Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होना पण बहुधा टास्क सिमिलर
होना पण बहुधा टास्क सिमिलर आहेत म्हनून तस वाटतय मला
मेघा स्वताच्याच प्रेमात इतकी
मेघा स्वताच्याच प्रेमात इतकी बुडालेली आहे कि विचारायचंच नाही . मदर्स डे च्या निमित्ताने तिथे काही जणांच्या आयांचे / काही जणांच्या मुला /मुलींचे फोन आले . मेघाच्या मुलीचा फोन आला होता तर ती मुलीला विचारते " मी कशी दिसते स्क्रीन वर ? " आं . कशी खेळते ते विचार ना . कशी दिसते काय ? तो सुशान्त तिला त्या खुर्चीतल्या टास्क च्या वेळी म्हणाला होता " तू जुईला पहायच्या निमित्ताने उठलीस . पण तुला स्वताचा चेहरा धुउन मेकअप करायचा होता खर तर "सुशांतने बरोबर ओळखलं . मी सतत चांगलीच दिसायला पाहिजे असं तिचा टोकाचा अट्टाहास असतो म्हणून चेहऱ्याला मेकअप फासून बसलेली असते सतत. तिचा चेहरा जेव्हा बघावा तेव्हा पांढरा फटक बाकी मान वगैरे काळी असा विचित्र मेकअप करते
पण राजेशच इतक्यात येण नाही आवडलं . आता परत प्रेमाचा महापूर आणि बोअर . राजेशच्या बायकोच /आईवडलांचं खरंच कौतुक आहे . राजेश चे आई -वडील पण बघत असतील ना ? नक्कीच आणि मुली ? मुली तर लहान आहेत त्याच्या . दोघी खूप गोड आहेत
राजेशला काही तारतम्य नाही,
राजेशला काही तारतम्य नाही, मुली कशा घेतील हे सर्व, मला त्यांचीच काळजी वाटते. थापा मारतोय आपली जोडी आवडतेय, जोडे हाणतायेत पब्लिक बाहेर.
मध्ये मध्ये news बघताना लावत होते तेव्हा हे म्हणत होता, रे रा दिसले की परत back to news असं करत मला news चॅनेल जास्त बघावं लागलं.
रेशम आस्ताद सुशांत एका जागी
रेशम आस्ताद सुशांत एका जागी बसून सर्वांना सतत नावं ठेवत असतात. स्मिता कॅप्टन म्हणून गेली त्या मशिनजवळ तर तिलाही बोलून झालं, अतिशहाणें समजतात स्वतः ला.
ऋतुजा मला तर जाम आवडायला
ऋतुजा मला तर जाम आवडायला लागलीयं. काय सॉलिड सजेशन दिलं तिने. फटाफट नॉमिनेशन देऊन टाका, बझर कधी बंद होइल सांगता येणार नाही. अन स्वतः पहिल्यांदा रे ला नॉमिनेट केल. जियो !
पुष्कर अन सैची खेचली अन नंतर सै पु मधल्या कमेंट वर खळ्खळून हसताना मस्तच
पुश्की नेहमीप्रमाणे भांबावलेला
काय सई पण फालतु डील करत होती
काय सई पण फालतु डील करत होती रे शी, पडली तोंडघशी.
ऋतुजा व मेघा ...आपले फेवरेट..
ऋतुजा व मेघा ...आपले फेवरेट..
मेघा मध्ये काय फायटींग स्पीरीट आहे.. मानल... अशी जोडीदार हवी. कशाही परिस्थीती मध्ये तरुन जाउ...
पुस्की आन सुस्की (सई) आजाबात
पुस्की आन सुस्की (सई) आजाबात आवडनास झाल्यात त्या..मेघाला दगा देण्यास सुरु केल्या पासन...
त्यो पुस्की अस भिरभीरल्या गत का असतय जनु... जत्रत गेल्यावर गठुड हरवल्यागत...
>>>>पण सुशांतला आस्तादपेक्षा
>>>>पण सुशांतला आस्तादपेक्षा जास्त वोट्स?
हे कुठे दाखवतात म्हणे?
अरे ते तिघे बॉटम ३ मध्ये होते... त्यातुन मग सुशांत सेफ झाला आणि थत्ते आणि आस्ताद डेंजर झोनमध्ये गेले म्हणजे सुशांतला आस्तादपेक्षा जास्त वोट्स मिळाले ना!
