सध्या आपले धर्मनिरपेक्ष सुप्रीम कोर्ट फार सक्रिय झाले आहे. जागोजागी फटाकेविक्रीवर बंदी आणली आहे. हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशात भारतभरात दिवाळी हा सण फटाके फोडून साजरा केला जात असल्याने जनमाणसांत तर्हेतर्हेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
विचारसरणी क्रमांक १ -
ऐन दिवाळीतच यांना प्रदूषण आठवते का? हॅपी न्यू ईयरला फटाके उडवले तर चालते वाटते? त्याने प्रदूषण नाही का होत? (भले तेव्हा फटाके उडवणारेही आपलेच लोकं का असेना) पण या बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंच्या सणांनाच पर्यावरणाची काळजी का वाटते? दिवाळीला फटाके नको, गोकुळाष्टमीला हंडी नको, होळीला पाण्याची नासाडी नको. पण बकरी ईदला रस्त्यावर बकरे कापलेले आणि रक्ताचे पाट वाहिलेले बरे चालते.
चेतन भगतसारख्या विचारवंत साहित्यिकाने देखील असेच काहीसे टवीट केले आहे.
Chetan Bhagat ✔@chetan_bhagat
आज अपने ही देश में, उन्होंने बच्चों के हाथ से फुलझड़ी भी छीन ली। हैपी दिवाली मेरे दोस्त।
11:44 AM - Oct 9, 2017
Chetan Bhagat ✔@chetan_bhagat
Can I just ask on cracker ban. Why only guts to do this for Hindu festivals? Banning goat sacrifice and Muharram bloodshed soon too?
11:37 AM - Oct 9, 2017
चे. भगतची बातमी ईथे वाचू शकता - http://www.loksatta.com/desh-videsh-news/chetan-bhagat-wants-diwali-cele...
विचारसरणी क्रमांक २ -
दरवेळी प्रत्येक गोष्टीला धर्माच्या चष्म्यातून बघणे गरजेचे आहे का? प्रदूषण खरेच एक गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या चार दिवसात करोडो फटाक्यांतून एकाच वेळी निघणारा विषारी धूर रोखणे खरेच गरजेचे आहे.
संबंधित बातम्या खालील लिंकावर वाचू शकता
http://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-court-bans-firecrackers...
http://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-imposes-ban-on-sale-of-fir...
मला दुसरी विचारसरणी पटते.
मी स्वत: ईयत्ता आठवी नववी पर्यंत फटाके वाजवण्याचा आनंद लुटला आहे. त्यामुळे आपण आपल्या लहानपणी जो फटाक्यांचा आनंद लुटला त्याला आताची लहान मुले मुकतील असाही विचार मनात येतो. पण उद्या जर त्यांना मोकळ्या आणि शुद्ध हवेत श्वास घ्यायचा असेल तर हे गरजेचे आहे. ही वेळ आपण स्वत:च त्यांच्यावर आणली आहे. तर आता उगाच हळहळ व्यक्त करण्यात अर्थ नाही.
तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या आनंदासाठी पर्यावरणाचा र्हास करत दुसर्यांच्या जीवाशी खेळ करू शकत नाही.
आपले काय मत आहे?
भाचा वेलकम बॅक
भाचा वेलकम बॅक
ऋन्मेष,
पाऊस, चक्र, फुलबाज्या हे फटाके पुरेसे पुरुषी नाहीयेत रे..
लाख भर रुपयांचे पाऊस उडवलेस तरी वायू प्रदूषण टळणार नाही,
मी तर म्हणतो सरळ फटाके विक्री दुकानावर आधार नम्बर सक्तीचा करावा, प्रत्येकाला 1000 रु चेच फटाके घेता येतील अशी लिमिट ठेवावी
कोण रे ते बंदी बंदी बोलणारे?
कोण रे ते बंदी बंदी बोलणारे? विकण्यावर बंदी आहे वाजवण्यावर थोडी आहे...?
दिल्लीकरांनो खुशाल फटारे उडवा. दरवर्षी 3000 चे घेत असतील तर यंदा 8000 चे घ्या. मोठ मोठे आवाज करणारे फटाके निवडून घ्या. पाऊस, भुईचक्र, नागाच्या गोळ्या, फुलबाजाची मोठी कांडी या सारख्या भरपुर धूर होणारे फटाके आवर्जून घ्या. एक एक लवंगी न जाळता 5000-10000 च्या माळा लावा त्याचा आवाज मोठा होतो आणि धुर पण जास्त होतो.
