सध्या आपले धर्मनिरपेक्ष सुप्रीम कोर्ट फार सक्रिय झाले आहे. जागोजागी फटाकेविक्रीवर बंदी आणली आहे. हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशात भारतभरात दिवाळी हा सण फटाके फोडून साजरा केला जात असल्याने जनमाणसांत तर्हेतर्हेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
विचारसरणी क्रमांक १ -
ऐन दिवाळीतच यांना प्रदूषण आठवते का? हॅपी न्यू ईयरला फटाके उडवले तर चालते वाटते? त्याने प्रदूषण नाही का होत? (भले तेव्हा फटाके उडवणारेही आपलेच लोकं का असेना) पण या बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंच्या सणांनाच पर्यावरणाची काळजी का वाटते? दिवाळीला फटाके नको, गोकुळाष्टमीला हंडी नको, होळीला पाण्याची नासाडी नको. पण बकरी ईदला रस्त्यावर बकरे कापलेले आणि रक्ताचे पाट वाहिलेले बरे चालते.
चेतन भगतसारख्या विचारवंत साहित्यिकाने देखील असेच काहीसे टवीट केले आहे.
Chetan Bhagat ✔@chetan_bhagat
आज अपने ही देश में, उन्होंने बच्चों के हाथ से फुलझड़ी भी छीन ली। हैपी दिवाली मेरे दोस्त।
11:44 AM - Oct 9, 2017
Chetan Bhagat ✔@chetan_bhagat
Can I just ask on cracker ban. Why only guts to do this for Hindu festivals? Banning goat sacrifice and Muharram bloodshed soon too?
11:37 AM - Oct 9, 2017
चे. भगतची बातमी ईथे वाचू शकता - http://www.loksatta.com/desh-videsh-news/chetan-bhagat-wants-diwali-cele...
विचारसरणी क्रमांक २ -
दरवेळी प्रत्येक गोष्टीला धर्माच्या चष्म्यातून बघणे गरजेचे आहे का? प्रदूषण खरेच एक गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या चार दिवसात करोडो फटाक्यांतून एकाच वेळी निघणारा विषारी धूर रोखणे खरेच गरजेचे आहे.
संबंधित बातम्या खालील लिंकावर वाचू शकता
http://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-court-bans-firecrackers...
http://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-imposes-ban-on-sale-of-fir...
मला दुसरी विचारसरणी पटते.
मी स्वत: ईयत्ता आठवी नववी पर्यंत फटाके वाजवण्याचा आनंद लुटला आहे. त्यामुळे आपण आपल्या लहानपणी जो फटाक्यांचा आनंद लुटला त्याला आताची लहान मुले मुकतील असाही विचार मनात येतो. पण उद्या जर त्यांना मोकळ्या आणि शुद्ध हवेत श्वास घ्यायचा असेल तर हे गरजेचे आहे. ही वेळ आपण स्वत:च त्यांच्यावर आणली आहे. तर आता उगाच हळहळ व्यक्त करण्यात अर्थ नाही.
तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या आनंदासाठी पर्यावरणाचा र्हास करत दुसर्यांच्या जीवाशी खेळ करू शकत नाही.
आपले काय मत आहे?
पण बकरी ईदला रस्त्यावर बकरे
पण बकरी ईदला रस्त्यावर बकरे कापलेले आणि रक्ताचे पाट वाहिलेले बरे चालते.
>>> याच्यात काय प्रदूषण आहे?
माझे मत पण दुसरे v4 सरणी चे
माझे मत पण दुसरे v4 सरणी चे आहे.. फटाके फोडताना किती लोकांना इजा पण होते, दर वर्षी बातम्या येतात..
ऋन्मेष,
ऋन्मेष,
उगाच निकालाचे चे महाभयंकरीकरण करू नकोस.
1) बंदी केवळ फटाके विकायला आहे, फोडायला नाही.
उपलब्धता कमी झाल्याने तरी लोक कमी फटाके वापरतील असा कोर्टाचा अंदाज आहे. दिल्ली बाहेरून खरेदी करून, किंवा ऑनलाइन purchase वर फ्री गिफ्ट म्हणून आलेले फटाके तुम्ही वाजाऊ शकता ( फटाके विक्रेते आपला स्टॉक आता ऑनलाइन फ्री देऊन संपवत आहेत)
2)बंदी फक्त दिल्लीत आहे बाकी देशात नाही, तेव्हा हिंदू सणावर बंदी हा आक्रोश उगाच आहे.
