बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो पर्यंत अंगावर घ्यायची चादर वेगवेगळी आहे तोपर्यंत एका बेडवर झोपण्यात काही वावगे नाही.

कॉलेजला असताना आम्ही मुलेमुली एकाच बेंचवर झोपायचो. बस्स मन साफ हवे.

मागे व्हॉटसपवर ईंग्लिश बिगबॉसच्या काही स्विमिंग पूल क्लिप्स पाहिल्या होत्या. त्या खर्‍या मानल्या तर या बाबतीत हिंदी बिगबॉस बालवाडी वाटेल Happy

उनाची केवळ नॉमिनेट केल्यामुळे चालू असलेली कावकाव फालतू वाटते. त्यामानाने सुसल्या कूल आहे. कदाचित तीला एका आठवड्यात हाकलण्याच्याच बोलीवर घेतली असेल.

पर डे मिळत असेल त्यांना.

तो विनित कॅप्टन म्हणून फारच मवाळ वाटतो. काल आरती आणि मेघा ला समोरासमोर बोलवून काय ती कामे सांगायची सोडून त्यांच्या मधे इकडून तिकडे पळत होता. बिबॉला सुद्धा त्याला बोलावून सांगावे लागले कि दिलेले काम त्याने प्लॅनकरुन इतरांकडून करुन घ्यायचे आहे.

स्मिता कोण? पप्पी दे पप्पी दे वाली ना? मग ओठ स्पेशल असणारच ना. >>> सस्मित, त्या गाण्यात तर तिचे ओठ Normal होते.

पुर्वी हिंदी बिग बॉसमधे वेगळ्या खोल्या होत्या की दोघांसाठी >>> हो, पण दोनचार सिझन्सनन्तर common बेडरुम ठेवायला लागले आहेत. मराठीत अस करु शकत नाही ना. सन्सकृती पाळायची असते. ती सई लोकूर मात्र पुष्कर जोग आणि सुशान्त शेलारच्या पाठी लागून सन्सकृतीची वाट लावतेय.

काहीच क्रियेटीव्ह नाही करता येत का? >>> तस काही नाही. टास्कस सुद्दा असतात बीबॉ मध्ये. काल होता ना टास्क, प्रार्थना- यज्ञ म्हणून.

स्मिता बरी वाटली स्वभावाने>>>> + १

<आस्ताद काळे> आजिबातच बॅलन्स्ड वाटला नाही>>> हो ना. काल तो सुसल्याची टिका करत होता. आणि ती मेधा धाडे सुसल्याच्या कपडयान्विषयी बोलत होती, स्वतः मात्र काय घालून फिरत होती?

मेधा धाडे उनाला आज्जीबाई बोलली.

काल आरती आणि मेघा ला समोरासमोर बोलवून काय ती कामे सांगायची सोडून त्यांच्या मधे इकडून तिकडे पळत होता>>> नैतर काय. त्या दोघीन्न्च पटत नाही एकमेकीन्शी, तर हा उगाच त्यान्च्यात Patch-up घडवायला बघत होता.

आज आस्ताद आणि उनाच वाजणारेय वाटत.

अनिल थत्ते किती मी मी करतात? Uhoh आपल्याला खूप कळतं, मी सर्वांना बोलतं करतोय पण मला कोण विचारणार वगैरे.
जुईचे एक पाहिले का? अनिल थत्ते बोलायला लागले की ती उगिचच हसते किंवा काहिबाही निराळंच बोलत राहते तिथेच.

अनिल थत्ते हा माणूस अगदी माझ्या लहानपणापासूनच मला आवडत नाही..एक पत्रकार म्हणून तर चांगले नाहीच ते पण माणूस म्हणून पण चांगला वागता येत नाही त्यांना..

आमच्या बाजुच्या इमारतीत राहायचे...म्हणजे आम्हीच आता तिथे राहत नाही..

काय त्यांच्या गाड्या, संपूर्ण गाडीवर ह्यांचाच पोस्टर प्रिंट केलेलं..

जिथे बघाव तिथे मी मी आणि मी पणा..

आज आरतीचं मनोगत ऐकायला मिळालं..
आधी मला फुल टपोरी वाटलेली ती पण तिलाही हळवा असा भुतकाळ आहे...ऐकून थोडसं वाईट वाटलं तिच्याबद्दल..

आस्ताद अती करतोय. फुकटचं फुटेज खाण्याच्या नादात सगळ्यांना शत्रू बनवून ठेवेल तो..
बिचार्‍या विनीतला कसं वागायचं हे अजून नीट कळलं नाहीये.
स्मिताचा भुतकाळ ऐकूणदेखिल वाईट वाटलं..
राजेश, जुई सध्या जसे वागताहेत त्यामुळे आता काही आठवडे ते सेफ असतील तरी नंतर अवघड होईल त्यांचे.
उना सारखं सारखं ब्राह्मण ब्राह्मण करते ते नाही आवडलं..