पुढच्या पिढीला लंग कँन्सर होईल, दम्याचे रोग होईल, डोळ्यांचे रोग होतील, त्याची फिकर आता का करायची? आज नाही तर उद्या हे होणारच आहे.. फटाक्याने नाही तर सिगरेट ने रोग होतील त्याचे आपल्याला आता काय करायचे? आपला सण, धर्म महत्त्वाचे बाकीचे खड्ड्यात गेले.. 5000 पेक्षा जास्त वर्षाहून जुना धर्म आहे. अशा नोटीसींमुळे धर्म बुडणार नाही.. फक्त खतरे में येऊ शकतो. त्यामुळे धर्मावर आलेले संकट टाळायचे असेल तर फटाके फोडाच एक वेळ फराळ करू नका पण त्या पैशातून यंदा फटाके घ्या नविन कपडे घेऊ नका पण फटाके घ्या.
तिकडे जवान सियाचिन मध्ये देशाचे रक्षण करत उभे आहे आणि तुम्हाला धर्माचे रक्षण करण्यासाठी फटाके घेता येणार नाही?
फटाके आणि धर्म वगैरेचा काय
फटाके आणि धर्म वगैरेचा काय संबंध ?
फटाक्यांची विक्री आधारकार्डशी
फटाक्यांची विक्री आधारकार्डशी जोडावी.
एका महित्यात, एका आधारकार्डवर कमाल ६ टिकल्यांच्या डब्या (एका डब्यात कमाल ५० टिकल्या), लवंगी फटाक्यांच्या ४ माळा, २ इंच लांबी आणि १/४ इंच व्यासाच्या फटाक्यांची एक माळ ( एका माळेत कमाल ४० फटाके), २ पाऊस, २० नग फुलझड्या. चार आधारकार्ड मिळुन एक मल्टीशॉट. या धर्तीवर आकार, प्रकार आणि संख्यांच्या कमाल मर्यादा घालून फटाक्यांची विक्री करावी. फटाक्यांचे शेल्फ लाईफ १ महिन्यांच्यावर रहाणार नाही अशी त्यांची रचना असावी.
मग आधार कार्डचे राशन कार्ड
मग आधार कार्डचे राशन कार्ड बनेल
>> या फटाक्यामुळे मागच्या
>> या फटाक्यामुळे मागच्या वर्षी सोसायटीतलं एक घर जळता जळता थोडक्यात वाचलं होतं .
हो हा धोका अनेक ठिकाणी असतो. त्यात आणि उंच मजल्यांवर राहणारे कुटुंब असेल आणि ते दिवाळी सुट्टीला बाहेर गेले असेल तर खिडकी उघडी असते बरेचदा त्यातून फटाके आत येतात.
आमच्या इथे खूप वर्षांपूर्वी एकाच्या घरी बरेच पै पाहुणे आले होते. मोठी पंगत बसली होती. जेवायला वाढले. आता सगळे सुरु करणार इतक्यात ग्यालरीतून एक रॉकेट आले आणि सगळ्यांच्या ताटांवरून निघून गेले
रॉकेट पडून तर आमचं लाकडी घर
रॉकेट पडून तर आमचं लाकडी घर जळायला लागलं होतं, खूप वर्षाआधी. सेम, ताट सोडून आग विझवायला पळायला लागले.
फटाके आणि धर्म वगैरेचा काय
फटाके आणि धर्म वगैरेचा काय संबंध ?
>>>>>
संबंध नाही असेही बोलता येत नाही.
दिवाळी हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा सण आहे आणि आजच्या तारखेला (किंबहुना माझ्या वडिलांच्या जन्मापासून) तो फटाके वाजवून साजरा केला जातो.
अर्थात धर्माशी संबंध जोडत फटाक्यांच्या दुष्परीणामांना लपवणे हे चूक आहे, पण संबंध नाही असेही बोलू शकत नाही.
फटाक्याने नाही तर सिगरेट ने
फटाक्याने नाही तर सिगरेट ने रोग होतील त्याचे आपल्याला आता काय करायचे?
>>>>>>
व्हॉटसपवर मेसेज फिरतोय असा.. सिगारेटवर जसा वैधानिक इशारा देऊन विकता तसे फटाक्यांबाबत का नाही करत?
दारूचे तर उलटे उदात्तीकरणच चालू असते. मग याच दारूला का विरोध असेही कोणी बोलू शकतोच..