3) कोर्टाचा दहीहंडी बद्दल काय स्टॅन्ड होता ते आठवून पहा? कोर्टाने दहीहंडी संदर्भात आपला निर्णय बदलला होता ना? तेव्हा हिंदूची गळचेपी होतेय या मुद्द्यात फारसा दम नाही.
4)या आधी फायर सेफ्टी चा विचार करून निवासी भागामध्ये फटाके साठवणे व दुकाने असणे याला बंदी होती .पण त्याची अंमलबजावणी झाली नाही असे वाचले, त्यामुळे या वेळी कोर्टाने अजून स्ट्रीक्त गाईडलाईन्स दिल्यात.
5) याच मोसमात दिल्ली च्या आसपास शेतातील राब जाळतात, त्यामुळे पर्यावरण आधीच स्ट्रेस्सड असते. (या वर्षी हे राब जळण्यासाजे प्रमाण 40%कमी झालय असे वाचले)
6) मुंबईला विशाल किनारा असल्याने मुंबईत राहून दिल्लीत कसे प्रदूषण कसे होते याची कल्पना कठीण आहे.
7)हल्ली शाळांमध्ये फटक्यात बाबत बरेच प्रबोधन करतात, माझी मुलगी फटाक्यांच्या विरुद्ध आहे. हे प्रबोधन व्यवस्तीत आणि कनसिस्टंटली झाले तर पुढच्या 6 7 वर्षात कोर्टाने मध्ये न पडता फटाक्यांची विक्री बरीच कमी झालेली दिसेल.
8) बकरी ईद , गल्लोगल्ली झालेली बकर्यांची कुर्बानी मला वैयक्तिक कितीही आवडत नसली तरी या बाबत कोर्टाचा निकाल आहे, बकरी ईद च्या एक दिवशी खाटीक खान्यात न जाता आपल्या घर जवळ बकरे (काही गाईड लाईन्स चे पालन करून) मारायला कोर्टाने अनुमती दिली आहे . तेव्हा या बाबतीत काही बोलत नाही.
बंदी विक्रीवर आहे, वाजवण्यावर
बंदी विक्रीवर आहे, वाजवण्यावर नाही.
दिल्लीतलं प्रदूषण भयानक आहे. जिवापेक्षा धार्मिक अस्मिता महत्त्वाच्या वाटणार्यांना शुभेच्छा.
नदीत गणपती विसर्जन, फटाके
नदीत गणपती विसर्जन, फटाके फोडणे, दसार्याला शमीची पाने देणे, कृत्रीम रंग वापरून पंचमी, ई गोष्टींचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम यावर भारतात नवीन पिढीला जागरुकता आलेली आहे असे दिसते. चांगली गोष्ट आहे.
अमेरिकेत मात्र उलटी गंगा. आमच्या कॉलनीत ९९% भारतीय आहेत. गणपती विसर्जन मिरवणूक झाली. काही मूर्ख लोकांनी फटाके फोडले. कचरा अर्थात उचलला नाही. घरे बव्हंशी लाकडी असल्याने मॅनेजमेंट कडून खरमरीत ई मेल आली. आमच्या राज्यात नागरिकांना फटाके फोडायला बंदी आहे. या वर्षी ती उठवली व दुकानात दिवाळीनिमित्त फटाके आले. आता कचरा होईल.
इंग्लंड मध्ये एका नदीत मोठ्या प्लॅस्टर च्या गणपतीचे विसर्जन झाले. दुसर्या दिवशी अर्थात मूर्ती तरंगत होती. लोकांना वाटले कुणी आत्महत्या केली की काय? पोलिस, फायर ब्रिगेड सारे आले.
इथे एकाने नदीत गनपती विसर्जन केले. दुसर्या दिवशी एका अमेरिकन महिलेला सापडली. तिला वाटले कुणाची मूर्ती हरवली असेल. तिने घरी आणून ठेवली व फ्लायर्स लावले की मला एक मूर्ती सापडली आहे, ज्याची असेल त्याने अमूक नम्बर वर फोन करावा.
सिम्बा +१
सिम्बा +१
फटाके हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत की काय? ते जगभर फोडले जातात पण पारंपारिक दिवाळी सणात फटाके होते असं वाटत नाही. हे लोण आपल्याकडे अलीकडेच आलं आहे आणि प्रचंड हवा, आवाज प्रदूषण होतं त्यामुळे बंदी योग्यच आहे. लहान मुलांसाठी तर खूप रिस्की प्रकार आहे.
