या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.
अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?
त्यावर माझे उत्तरः
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.
नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...
भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.
हे संपूर्ण उत्तर नाहीये. पुढे चर्चा होइल तसे अधिक लिहित जाईन.
, तेव्हा तंत्रज्ञान वापरतात
, तेव्हा तंत्रज्ञान वापरतात म्हणून कोणी विज्ञानवादी होत नाही
>> true. I am talking about modern technology based on coal and petrol. The one which will be useless without this energy.
Point is about its users who claim rationality -but are they really?
Buva, if someone says. Mala kalat he sagal ugachach अहेe, pan mala grahan (,eclipse rituals) palayachi savay lagali ahe. Is that acceptable?
If not, then how can it be acceptable in ur example?
Same footpattee havi na!
People find thr solace in different things.
Coming to original question.. What is scientific mindset? The one which accepts the possibilities. Thr is a hypothesis and u prove or disprove it. U accept the outcome. Few years down the line u find new evidence/realize the limitations of original proof/circumstances. New theory is formed and its considered right till new one comes along with newer data.
When it comes to the God, many will just believe, many will just refute..
A scientific way would be to evaluate.
How? There are ways and rituals. Follow them urself and see if u get the result. Tantra Marg is said to have quick ways of achieving results.
I personally know one person converted from atheist to a tantrik by trying out these things.
If we just sit in d chair under the roof and discuss wheather swimming is real, if its possible - we can't swim. We won't know a thing other than a theory.
Get in d water.. Feel it.. Try it and then decide. (I know this isjust an example. And there will be counter example.)
Saying "no" without experiments and without evidence doesn't seem to be very scientific to a a layman like me. Perhaps scientists here can tell if anything missing in my argument.
true. I am talking about
true. I am talking about modern technology based on coal and petrol. The one which will be useless without this energy. Point is about its users who claim rationality -but are they really? >> माझ्या गावात जर थर्मल प्लँट मधलीच एनर्जी येत असेल, फक्तं कोळशावर चालणारे रेल ईंजिन येत असेल तर मी "मला ग्रीन सोलार एनर्जीच पाहिजे आणि त्यावर चालणारीच ट्रेन पाहिजे" असा हट्टं धरून अंधारात बसलो, रोज दोन तास कामासाठी पायी चालत गेलो तर ते ईरॅशनल हॉईल आणि कोल बेस्ड एनर्जी (तिचे कितीही दुष्परिणाम असले तरी) वापरणे रॅशनल असेल.
रॅशनल म्हणजे नुसते राईट (सोलार एनर्जी) ऑर राँग (कोल एनर्जी) असा चूक किंवा बरोबर निर्णय घेणे नाही तर सारासार विचार करून निर्णय घेणे. म्हणून राईट/राँग आणि रॅशनल/ईरॅशनल हे डिक्शनरीतले दोन वेगळे शब्दं आहे.
तुम्ही म्हणाल मग जिथे कंफर्ट आहे तिथे मी राईटला रॅशनल म्हणत विचार करतो आणि जिथे त्रास आहे तिथे राँग ला रॅशनल म्हणत विचार करतो. तर हेही रॅशनलच आहे म्हणून बरोबर आहे.

सॅटिसफाईस -- आधी समाधान (सॅटिफॅक्शन) मग त्याग (सॅक्रिफाईस) जे रॅशनल आहे.
सॅक्रिफॅक्शन -- आधी त्याग (सॅक्रिफाईस) मग समाधान (सॅटिफॅक्शन) नेहमी रॅशनल असेलच असे नाही.
Buva, if someone says. Mala
Buva, if someone says. Mala kalat he sagal ugachach अहेe, pan mala grahan (,eclipse rituals) palayachi savay lagali ahe. Is that acceptable?>>>>>> ऑफ कोर्स. इथे " हे उगाचच आहे" हे माहित आहे म्हणजे तुम्ही रॅशनल आहात. तरी पुढे जाऊन तसं करत आहात त्याला वेगळी कारणं असू शकतात. माझ्या घरात तशी उदाहरणं आहेत. स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेऊन जर कोणी अशा गोष्टींवर खरा खरा विश्वास ठेवत असेल तर ते बरोबर नाही असं म्हणत आहेत वर.
