लता स्वरपु ष्प ४: मौसम है आशिकाना

Submitted by अश्विनीमामी on 19 May, 2018 - 09:50

हे चौथे पुष्प लिहिताना महजबीन बानो अर्थात मीना कुमारी ह्यांची आठवण येते. दु:खांची राणी म्हणून गौरविलेली गेलेली ही गोड चेहर्‍याची व कवीमनाची प्रतिभावान अभिनेत्री फक्त वयाच्या अडतिसाव्या वर्शी वारली. नुकतीच तिची पुण्य तिथी झाली. जीवनकथा नेहमीसारखीच. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवायला ही सिनेमात कामे करू लागली. बैजू बावराच्याही आधी ऐन सोळाव्या वर्शी तिने अलाउद्दीन मध्ये एका गोड व हसर्‍या राज कन्येचीही भूमिका केली आहे. हा सिनेमा मी दूरदर्शन वर बघितला आहे. साधे ग्राफिक्स पण मजेशीर. व मीना एकदम नाजूक. क्युटी पाय.

पण जस जसे कामात स्थैर्य आले तसतसे भूमिकाही दु:खी मिळत गेल्या, वैयक्तिक जीवनात कमाल अमरोही सारख्या दिग्दर्शकाबरो बर एक्स्ट्रीम लव्ह हेट रिलेशन शिप मध्ये अडकली. संवेदनशील मनाची असल्याने सुकून मिळ वायला मद्याचा व ऊर्दू शायरीचा आधार घेतला. अनेक भावना कवितारूपात बद्ध करून डायरीत उतरवल्या. अश्या रिलेशनशिप मध्ये अडकले की व्यक्तीचा स्वतंत्र जगण्याचा आत्मविश्वास हळू हळू संपत जातो व नष्टच होतो. प्रेमिका शिवाय आपल्याला पर्याय नाही व त्याच्याबरोबर तर जमत नाहीये. मध्ये स्पेसेस उरतच आहेत अश्यावेळी त्या स्पेसेस भरायला कसकसले आधार घेतले जातात. खुदही को बुलंद कर इतना हा पर्याय हरवून जातो. त्यात अश्या कमकुवत अवस्थेचा फायदा करुन घेणारे नातेवाइक असले की मग एकच सुटकेचा मार्ग दिसतो जो तिने अंगिकारला...

फेब्रुवारी १९७२ मध्ये पाकीजा रिलीज झाली, पुण्यात नव्याने झालेल्या नटराज सिनेमातला हा पहिला सिनेमा. मी आई व मावशींबरोबर हात धरून गेले होते पण काहीही समजले नाही. ३१ मार्चला मीना वारली तेव्हा काळ्या बुरख्यातले तिचे चित्र सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर होते. ते आत्ताच्या भाषेत एपिक शॉट. बघताना मौसम है आशिकाना गाण्यातले निसर्ग चित्रण फारच मनोहारी वाटले होते ते ऑरेंज स्काय, पक्षी, आपली घरासमोरची मुठा नदी पहाटे पहाटे थोडीशी अशीच दिसते असे ही वाटले होते बालमनास...गाण्याचे शब्द असे आहेतः

मौसम है आशिकाना,
ऐ दिल कहींसे उनको ऐसेमें ढुंड लाना.

कहना के रुत जवां है और हम तरस रहे है
काली घटाके साये बिरहन को डस रहे है.
डर है न मार डाले सावन का क्या ठिकाना

सूरज कहीं भी जाये. तुमपर न धूप आये
तुमको पुकारते है इन गेसुओं के साये
आ जाओ मैं बनाउं पलकों का शामियाना

फिरते हैं हम अकेले बाहों में कोई ले. ले.

आखिर कोई कहांतक तनहाइयोंसे खेले.
दिन हो गये है जालिम राते हैं कातिलाना

ये रात ये खामोशी ये ख्वाब से नजारे
जुगनू है या जमीं पर उतरे हुए हैंतारे
बेखाब है मेरी आंखे मदहोश है जमाना.

सिचुएशन अशी आहे की नायक आपल्याच प्रेमात आहे. आग उधर भी बराबर लगी हुई हैहे नायिकेला कळते. ती स्वतः कोठ्याच्या कचाट्यातून उठून थोडे से स्वातंत्र्य उपभोगते आहे. फार काळापासून आपण ज्याचा शोध घेत होतो तो हाच हा एक भावनिक गारवा ती अनुभवते आहे.