बाकी कोर्ट, बंदी याबद्दल डिटेल वाचलं नाहीये पण प्लीज याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. आता तयार असलेला माल, कामगारांचा रोजगार याबद्दलचे concern मान्य आहेत, इतर धर्मातील प्रदूषण पण कोर्टाने बंद करावे हे ही योग्य आहे पण दिवाळी ,फटाके ,हिंदू धर्म यावरचा हा धागा मुद्दाम कुरापत काढण्याच्या, उपरोधिक (?), किंवा इथे उगाच धर्मावरून भांडण लावण्याच्या उद्देशाने काढल्यासारखा वाटतो.
अर्थात या आयडीला हे उद्योग कायम माफच असतात , सो असोच.
चेतन भगतसारख्या विचारवंत>>>
चेतन भगतसारख्या विचारवंत>>> विचारवंत really?
We stay in NCR (Gurgaon) so we welcome this decision. At least this year less pollution due to fire cracker. Paddy burning in Punjab/ Haryana and western UP is big issue here . Hope this year there will be some relief.
सिम्बा अतिरीक्त माहीतीबद्दल
सिम्बा अतिरीक्त माहीतीबद्दल धन्यवाद.
वर लेखातल्या बातमीत मी देखील फ्टाके विक्रीवर बंदी असाच उल्लेख केलाय. बातमीच्या लिंकही आहेत.
पण हे एक ईण्टरेस्टींग वाटते. म्हणजे केवळ विक्रीवर बंदी पण वाजवण्यावर नाही. म्हणजे दिल्लीवाले आजूबाजूच्या शहरातून फटाके आणून वाजवू शकतातच. किंबहुना प्रत्येकाला आजूबाजूच्या शहरात जायचीही गरज पडणार नाही, ते येनकेनप्रकारे उपलब्ध होतीलच. लोकं बाहेरून भरभरून स्टॉक मागवतील किंवा त्यांना तो तसा उपलब्ध करून दिला जाईल. मग मला समजत नाही अश्याने प्रदूषण रोखण्याचा मूळ हेतू कसा साध्य होणार?
बाकी लेखात दोन विचारसरणी मांडल्या आहेत. त्यातील पहिल्या विचारसरणीला साजेसे चे. भगत यांचे ट्विटस जसेच्या तसे दिलेत. बातम्यांच्या खालील प्रतिसादातही आपण या आशयाचे प्रतिसाद बघू शकतात. व्हॉटसप फॉर्वर्ड आपल्याही मोबाईलवर असतीलच. लोकं असले मेसेज पुढे ढकलतात म्हणजे असा विचार करणारेही बरेच आहेत हे मान्य करावेच लागेल.
मी स्वत: दुसरया विचारसरणीला समर्थन दिले आहे. बातम्यांची लिंक चेक कराल तर मुंबईत देखील काही प्रमाणात फटाके विक्रीवर बंदी येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रश्न फक्त दिल्लीचा नाही. शाळांमध्ये जर लहान मुलांना फटाक्यांबाबत प्रबोधन करत असतील तर चांगलेच आहे. ईथेही हाच हेतू आहे. जी गोष्ट मला आठवी नववीत समजली ती येत्या पिढीला लवकर समजली तर चांगलेच आहे.
शाळांमध्ये जर लहान मुलांना
शाळांमध्ये जर लहान मुलांना फटाक्यांबाबत प्रबोधन करत असतील तर चांगलेच आहे. ईथेही हाच हेतू आहे. जी गोष्ट मला आठवी नववीत समजली ती येत्या पिढीला लवकर समजली तर चांगलेच आहे.>>>
११
मुळात कोणताच सण साजरा करण्यासाठी फटाक्यांची गरज नाही.
आमच्याकडे मी पाचवीत असल्यापासून म्हणजे जवळपास ९ वर्षे फटाके फोडले नाहीत.
लहान असूनही भावाने कधी फटाक्यांसाठी हट्ट केला नाही.असे पैसे घालवण्यापेक्षा तो त्याच्या साठी काहीतरी घेतो.यामागचं कारण वेगळे आहे..बिल्डींग मधल्या कुत्र्यांना त्रास होतो आणि ते थेट घरी येतात..
त्यांचा त्रास बघवत नाही म्हणून याने फटाके वाजवणं सोडलं(हे ही नसे थोडके)
दुसर्यांनी केले तर ते चालत मग आम्ही पण करणार हा मुद्दा पण नाही पटतं.सुरुवात कोणीतरी केलीच पाहिजे.
