Submitted by सेन्साय on 9 June, 2018 - 23:43
वाऱ्याचा सोसाट, ढगांचा गोंगाट
आकाशी झिंगाट, रोषणाई !
पाऊस मिठीत चिंब भिजला
घास भरवते एकमेकाला तरुणाई
जोडून तिफन, वादळावर आरूढ़
रचते भारुड, बैलांची सवाई !
पाऊस मिठीत चिंब भिजला
जोत सरकतो फुलवत हिरवाई
छपुर ठिबकलं ओसरीत भरलं
चिखलाचं जिणं जागीच सरकलं
पाऊस मिठीत चिंब भिजला
बळी घेत रोज एक रोगराई
― अंबज्ञ
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !
सुंदर !
छान!
छान!
धन्यवाद अक्षय आणि
धन्यवाद अक्षय आणि द्वादशांगुला
खूप छान, मुळात पाऊस खुप आवडतो
खूप छान, मुळात पाऊस खुप आवडतो, म्हणून पावसावरचे लेख, कविता पण आवडतात
छान !
छान !
धन्यवाद VB आणि आनंद
धन्यवाद VB आणि आनंद
मस्तच ! ! !
मस्तच ! ! !
मस्तच!!!
मस्तच!!!
धन्यवाद अधांतरी आणि पंडितजी
धन्यवाद अधांतरी आणि पंडितजी