नमस्कार मायबोलीकरहो!
गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची! दरवर्षी शक्कल लढवून संयोजक नवनवे नियम बनवून मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात. अनेक प्रश्नोत्तरे, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल! पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते. यंदाही आम्ही प्रयत्न केलाय थोडी अवघड, थोडी सोपी अशी पाककृती स्पर्धा आयोजित करण्याचा! चला तर मग, बघूया काय आहेत यंदाचे नियम!
विषय क्रमांक १ - "अमृताहुनी गोड"
उत्सव आणि गोड पदार्थ यांचे अतूट नाते आहे. जगभरात बहुतेक कोणताही उत्सव गोड पदार्थ न खाता साजरा केला जात नसेल. पण हल्लीच्या काळात मात्र गोड पदार्थांवर आडवा हात मारताना बरेच जण दहादा विचार करतात. आधुनिक जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदयरोगाचे वाढत असलेले प्रमाण आणि आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांची उपलब्ध होणारी माहिती ह्यामुळे बरेच जण साखर खाण्याच्या बाबतीत जागरूक असतात. गोड खायचं तर आहे, पण 'पांढरी साखर' नको आहे असं असताना नेमकं करायचं काय? 'शुगर फ्री डार्क चॉकोलेट' सारख्या पदार्थांना काही पर्याय शोधता येतील का?
तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची साखर, गूळ आणि स्वीटनर नसलेल्या पण तरीही चवीला गोड अश्या काही पाककृती करूया.
स्पर्धेचे नियम :
१. पदार्थाच्या साहित्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर,खडीसाखर, गूळ, काकवी , आर्टिफिशल स्वीटनर (स्टेव्हिया, स्प्लेंडा, स्वीट & लो, सॅकरिन) ह्याचा समावेश नको. तसेच हे घातलेले फळांचे पदार्थ, जॅम्स / जेली/ मार्मलेड सुद्धा नको. मिल्कमेड, कंडेंसड मिल्क / इव्हॅपोरेटेड मिल्क, साखर घातलेले फळांचे क्रश हे ही नको. कॉर्न सिरप नको.
२. मध, अगाव्ही नेक्टर, मेपल सिरप, फळे ( ताजी किंवा फ्रोजन) , फळांच्या फोडी, फळांचा ताजा रस हे चालेल. वरून साखर न घातलेली हवाबंद डब्यातली फळे किंवा साखर न घालता आटवलेला फळांचा रस (मँगो पल्प वगैरे) चालेल. कुठल्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरले ते कृतीत नमूद करावे.
३. एक आयडी एका विषयाची एकच प्रवेशिका देऊ शकेल.
४. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २५ ऑगस्ट खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
५. 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
६. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
७. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे "अमृताहुनी गोड - <<< पदार्थाचे नाव >>> - <<< आयडी >>>"
८. प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
९. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
१०. पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा.
११. पदार्थाची चव गोड असणे बंधनकारक आहे.
१२. स्पर्धेचा निकाल मतदानाद्वारे काढला जाईल
१३. 'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही विनंती.
१४.. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१५. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
====================================================
विषय क्रमांक २ - उपकरणं शरणं गच्छामि
'जेणू काम तेणू ठाय, बिजा करेसो गोता खाय' असं आपल्या शेजारी राज्यात म्हटलं जातं ते पाककृतींच्या बाबतीत अगदी योग्य आहे. घटक पदार्थ, स्वयंपाकाची उपकरणे, वाढायची भांडी ह्यापैकी ज्याचं काम त्याने केलं नाही तर पाककृतीची भट्टी काही जमत नाही. यंदा या उपकरणांच्या चौकटीत राहून आपण पाकसिद्धी करायची आहे.
स्पर्धेचे नियम :
१. स्वयंपाक करताना वापरायच्या उपकरणांच्या २ याद्या खाली दिल्या आहेत, या दोन्ही यादीतील प्रत्येकी किमान एक उपकरण वापरून आपल्याला पाककृती बनवायची आहे. (म्हणजे प्रत्येक पाककृतीत प्रत्येक यादीतले एक अशी किमान २ उपकरणे वापरली असलीच पाहिजेत.) या यादीतील उपकरणे पदार्थ बनवताना महत्वाची असावीत. या उपकरणाशिवाय ती पाककृती पूर्णत्वास नेणे जिकीरीचे असावे. उदा. सजावटीसाठी काकड्या स्लाइसर ने कापल्या किंवा चीझ स्लाइसेस कूकी कटरने कापले असे नसावे.