ऋतुजाने आज मस्त उडवली सई आणि
ऋतुजाने आज मस्त उडवली सई आणि पुष्करची बसल्याबसल्या
तुम्ही माघार घेतली म्हणाली!
पुष्कर नेहमीसारखा लगेच डिफेंसीव्ह झाला
रेशमला आज मस्त संधी होती सईला
रेशमला आज मस्त संधी होती सईला ग्रूपमध्ये ओढण्याची आणि मेघाला एकटे पाडण्याची.... पण माठपणा केला तिने!
आता सई मेघा बॉंडींग अजुन चांगले होणार!
आता सई मेघा बॉंडींग अजुन
आता सई मेघा बॉंडींग अजुन चांगले होणार!>>राजेश आला ना.. त्यामुळे सगळे आपापल्या कंपूला धरुन बसले.
रेरा तर मोकाटच सुटलेत. उनाची काव्काव जाम वाढणार आहे.
रेराच्या कंपूमधल्यांचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे, खुन्नसही वाढली आहे. आता परत कार्याच्या वेळी कंपू फोडला जाईल अन कळेल कोण कोणाशी किती प्रामाणिक आहे ते. आस्ताद विरुद्ध कंपूत असेल किंवा राजेश.
आता मानबाचा बच्चा आणि गुरव
आता मानबाचा बच्चा आणि गुरव सुसह्य वाटत असतिल पब्लिकला. मिसेस श्रुंगारपुरे मसाला कधी दळायला काढतात तेवढं पाहु.
बच्चा आणि गुरव नेहमीच सुसह्य
बच्चा आणि गुरव नेहमीच सुसह्य वाटत आलेत, धारक्कच डोक्यात जाते प्रेक्षकांच्या.
एक वेळ शिंगार गुरव मान्य.. पण भंगार म्हणजे बच्चा जरा जास्त होतय ☺️
रेरा तर मोकाटच सुटलेत.
रेरा तर मोकाटच सुटलेत.
>>> काहीही चाललंय... आय लव यु काय, डबल बेड वर एकत्र झोपू काय.. पप्प्या काय घेतायत.. एकाच चाद्रित झोपणे काय... बिग बॉस ला वाटत असेल trp वाढतोय पण बघवत नाहीय ही म्हातारी प्रेम कथा..
स्मिताला का नाही आईचा फोन आला
स्मिताला का नाही आईचा फोन आला. यायला हवा होता, she missing आई.>>
माझ्या पुण्याच्या मैत्रिणीने सांगितले कि तिची आई नाही .
मला सध्या ऋतुजा आणि स्मिता आवडतेय .
माझ्या पुण्याच्या मैत्रिणीने
माझ्या पुण्याच्या मैत्रिणीने सांगितले कि तिची आई नाही >> अरे बापरे. वडील तर तिचे वारलेले आहेत हे आधीच समजलं होत . सई तिच्यावर ओरडली तुझ्या बापाकडून वसूल करिन तेव्हा ती म्हणाली होती माझ्या बापाकडून वसूल करायला तुला वर जावं लागेल म्हणून. आई नाही -वडील नाहीत . नवऱ्याने पण खूप छळल . बिचारी . मला पहिल्यापासूनच स्मिता आवडत होती . ती व्यवस्थित खेळतोय . सगळं टास्क मध्ये ती कायम सक्रिय असते
आई आहे वाटतं की.. मागे बिबॉ
आई आहे वाटतं की.. मागे बिबॉ मध्येच थत्तेंंना सांगत होती मी एकटीच राहते मुंबईत पण शूटिंग वगैरे नसलं की आई येऊन राहते
पुष्करला कसं वागाव हेच
पुष्करला कसं वागाव हेच कळेनासं झालय.. ना इधरके ना उधरके असं झालय.. पण मला मेघा, सई, पुष्कर, ॠतुजा, उना यांचाच गृप आवडतो. भुषण, जुई, स्मि हे भार वाहिल्यासारखे त्या कंपुत आहेत.. थोडं एकेकट्याने खेळतील तर लोकं खरच त्यांनाहि डोक्यावर घेतील. आज काय घालतात राडा बघु
रेशम वा राजेश दोघांपैकी
रेशम वा राजेश दोघांपैकी कुणालाही कधीच असे प्रकार करताना पाहिले नाही (निदान दिसले नाहीत..). दोन प्रौढ व्यक्ती तिथे एकमेकाजवळ येत आहेत याचा ईतका बाऊ का केला जातोय..? थोडक्यात काय तर सर्व मुलींना बिकीनी टास्क वगैरे दिला तर बघताना मस्त एंजॉय करणार पण जरा कुणी कुणाच्यात अडकलं की आपल्याला डिसगसटींग वाटणार.>>>>>
प्रश्न प्रौढ व्यक्ती जवळ येण्याचा नाहीच आहे. प्रश्न आहे, ही व्यक्ती आपल्या पत्नीला एवढं गृहीत धरू शकते? इट्स डीसगस्टिंग. भलेही फॅमिलीला काही प्रॉब्लेम नसेल, किंवा असेलही, पण माझी बायको काहीही बोलणार नाही, एवढा माजोरडेपणा कुठून येतो?
