अकरा हजार तीनशे कोटींचा चुना - नीरव मोदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2018 - 12:23

महिन्याअखेरीस दहाबारा हजारांचा ओवरटाईम हातात पडतो तेव्हा आपली तर ऐश झाली असे वाटले. खरे तर असतो आपल्याच मेहनतीचा पैसा. पण तरीही नेहमीच्या पगारापेक्षा जास्त म्हणून वरकमाई झाल्यासारखे वाटते. शॉपिंग होते, हॉटेलिंग होते, गर्लफ्रेंडसोबत डेटींग होते. फक्त त्या दहा बारा हजारांच्या ज्यादा कमाईत. मग हे अकरा हजार कोटींचे घोटाळे करणारे आनंदाने मरत कसे नाहीत?

सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला ११,३०० कोटी रुपयांचा गंडा घालून अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी देशाबाहेर फरार झाला आहे.
अशी बातमी ऐकल्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येणारे काही प्रश्न -
१) पहिलाच प्रश्न - हे नुकसान शेवटी आपल्यासारख्या सामान्य करदातांच्या खिशात हात घालून वसूल केले जाणार का?
२) त्या बॅंकेत ज्यांची खाती आहेत त्यांना याचा काही फटका बसतो का?
३) आपल्याला साधे छोटेमोठे कर्ज काढायचे असेल तर आपल्याला ईतका मनस्ताप होतो, हे असे घोटाळे बॅंकेच्या डोळ्यात धूळ फेकून होतातच कसे? बॅंकाना अक्कल नसते का?
४) एखादा राजकीय गॉडफादर पाठीशी असल्याशिवाय हे घोटाळे करणे शक्य असते का? ईथे कोण्या एका पक्षावर आरोप करायचा नाहीये.
५) आता हे पैसे वसूलणार कसे? आज काहीतरी हिर्‍यांच्या दुकानावर छापे घालून पाचेक हजार कोटी वसूलले असे ऐकले आहे. पण मग ती दुकाने बंदच पडली का? त्यात काम करणार्‍या लोकांचे काय? त्यांचा तर चालू महिन्याचा पगारही बुडालाच का? नोकर्‍याही गेल्याच..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> २०१३ ला कागदपत्र हरवल्यामुळे मल्ल्याच्या केसची कागदपत्रे हरवण्याचे समर्थन कसे काय होऊ शकते? >>>

समर्थन कोणी केलंय? फक्त आठवण करून दिली.

मुळात १,७६,००० कोटी रूपयांंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे गायब करणे आणि न्यायालयाच्या अवमानासंबंधी प्रकरणाचे कागदपत्र गहाळ होणे, यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

मल्याचे मुख्य प्रकरण, म्हणजे त्याला मनमोहन सिंगांंच्या कारकिर्दीत पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार दिलेले ९००० कोटी रुपयांचे बिनतारण कर्जाच्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे सुखरूप आहेत. हे न्यायालयाच्या अवमानाचे प्रकरण इतक्या वर्षांनंतर आजच काही माध्यमात आलंय व ते किरकोळ असून फारसे महत्त्वाचे दिसत नाही.

>>> म्हणजे त्यांनी चुका केल्या तर आम्ही पण करणार. >>>

म्हणजे २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधानांचा समावेश असलेल्या या महाप्रचंड घोटाळ्याच्या प्रकरणाची कागदपत्रे गायब करणे ही चूक होती तर.

>>> त्यांनी चूका केल्या म्हणून तर जनतेने त्यांना नाकारले आहे. >>>

चिंता नसावी. यांनी चुका केल्या तर पुढील निवडणुकीत यांनाही जनता नाकारेल.

२०१३ मध्ये हरवली असं सां गितलं ती कागदपत्रे १९९३ ते २००४ या काळातली होती.

कॅगने फुगवलेले नोशनल लॉसचे लाख कोटींचे फुगे पुन्हा लिलाव केला तेव्हा फुटले.

मल्ल्याला दिलेली कर्जे मोदींच्या राज्यात बुडित झाली.

मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी मोदींच्या नाकाखालून पळाले.

गायब होणार्‍या गोष्टी अधिकाधिक रोचक होत आहेत.

चीनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा रिपोर्ट संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून गायब झाला.

आले कॉंग्रेसचे अंधभक्त.

