखवलेलं असतं.
दुसरी गोष्ट, पुरावे...... हे पंचांसमोर सह्या करून सील करतात आणि कोर्टमध्ये उघडतात ( बरोबर ना?) , इथे ऑफिसमधल्या काकू उचलून आणतात आणि बॉसला देतात. इशा बावळट आहे म्हणून ठीक, नाही तर एखाद्या स्मार्ट गुन्हेगाराने किती ईझींली हे पाकीट त्याच नाही हे पृव्ह केलं असतं. किती त्या निर्बुद्ध मालिका? घरातल्या सिनिअर सिटीझन्सना असे मुद्दे पटवून दिले तरी ते दुसऱ्या दिवशी टीव्ही पहाणारच.
मेधावी, सिरीयल संपेपर्यंत (
मेधावी,
सिरीयल संपेपर्यंत ( 2ते 8-10 किंवा कितीही वर्ष) ते मास्टरी मिळवतील पडण्यातली
Pages