Submitted by अननस on 1 January, 2018 - 00:57
मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र राहील्यास भाण्डणे होतात म्हणून वेगळे राहातो. आमच्या मुलाचे सन्गोपन चान्गले व्हावे यासाठी आम्ही काय करावे? या परीस्थीतीतून गेलेल्या लोकान्चे किन्वा समपदेशकान्चे अनुभव काय आहेत ?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला अनुभव नाही तरिही
मला अनुभव नाही तरिही सांगावेसे वाटते, पटले तर घ्या नाहितर सोडून द्या....
मुलासमोर भांडू नका.
मुलांसमोर जोडीदाराबद्द्ल नकारात्मक बोलू नका. आपले त्याच्याशी पटत नाही म्हणजे तो वाईट आहे असे नाही हे त्याला समजावून सांगा.
आमचे पटत नसले तरिही आमच्यासाठी तू खूप महत्वाचा/ची आहेस आणि आमचे तूझ्यावर अत्यंत प्रेम आहे हे त्या आपत्यास जाणवेल असे वागा.
तुम्ही वेगळे राहता तर ज्याच्याकडे मूल त्याचीच सगळी जवाबदारी असे होऊ देऊ नका, त्या वाटूण घ्या.
दोघांनी मुलाबरोबर वेगळा वेळ आणि थोडा एकत्र वेळ घालवा.
एकत्र वेळ घालवताना स्वतःचे प्रॉब्लेम्स पूर्णपणे वेगळे ठेवा. त्याला काय आवडेल ते करा त्यावर बोला, चित्रपट पहायला जा, एकत्र जेवण बनवून जेवा, फिरायला जा.
सोनाली यान्च्या वरिल मताशी
सोनाली यान्च्या वरिल मताशी सहमत....
मुलांचे संगोपन नीट व्हावेसे
मुलांचे संगोपन नीट व्हावेसे वाटत असेल आणि अजूनही एकत्र संसार करण्याची इच्छा दोघांमध्ये ही असेल तर एकत्र जाऊन समुपदेशन घ्या, जर त्यातून मार्ग निघाला नाही, भांडणे होतच राहिली तर वेगळे व्हा. पण पेपरवर टाईम टेबल सारखे पोराला वाटून नका घेऊ. त्याला/तिला हवं तेव्हा आई बाबाकडे जाता आलं पाहिजे अशी सोय ठेवा.
तुझ्याकडे ४ दिवस राहिलं माझ्याकडे २ च दिवस यावरून वाद घालू नका.
सोनाली, तुम्ही दिलेला
सोनाली, तुम्ही दिलेला प्रतिसाद खुप उपयोगी आहे. याचा प्रयत्न व्हायला हवा. अनेक वेळा अस दिसते कि लहान मुले आपल्याला वाटते त्यापेक्शा लवकर परिस्थीती त्यान्च्या परिने जाणुन घेतात. आई बाबां बरोबर खुप छान वेळ मुलान्चा गेला तरिही ते एकत्र घरी जात नाहीत किंवा रहात नाहीत यावरुन त्याना कळते कि काही तरी बरोबर नाही. मुले झाल्यावर वेगळे होण यामध्ये मुलान्वर निश्चीतच अन्याय होतो, त्याना दु:ख होते. आपण फक्त याची काळजी घेउ शकतो कि या दु:खाने त्यान्च्यावर विशेष दुष्परिणाम होणार नाही.
दक्षिणा, सगळ्या गोष्टी कडे, सकारात्मक आणि निर्णयात्मक द्रुष्टीकोनातुन बघायला लावणारा आहे. याचा निश्चित विचार करेन.
