Submitted by पुरंदरे शशांक on 29 May, 2018 - 01:03
ज्येष्ठ
ऋतूचक्राच्या आर्यात
ज्येष्ठ संधीकाली उभा
आग ओकूनी थकला
झाकोळती मेघ नभा
रानावनात पालवी
हिरवाई किती छटा
सुगंधात लपेटूनी
अनवट रानवाटा
लख्ख मोकळ्या आकाशी
वावटळ उठे दूर
त्याच्या आठवांनी दाटे
मनी काहूर काहूर
मेघ उमटती नभी
गहिरेसे भले मोठे
झुंजी घेती एकमेका
आभाळाचा पट फाटे
ज्येष्ठ तापता तापता
मन काहिली काहिली
येता वळवाची सर
मरगळ दूर झाली...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेष्टाकडे पाहण्याची सुंदर
जेष्ठाकडे पाहण्याची सुंदर एकाग्रता , सकारात्मकता ...
सुर्रेखच ..
कालपासून बघत होते पण शांतपणे
कालपासून बघत होते पण शांतपणे वाचायचं म्हणून ठेवलं होतं.
नेहमीप्रमाणे मस्तच शशांक .
अहाहा!!
अहाहा!!
सुंदर!
सुंदर!
छानच!
छानच!
सुंदर!!
सुंदर!!
मस्त!
मस्त!