बिकिनी टास्कविषयी म्हणाल तर, कुणी काय परिधान करावं, याच स्वातंत्र्य आहेच ना त्याला. भलेही मी बघणार नाही किंवा एन्जॉय करेन, पण तुम्ही स्वतःला कसेही प्रेसेंट करा. डोन्ट टेक युअर फॅमिली ग्रांटेड... स्वातंत्र्य आणि स्वैराचार दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या पत्नीला अशा उद्योगात गृहीत धरणं, सिम्पली नॉट डन.
पुन्हा... हे. मा. वै. म. Nothing Personal.
राजेशला सिक्रेट रूममध्ये
राजेशला सिक्रेट रूममध्ये ठेवलं तेव्हा त्याला बायकोला फोन करून कल्पना द्यायला मिळालेलं असणारे. चॅनलच्या क्रिएटिव्ह टीमला कळलंय की लोक रागाने का होईना पण बघत आहेत आणि trp मिळतोय तर ते तीच स्टोरी अजून तेल घालून आपल्यासमोर आणणार. मधल्या वेळात राजेशने बायकोला विश्वासात घेतलं की झालं.
स्मिता कॅमेरापुढे उभे राहून
स्मिता कॅमेरापुढे उभे राहून कुणाशी बोलत होती ? आय मीन तिच बोलण कुणाला अॅड्रेस होत .... आईलाच ना
दोन प्रौढ व्यक्ती तिथे
दोन प्रौढ व्यक्ती तिथे एकमेकाजवळ येत आहेत याचा ईतका बाऊ का केला जातोय..?...कारण त्या व्यक्ती म्हातार्या व मॅरीड आहेत.हे सगळं फॅमिलीली आधीच माहित असेल तरी त्रास होतच असणार नक्की. निदान मुलांना.
अनमॅरीड,यंगस्टर्स असते तर रोमेंटिक वाटलही असतं.कदाचित.
उगाच चुकीच्या गोष्टींना कशाला डिफेंड करताय.
हिंदी बिग बॉसच्या एका सिझन मधे तर एक लग्नही लागलं होतं.पण ते अनमॅरिड होते दोघं.
इट्स डीसगस्टिंग. +१
दोघांनाही माज आलाय बाकी काही नाही.
आई असावी स्मिताची, असं वाटतंय
आई असावी स्मिताची, असं वाटतंय काल ती कॅमे-यासमोर बोलली त्यावरुन.
दोन प्रौढ व्यक्ती तिथे
दोन प्रौढ व्यक्ती तिथे एकमेकाजवळ येत आहेत याचा ईतका बाऊ का केला जातोय..?...कारण त्या व्यक्ती म्हातार्या व मॅरीड आहेत.हे सगळं फॅमिलीली आधीच माहित असेल तरी त्रास होतच असणार नक्की. निदान मुलांना.
अनमॅरीड,यंगस्टर्स असते तर रोमेंटिक वाटलही असतं.कदाचित.
उगाच चुकीच्या गोष्टींना कशाला डिफेंड करताय. >> +१११११११
सगळं स्क्रिप्टेड आहे असं जरी मानलं तरी सर्वसामान्य लोक हा कार्यक्रम खराच समजतात.
चित्रपटात सगळं खोटं असतं हे लोकांना माहिती आहे..पण ईथे हे कलाकार लोक जरी व्यवसायाचा भाग म्हणून खोटं नाटक करत असतील तरी बाहेरच्या जगात ते सगळं खरं समजलं जाणार आहे. बिबॉ ची टॅगलाईन च आहे ना.." ईथे जे दिसतं तेच असतं .."