Get in d water.. Feel it.. Try it and then decide. (I know this isjust an example. And there will be counter example.)>>>>> काहीच म्हणणं नाही. तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. फक्त त्या मार्गाला जाऊन तो मार्ग रॅशनल आहे असं कृपया म्हणू नये कारण तसं असायला ती पद्धत रॅशनल किंवा वैज्ञानिक चौकटीत बसत नाही. It goes both ways. People who believe in science cannot refute someone's "experience" as its personal. Being rational or being of a scientific view does not involve judging other people's faith or experiences. The question of refuting someone comes up when a person involved in unscientific things (spirituality, belief in a personal god etc) claims their view is rational.
सॅटिसफाईस -- आधी समाधान
सॅटिसफाईस -- आधी समाधान (सॅटिफॅक्शन) मग त्याग (सॅक्रिफाईस) जे रॅशनल आहे. >> आणि हे अस करणारे जेव्हा त्यागात कसं समाधान सामावलेलं आहे ते लेख लिहून सांगत फिरतात तो भंपकपणा.
नानबा तुमच्या मिन्ग्लिशमधल्या
नानबा तुमच्या मिन्ग्लिशमधल्या पोस्ट अतिशय कष्टाने वाचल्या. तुमचे मुद्दे उगाचच काय तरी धोपटत बसले आहेत.
मुद्दा हा आहे की आस्तिकता, देव आहे हे 'सत्य' आहे असे मानणे हे आधुनिक विज्ञानाच्या विचारसरणीनुसार योग्य आहे का.
तुमचे ६वे एक्स्टिंक्षन वगैरे मुद्दे, कोल/ऑइलचा वापर वगैरे इर्रिलेवंट आहेत. मी तेल वापरले तर पुढल्या पिढीला प्रचंड गरम पृथ्वीवर राहायला लागेल, टोकाची वातावरण निर्मिती होईल, जिथे खूप पाऊस पडे तिथे दुष्काळ वगैरे वगैरे हे निश्कर्ष / भविष्य आज उपलब्ध असलेल्या डेटावरून व सांख्यिकीची सुत्रे वापरून काढले आहे. ते योग्य ठरेल असा विश्वास आहे कारण ते ही सुत्रे व डेटा आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर खरे ठरले आहेत (प्रुवन). हे माहिती असताना समजा मी भरमसाठ तेलाचा वापर सुरुच ठेवला तर तो एक इन्फॉर्म्ड चॉइस असेल. तो पुढल्या पिढीला उपकारक आहे की अपायकारक, नैतिक की अनैतिक याची चर्चा इथे अप्रस्तुत आहे. यापेक्षा सोपे उदाहरण देतो. मला वारश्याने शेतजमिन मिळाली. ती तशी माझ्या वडिल-आजा-पणज्याला मिळाली होती. त्यांनी कष्ताने कसून, उत्पन्नापेक्षा खर्च कमी या सुत्राने वागून जमिन पुढल्या पिढीच्या हवाली केली. मी जुगारी, दारुडा आहे. काही काम न करता फक्त खर्च करतो.
१. मला दारू प्यायला, जुगार खेळायला आवडते म्हणून मी ते करत राहीन व जमिन विकून संपेपर्यंत ते करत राहीन. मला कळते की असे वागत राहिलो की जमिन विकायला लागेल व पुढल्या पिढीला ती मिळणार नाही. हा झाला वैज्ञानिक दृष्टीकोण.
२. मला दारू प्यायला, जुगार खेळायला आवडते. मी जर रोज बोकड कापला म्हसोबाला तर मी जुगारात जिंकेन व मग माझी जमिन वाचेल ही झाली श्रद्धा/आस्तिकता (मग देवाला बोकड कापणे कश्यानेही रिप्लेस करता येइल. इथे येऊन जर रोज वैद्यबुवांना शिव्या हासडल्या तर जिंकेन असा एखाद्याचा विश्वास असेल, एखादा न्युमरोलॉजीवर विश्वास ठेवून अमूक नंबरच्याच टेबलवर रोज बसेल रमी खेळायला., एखादा नावात एक्स्ट्रा अक्षरं टाकेल).
वैद्यबुवांना शिव्या हासडल्या
वैद्यबुवांना शिव्या हासडल्या तर जिंकेन >>>>
रोज हासडत जा टवणे म्हणजे एक दिवशी लंबर लागून काम होईल तुमचं. 
