अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा:
टीव्ही असो वा रेडिओ किंवा आता तर ऑनलाईनही, एखादा कार्यक्रम रंगात येऊन बघत असलो की नेमक्या वेळी रसभंग करायला जाहिराती लागतात. मायबोलीवरच्या जाहिरातीही कधी चर्चेचा विषय बनतात. वर्तमानपत्रे तर आता जाहिरातींसाठीच खास पुरवण्या छापतात इतकं महत्वाचं स्थान पटकावलं आहे जाहिरातींनी. "लो , ले लो , ले लो रस्ते का माल सस्ते मे ", "२५ पैशात दुधी हलवा" पासून सुरू होऊन जाहिराती लाखो करोडो रूपये खर्च करून, चित्रपट तारकांना घेऊन सुद्धा बनतात. यंदा गणेशोत्सवातही आम्ही काही जाहिराती आणायचा विचार केला आहे. या जाहिराती तुमचा रसभंग करणार नाहीतच, उलट तुम्ही अगदी आतुरतेने पुढची जाहिरात कधी येतेय याची वाट पाहाल! वाटतेय ना उत्सुकता?
यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित करत आहोत विचित्र वस्तूंच्या विनोदी जाहिरातींची स्पर्धा! खाली दिलेल्या वस्तूंवर तुम्हाला जरा हटके आणि विनोदी जाहिराती लिहायच्या आहेत.
उत्पादने :
१)आयुर्वेदिक कपडे
२)भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर
३)B2 वनस्पतीचे तेल
४)फेसबुक साठी रेडीमेड स्टेटस
५)रंगीबेरंगी शू पॉलिश
स्पर्धेचे नियम :
१) या उत्पादनांपैकी कोणत्याही एका उत्पादनावर वर्तमानपत्रात छापून येईल अशी जाहिरात लिहावी. त्यात ऑडिओ, व्हिडीओ चालणार नाही. फोटो, चित्रं चालू शकेल. मात्र ती तुम्ही काढलेली किंवा प्रताधिकारमुक्त असावीत.
२)एका प्रवेशिकेत एकाच उत्पादनाची जाहिरात असावी.
३) जाहिरात विनोदी असायला हवी पण सभ्य भाषेचा वापर करावा.
४) जाहिरातीला शब्दमर्यादा नाही.
५) प्रवेशिका देण्यासाठी गणेशोत्सव - २०१७ ह्या ग्रुपाचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा. धाग्याचे शीर्षक <<<स्पर्धेचे नाव>>> - <<< उत्पादनाचे नाव >>>> - <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.
६) एका आयडीने कितीही प्रवेशिका देता येतील.
७) प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
८) स्पर्धेचा निकाल मतदान पद्धतीने काढला जाईल.
अतरंगी उत्पादनांच्या अफलातून
अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती .....
भाग घ्यायलाच हवा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त!
मस्त!
फुल्ल कॉमेडी उपक्रम आहे..
फुल्ल कॉमेडी उपक्रम आहे.. फालतू धाग्याला प्रतिसादांनी मजेशीर बनवण्याच्या माबोकरांच्या प्रतिभेला पाहता या उपक्रमात बरेच मजेशीर वाचायला मिळणार हे नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचायला का? लिहायला दिलेय ना
वाचायला का? लिहायला दिलेय ना इतके!
तूही लिही जरा दोन चार जाहिराती.
वाचायला का? लिहायला दिलेय ना
वाचायला का? लिहायला दिलेय ना इतके! Happy तूही लिही जरा दोन चार जाहिराती.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>>>>>>>>>
असं आयतं कोलीत हातात लागल्यावर दोनचार धागे काढायचे मी सोडतोय होय..
बाकी काही चित्रं लागली तर देतो तुम्हाला ऑर्डर ..
मस्तं कल्पना!
मस्तं कल्पना!
Best spardha !!
Best spardha !!
भन्नाट कल्पना.... पण
भन्नाट कल्पना.... पण कल्पनाशक्ती नाही त्यामुळे भाग घेता येणार नाही. मतदान करू हो नक्की.
भन्नाट स्पर्धा आणि भारी विषय
भन्नाट स्पर्धा आणि भारी विषय आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुण्यातील वर्व मधल्या मॅड
पुण्यातील वर्व मधल्या मॅड ॲड्स ची आठवण आली!
पुण्यातील वर्व मधल्या मॅड
पुण्यातील वर्व मधल्या मॅड ॲड्स ची आठवण आली! >>> अगदी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व उपक्रम आवडले!!
सर्व उपक्रम आवडले!!
(आपल्या कडे पुरण यंत्र आहे का, असलं तर ते पुरणयंत्र कुठे ठेवलं आहे या यक्ष प्रश्नाचं उत्तर गेले ७ दिवस शोधतेय मी.त्या मानाने हे चॅलेंज मस्त आणि नो इन्व्हेंटरी वाले आहे!! नक्की भाग घेणार.)
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे आधी एक-दोन दिवस वाचणार. मग काही सुचलं तर लिहिणार.
व्वा! मस्त आहे स्पर्धेचे विषय
व्वा! मस्त आहे स्पर्धेचे विषय. जमल्यास नक्की भाग घेणार.