मग स्वतः ला प्रगल्भ कलाकार वगैरे समजणारे हे लोक अशा चुकिच्या गोष्टी स्क्रिप्टेड जरी असल्या तरी का करतात. त्याना पैसा मिळतो मान्य पण पण त्यांची खर्या आयुष्यातली इमेज पण हा कार्यक्रम बदलतो आहे हे याना कळत नाही का.
रे आणि रा ने प्रसिद्धी साठी जे केलय ते खरच खुप चीप वाटत होतं..त्यांचे चाळे घरातल्या वडीलधार्यांसमोर बसुन काल बघणं शक्यच झालं नाही.
असो...बाकी आपण कितीही पुढारलेला विचार केला तरी जे नाही पटत ते नाहीच पटत असं म्हणणार.
या दोघांपेक्षा पुष्कर ने घेतलेला स्टँड ..नेहेमी बायकोचा विचार करणे वगैरे जास्त योग्य वाटतं...
माझी आई नेहमी झी मराठी पाहते.
माझी आई नेहमी झी मराठी पाहते. काल पहिल्यांदाच बिग बॉस बघितले तिने तर रेशमच वागण पाहुन बोलली, "ही का सारखी चिकटतेय त्याला?"
त्यांचे चाळे घरातल्या
त्यांचे चाळे घरातल्या वडीलधार्यांसमोर बसुन काल बघणं शक्यच झालं नाही...बाकी आपण कितीही पुढारलेला विचार केला तरी जे नाही पटत ते नाहीच पटत असं म्हणणार...या दोघांपेक्षा पुष्कर ने घेतलेला स्टँड ..नेहेमी बायकोचा विचार करणे वगैरे जास्त योग्य वाटतं.. +१००
रे रा चीप. फेक असो वा खरी,
रे रा चीप. फेक असो वा खरी, Disgusting. काल channel बदलावं लागल मला.
पण माझी बायको काहीही बोलणार
पण माझी बायको काहीही बोलणार नाही, एवढा माजोरडेपणा कुठून येतो? >> अरे कॅमेराच्या पाठीमागे बिग बॉस ने त्याची आणि त्याच्या बायकोची भेट घडवली पण असेल . आपल्याला काय माहिती ? या सगळ्या नाटकाचे पैसे मिळतात त्या लोकांना. यांचे घरचे या सगळ्या गोष्टींना सरावलेले असतात. कित्येक ऑनस्क्रीन रोमान्स करणारे कलाकार ऑफ स्क्रीन एकमेकांच्या वाऱ्याला पण उभे रहात नसतात.शो संपला कि तू कोण ? मी कोण ? असही होऊ शकत
त्यातून राजेशने घरात शिरल्या शिरल्या खूप खोटी स्टोरी सांगितली कि त्यांनी मला अंधार कोठडीत ठेवल होत डोळे बांधून आणि काय काय . ते का ? तर तो खर काय ( सिक्रेट रूम मध्ये ठेवलं हे ) सांगू शकत नव्हता . त्याप्रमाणेच रेशम बरोबर हे सगळं प्रेमप्रकरण तो करतोय हे फेक आहे हेही तो सांगू शकत नाहीये . म्हणून तो टाइम पास म्हणून सारखा रे ला लव्ह यु -लव्ह यु करत असतो . त्याचे त्याला स्पेशल एक्स्ट्रा पैसे मिळत असतील जे तो इतरांना सांगू शकत नाही
मेघा जस म्हणाली माझ्या कडे
मेघा जस म्हणाली माझ्या कडे काही काम नाहीये . राजेश कडे तरी कुठे काय काम आहे ? त्याची बायको म्हणाली असेल "जा आणि कमवून तरी ये . नुसता घरात बसण्यापेक्षा . नाहीतर बिग बॉस घरात शिरल्या शिरल्या पाच दिवसात कस काय त्याला प्रेम झालं ? त्यातून रेशम पण आता त्याला जास्त भाव देत नाहीये . ती पण घाबरली आहे "अरे असं काय सगळं कॅमेरासमोर बोलतोस " वगैरे बोलतेय आहे ती . " मला तुझ्या बायकोची भीती वाटते. तीची काय रिअक्शन असेल " अशी रेशम ला पण भीती वाटतेय
Pages