कोळसा खाणी भ्रष्टाचार प्रकरणाची ती कागदपत्रे हरवली नसून पुरावे नष्ट करण्यासाठी नष्ट केली होती कारण त्यात तत्कालीन पंतप्रधानांचा थेट सहभाग होता.

CAG ने केलेल्या नुकसानीच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त महसूल २०१५ पासून केलेल्या लिलावातून मिळत आहे. मनमोहन सिंग सरकारने कोळसा खाणींंचा लिलाव न करता सर्व खाणी आपल्य मर्जीतील लोकांना खिरापतीसारख्या फुकट वाटून देशाचे प्रचंड नुकसान केले हे यातून सिद्ध झाले आहे. न्यायालयात सुद्धा हेच सिद्ध झाले होते.

https://www.google.com/amp/s/wap.business-standard.com/article-amp/econo...

मुळात मल्याला ९००० कोटींचे विनातारण कर्ज मनमोहन सिंग सरकारच्या काळात दिले गेले ते बुडवण्यासाठीच दिले होते. कर्ज विनातारण देण्यास काही बँकांनी नकार दिल्यानंतर त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयातून व अर्थमंत्रालयातून ताकीद देऊन कर्ज देण्यास भाग पाडले गेले होते.

मल्या, नीरव मोदी वगैरेंंना विनातारण बुडीत कर्जे देण्याचा गुन्हा तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा आहे. मोदी सरकार यांना परत आणण्यात यश मिळवण्याच्या अगदी जवळ आहे. मल्या इंग्लंडमध्ये सर्व न्यायालयात खटले हरला असून काही काळातच त्याचे भारतात प्रत्यार्पण होणार आहे. नीरव मोदीला इ़ग्लंडने मागील दीड वर्षांपासून तुरुंगात ठेवले आहे व त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला काही काळातच निकाली निघेल. ते भारतात आल्यानंतर तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांचा त्या प्रकरणातील सहभाग उघड होणार आहे.

बादवे बोफोर्स बदनाम क्वात्रोची, युनियन कार्बाईडचा अँडरसन यांना कॉंग्रेसनेच भारतातून सन्मानपूर्वक जाऊ दिले होते हे स्मरत असेलच.

तुम्हीच दिलेल्या बातमीत ती कागदपत्रे २००४ पूर्वीची होती असं म्हटलं आहे.
तत्कालीन पंतप्रधानांत वाजपेयीही आले. तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताय.

सर्वोच्च न्यायालयाने १९९३ पासूनचे खाणवाटप रद्द ठरवले होते.

बाकी तुम्ही पुढे लिहिलेल्या गोष्टी सांगोवांगीच्या आहेत. त्यांच्यासाठी पुरावे नाहीत.
मल्ल्या ते मोदी परत आलेच हे केव्हापासून ऐकतोय.

लिलावात पैसे मिळालेले नाहीत तर खाणीं चालताहेत तितक्या वर्षांत मिळणार आहेत. तोवर ती गाजराची पुंगीच आहे. वाजते का बघू.

सगळेच सरकार भ्रष्टाचारी आहेत
खुशाल टिका करावी
पण आपला तो बाब्या हा बोलायचा अट्टाहास कश्याला?

राजकारण्यांची व्यक्तीपूजा करणे थांबवा आता लोकहो. कधीतरी देशाचाही विचार करा _/\_

सगळेच सरकार भ्रष्टाचारी आहेत
खुशाल टिका करावी
पण आपला तो बाब्या हा बोलायचा अट्टाहास कश्याला?
>>> +१.
हे माहित असून एकमेकांना झोडपण्यातच रस असेल तर हे निरंतर चालू रहाणार, कुठल्याही धाग्यात कुणी विषय आणला की बस.

>>> तुम्हीच दिलेल्या बातमीत ती कागदपत्रे २००४ पूर्वीची होती असं म्हटलं आहे.
तत्कालीन पंतप्रधानांत वाजपेयीही आले. तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताय. >>>

तत्कालीन बुजगावण्यानेच २००४-२०१३ या काळात खाणी फुकट वाटल्या होत्या. त्यामुळेच न्यायालयाने खाणवाटप रद्द केले होते.

>>> बाकी तुम्ही पुढे लिहिलेल्या गोष्टी सांगोवांगीच्या आहेत. त्यांच्यासाठी पुरावे नाहीत. >>>

कोळसा खाणीवाटपात घोटाळा असल्याचे सिद्ध झाल्यानेच न्यायालयाने ते रद्द करून लिलाव करण्याचा आदेश दिला होता. मनमोहन सिंग या घोटळ्यातील आरोपी असून त्यांनी या खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मिळवली आहे.