हिंदी बिग बॉसचे काही सीझन (बहुतेक ७,८,९) बऱ्यापैकी बघितले..... नवव्या सीझनच्या वेळेला इथेच मायबोलीवर धागा काढलेला.... त्याच्याच हेडरमध्ये लिहलेले या शो बद्दलचे मत इथे डकवतो:

"मला या शोचा फॉरमॅट फार आवडतो.... दिवसादिवसाला समीकरणे बदलतात... ग्रुप्सचे डायनॅमिक्स बदलतात.... लोकांचे अनेक नमुने बघायला मिळतात.... काही प्रचंड आवडतात तर काहींचा भयानक तिरस्कार वाटतो अन काहींकाही कमालीचे बोअर वाटतात
आता यातला किती भाग खरा असतो आणि किती स्क्रिप्टेड असते... मला खरच माहिती नाही.... पण पूर्णपणे स्क्रीप्टेड सिरीअल्सपेक्षा मला अश्या शो मध्ये जास्त नाट्य आढळते."

मराठी बिग बॉसनेही फारसा वेगळेपणा न आणता रुळलेल्या वाटेने जाणे पसंत केलेय.... अधुनमधुन बघतोय हा शो.... बरा वाटतोय.... फक्त अजुन जरा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असायला हवे होते असे वाटते!

या शो ची आणि फॉरमॅट ची गंमत अशी की तुम्ही फार दिवस गुडीगुडी मोडमध्ये आणि फेक इमेज पकडून राहू शकत नाही.... कधी ना कधी तुमची खरी पर्सनॅलीटी समोर येतेच (unless you are genuinely good in nature)..... Few people win the show and few people win the hearts.... Its very difficult to do the both!

आयपीएलमधून वेळ मिळेल तसा बघत राहीन हा शो!

स्वरुप टोटली सहमत.
मला आपलं सिरियल मध्ये काय चाललं आहे ते लक्षात ठेवण्यापेक्षा हे बिग बॉस वगैरे पहायला बरं वाटतं. नो स्क्रिप्ट, नो स्टोरी. सगळेच हिरो आणि सगळेच व्हिलन. कुठूनही पहा, मिस झाल्याची खंत नाही बाळगावी लागत.

. कुठूनही पहा, मिस झाल्याची खंत नाही बाळगावी लागत. >>>>> serials चे पण आजकाल हेच तर झाले आहे. आठ्वडाभर एकच दळ्ण द्ळ्तात. शिवाय एखादा सण असेल तर सगळ्याच serials मधे इथुन तिथुन तेच असते, लग्न सराई तर यान्च्याकडे वरषाचे बारा महिने असते. कुठे हि काहि हि बघा.

आस्ताद काल थत्तेना बरोबर बोलला. किती फुटेज खात होते, मी मी करत होते. ह्यांची स्टोरी संपतंच नव्हती. आस्ताद आणि अजून काहीजण रात्रभर जागे होते, दिवसा झोपले नव्हते. थत्ते पुराण काही संपत नव्हतं.

स्मिता, आरती याचं आधीचे आयुष्य खडतर पण तरीही स्मिताचा स्वभाव चांगला वाटतो.

उना आणि अनिल थत्ते Tom and Jerry खेळतायत एकमेकान्शी. Proud सुशान्त शेलार Positive वाटतोय मला.

भूषण कडू आणि स्मिताची स्टोरी माहिती नव्हती मला. काल Captain नेच दोन नियम मोडले. Biggrin माईक नव्हता घातला, अवेळी झोपला.

आस्ताद काल थत्तेना बरोबर बोलला. किती फुटेज खात होते, मी मी करत होते. + १

सई लोकूर आणि पुष्कर इन्गलिश मध्ये जास्त बोलत होते. Uhoh

सई लोकुर अती आगाऊ वाटते.
स्मिता चेहर्‍यावरून अ‍ॅटिट्युड वाली वाटते पण आतून मऊ आणि हळवी आहे असे वाटते. (एव्हन डाऊन टू अर्थ)
सेम विथ भूषण आणि आरती. भूषण ला ऐकून तर माझ्या डोळ्यात पाणि आलं.
इव्हन उना. मला त्यांचं आवडलं.
मेघा धाडे प्रचंड लाऊड... थत्ते नंतर मी मी करण्यात तिचाच नंबर लागतो. माझा राग, माझा ड्रेसिंग सेन्स, माझा पेशन्स Uhoh म्हणे माझा कडेलोट झाल्यावर माझ्याच रागाची मलाच भिती वाटते. Uhoh
धर्माधिकारी बोर.
अजूनी अस्ताद ला ऐकले नाहिये. बघु आज बोलेल बहुधा तो.
सुशांत आणि राजेश जबरी.. त्यातल्या त्यात राजेश तर अफाटच. (मी प्रेमात Proud :डोळ्यात बदाम असलेली बाहुली:)