(त.टि: हे माझे विचार आहेत.. बाकी जैसी जिसकी सोच)
आमच्या कॉलनीत ९९% भारतीय आहेत
आमच्या कॉलनीत ९९% भारतीय आहेत.
>>> अरेरे...काय फायदा अमेरिकेत जाण्याचा जर पुण्याच्या पेठेचाच फील येत असेल तर..
तिसरी विचारसरणी हि बंदीची लाट
तिसरी विचारसरणी हि बंदीची लाट निर्माण करणाऱ्यांची आहे जिचा तुम्ही धाग्यात उल्लेख केलेला नाही.
अशा लाटा निर्माण केल्या कि धर्मिक ध्रुवीकरण होते. येडे लोक पॅनिक होऊन आरडाओरडा सुरु करतात. भगत सारखे टुकारवंत साळसूद होऊन लगेच कोल्हेकुई सुरु करतात. त्यांच्यापाठोपाठ इतर कोल्हे पण ओरडायला सुरवात करतात. शांत असलेल्या जंगलात अशा रीतीने धार्मिक प्राण्यांची एकगठ्ठा झुंड तयार होते. मग नाटकी बंदी (जी होणारच नव्हती) मागे घेऊन किंवा होणार नाही म्हणून जाहीर करून धर्माचा तारणहार मसीहा वगैरे आपणच आहोत हा संदेश राजकारण्यांना लोकांच्यात सहज पोहोचवता येतो. असा हा गेम आहे बाकी काही नाही.
तुम्ही पहा. जन्माष्टमी असो किंवा गणेश चतुर्थी किंवा दिवाळी. हे सण तोंडावर आले कि अशा लाटा मुद्दाम तयार केल्या जातात. पाठोपाठ "आमचा धर्मच का धोक्यात" ची कोल्हेकुई करवली जाते. सगळे आधीच ठरलेले असावे कि कुणी काय बोंब मारायची त्याप्रमाणे सर्वकाही सुरु असते. पण प्रत्यक्षात अशी बंदी वगैरे काही कधी येत नाही. व्हायचे तसे सगळे डॉल्बी, फटाके, धोकादायक मानवी मनोरे वगैरे सगळे होतेच दरवर्षी.
इनामदार, अनुमोदन!
इनामदार, अनुमोदन!
*।।येणाऱ्या दिवाळी साठी एक
*।।येणाऱ्या दिवाळी साठी एक छोटेसे आवाहन।।*
फटाक्यांचा भरपूर आनंद घ्या, कारण हा फटाक्यांचाच सण आहे. राहिली गोष्ट पर्यावरणाची, तर दिवाळी मध्ये फटाक्यांच्या वासामुळे सगळे मच्छर आणि किडे मरून जातात.
वर्षभर एअर कंडिशन रूम मध्ये बसून वातावरणातील ओझोनच्या थराची वाट लावणाऱ्यानी ओझोनच्याच नावाखाली दिवाळीच्या फटाक्यांवरती आम्हाला सल्ले देऊ नयेत. नाहीतरी हवा प्रदूषणात भारत जगात ७४ व्या क्रमांकावर आहे. आपल्या पेक्षा दुसऱ्या देशांमूळे खूप प्रदूषण आहे.
या मीडिया आणि तथाकथित पर्यावरण प्रेमींना फक्त हिंदू सणांमध्येच प्रदूषणाची आठवण होते.
भरपूर फटाके वाजवा, दिवाळी आहे. आपल्याकडे काय त्या नवाझ शरीफ चे सुतक नाही की आपण दुःख दाखवायचं. वर्षात बाकीचे ३६० दिवस आहेतच पर्यावरणासाठी....
सगळे स्वयंघोषित समाजसेवक, अतिज्ञानी, मानी आणि बातम्यांपुरते पर्यावरणवादी यांनी शांत राहावे.
------
पुण्यातल्या एका भक्ताचे विचार
इनामदार, इमानदारीत लिहिलेला
इनामदार, इमानदारीत लिहिलेला प्रतिसाद परफेक्ट आहे.
शेफालीताई वैद्य ही बंदी
शेफालीताई वैद्य ही बंदी हिंदूंसाठी कशी अन्यायकारक आहे हे सांगायला टाइम्स नाउ आणि रिपब्लिकवर येऊन गेल्या म्हणे.
त्या म्हणतात म्हणजे बरोबरच असणार.
न्यायालयाचा निषेध.
चेतन भगत हे थोर विचारवंत म्हणतात तेही खरेच आहे.