यादी १ - ढोकळा स्टॅन्ड किंवा इडली स्टँड, अप्पे पात्र, मफिन टिन , स्लो कूकर
यादी २ - पुरण यंत्र, कूकी कटर, सोर्या
२. याव्यतिरिक्त बाकीची उपकरणे गरजेप्रमाणे वापरू शकता.
३. पाककृती गोड, तिखट कुठल्याही चवीची चालेल.
४. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २५ ऑगस्ट
खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
५. 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
६. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
७. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे "उपकरणं शरणं गच्छामि - <<< पदार्थाचे नाव >>> - <<< आयडी >>>"
८. प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे. तसेच कोणती उपकरणे वापरलीत ते स्पष्ट लिहावे.
९. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
१०. पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा.
११. स्पर्धेचा निकाल मतदानाद्वारे काढला जाईल.
१२. 'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही विनंती.
१३. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१४. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास जरुर येथे विचारा. आरोग्यपूर्ण आणि उपकरणांच्या साहाय्याने पटकन होणारे पदार्थ बनवून यंदा गणपती बाप्पाला खूश करुया! गणपती बाप्पा मोरया!
यामध्ये थोडा फेरफार केला तर (
यामध्ये थोडा फेरफार केला तर ( शिंगाडा पीठ कमी जास्त/ खजूर परतून घेतला आहे त्याऐवजी चटणीसाठी उकडून घेतात तसा ) चवीला आणखी चांगले लागेल.
कालच्या उपासाला चालेल म्हणून कॅान फ्लावर/तांदुळ पीठ वापरले नाही.
अमृताहूने गोडचे नियम : अगावे
अमृताहूने गोडचे नियम : अगावे नेक्टर आणि मेपल सिरप चालेल पण काकवी नको? अगावे तर खूपच प्रोसेस्ड असते, काकवी नक्कीच (त्यातल्या त्यात) बरी होती. मेपल सिरप आणि काकवी ह्याची तुलना केली तर आरोग्यास त्यातल्या त्यात काकवी बरी. साखरेच्या एवजी हे असले काही ( अगावे नेक्टर, मेपल सिरप, मध वगैरे) वापरले तर पदार्थ आरोग्यदायी ? ते कसे काय हो?
नाहितर मग, प्रोसेस्ड पदार्थच काढून ताजी फळं आणि ड्राय फ्रूट्स वगैरे ठेवायचं ना. हे सगळे गोडाचे ऑप्शन नाहितर गोलगोलच आहेत. ते जे काही आधीचे पुराण लिहिलेय ना की, गोड कमी खायचे , आरोग्यदायी हवे म्हणून हे वापरा ह्याला काहीच अर्थ नाही दिलेल्या पर्यायावरून हेच वाटते. सगळाच झोल आहे नियमात.
उपकरणं शरणं गच्छं : ह्या पाकृ मधील गोड पदार्थाचे नियम क्लीअर नाहीयेत. म्हणजे आधीच्या पाकृ मध्ये गोड पदार्थ कसा असावा लिहिलेय आणि कारण दिलेय की, आजकाल गोड कमी खातात म्हणून असे जिन्नस वापरा मग दुसर्या पाकृचे नियम जर गोड करायची असल्यास काय ते सांगा. विरोधाभास आहे खूपच नियमात.
आणि ताज्या फळांमध्ये सुद्धा
आणि ताज्या फळांमध्ये सुद्धा ठराविकच फळे असती तर जरा बरे कौशल्य ठरले असते.
नियम कायच्याकाय एकमेकास मारक आहेत.
भारी कल्पना !
भारी कल्पना !
एक शंका आहे संयोजक,
एक शंका आहे संयोजक, अमृताहूनी गोड साठी दूध घरी आटवून ते साखर वगैरे काहीही न घालता वापरले तर चालू शकेल का?
@ आशिका हो चालेल
@ आशिका हो चालेल
धन्यावाद संयोजक
धन्यावाद संयोजक
मस्त कल्पना
मस्त कल्पना
सम्योजक, माझी पा कॄ. या
संयोजक, माझी पा कॄ. या ग्रुपच्या होमपेजवर दिसत नाहीये. काही चुकले असल्यास प्लीज दुरुस्त करता येईल का?
Pages