मुद्दा हा आहे की आस्तिकता,
मुद्दा हा आहे की आस्तिकता, देव आहे हे 'सत्य' आहे असे मानणे हे आधुनिक विज्ञानाच्या विचारसरणीनुसार योग्य आहे का >>> अर्थातच योग्य आहे. कारण विज्ञान तुम्ही काय "मानावे" ह्यावर काहीच कमेंट करत नाही. विज्ञान ते दिलेल्या परिस्थितीत सत्य पडताळून पाहु शकते. देवाच्या अस्तित्वाच्या बाबतीत विज्ञान अग्नोस्टिक आहे.
तुम्ही दत्तक घेतलेल्या एखाद्या मुलीला आपली स्वतःची मुलगी "मानू" शकता व त्या प्रमाणे वागू शकता. ते विज्ञानाच्या "बाप/आइ" जैविक व्याख्येत बरोबर अथवा सत्य असेलच असे नाही. पण ह्या मानलेल्या नात्यावर श्रद्धा ठेऊन जगलेल आयुश्य अवैज्ञानिक असल तर खरच काय अयोग्य असत ?
"मानण" हे चुकिच नाही. पण प्रत्येक "मानण" तुमच्या जिवनाला कुठल्य ना कुठल्या पद्धतीने कंस्ट्रेंट करतात. ते कसे कंस्ट्रेंट करतात हे सम्जून घेणे हे वैज्ञानिक विचार. हे समजून घेतल्यानंतरही तुम्हाला ते मानण योग्य वाटल तर तो तुमचा वैज्ञानिक निर्णयच असतो. त्यामुळे अस्तिक असण म्हणजे काहितरी आहे हे मानण ते मानण वैयक्तिक जीवन समृद्ध करणार असु शकत किंवा नाही. वैयक्तिक जीवन समृद्ध करणार असल तर ते समाज समृद्ध करणार असेलच अस नाही. तेंव्हा.....
अस्तिक असाल तर तुमच क्रिटिकल थिंकिंग थांबत असा सूर जाणवत आहे. पण तुकाराम, राम्दास ह्यांच क्रिटिकल थिंकिंग बंद होत का? देवाच्या बाबतीत ते एक मर्यादा ओलंडू शकल नाही हे खरच. तो कंस्ट्रेंट असुनही एकंदर मानवी जीवनावरचे त्यांचे विचार ज्ञानदायी नाहित का? जीवनोपयोगी नाहित का?
ये हुई ना बात पेशवे. चांगली
ये हुई ना बात पेशवे.
चांगली पोस्ट.
तुमचा वैयक्तिक अनुभव तुमचं आयुष्य समृध्द करत असतो किंवा नसतो. ह्या अनुभवांचे जणू एक स्पेक्ट्रम आहे. फक्त असं आहे अनुभव काहीही असो, ते येण्यामागची प्रोसेस आणि ते अनुभव सुद्धा एक तर रॅशनल असतात किंवा नसतात, येवढच.
तेवढ्यात पोस्ट बदलली पेशवे.
तुकाराम महाराजांचे योगदान खुप मोठे आहे, त्यात शंका नाही पण त्यामुळे त्यांचे विचार सायंटिफिकली बरोबर होते असं नाही. ते सगळ्यात देव बघायचे. त्यांचं उदाहरण हे त्यातल्या त्यात कमी अनसायंटिफिक आहे. He transcended the self, so there was tremendous clarity in his thoughts but that doesn't mean his thoughts about the universe etc were scientific or even rational.
बुवा बरोबर तुकारम महाराज
बुवा बरोबर तुकारम महाराज सायंटिफिक होते अस माझ म्हणण नाहीच आहे. सायंटिफिक अस त्यंच्या विचारात काहिच नव्हत तर कुठल योगदान "मोठे" आहे व का? अलाइड जीवनावर भाष्य कवितेत करा वा गद्यात ते अवैद्यानिक असेल तर? जाउदे शब्दछल करण्यात काय मजा नाय
प्वाईंट आहे पेशवे, योग्य
प्वाईंट आहे पेशवे, योग्य मुद्दा. थोड्यावेळानी लिहितो.
