अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा:
टीव्ही असो वा रेडिओ किंवा आता तर ऑनलाईनही, एखादा कार्यक्रम रंगात येऊन बघत असलो की नेमक्या वेळी रसभंग करायला जाहिराती लागतात. मायबोलीवरच्या जाहिरातीही कधी चर्चेचा विषय बनतात. वर्तमानपत्रे तर आता जाहिरातींसाठीच खास पुरवण्या छापतात इतकं महत्वाचं स्थान पटकावलं आहे जाहिरातींनी. "लो , ले लो , ले लो रस्ते का माल सस्ते मे ", "२५ पैशात दुधी हलवा" पासून सुरू होऊन जाहिराती लाखो करोडो रूपये खर्च करून, चित्रपट तारकांना घेऊन सुद्धा बनतात. यंदा गणेशोत्सवातही आम्ही काही जाहिराती आणायचा विचार केला आहे. या जाहिराती तुमचा रसभंग करणार नाहीतच, उलट तुम्ही अगदी आतुरतेने पुढची जाहिरात कधी येतेय याची वाट पाहाल! वाटतेय ना उत्सुकता?
यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित करत आहोत विचित्र वस्तूंच्या विनोदी जाहिरातींची स्पर्धा! खाली दिलेल्या वस्तूंवर तुम्हाला जरा हटके आणि विनोदी जाहिराती लिहायच्या आहेत.
उत्पादने :
१)आयुर्वेदिक कपडे
२)भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर
३)B2 वनस्पतीचे तेल
४)फेसबुक साठी रेडीमेड स्टेटस
५)रंगीबेरंगी शू पॉलिश
स्पर्धेचे नियम :
१) या उत्पादनांपैकी कोणत्याही एका उत्पादनावर वर्तमानपत्रात छापून येईल अशी जाहिरात लिहावी. त्यात ऑडिओ, व्हिडीओ चालणार नाही. फोटो, चित्रं चालू शकेल. मात्र ती तुम्ही काढलेली किंवा प्रताधिकारमुक्त असावीत.
२)एका प्रवेशिकेत एकाच उत्पादनाची जाहिरात असावी.
३) जाहिरात विनोदी असायला हवी पण सभ्य भाषेचा वापर करावा.
४) जाहिरातीला शब्दमर्यादा नाही.
५) प्रवेशिका देण्यासाठी गणेशोत्सव - २०१७ ह्या ग्रुपाचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा. धाग्याचे शीर्षक <<<स्पर्धेचे नाव>>> - <<< उत्पादनाचे नाव >>>> - <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.
६) एका आयडीने कितीही प्रवेशिका देता येतील.
७) प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
८) स्पर्धेचा निकाल मतदान पद्धतीने काढला जाईल.
ज्या जाहिरातीला जास्त
ज्या जाहिरातीला जास्त प्रतिक्रिया येणार ती जाहिरात विजयी होणार?
संयोजक, माझ्या प्रश्नाचे
संयोजक, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या की.
निस्तुला, गणेशोत्सव संपल्यावर मतदान होईल. त्यात मायबोलीकर ठरवतील विजेता.
भरत,
भरत,
रेडियो करता लिहिलेली जाहिरात विनोदी लेखनात हलवू शकता किंवा इथे गणेशोत्सवात ठेवू शकता. गणेशोत्सव संपल्यानंतर मतदानासाठीच्या प्रवेशिकांमधे ती धरली जाणार नाही.
निस्तुला, गणेशोत्सव
निस्तुला, गणेशोत्सव संपल्यानंतर नियमात बसणार्या सर्व प्रवेशिकांवर मायबोलीकर मतदान करतील आणि विजयी प्रवेशिका निवडतील.
इथे एक उदाहरण पाहता येईल https://www.maayboli.com/node/60252
ओके..मतदान सुरु झालंय का
ओके..मतदान सुरु झालंय का
Pages