>>> मल्ल्या ते मोदी परत आलेच हे केव्हापासून ऐकतोय. >>>

श्रीराममंदीर निर्माणाबद्दल अशाच शंका घेतल्या जाते होत्या. ५ ऑगस्ट २०२० या दिवशी या शंका घेणाऱ्या सर्वांना सणसणीत थोबाडीत बसली आणि आता ते लाल झालेला गाल चोळत बसलेत.

>>> लिलावात पैसे मिळालेले नाहीत तर खाणीं चालताहेत तितक्या वर्षांत मिळणार आहेत. तोवर ती गाजराची पुंगीच आहे. वाजते का बघू. >>>

कलम ३७०, श्रीराममंदीर निर्माण, तोंडी घटस्फोट इ. सुद्धा गाजराची पुंगी समजले जात होते.

सर्वोच्च न्यायालयाने १९९३ ते २०१० या काळात झालेले कोळसा खाण वाटप रद्द केले होते. रद्द करण्याचे कारण वाटपासाठी ठरलेले निकष व पद्धत न्यायालयाला अमान्य होते. ते लिलावाने व्हावे असे न्यायालयाने ठरवले.

अरुण जेटली अन्य एका बाबतीत सर्वोच्च न्यायालयाबाबत Tyranny of the unelected म्हणाले होते.

ब्रिटिश कोर्ट प्रत्यार्पण करण्यासाठी अनुकूल....

होम सेक्रेटरी "प्रीती पटेल" यांच्याकडे प्रस्ताव जाणार.

नीरव मोदी समोर हाय कोर्टात जाण्याचा मार्ग अद्याप खुला.

<< रिटिश कोर्ट प्रत्यार्पण करण्यासाठी अनुकूल....

होम सेक्रेटरी "प्रीती पटेल" यांच्याकडे प्रस्ताव जाणार.

नीरव मोदी समोर हाय कोर्टात जाण्याचा मार्ग अद्याप खुला. >>

----- छान... प्रगती आहे.

ब्रिटनमधे अलिशान घर होते, चांगले जिवन जगत होता... पण तिथल्या वर्तमानपत्रात बातमी आली, घराचे फोटो आले आणि ( देशात परत आणायची) नसती ब्याद मागे लागली.

आपल्या गृहखात्याला आणि पोलिसांना काहीच थांगपत्ता नव्हता यावर विश्वास बसत नाही.
परत आणायची एक प्रक्रिया असते, त्यासाठी वेळ लागतो. बहुधा पुढच्या निवडणूकीच्या तोंडावर हे आणि इतर काही ठेवणीतले (जसे माल्या , ललितजी मोदी , चोक्सी) प्रकरणे बाहेर निघतील. त्याला "हालचालींना " जोरदार प्रसिद्धी मिळेल.... भर म्हणून रॉबर्ट वद्राचे नाव पण गोवतील.

देशातली जनता खुष....

पुलवामा -भाग दोन घडविले जाईल, अगोदरच पत्रकाचा मसुदा तयार असेल. नाव/ स्थळ / तारिख/ वेळ बदलेल. एक कुठलासा लकी आकडा स्विकारतील ( मागच्या खेपेला ३०० लकी होता म्हणजे ३०० किलोची स्फोटके, ३०० अतिरेकी मारले.... ३०० अतिरेकी सिमारेषा ओलांडायच्या तयारीत.... ३००.... ३००) मग बालाकोट-दोन घुसके.... जनतेच्या हर्षोल्लासाला आता सिमा रहाणार नाही.

सर्व जगभरांत अनेकांना देशभक्तीचे किंवा देशद्रोही अशा प्रकारची प्रमाणपत्रे मिळतील.

देशातल्या किती % लोकांना नोकर्‍या मिळाल्या, किती लोकांचे अच्छे दिन आले, अत्याचाराने ग्रासलेल्या किती % महिलांना कसा तत्काळ न्याय मिळाला... GDP कसा सुधरला आणि मुख्य नव्या शेती विषझाल्याद्या मुळे किती लाख शेतकरी आत्महत्या कमी झाल्या यावर मायबोलीवर नवे धागे निघतील.

आणि २०२४, २०२९ सोय नक्की.