भारतातल्या मुलांचे धड पोषण होत नाही, ते जाऊ द्या. पण त्यांना फुलबाजी फिरवण्याचा आनंद तरी मिळू द्या.
प्रदूषण रोखण्यासाठी ठरावीक
प्रदूषण रोखण्यासाठी ठरावीक ठिकाणी फटाक्यांवरील बंदी रास्त आहे. याविषयी अजून बरेच समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे, जेणेकरून याचे राजकारण होण्यापासून रोखले जाईल.
बाकी ३१ डिसेंबरलाही जगभर फटाके उडवतात तरी हे सर्व फक्त हिंदूंच्या सणालाच कसं आठवतं वगैरे वादाच्या मुद्यांबाबत 'नो कमेंट्स...'.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी शाळकरी मुलांसह फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेतली व प्रदूषणमुक्त दिवाळीला सपोर्ट दिला आहे. शिवसेनेच्या रामदास कदम यांनी महाराष्ट्रात फटाके बंदीबद्दल अनुकूलता दर्शवली आहे.
काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी मात्र फटाके बंदी करू देणार नाही असा इशारा दिला आहे व दिवाळीत नाही फटाके उडवायचे तर कधी, असा सवाल केला आहे.
फडणवीसांना सपोर्ट, आणि देवाने शेफाली वैद्य, संजय निरुपम अशा लोकांना थोडी सुबुद्धी द्यावी ही प्रार्थना.
https://www.ndtv.com/india-news/maharashtra-asks-its-citizens-to-observe...
<<आता कचरा होईल.>>
<<आता कचरा होईल.>>
फक्त भारतीयच कचरा करतात का?
इतर लोकहि करतात.
काँग्रेसवाल्यांचं बरोबर आहे.
काँग्रेसवाल्यांचं बरोबर आहे. त्यांना बिचार्यांना गेल्या ३ वर्षांत फटाके उडवायला दुसरी संधी उपलब्ध नव्हती.
आता तुम्ही म्हणताच आहात, तर काँग्रेसलाही दिवाळीत फटाकेबंदी करून इलेक्शन रिझल्ट्सला आतिषबाजी करायची संधी लाभो, असे म्हणतो.
वेल्कम टु काँग्रेस साईड ऑफ संतुलित कुंपण.
चेतन भगत हे थोर विचारवंत
चेतन भगत हे थोर विचारवंत म्हणतात तेही खरेच आहे.
भारतातल्या मुलांचे धड पोषण होत नाही, ते जाऊ द्या. पण त्यांना फुलबाजी फिरवण्याचा आनंद तरी मिळू द्या.
<<
अगदी अगदी!
अन फटाक्यांमुळे डेंग्यूचे मच्छर मरतात तो फायदा वेगळाच!
दिवाळी संपल्यावर करायला हवी
दिवाळी संपल्यावर करायला हवी ही बंदी... ऐन दिवाळीत काय?
"अन फटाक्यांमुळे डेंग्यूचे
"अन फटाक्यांमुळे डेंग्यूचे मच्छर मरतात तो फायदा वेगळाच!" - वेचून वेचून डेंग्यूच्याच डासांना मारणार्या फटाक्याच्या धुराचं कौतुक करावं तितकं थोडच आहे. असं सिलेक्टीव्ह काम तर अँटीबायोटीक्स पण करत नसतील.
बाकी ईनामदार म्हणतात तसं, तु मारल्यासारखं कर आणी मी रडल्यासारखं करतो, हा खेळ पूर्वापार चालत आलाय आणी पुढे सुद्धा चालूच राहील. हॅपी दिवाली!
>> तु मारल्यासारखं कर आणी मी
>> तु मारल्यासारखं कर आणी मी रडल्यासारखं करतो<<
एक्झॅक्टली! दिल्लीत फटाके विकायचे नाहित पण बिंधास्त फोडायचे, त्यावर बंदि नाहि. म्हणजे साप (शायद) मरे लेकिन लाठी ना टुटे???
मुद्दा हा आहे की फटाके स्टॉल
मुद्दा हा आहे की फटाके स्टॉल ला आग लागून खूप नुस्कआन होऊ शकते.इमारती पण पेट घेऊ शकतात.
तु मारल्यासारखं कर आणी मी
तु मारल्यासारखं कर आणी मी रडल्यासारखं करतो
>>>>>
यात सुप्रीम कोर्टही सामील असते? असू शकते ??
मुद्दा हा आहे की फटाके स्टॉल
मुद्दा हा आहे की फटाके स्टॉल ला आग लागून खूप नुस्कआन होऊ शकते.इमारती पण पेट घेऊ शकतात.