स्पर्धे विषयी थोडी अजून
स्पर्धे विषयी थोडी अजून माहीती हवी होती.
स्पर्धेचे नियम :
१) या उत्पादनांपैकी कोणत्याही एका उत्पादनावर वर्तमानपत्रात छापून येईल अशी जाहिरात लिहावी. त्यात ऑडिओ, व्हिडीओ चालणार नाही. फोटो, चित्रं चालू शकेल. मात्र ती तुम्ही काढलेली किंवा प्रताधिकारमुक्त असावीत. या नियमा प्रमाणे मला जाहीरातीसाठी आंतरजालावरून चित्र घ्यायचे नाहीये. पण माझी चित्रकला चांगली नाही. तर मला मी तयार केलेल्या जाहीरातीसाठी माबोवरील कोणाकडून चित्र काढून घेता येऊ शकेल का?
जर असेल तर ती मदत कोणाकडून मिळु शकेल.
छान उपक्रम आहे. मी माबोवर
छान उपक्रम आहे. मी माबोवर लिखान केलेलं नवीन धागा कसा तयार करतात याची माहिती मिळेल का?
@ निर्झरा, चित्राशिवाय पण
@ निर्झरा, चित्राशिवाय पण तुम्हाला जाहिरात करता येईल की..
जाहिरातीत मुख्यत्वे मराठीच पण
जाहिरातीत मुख्यत्वे मराठीच पण मराठी, ईंग्रजी, हिंदी, मिंग्लीश चालणारे का?
मस्त , मज्जा येणारे.
मस्त , मज्जा येणारे.
निर्झरा - चित्र / फोटो
निर्झरा - चित्र / फोटो तुम्ही स्वतः काढलेले असावे. बाहेरचे चित्र वापरायचे असल्यास ते प्रताधिकारमुक्त असावे लागेल . नाही तर हिम्स्कूल म्हणतात त्याप्रमाणे चित्राशिवाय जाहिरात करता येईलच,
पवनपरी ११ - वर नियम क्र. ५ पहा.
नविन लेखनाचा धागा उघडायला या पानाच्या उजव्या हाताला या ग्रूपमधे नवीन लेखन करा >>लेखनाचा धागा अशी लिन्क आहे ती पहा.
योग - प्रवेशिका मुख्यत्वे मराठी मधे असेल आणि थोडे फार इतर भाषांचे शब्द आल्यास चालू शकेल. संपूर्ण इंग्रजी किंवा संपूर्ण हिंदी टाळावे.
प्रताधिकारमुक्त छायाचित्र
प्रताधिकारमुक्त छायाचित्र ओळखतात कसे?
उदाहरणार्थ जर मला जाहीरातील मॉडेल म्हणून शाहरूख टाकायचा असेल तर मी त्याचे आंतरजालावरून कुठलाही फोटो आणू शकतो का?
how to find non copyrighted
how to find/identify non copyrighted images असा गूगल सर्च करण्याचे कष्ट घे की ऋ बाळा
हो पण त्या निकषांवर मिळालेले
हो पण त्या निकषांवर मिळालेले चित्र मायबोली आणि संयोजकांच्या नियमात बसायला हवे ना. त्यामुळे त्यांच्या तोंडूनच ऐकलेले बरे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मराठीत सांगतील
नक्कीच भाग घेणार
नक्कीच भाग घेणार
>>योग - प्रवेशिका मुख्यत्वे
>>योग - प्रवेशिका मुख्यत्वे मराठी मधे असेल आणि थोडे फार इतर भाषांचे शब्द आल्यास चालू शकेल. संपूर्ण इंग्रजी किंवा संपूर्ण हिंदी टाळावे.
धन्स!
योग, वरती नियम ५ बघा
योग, वरती नियम ५ बघा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईथे जाहिरात केली आहे:https:/
संयोजक,
ईथे जाहिरात केली आहे:
https://www.maayboli.com/node/63596
(योग्य आहे ना, पान, गृप, वगैरे?)
लँडिंग पेज वरून या पेज वर
लँडिंग पेज वरून या पेज वर लिंक नाहीये...ती करणार का संयोजक?
या उपक्रमात बऱ्याच एंट्री
या उपक्रमात बऱ्याच एंट्री आल्या आहेत ज्या लँडिंग पेजवर अपडेट झालेल्या नाहीत. कृपया अपडेट करा.
मी एक रेडियो कमर्शियल लिहिलंय
मी एक रेडियो कमर्शियल लिहिलंय. दुसरी जाहिरात मालिकेत प्रॉडक्ट प्लेसमेंट डोक्यात आहे.
ती लिहिण्याआधी पुन्हा नियम नजरेखाली घातले तर
< या उत्पादनांपैकी कोणत्याही एका उत्पादनावर वर्तमानपत्रात छापून येईल अशी जाहिरात लिहावी.>
हा पहिलाच नियम दिसला.
माझी प्रवेशिका चालणार आहे का? नियम शिथिल करता येतील का? नाहीतर लिहिलेली जाहिरात विनोदी लेखनात हलवतो आणि दुसरे गणेशोत्सवानंतर लिहितो.
Pages