(याच आशयाची मागे मी एक लघुकथाही लिहिली होती - ही त्याची जाहीरात - चिंगी आणि मॅगी - https://www.maayboli.com/node/54206 )
सरकार आणि न्यायालयाच्या या अश्या धोरणामुळे यांना खरेच जनतेची काळजी असेल असेही मग कधी वाटत नाही.
हो, असल्यास पर्यावरणाची असू शकेल !
दारूचे तर उलटे उदात्तीकरणच
दारूचे तर उलटे उदात्तीकरणच चालू असते. मग याच दारूला का विरोध असेही कोणी बोलू शकतोच..
>>> अहो ती दारू वेगळी, ही वेगळी. ती प्यायची, ही काय खायची दारू आहे का..
फटाके आणि धर्म वगैरेचा काय
फटाके आणि धर्म वगैरेचा काय संबंध ?
>>>>>
संबंध नाही असेही बोलता येत नाही.
दिवाळी हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा सण आहे आणि आजच्या तारखेला (किंबहुना माझ्या वडिलांच्या जन्मापासून) तो फटाके वाजवून साजरा केला जात
---पण हे exclusive नाही. अमेरिकन हॅलोवीन, स्वतंत्रता दिवस, मुस्लिम धर्मियांची ईद, युरोपियन ख्रिस्ती/राष्ट्रीय सण, चिनी नववर्ष अशा सर्व प्रसंगी फटाके उडवले जातात. मॅच जिंकली तर, लग्न लागल्यावर असे अनेक प्रसंग असतात जेव्हा फटाके उडवतात.
आता दिवाळीत गोड धोड करतात पण म्हणून साखरेचा हिंदू धर्माशी संबंध लावता येत नाही कारण इतर धर्मात व देशातही जगभर गोड पदार्थ करतात व खातात.
अमेरिकन हॅलोवीन, स्वतंत्रता
अमेरिकन हॅलोवीन, स्वतंत्रता दिवस, मुस्लिम धर्मियांची ईद, युरोपियन ख्रिस्ती/राष्ट्रीय सण, चिनी नववर्ष अशा सर्व प्रसंगी फटाके उडवले जातात. मॅच जिंकली तर, लग्न लागल्यावर असे अनेक प्रसंग असतात जेव्हा फटाके उडवतात.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आनंदाच्या प्रसंगी फटाके उडवले जाणे, आतिषबाजी केली जाणे हे वेगळे आणि प्रथा परंपरेचा भाग म्हणून दिवाळी सण फटाके फोडून साजरा केला जाणे हे वेगळे नाही का...
अर्थात म्हणूनच तर या चार दिवसात एवढे फटाके उडवले जातात जेवढे तुम्ही वर उल्लेखलेल्या दिवसांत उडवले जात नाहीत,
आणि म्हणूनच तर न्यायालयाने बंदी घातली आहे.
चार लोकं हौसेने उडवत असते तर का घातली असती. करोडो लोकं अगदी प्रथा परंपरा असल्याप्रमाणे उडवतातच म्हणूनच तर निर्बंध लादायची गरज पडलीय.
मुळात मान्य करायला हरकत काय
मुळात मान्य करायला हरकत काय आहे.
म्हणजे ओके, हा आमचा सण आहे. ईतके वर्षे आम्ही हा फटाके वाजवून साजरा करत होतो. पण आता परीस्थिती बदलली आहे. तर सण साजरा करायच्या पद्धतीही त्यानुसार बदलायला हव्यात. ईतके सरळ आहे हे
धर्माचाही मान राखा, आणि प्रदूषणावरही नियंत्रण
सनव, फटाक्यांचा शोध चीन मध्ये
सनव, फटाक्यांचा शोध चीन मध्ये लागला. इथे मायबोलीवरच फटाके वाजवणं दिवाळीच्या परंपरेत नव्हतं असं वाचलेलं आहे . मग जे आपल्या परंपरेत नाही ते साजर का करावं हा प्रश्न आहे .
हा तो बाफ
https://www.maayboli.com/node/46040
तु मारल्यासारखं कर आणी मी
तु मारल्यासारखं कर आणी मी रडल्यासारखं करतो
>>>>>
यात सुप्रीम कोर्टही सामील असते? असू शकते ??
न्यायालयाये त्यांचे काम करतात. फटाक्यांमुळे प्रदूषण होते याचे पुरावे घेऊन ते बंद करण्याविषयी कोर्टात कोणी केस केली तर प्रदुषणाच्या निकषानुसार न्यायालय निर्णय देते कि फटाके वाजवण्यावर कायद्याने बंदी आवश्यक. झाले. त्याच निर्णयाचा हे लोक झुंडी बनवण्याचे हत्यार म्हणून वापर करतात.
