Submitted by बेफ़िकीर on 23 May, 2018 - 13:55
गझल - अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
========
अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
पुरी धर्मांध करुनी माणसे वाटून घेऊ
विचारांनी वसवलेले शहर जाळून टाकू
पुढे ह्या शांततेचे कोळसे वाटून घेऊ
तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ
विरह दुःखे अबोले त्रास त्रागा आणि अंतर
तुझ्यामाझ्यात अपुली पाडसे वाटून घेऊ
बहुतसे एकमेकातच मिळाले मिसळलेले
निराळे राहिले तितके ठसे वाटून घेऊ
घडो नजरानजर कित्येक वर्षांनी पुन्हा ती
किती करतोय आपण धाडसे! वाटून घेऊ
दुरावा सोड, हो मनमोकळा, बघ अंत आला
जसे वाटायचे पूर्वी तसे वाटून घेऊ
इथे येणार नव्हतो पण मला आले निमंत्रण
इथे आलोच नाही मी असे वाटून घेऊ
किती केले सहन, प्रत्येक मन जपण्यास मीही
तरी मी 'बेफिकिर' आहे कसे वाटून घेऊ
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निव्वळ अप्रतिम! सुरेख! मस्तच!
निव्वळ अप्रतिम! सुरेख! मस्तच!
मस्त.!
मस्त.!
तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ
दुरावा सोड, हो मनमोकळा, बघ अंत आला
जसे वाटायचे पूर्वी तसे वाटून घेऊ
किती केले सहन, प्रत्येक मन जपण्यास मीही
तरी मी 'बेफिकिर' आहे कसे वाटून घेऊ
हे विशेष आवडले.!
धन्यवाद शाली, बी. एस.
धन्यवाद शाली, बी. एस.
जबरदस्त लिहिलय ,सुरेख ! ! !
जबरदस्त लिहिलय ,सुरेख ! ! !
>>>विचारांनी वसवलेले शहर
>>>विचारांनी वसवलेले शहर जाळून टाकू
पुढे ह्या शांततेचे कोळसे वाटून घेऊ
तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ>>>क्या बात है!
<<< किती केले सहन, प्रत्येक
<<< किती केले सहन, प्रत्येक मन जपण्यास मीही
तरी मी 'बेफिकिर' आहे कसे वाटून घेऊ >>> सुंदर
बेफिजी अप्रतिम लिहिलंय.
बेफिजी अप्रतिम लिहिलंय. लाजवाब !
विचारांनी वसवलेले शहर जाळून
विचारांनी वसवलेले शहर जाळून टाकू
पुढे ह्या शांततेचे कोळसे वाटून घेऊ
क्या बात.....
विरह दुःखे अबोले त्रास त्रागा
विरह दुःखे अबोले त्रास त्रागा आणि अंतर
तुझ्यामाझ्यात अपुली पाडसे वाटून घेऊ
बहुतसे एकमेकातच मिळाले मिसळलेले
निराळे राहिले तितके ठसे वाटून घेऊ
घडो नजरानजर कित्येक वर्षांनी पुन्हा ती
किती करतोय आपण धाडसे! वाटून घेऊ
दुरावा सोड, हो मनमोकळा, बघ अंत आला
जसे वाटायचे पूर्वी तसे वाटून घेऊ
एक एक शेर, नितांत सुंदर
अधांतरी, सत्यजित,
अधांतरी, सत्यजित, द्वादशांगुला, उपाशी बोका, असुमो
खूप आभार
सुरेखच
सुरेखच
वाह!!
वाह!!
झक्कास
झक्कास