द मेकिंग ऑफ पाकीजा व त्यातील गुलाम महंमद ह्यांचे संगीत हे दोन्ही स्वतंत्र लेखांचे विषय आहेत. वो किस्सा फिर कभी. दिग्दर्शकाने अजोड निसर्ग व फ्रेशनेस आणून बॉयफ्रेंड च्या कपड्यात अनोखे स्वातंत्र्य उपभोगणारी नाजूक व सुरेख अदाकारा आणून आपले काम केले आहे. ती स्वच्छंद निसर्गात बागडताना प्रियकराला लवकर यना असे साकडे घालते त्यासाठी लताचा स्वर्गीय गोड आवाज आहे. व संगीत काराने अनेक वाद्ये त्यात सुरुवातीलाच वेगळे असे फ्लूट वापरले आहे. व ताल वाद्ये अगदी सॉफ्ट आहेत. कधी कधी तर नुसते घुंगरुचे गुच्छच वापरले आहेत. अत्तरशास्त्रात कसे व्हॅनिला, चॉकोलेट मिल्की सॉफ्ट असे सुगंध एकत्र मेळ करून सुखद भावना जनरेट करतात तसे संगीतकाराने सुखी आनंदी सूर वापरले आहेत. नुकत्याच जन्मलेल्या ( अल्पायुषी ) प्रेमाचा ताजा करारा अंदाज लताजी आपल्या बेहतरीन आवाजात व्यक्त करतात.

किती सुरेख वातावरण उभे केले आहे. लताच्या आवाजत जी एक प्रकारची प्युरिटी आहे ती इथे चपखल बसते. पूर्ण गाण्याला बेस फीलिंग्ज, शारिरिकतेचा स्पर्शही नाही. उदा तू मुंगळा मुंग्ळा हे उषा च्या आवाजातले गाणे ऐका. हॉर्नी व डिलिशसली चीप साउंड आहे. ते गाणे ही आपल्याजागी आय कॉनिकच आहे. पण हे एका वेगळ्या लेव्हलवर आहे.

इथे फक्त प्रेम व प्रेमच गुलिस्तां भरून टाकते आहे. नायिका सुर्यालाच दटावते. मी माझ्या केशपाशात प्रियकराला उन्हापासून सुरक्ष्हित ठेवेन नाहीतर नयनांतच त्याचे घर बनवेन, मध्ये मग एक फ्लूटचा आलाप आहे. एकटे रहायला ती गांजली आहे आता मनाला सहजीवनाची, कंपॅनिअनची आस लागून राहिली आहे.

ह्या नंतर एक आलाप आहे तो जीव कुरवाळून टाकण्याजोगा आहे. एका ओळीतुन दुसृया ओळी कडे नेताना लता ज्या सफाईने मधला अवकाश जोडते ती कारीगरी ऑसम आहे. सलाम कुबुल करीये.

माझ्या डोळ्यातली स्वप्ने पण त्याने चोरली आहेत आणि ह्या मादक आशिकाना मौसम मध्ये मला आता त्याच्या मिठीतच खरा सुकून लाभेल..... हाय अल्ला उनको जल्दी भेज्दो. एक अतिशय हळूवार गाणे. हा नायक नेमका हिला सोडून कुठे गेलाय असे वाटून मीच हळहळले. असे एकांताचेक्षण किती कमी येतात. असे लाँगिन्ग पण कधीतरीच भावते. नाहीतर
रुक्ष नात्यातले व्यवहार.

एकट्या स्त्रीच्या आयुष्यात अनेक मोहाचे, कमकुवत पडण्याचे क्षण येतात. महजबीन बानुसारखी कोणी जीवनाचे जहर पिउन लवकरच हार मानून दुनियेला अलविदा म्हणते तर लताजींसारखी कोणी
आपल्या गोड आवाजामागे एक कणखर व्यक्तिमत्व खडे करून जीवनाने दिलेले पत्ते नीट खेळून लढा जिंकते. आपल्याबरोबर इतर लाखोंना जीवनात सध्या लुप्त होत चाललेले निवांत आरामाचे, गुलाबी प्रियाराधनाचे क्षण अनुभवण्याची छोटीशी संधी उपलब्ध करून देते. तुमच्या आवाजाने प्रकाशित केलेल्या जीवनाच्या खडतर अंधार्‍या वाटेवर आम्ही चालतोय दीदी. मोह पडतो तो फक्त हे गाणे परत परत ऐकायचा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages