चाळीतल्या गमती-जमती (२१)
आपल्या मुलीच्या गावी जाऊन तूप रोटी खाऊन धट्टी कट्टी होणाऱ्या म्हातारीची चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही गोष्ट ऐकत ऐकत मोठी झालेली एक आशावादी पिढी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटत आला आहे.पण आमच्या चाळीशेजारच्या म्हातारीने आजारी पडून धट्टी कट्टी झाल्यावर इतरांबरोबर माझ्याशीही प्रेमाने वागावे या माझ्या अपेक्षेला सुरुंग लावला पण मी पूर्ण वाह्यात आणि वाया गेलेली मुलगी असून मला सुधरावण्याचा तिने विडाच उचलला.माझ्या मोठ्याने बोलण्यावर,हसण्यावरच काय अगदी माझ्या मुलांची कपडे घालण्यावरूनही तिने येता जाता मला फैलावर घेण्याबरोबर मम्मीकडे माझी कानउघाडणी सुरू केली.मम्मी आपली पडत्या फळाची आज्ञा म्हणून ,जरी ते पडते फळ मला येता जाता उलथना पण झालय बेन पटदिशी म्हणत असली तरी शिवाय तिने माझ्यावर इंदू आज्जीने लावलेल्या निर्बंधावर अंतिम मान्यता देऊन तुमचीच नात आहे बघा सुधारते का असा लेकी बोले सुने लागे हा टोमणा मारून घेतला होता.या जाचक अटी मला मान्य नसल्याने सायमन गो बॅक च्या धर्तीवर आपण इंदू गो बॅक अस पोस्टर तयार करून घ्यावे असे विचार माझ्या मनाला शिवू लागले(तेंव्हा मन कुठे सापडत होत माझ्या हाताला काय माहीत)
पण मी सोडून मात्र इंदू आज्जी आमच्या घरातील इतर व्यक्तींची अक्षरशः काळजीच करू लागली.दोन्ही घराचे संबंध सुधारले,दोन्ही घरातील राजदूतांना मान मिळू लागला,दोन्ही घरातील आर्थिक,खाद्य पदार्थ आणि इतर भावनिक आधाराची देवाणघेवाण वाढून आयात निर्यात व्यापारात वाढ झाली.मी केवळ सांग काम्या असल्यामुळे हे आज्जीना नेऊन दे जा म्हंटल की,देय पदार्थात माझ्या आवडीचा पदार्थ असेल तर त्यातील हळूच काढून फ्रॉक च्या खिशात ठेऊ लागले.इंदू आज्जीने दिलेले पदार्थ चाखून ती सुगरण आहे अशी पदवी मम्मीने बहाल केली.पण आपल्या शत्रू राज्यातून आलेले पदार्थ वर्ज्य करावे म्हणून मी त्या कडे ढुंकूनही पाहत नव्हते.शिवाय म्हातारी घरात काही आणून देताना राजीला नका देऊसा हे वाक्य दहा दहा वेळा म्हणत उभा राहायची.मी मग मला तर कुठं खायचेय हे वाक्य तिला दहा दहा वेळा ऐकवायचे.तिने दिलेल काही खायचं नाही हा मी केलेला 'पण' एक दिवस मोडला त्याचे कारण एक दिवस तिने माझ्या अतीव आवडीचे दोन पदार्थ दिले होते एक म्हणजे कारलं आणि दुसऱ्या अळूच्या वड्या.मम्मीला नक्की माहीत असणार हे मी खाणारच.तिने जेवताना माझ्या समोरच ठेवल्या होत्या.माझ्या तोंडाला बघूनच पाणी सुटले आणि मी माझा पण मोडून सगळ्या वड्या आणि कारलं मीच एकटीने खाऊन टाकलं आणि मम्मी मागे हसत ऊभा होती.म्हणाली थांब सांगते आता आज्जीला,माझं पोटभर खाऊन झालं होतं पण मम्मीने हे जाऊन हे म्हातारीला सांगणे म्हणजे माझी मानहाणी होण्यासारखच होत.मी काकुळतीला आले,मम्मीने सांगितलं नाही पण ती मात्र वरचेवर मला हे सांगण्याची धमकी देऊन माझ्याकडून कामे करून घेऊ लागली.मला म्हातारीच्या नसत्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले गेल्यासारखं वाटू लागलं.आणि आपल जिभेवर नियंत्रण नसेल तर काय होऊ शकते याची शिकवण मला म्हातारीच्या कडू कारल्याने दिली होती.एका अर्थी ते कारलं माझं आद्य शिक्षकच होत.
छान!
छान!
फक्त ते भाग १८, १९, २० करा की संपादन करून...
@ami एकत्र करायचे का
@ami एकत्र करायचे का
@ami एकत्र करायचे का
@ami एकत्र करायचे का
नाही.
नाही.
सध्या जो भाग १९ आहे त्याच्यावर प्रतिसादात तुम्ही म्हणालात कि हा १८च आहे चुकून १९ नाव दिले.
तर सम्पादन करून १९ ला १८, २० ला १९ आणि २१ ला २० करा असे सांगतेय.
लयच भारी लिवलय राजी ..
लयच भारी लिवलय राजी ..
धन्यवाद धनवंती
धन्यवाद धनवंती
मी आज एकच भाग वाचला. आवडला
मी आज एकच भाग वाचला. आवडला मनापासून...!