कॉलेजातील मस्ती नि यारों की फुलवारी
नव्हतीच ती स्वस्ती तरी पण फुलवली भारी
कट्टा नि कटिंग चाय भी होता था शेरिंग
नडला आम्हाला की झालाच साऱ्यांना बोरिंग
नुसत्या एका नजरेने आंखोसे मार डालना
कुठूनस मनात धकधक तर हार्टबीट बढना
इशारो इशारो में ही पुरा पिरेड ऑफ जाना
घायाळ होतांना लाईफ के ख्वाबो में खो जाना
वहीतली चिठ्यांची गर्दी, ग्रीटिंग का कलेक्शन
रात के अंधेरी चद्दर में ढीगभर पत्रांशी कनेक्शन
बीच आया संडे भी वाटत होता मोठा अफेक्शन
कोई तो बताओ यार प्रेमातलं सही डायरेक्शन
ये जीना, शायनिंग स्टाईल पुरे होत समजायला
प्यार के खेल पहिल्यांदा लागले होते जमायला
नामंजूर था एक होना हे लागलं होतं कळायला
क्या पता उन्हे कॉलेजचं प्रेम नसतच निभायला
इश्क हुआ लेकीन खून के रिश्तों में खोट आई
नन्ही जानो को पता नही था घरो में आग आई
दिल बड़ा किया दोनोंने प्यार में कुर्बानी लाई
घर की झूटी मिजाज में जिंदगी दाव पे लगाई
फिर....
केहने को चांस मिला उन्हे कॉलेजच काय प्रेम असत?
बड़ा दिल नही था बड़ों का उधारीच हृदय असत
उन्हे क्या मोहोब्बत से ?युद्ध जिंकल्यात सार असत
इश्क़ मे लुट जाना हे शेवटी कवितेपुरतच छान असत
व्वा! खूप छान..
व्वा! खूप छान..
धन्यवाद मेघाजी !!!
धन्यवाद मेघाजी !!!
प्रेम कर भिल्लासारख हे
प्रेम कर भिल्लासारख हे कवितेतच छान वाटत<<<<
ही ओळ पूर्ण मराठीत आल्याने आधीच्या ओळींत सांभाळलेला अर्धी हिंदी, अर्धी मराठी ब्यालन्स कवितेच्या अगदी शेवटी जातो. कवितेच्या बाबत 'आधी कळस, मग पाया(सूप नव्हे, बेस)' अशी स्थिती असल्याने शेवटाकडे असा ब्यालन्स जाणे बरोबर नाही. पाया कमकुवत राहून कविता कोसळू शकते व तिचा योग्य तो प्रभाव पडत नाही. तरी यात काही बदल करता येतील का?
बाकी कविता वाचून महाविद्यालयात जायला हवे होते, असे पुन्हा एकदा वाटले व मन खंतावले.
श्रद्धाजी, तुमचा मुद्दा
श्रद्धाजी, तुमचा मुद्दा चिंतनीय आहे. प्रेम करो भल्लाल की तरह असा बदल कसा वाटेल?
अगदी सही रहेगा सत्यादा...
अगदी सही रहेगा सत्यादा...
भल्लाल वरून याद आया... आधी मला 'महाविद्यालयात जायची तमन्ना होती पण कुणी महेंद्र बाहुबली भेटला नाही' हे वाक्य लिहायचे होते.
धन्यवाद श्रद्धाजी तुम्ही जे
धन्यवाद श्रद्धाजी तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे ...पण भावनेच्या भरात ती ओळ चपखल बसली व आधीच्या कळसा विषयी विसरून गेलो... त्यात बदल करायचा नक्की प्रयत्न करेन !!!
प्रेम कर भिल्लासारख हि ओळ
प्रेम कर भिल्लासारख हि ओळ टाकायची तीव्र इच्छा होत असताना हि यमक न जुळल्याने शेवटच्या काही ओळी बदलल्या आहेत...!
माहित नाही कश्या आल्यात ...