प्रदूषण रोखण्यासाठी ठरावीक
प्रदूषण रोखण्यासाठी ठरावीक ठिकाणी फटाक्यांवरील बंदी रास्त आहे. याविषयी अजून बरेच समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे, जेणेकरून याचे राजकारण होण्यापासून रोखले जाईल.
बाकी ३१ डिसेंबरलाही जगभर फटाके उडवतात तरी हे सर्व फक्त हिंदूंच्या सणालाच कसं आठवतं वगैरे वादाच्या मुद्यांबाबत 'नो कमेंट्स...'.>>>> +११
हा निर्णय २०१६ मधला आहे त्यावर तात्पुरती स्थगीती होती.ती आता उठवली. आणि ते योग्यच आहे.
३१ डिसेंबरला जगभर फटाके
३१ डिसेंबरला जगभर फटाके उडवतात का ? as in bursting fire crackers or is it fireworks?
म्हणजे जागोजागी, गल्लोगल्ली फटाके फोडतात? की काही विशिष्ट ठिकाणी फायरवर्क्स करतात? बातम्या वाचून तरी दुसरा प्रकार होतो असं वाटतं. जगभरातले मायबोलीकर सांगू शकतील.
फटाक्यांचं प्रदूषण आणि त्याचा ग्लोबल वॉर्मिंगवरचा परिणाम ही जरा दूरची गोष्ट झाली. पण एकेका जागी इतक्या मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो, तेव्हा तिथे राहणार्या लोकांच्या आरोग्यावर, अगदी तात्पुरता असला, तरी काय परिणाम होत असेल? ज्यांना याचा जास्त त्रास (श्वसनविकार, रक्तदाब इ.) होतात, त्यांनी गेल्या जन्मी काही पापं केली, म्हणूनच इतक्या सुंदर, पवित्र, उदात्त धर्मकार्याचा त्रास होण्याची शिक्षा ते भोगताहेत, असं समजायचं का?
ते लक्ष्मी बाॅम्ब अजूनही
ते लक्ष्मी बाॅम्ब अजूनही मिळतात का?
लक्ष्मीपुजनच्या दिवशी लक्ष्मीचे चित्र असलेले फटाके फोडतात. छिन्नविच्छिन्न झालेली लक्ष्मीची चित्रे लक्ष्मीपुजनाच्या रात्री कचर्याच्या ढिगाऱ्यात पडलेली असतात.
ही पण बहुतेक परंपराच असावी कारण माझ्या बाबांच्या लहानपणापासून हा फटाका अस्तित्वात आहे
नायगारा (मराठीत असच म्हटलेलं
नायगारा (मराठीत असच म्हटलेलं नी लिहीलेलं बघीतलय) जवळ आठवड्याचे ५ वेळा रात्री ५ मिनिटे आतषबाजी होते. स्थानिक वैतागलेले दिसले किमान आवाजाला तरी. दिल्लीत किंवा इतर ठिकाणी दिवाळीत जसं घुसमटल्यासारखं वाटतं तसं वाटलं नसलं तरी प्रदूषण होत असणारच. पण पर्यटकांसाठी सहन करणे कितपत बरोबर माहीत नाही.
>>>>स्थानिक वैतागलेले दिसले
>>>>स्थानिक वैतागलेले दिसले किमान आवाजाला तरी. >>>>
स्थानिक नायगराच्या आवाजाला कंटाळणे स्वाभाविक आहे
मात्र त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांना सहन करणे भाग आहे
किती प्रमाणात फटाके फोडावेत
किती प्रमाणात फटाके फोडावेत हे इतके वर्ष न कळल्याने आता शेवटी बंदी ची वेळ येते आहे...
हल्ली बऱ्याच बाबतीत असेच झाले आहे, ज्या लिमिट्स (कुठे थांबायचे) हे समाजाला स्वतःला समजायला हव्या हे न समजल्याने शेवटी बॅन आणि बंदी ची भाषा येते.
बंदी घालण्या ची वेळ येते supreme court ला ह्यातच सगळे आले.
बाकी, मुलं दिवाळीत फटाके फोडायला खूप उत्सुक असतात, आणि रंग पंचमीत पाण्यात खेळण्याची मजा लहान मुलांसाठी काही औरच असते.