आयुष्य फार छोटे आणि सुंदर आहे
आयुष्य फार छोटे आणि सुंदर आहे, असलेला प्रत्येक दिवस संण असल्यासारखा साजरा करा जोडीदाराला क्षमा करा, मागचे कटू अनुभव पुन्हा उगाळून वर्तमान काळ खराब करू नका, अगदी डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्या कदाचित काही शारीरिक मानसिक वेदना असल्यास त्यावर औषद उपाय मिळून जगणे आनंदी होईल, आणि मुले ती तर काय देवाची ठेव आज तुमच्या जवळ आहेत, तुम्ही भांडा किंवा प्रेम करा , पंखात बळ आल्यावर नक्की उडून आपले आकाश अवकाश धुंडळणार आणि त्या नंतर तुम्हाला फक्त आठवणी आणि आकांडतांडव केल्या असल्यास फक्त पश्यात्ताप राहील, आणि मुले कडवट अनुभव आल्यामुळे तुम्हाला त्याची अनेक पटीने नक्की परतफेड करतील तेव्हा वेळीच जागा व्हावं आणि जीवनाचा पूर्णवनंड घ्या
जर खरच काळजी असेल ना मुलाची
जर खरच काळजी असेल ना मुलाची तर मतभेद विसरुन एकत्र या , केवळ पटत नाही ह्या एका कारणासाठी वेगळे होऊ नका , तुम्हाला एकमेकांना समजून घेऊन तडजोड करता येत नाही म्हणून मुलाने आयुष्यभर तडजोड करत रहायची , मोठ्यांना मोठ्यांसारख वागता येत नाही म्हणून लहान लेकराने अकाली प्रौढ व्हायच
त्याने का सहन करायची आयुष्यभराची शिक्षा आणि तेही कुठलीही चुक नसताना ?
आई किंवा बाबा अस दोघांपैकी एकाला निवडताना फार त्रास होतो मनाला , जीवाची अक्षरशः फरफट होते ,आईकडे असताना वडीलांची आठवण येते आणि वडीलांकडे असताना आईची ओढ वाटत राहते
लहान वयात मनावर जे ओरखडे उठतात ते आयुष्यभर मनाला यातना देतात , हे सगळ बोलतेय कारण आई वडील वेगळे झाल्यावर काय त्रास होतो हे मी लहानपणापासून सोसलय , गेल्या अनेक वर्षात शांत झोप लागली नाहीये , आई आणि वडील दोघांच सोबत असण खूप मिस केल कायम
खरच अक्षरशः हात जोडून विनंती आहे की जर खरच काही फार गंभीर कारण नसेल तर वेगळे होऊ नका प्लीज
भावनेच्या भरात अधिक उण काही बोललं गेल असेल तर क्षमस्व
१. मुलांना वेळ द्यावा
१. मुलांना वेळ द्यावा.
२. मुलांसमोर कधी भांडू नये.
३. मुलांना ही जाणीव करून द्या की, ते तुम्हाला कधीही फोन, मेसेज करू शकतात.
४. तुम्ही काय करतात, ऑफीस मध्ये किंवा इतरत्र या बद्दल मुलांना सांगा, जेणेकरून मुलं सुद्धा ते काय करतात, वेळ कसा घालवतात ते तुम्हाला सांगतील.
५. मुलांच्या छंद, हॉबी बद्दल त्यांच्याशी गप्पा मारा. त्या बद्दल जाणून घ्या, त्या बद्दल प्रोत्साहन द्या.
६. तुमच्या पार्टनरला किंवा त्यांच्या घरच्यांना मुलांसमोर नावं ठेवू नका.
७. मुलांवर चिडू नका, कोणत्याही प्रकारचा राग मुलांसमोर व्यक्त करू नका.
8. मुलांसमोर रडू नका.
9. थोडक्यात, नकारात्मक भावना मुलांसमोर व्यक्त केल्या, तर मुलं अशा भावनां पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.
१०. मुलांना भेटवस्तू द्या. असं काही जे त्यांना उपयोगी पडेल, ते खूप वर्ष वापरू शकतात, या गोष्टी मुलं लक्षात ठेवतात
परत एकदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे..
मुलांना वेळ द्या.