पेशवे पेशवे, एव्हडी पोस्ट
पेशवे पेशवे, एव्हडी पोस्ट लिहायच्या आधी मी इतका वेळ हात खरवडून लिहितोय ते तरी वाचायचे हो. इथे 'सत्य' आहे असे मानणे लिहिले आहे त्यात 'सत्य' या शब्दावर भर आहे आणि मानणे हे क्रियापद मान्य असणे या अर्थाने आहे. एखाद्याने देव आहे हे सत्य (फॅक्ट) आहे हे मान्य करून जर पुढली विधाने लिहिलीत तर त्याची पुढली विधाने ही अयोग्य असतील. देव आहे असे गृहीतक धरून विधाने केली, वाढवली तरी देवाचे असणे हे गृहीतक आहे, सत्य नाही हे पहिल्याच पायरीवर स्पष्ट केले आहे.
तुमचे असे म्हणणे आहे का विज्ञान काय वाट्टेल ती गोष्ट सत्य आहे हे मान्य करण्याची मुभा देतो त्याचे पुरावे/सत्यता सिद्ध झाल्याशिवाय? आणि विज्ञान काहीही सत्य आहे असे मान्य करायला मुभा देत असेल तर मग पुढचे अॅग्नॉस्टिक वगैरे कशाला लिहायचे?
>>>
"मानण" हे चुकिच नाही. पण प्रत्येक "मानण" तुमच्या जिवनाला कुठल्य ना कुठल्या पद्धतीने कंस्ट्रेंट करतात. ते कसे कंस्ट्रेंट करतात हे सम्जून घेणे हे वैज्ञानिक विचार. हे समजून घेतल्यानंतरही तुम्हाला ते मानण योग्य वाटल तर तो तुमचा वैज्ञानिक निर्णयच असतो
>>
आँ?? मी गांजा प्यायलो की मला पेशवे हे पुरुष नसून स्त्री आहेत असे दिसते. गांजा पिण्याचा कण्स्ट्रेन्ट मी मान्य केल्याने पेशव्यांचे स्त्री असणे माझ्या वैज्ञानिक विचारानुसार सत्य होते.
इथे प्रश्न फार थेट आहे. देवाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे का आधुनिक विद्नानाच्या विचारपद्धतीनुसार. ते सत्य आहे असे मानल्याने तुमच्या जीवनातल्या बद्धकोष्ठता ते बुद्धकोष्ठता (म्हणजे वैचारीक तुंबण) या व्याधींचा निचरा होतो की नाही, तसा झाल्यास ती औषधपद्धती योग्य आहे की नाही, मला उपयोग झाला म्हणुन मी दुसर्याला त्याचा उपयोग करायला सांगावा की नाही याबद्दल चर्चा नाहिये.
टणेश्वरा, मी स्त्री आहे असे
टणेश्वरा, मी स्त्री आहे असे तुझे मानणे हे वैज्ञानिक सत्य नसले व ती मान्यता तु तुझ्या थडग्यात घेऊन गेलास तरी तुझ्या जीवनावरचे त्या मान्यतेचे कंस्ट्रेंट शुन्य आहेत. हे झाले वैयक्तिक परिणाम. तुझ्या मान्यतेचा माझ्या जीवनावरही प्रभाव शुन्य त्यामुळे ती मान्यता अतिशय हार्मलेस असेल (सामजिक परिणाम).
एखाद्याने देव आहे हे सत्य (फॅक्ट) आहे हे मान्य करून जर पुढली विधाने लिहिलीत तर त्याची पुढली विधाने ही अयोग्य असतील. >> असे काही नाही. कोणत्याहि बेसीक मान्यतेवर जी अवैज्ञानिक पण असू शकते लोजिकली कन्सिस्टंट सिस्टम बनवता येते. त्या सिस्टिम मधे ती विधाने चूक किंवा बरोबर सु शकतात. उदा. ज्ञायव्यवस्था ह्यातील सगळी अॅसम्प्शन वैज्ञानिक असतातच असे नाही. चेस, क्रिकेटचा गेम. कुटुंब व्यवस्था अशी अनेक....
सायंटिफिक अस त्यंच्या विचारात
सायंटिफिक अस त्यंच्या विचारात काहिच नव्हत तर कुठल योगदान "मोठे" आहे व का? अलाइड जीवनावर भाष्य कवितेत करा वा गद्यात ते अवैद्यानिक असेल तर?>>>>>>>>> चर्चेची सुरवात विज्ञानवादी असलेल्या माणसाने आस्तिक असावे की नाही इथून झाली. आस्तिक म्हणजे जो माणूस देवावर किंवा माणूस निसर्ग आणि सगळं जग चालवणारी एक शक्ती आहे, असं मानणारा.