>>>>>
हा खरेच न्यायालयीन निकालातील मुद्दा आहे की आपला अंदाज?
पटणेबल आहे मात्र. कारण फटाके फोडायला नाही तर विक्रीला बंदी घातली आहे. फटाके विकणारे कुठल्याही धर्माचे असू शकतात, त्यामुळे सर्वांच्याच पोटावर पाय
>> फटाक्यांमुळे डेंग्यूचे
>> फटाक्यांमुळे डेंग्यूचे मच्छर मरतात
यावरून एक जुनी आठवण आली. शालेय वयात असताना मी घरात एखादी पाल चुकून जरी दिसली कि तिला ताबडतोब घराबाहेर हाकलून काढायच्या कामाला लागायचो. घरात पाल वगैरे असणे अजिबात आवडत नव्हते (अजूनही नाही). तर मी या कामी मदत करायला वडिलांना बोलवायचो. पण ते अजिबात दाद द्यायचे नाहीत. म्हणायचे, "असू दे रे. दुर्लक्ष कर पालीकडे. उलट पाल असलेली चांगलीच. पाली डास खातात त्यामुळे डास होत नाहीत"
त्यांच्या या युक्तिवादावर हसावे का रडावे कळत नव्हते कारण शंभरातला एखादा डास पाल खात असेल
असो. थोडे विषयांतर झाले. पण इथे मात्र याच्या उलट आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे डासच काय अनेक प्रकारचे किटक व पक्षी सुद्धा पुष्कळ मरतात असे वाचनात आले होते एका मर्यादेपर्यंत ठीक आहेत फटाके. पण मागच्या अनेक वर्षांत या मर्यादेचे उल्लंघन झालेय हे सुद्धा चिंताजनक आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर धनिक लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त फटाके वाजवण्याचा पायंडा पडलेला आहे. मागच्या दिवाळीत माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने एक लाख रुपयांचे फटाके उडवले होते. हे त्यांनीच गप्पा मारताना सांगितले. हि नक्कीच सण साजरे करण्याची पद्धत नव्हे. अति आतषबाजी हि सणाला आलेली सूज आहे.
या फटाक्यामुळे मागच्या वर्षी
या फटाक्यामुळे मागच्या वर्षी सोसायटीतलं एक घर जळता जळता थोडक्यात वाचलं होतं .
रस्त्यावर एका मूर्खाने ते रॉकेट का काय असतं ते बाटलीत घालून पेटवल. तर ते रॉकेट उंच जाऊन सरळ सोसायटीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका घरात घुसल . बेडरूमच्या खिडकीतून आत घुसल्यामुळे तिथला सोफा पूर्ण जळाला ।फर्निचरच पण नुकसान झालं . प्लस आख्या सोसायटीत शॉर्ट सर्किटची पण भीती . नशीब त्या फॅमिलीतलं कोण त्यावेळी बेडरूममध्ये नव्हतं ती फॅमिलीच काय पूर्ण सोसायटी हादरली . फायर ब्रिगेडला ती आग विझवायला अर्धा तास लागला.
ह्या मंद लोकांच्या आनंदापायी लोकांचं किती नुकसान होतं
कसले डोंबलाच फटाके उडवतात !
या फटाक्यामुळे मागच्या वर्षी
या फटाक्यामुळे मागच्या वर्षी सोसायटीतलं एक घर जळता जळता थोडक्यात वाचलं होतं . >>
"भारतात इतक्या आगी लागतात, त्याबद्दल तुम्ही काही म्हणत नाही. फक्त दिवाळीच्या फटाक्यांच्या आगीचा तुम्हाला त्रास होतो. म्हणजे तुमचा अजेंडा दिसतो." असं म्हणायचं बाकी आहे फक्त.
या रॉकेटने बरेच आगी लावल्या
या रॉकेटने बरेच आगी लावल्या आहेत. अगदी फ्टाक्यांच्या दुकानात घुसून हाहाकार माजवण्याचाही प्रकार झाला आहे. त्यावर बंदी का आणत नाही समजत नाही.
मला वाटते पाऊस, चक्र, फुलबाज्या, टिकल्या आणि लवंगी हे मोजकेच फटाके वाजवायला परवानगी द्यावी.
साहजिकच हे फटाके मोठे वाजवणार नाहीत. आणि ज्या लहान मुलांना फटाके वाजवायचा आनंद लुटायचा आहे ते लुटतील.
Pages