प्रमाण कळत नाही ते मोटठ्यांना, त्याचे परिणाम मात्र असे की लहान मुलांना सांगितल्या आणि शिकवल्या जाते आणि ही अपेक्षा केली जाते की त्यांनी हे समजून घ्यावे. बिचारे. मला लहानपणी कुणी सांगितले असते तर मी म्हंटले असते कमी फोडेन पण फोडेन हे नक्की. कमी पाणी waste करेन पण पाण्यात भिजेन आणि भिजवेन हे नक्की.
स्थानिक नायगराच्या आवाजाला
स्थानिक नायगराच्या आवाजाला कंटाळणे स्वाभाविक आहे >> हो. इतकंच काय नाएग्रा रात्री 10 नंतर बंद करा अशी जनहितार्थ पिटीशन दाखल होती. हुशार लोक रात्री 10 नंतर मुक्काम फॉल्सव्ह्यू कॅसिनोला हलवतात. त्या दरम्यान दोन तीन लोक 9 ते 9.5 मध्ये होणाऱ्या आवाजाने स्थलांतरीय पक्षी जीवनावर होणारे दुष्परिणाम यावर पीएचडी मिळवून पसार झाले. लोकलाईज्ड ओझोन भोके इतकी झाली आहेत विचारू नका. गेल्याच महिन्यातला एक बाण ओझोन थराला भेदून आरपार गेला म्हणतात.
@ लक्ष्मीबार,
@ लक्ष्मीबार,
बहुधा ते खूप आधीच बॅन झाले आहेत. जेव्हा मिळायचे तेव्हा विष्णूबार सुद्ध यायचा ज्यावर विष्णूचे चित्र असायचे.
पण जसे रामफळापेक्षा सीताफळ फेमस तसे विष्णूबार पेक्षा लक्ष्मीबार फेमस होता.
माझ्या माहितीप्रमाणे आमच्या येथील मराठी लोकंच लक्ष्मीबार वाजवण्यात पुढे असायची, या उलट गुजराती लोकं मात्र लक्ष्मीबार वाजवायचे नाहीत. (चूक असेल तर कर्रेक्ट करा, दादामामांकडून ऐकीव माहीती आहे) . तसेच मराठी लोक भाऊबीजेला जास्त फटाके वाजवायचे तर गुजराती लोकं लक्ष्मीपूजनाला जास्त फटाके वाजवायचे. ते सारे व्यापारी दुकानदार असल्याने जवळपास दहापट पैश्याला आग लावायचे.
लक्ष्मीबार, विष्णूबार बंद झाल्यावर त्याच प्रकारच्या चिमणीबार आणि डबलबार यावर लोकं गुजारा करू लागले. हल्ली कोणते फटाके मिळतात माहीत नाही.
लक्ष्मीबार फेमस व्हायचे एक कारण म्हणजे त्याच्या कागदांचा होणारा कचरा. सर्व फटाके संपल्यावर तो जाळायचा आणि त्यात एकेक लवंगी टाकत मजा घेत राहायची.
गेल्या काहे दिवसांपासून ते
गेल्या काहे दिवसांपासून ते आजच्या तारखेपर्यंत जो पाऊस पडतोय ते पाहता यावेळी पाऊसच फटाक्यांचे दिवाळे काढणार बहुतेक. सरकार आणि न्यायालय फक्त निमित्त मात्र बदनाम होणार असे दिसतेय...
हा विषय आधी "हि" धागा आलाय
हा विषय आधी "हि" धागा आलाय का मायबोलीवर? असेच वाटते आहे. असो.
हा ठळक केलेला भाग आधी वाचा. :
मी फटाके कधीच वाजवत नाही आणि तीव्र विरोधात आहे व्यैयक्तिक अॅलर्जीमुळे. तसेच ह्या गोष्टींचा धर्मांशी जोडन्यात तथ्य नाही असे मानते.
आता, फटाके विक्रीवर बंदी विषयी: योग्य निर्णय आहे. फक्त फटाके कारखान्यात काम करणार्यांना दुसरे काम वा निर्मुलन करायची जबाबदारी वाढली. फटाके विक्रीवर बंदी तसेच वाजवण्यावर सुद्धा बंदी असावीच, त्यात धर्म, काळ, सण बघू नये. तो आवाज सहन होत नाही. आणि तो वास सुद्धा.