तुम्हला मुले किति आहेत
तुम्हला मुले किति आहेत
माझे parents ७वर्ष वेगळे राहत
माझे parents ७वर्ष वेगळे राहत होते मग त्यांनी divorce घेतला. दोघांनीही दुसरं लग्न केलं.आज या गोष्टीला 10 वर्ष झाली. आता दोघांनाही वाटत कि 'त्यावेळी' जरा समजून घेतलं, आततायीपणा केला नसता तर किती बरं झालं असत..आणि मुलगी म्हणून हे ऐकताना फार त्रास होतो मला...म्हणून मी म्हणेन Parent झाल्यावर आंधळेपणाने निर्णय घेऊ नयेत, कुणाच्याही बोलण्यात येऊन आपले मत ठरवू नये..
चैतन्य, तुमची यादी खूपच कठीण
चैतन्य, तुमची यादी खूपच कठीण आहे हो..
1, 2, 6, 7, 8, 9 तर अशक्य आहे
आणखी एक प्रश्न म्हणजे, असा वागणे हे कृत्रिम वागणे नाहीये का..
घरात/ लग्नात प्रॉब्लेम असतील तर ते लपवून ठेवून काय फायदा आहे.. मुलांना पण कळू दे की.. की लग्न संस्थे मध्ये नक्की काय प्रश्न असतात, त्यांच्या निर्णय समयी उपयोगी पडेल ते..
सध्याच्या व्यक्ती स्वातंत्रतेच्या जमान्यात लग्न संस्थे चे पुनर्निर्माण होणे गरजेचे आहे.. अर्थातच स्वैराचार टाळून( हे मा वै म)
कसे आणि काय पुनर्निर्माण व्हावे किंवा करायचे हे माझ्या बुद्धी पलीकडचा विषय आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी लग्न झाल्याशिवाय केला नाही, आमच्या पालकांना वाटले ही नाही की असा काही विचार करायची गरज पडेल
मला वाटते आहे की मुलांना जेवढी लवकर समज येईल, तेवढी लवकर ती उत्तर शोधतील, अगदी समाज बदल नाही घडवला तरी स्वतः पुरेसा बदल तरी घडवतील..
काल इथल्या वर्तमानपत्रात एक
काल इथल्या वर्तमानपत्रात एक कल्पना वाचली. Nesting.
म्हणजे मुले सध्या ज्या घरात रहातात तिथेच त्यांना राहू द्या. आठवड्यातून काही दिवस एकाने तिथे रहायचे, दुसर्याने कुठेतरी खोली घेऊन रहायचे. (जसे आपसापसात ठरवाल तसे). म्हणजे मुलांचे आयुष्य आहे तसेच चालू राहील, त्यांना दोघांचेहि अत्यावश्यक असलेले प्रेम मिळेल.
तुम्हाला एकत्र रहायचे नसेल तर मुलांसाठी हा त्रास सोसा. जबाबदारी आहे तुमची.
जबाबदार्या न घेता संसारात राहून निव्वळ स्वार्थीपणाच करायचा असेल तरी मुलांचे आयुष्य विस्कळित करू नका. एक दिवस कायदाच आणला पाहिजे की मुलांची जबाबदारी न घेतल्याबद्दल शिक्षा! मग करा स्वार्थीपणा!!
कायदेशीर सल्ला हवाय का?
कायदेशीर सल्ला हवाय का?
त्यासाठी इनपुट अपुरं आहे.
माय आणि बाप एकाच वेळी दोन
माय आणि बाप एकाच वेळी दोन भूमिका करताना काय तारांबळ उडते हे ज्याचे त्यालाच माहीत
नन्द्या - मी हेच लिहायला
नन्द्या - मी हेच लिहायला आलेले.
मला चा न्गला वाटला विचार.
मुल त्याच घरात रहातं.त्या च्याकरता मे जर बदल घ डत ना ही.
आ ई बाबा नी वेग ळीकडे र हावे आ ल टून पालटून.
(अर्थात इकोनॉमिकली शक्य असल्यास).
जवळपास रहाणे शक्य असेल आणि अमिकेबली शक्य असेल तर त्याचाही विचार करा.
मुलं भरडली जाऊ नयेत असे वाटते.