किती फुटेज खात होते, मी मी करत होते>> थत्ते महागुरूंना टफ competition देऊ शकतात त्याबाबतीत..
'मी विनोबा भावेंचा, बाबा आमटेंचा पीए होतो, सहा मुख्यमंत्र्यांचा मीडिया advisor होतो' - थत्ते
आज गुगलून पाहिल्यावर कळालं की त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्याने 'बलात्कार कसा करतात' असा लेख छापून आणला होता गगनभेदीमध्ये.. Disgusting.
थत्तेनी अर्थातच असं काही लिहिल्याचं अमान्य केलं होतं..

मी एकमेव सिझन बघितला होता तोही बर्‍यापैकी उशिरा बिग बॉस *८ , भारी होता तो सिझन , इथे एकाचवेळेस स्मार्ट, अलर्ट, भावनिक सगळ असाव लागत , मोस्तली फेक लोक इथे लगेच उघडकिस येतात आणी टिकत पण नाहित , काही नुसतेच तमाशे करुन टीआरपी वाढवत राह्तात पण त्याना चॅनेल मोस्टली विनर होवु देत नाही.

मला खर तर थत्ते बाहेर पडावेत असा वाटतंय पण त्यांची आणि उषाताईंची चांगली जुंपत असल्याने टीआरपी साठी त्यांना ठेवतील असं वाटतंय . त्यातल्या त्यात भूषण आणि ऋतुजा काहीच टीआरपी देत नसावेत शांत शांत राहून त्यामुळे त्या दोघांपैकी एकाचा नंबर लावतील या आठवड्यात असा वाटतंय आणि दुसऱ्या आठवड्यात दोघांपैकी जो उरेल तो आणि तिसऱ्या आठवड्यात मात्र जुही गडकरी . कारण जुही पण शांत शांत असते. मग थत्ते

आणखीन एक कळत नाही . दिवस भर कॅमेरात सगळ्यांचं वागणं-बोलणं शूट होतंय पण त्यातलं काही सिलेक्टिव्ह शूट ते दीड तासात बसवतात. आणि त्यातही त्या थत्तेंना जास्त फुटेज देतात . हे काय आहे ? त्यामुळे तेवढच प्रेक्षकांना दिसत. तो राजेश पण दिवसभर कोणाकोणाशी बोलत असेल -भूषण पण आणि जुही पण त्या तिघांच शुटींग गेल्या चार दिवसात दाखवलच नाही सारखा आपलं थत्ते कॅमेरासमोर जाऊन काही तरी बोलतात तेच दाखवत बसलेत . आज फर्स्ट टाइम पाचव्या दिवशी तो राजेश जे काही बोलत होता त्यांच्या ग्रुप मध्ये ठरवत होता रेशम ला सारखा उचलून घेत होता ते दाखवलं . भूषण च हि बोलणं दाखवलं आणि जुईलाही पहिल्यांदी विनीत बरोबर बोलताना दाखवलं . नाही तर गेले चार दिवस फक्त थत्ते आणि उषाताईच Happy

जुई लोकुर डोक्यात जातेय कंप्लिट.. सारखं त्या पुष्करच्या आजूबाजूला ?? Uhoh माझा मेकप खूप झालाय का? हे त्यालाच विचारायचं? Uhoh आणि तिचे पाय कसले आहेत. Uhoh

अस्ताद वर मी फिदा... छान मराठी बोलतो आणि ऋतुजा चे अती पाणी वापरणे हे त्याला खटकलं.. ते मला खूपच आवडलं. मला तो शेवटपर्यंत हवा. Happy

गडकरी बाई किती कॉन्फिडन्ट वाटल्या Rofl
स्मिताला मत दिलं म्हणे कारण एलिमिनेशन ला २ दिवस राहिलेत, जायच्या आधी तिला कॅप्टन शिप चा अनुभव घेऊ दे. किती भोचकपणा? जसं काही स्मिता जाणार आहे हे ती गृहितच धरून निघाली आहे.

>>अस्ताद वर मी फिदा... छान मराठी बोलतो

आस्ताद एकदम टिपिकल पुणेरी आहे..... टोन, शब्द, attitude..... सगळ एकदम माझ्या पेठी/कोथरुडी मित्रांची आठवण करुन देणारे आहे!

Pages