आता, >>>बकरे कापण्याने काय प्रदुषण <<<
रोगराई आणि बकालपणा इतका असतो त्या दिवसात. बकर्यांची बांधलेली जागा, ते रक्ताचे पाट , भरलेली गटारे वगैरे मी त्या दरम्यान , मुंबईत (बांद्रा ईस्ट, कुर्ला ) काही काळ रहात असल्याने (खरेतर त्याबाजूने नुसता प्रवास करत असूनसुद्धा)पाहून शिसारी आलेली तो हवेत पसरलेला घाण वास, कुजलेला कचरा बघवत न्हवता. ह्यात हवेचे व पाण्याचे प्रदुषण( ते बकरे कापतात तिथे घाण पाणी साठते, तिथेच ते फुटलेले पाईप).
आणि कितीही गाईडलाईन्स असले तरी हे आपले बंधू पाळतात असे दिसत नाही.
मोहर्रम ची कथा आणखी वेगळीच...
त्यामुळे, सर्व प्रदुषण करणार्या आणि सिविल नसलेल्या "गोष्टींस" आळा घालावा किंवा अतिशय कडक रीतीने अंमलात आणाव्या. नुसते कायदे ठरवून मोकळे होवु नये.
मला तर, सर्व धुमाकुळ घालून सण साजरे करणालाच बंदी असावी वाटते. मग धर्म वगैरे प्रश्णच येत नाही. ते रस्ते अडवून मिरवणूक, संगीत सर्वच.
व्हॉटसपवर मेसेज फिरतोय असा..
व्हॉटसपवर मेसेज फिरतोय असा.. सिगारेटवर जसा वैधानिक इशारा देऊन विकता तसे फटाक्यांबाबत का नाही करत?
दारूचे तर उलटे उदात्तीकरणच चालू असते. मग याच दारूला का विरोध असेही कोणी बोलू शकतोच.. >>>
काय पण लोजिक !
Submitted by दुहेरी on 15 October, 2017 - 11:39 >>> + १
>>फक्त फटाके कारखान्यात काम
>>फक्त फटाके कारखान्यात काम करणार्यांना दुसरे काम वा निर्मुलन करायची जबाबदारी वाढली.
निर्मुलनच्या ऐवजी तुम्हाला पुनर्वसन म्हणायचं आहे बहुतेक.
काय पण लोजिक !
काय पण लोजिक !
>>>>
सर्व लॉजिक उलटसुलटच आहे हे मान्य
म्हणजे बघा,
दारूने तुम्ही तुमचे स्वत:चे नुकसान करता, स्वत:चा जीव धोक्यात घालता म्हणून फक्त तुम्हालाच ती वॉर्निंग देण्यात येते. बाकी तुम्ही तुमच्या जीवाचे मग काहीही करा.
फटाक्यांनी तुम्ही पर्यावरणाचे नुकसान करता, आणि दुसर्यांचा जीव धोक्यात घालता म्हणून वॉर्निंग न देता बंदीच घालण्यात येते.
पण प्रत्यक्षात आपल्या जीवाचे काहीही बरे वाईट करणे म्हणजे आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. दारू पित पित मरणे गुन्हा नाही.
तसेच दारू पिणारा आपल्या कुटुंबियांची वाताहात करतो, किंवा आपल्या गाडीखाली परक्या लोकांना चिरडतो तरीही त्याचा ठपका कधी दारूवर ठेवला जात तिचे दुकान बंद होत नाही.
सलमान ज्या बार मधून दारू पिऊन बाहेर पडला तो बारच नसता तर .........
दारू ही वाईटच, मग कुठल्याही रुपात, कुठल्याही स्वरुपात असो !
शुभ दीपावली,
शुभ दीपावली,
आज नरकचतुर्दशी, united स्टेट्स ऑफ कोथरूड, कर्वे नगर स्टेट अजून तरी शांत आहे,
3 4 वर्षांपूर्वी सकाळी 5 ला फटाके फुटायला लागायचे,
दुरून आवाज येत आहेत फटाक्यांचे
पण बिल्डिंगच्या जवळपास शांतता आहे, क्वचित बॉम्ब किंवा डांबरी फटाके ऐकू येत आहेत
राहुलका,
राहुलका,
व्हॉटसपवर मेसेज फिरतोय असा.. सिगारेटवर जसा वैधानिक इशारा देऊन विकता तसे फटाक्यांबाबत का नाही करत?
दारूचे तर उलटे उदात्तीकरणच चालू असते. मग याच दारूला का विरोध असेही कोणी बोलू शकतोच.. >>>
काय पण लोजिक !
Submitted by दुहेरी on 15 October, 2017 - 11:39 >>> + १
Submitted by राहुलका on 16 October, 2017 - 11:26
हे मी कधी लिहिलं...
Pages