हजारो कोटी रुपयांचा रामाच्या नावाने गोळा होत असलेला चंदा - रामाला कायमचे निवासस्थान मिळेल का ? रामाला कायमचे निवासस्थान मिळाले तर पुढे काय?

रामाला कायमचे निवासस्थान मिळाले तर पुढे काय?>> शहाजी महाराजांनी बांधलेला लाल महाल शोधायला घेतला तरी पुरे..!!!

<< बालाकोट सर्जिकल स्ट्राइक - दुसरी अ‍ॅनिव्हर्सरी . >>

------ ३०० अतिरेकी यमसदनाला पाठविले तो दिवस ?
पुलवामा घडविले नसते तर बालाकोट स्क्रिन वर दाखवायची गरजही पडली नसती. प्रेमांत, युद्धात आणि निवडणूकांत सर्व सर्व काही क्षम्य असते.

पुलवामा येथे स्फोट घडविला- ४४ जवानांची हत्या झाली नसती तर? जवानांना काहीच हालचाल करायची संधी पण मिळाली नाही आणि म्हणून हत्या.
शेकडो जवान (दोन हजार) त्या मार्गावरुन जाणार होते, तो मार्ग, वेळ आदी महत्वाची माहिती त्या स्फोट घडविणार्‍याला कुणी पोहोचविली?
(त्या काळात ) देवेंदर सिंग पुलवामाचे पोलिस अधिकारी नसते तर या व अशा क्षुल्लक प्रश्नांची उत्तरे बालाकोटच्या धुराड्यात विचारणे म्हणजे शुद्ध देशद्रोही पणा आहे.

पाकसमोर वज्रासारखे कठोर बनणारे श्री. नरेंद्र दामोदरदास मोदीजी हे चीन बाबत अगदी मेणाहूनही मऊ बनतात. "न वहां कोई हमारी सीमा में घुस आया है और न ही कोई घुसा हुआ है, न ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के कब्जे में है... " २० सैनिकांचे प्राण गेले, देशासाठी ते शहिद झाले पण जर कुणी घुसलेच नाही तर हे घडले कसे?

आज चीनने चार पावलांनी माघार घेतली आहे .... तर भारताने पंचवीस. जर ते देशाच्या आंत आलेच नव्हते तर माघार कुठून?

गलवानवर बिहार निवडणूक जिंकली ना मग झाले..! बालाकोटमधे शहीद झालेले २० जवान बिहारचेच होते हे विषेश.

आता ४ राज्यांच्या निवडणूक येताहेत..!

<< बालाकोटवर बिहार निवडणूक जिंकली ना मग झाले..! >>

----- गलवान... बालाकोट सरमिसळ

स्क्रिन वर अस्पष्ट दिसले ते होते बालाकोट , ३०० अतिरेकी मारले ते बालाकोट.

गलवान --- २० जवान शहिद---- बिहार निवडणूका---- गलवान येथे अगदी योगायोगाने बिहार रिजेमेंटच होती. निवडणूका जिंकायची सवय (चटक) लागली आहे. Happy

शुभ रात्र

कॉमेडी नाईटवाले उदय स्वप्नात पण पुलवामा पुलवामा बडबडत असतील.... पुरावा नाही काडीचा अन कांगाव्याला सगळ्यात पुढे!

हे सगळं / माहीती कोर्टात सादर करा.

बालाकोट मधे झाडं पडली असं आता पाकिस्तान सुद्धा म्हणत नाही.

इतके वर्ष काश्मीर मधे सैनिकांवर होणारी दगडफेकीचा आनंद घेणा-यांना असं वाईट वाटणारच म्हणा..अपेक्षित आहे

होना... अन त्या निवडणुका जिंकण्यासाठी काही शे सैनीकांच्या शहीद होण्याचं रक्त लागलं दातांना तर काय बिघडलं..!

तेच तर सांगतेय ताबडतोब कोर्टांत ही माहिती सादर करा ..

सैनिकांवर एकतर्फी होणारी दगडफेक टिव्ही वर आम्ही बघायचो, रमजान मधे अतिरेक्यांवर कारवाई नाही अशा एकतर्फी बातम्या ऐकायचो तसं आता आजिबात दिसत नाही..सैनिक empowered दिसतं

बिचारे किती सैनिक अशा appeasement मधे मेले, जायबंदी झाले. ..

दे दी हमे आजादी बिना Sad Sad

कोर्टात?

सिरेली बघून बघून बिंडोक भ्रम होत असतात त्यांना.... इग्नोर माडी!

Pages