विज्ञानावर विश्वास असणारा आणि मनुष्य जगात आणि बाहेर जे काही घडतं आहे, त्या मागे एक प्रकारचे विज्ञान आहे जे अर्थातच आपल्याला पुर्ण ज्ञात नाही ह्यावर विश्वास असलेल्या माणसाला मी विज्ञानवादी म्हणेन. जेवढं ज्ञात आहे, त्याला अनुसरुन त्याची एक चौकट तयार केली गेलेली आहे. ती चौकट जसे नवीन शोध लागत आहेत, तशी तिची व्यप्ती वाढत जात आहे.
विज्ञान तशी पुढची पायरी आहे आणि वर मी लिहिलय तसं दृष्टिकोन वैज्ञानिक असायला तो रॅशनल हा असलाच पाहिजे. तर इथून पुढे मी वैज्ञानिक एवेजी रॅशनल हा शब्द वापरेन कारण दैनंदिन आयुष्यात माणसाला फार वैज्ञानिक असा द्दृष्टिकोन ठेवायची गरज नसते (कारण दैनंदिन जीवनात तो सतत वैज्ञानिक प्रॉबलेम सॉल्व नाही करत आणि दृष्टिकोन फक्त रॅशनल असेल तर तेवढं पुरेसं आहे)
स्वतःला रॅशनल म्हणणारा माणसानी त्याच्या दैनंदिन व्यवहारात तो वापरणे अपेक्षित असते. आता तो माणूस जर स्वतःच्या इच्छेनी इररॅशनल वागायला लागला तर तो इथला मुद्दा नाही. जो पर्यंत त्याला माहित आहे, आपण इररॅशनल वागतोय तो पर्यंत काहीच प्रश्न नाही.
इथ पर्यंत चर्चा आली होती पण मला वाटतं पेशवे तुम्ही थोडा अध्यायत्माचा दाखला देत, आंतरिक शांती हे मुद्दे पण आणले. मग पुढे ह्या गोष्टी अवैज्ञानिक, इररॅशनल जरी वाटल्या तरी त्याचा माणसाला त्याचा जीवनात पुष्कळ आनंद मिळतो किंवा आयुष्य आणखिन सुसाह्य होतं हा मुद्दा मांडला. तुकारामांच्या योगदानाविषयी पण मुद्दा आहेच, जो योग्यच आहे.
प्रथमदर्शनी विज्ञानवाद आणि अध्यायत्म हे दोन स्वतंत्र असे ट्रॅक वाटतात आणि बर्याच अंशी ते खरं पण आहे. एक ट्रॅक धरला म्हणून दुसरा सोडायला पाहिजे असं काही, किंवा असंही म्हणता येइल की वैज्ञानिक दृष्टिकोनाला जर अध्यायत्माची जोड लागली तर माणूस आंतर्बाह्य असा सुखी होऊ शकतो, जास्त इम्पॅक्टफूल असं काम करु शकतो. हे पण पुष्कळ खरं आहे पण पुर्ण पणे नाही असं वाटतं.
एकदा माणसाचा द्रुष्टिकोन रॅशनल असला की तो सर्वत्र तसा असला पाहिजे. मग तुम्ही अध्यायत्मिक गोष्टींकडे सुद्धा रॅशनल दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जर तुमच्या अध्यायत्माचे बेसिक टेनेट्स रॅशनल नसतील तर ते सुद्धा नीट पडताळून बघितले पाहिजे. रॅशनल विचार हा प्रोग्रेसिव पण असतो.
राहिला प्रश्न अध्यायत्माचा तर, तुम्ही अभ्यासत असलेला अध्यायत्म जर माणसाच्या केपेबिलिटीज बद्दल, जगाबद्दल (म्हणजे युनिवर्स ह्या अर्थानी) जर इररॅशनल आणि अवैज्ञानिक असे दाखले देत असेल तर तो पण झुगारुन टाकायला हवा.
आता इथे एक इंटरमिजेयट अशी फेज येऊ शकते की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पण अध्यायत्मिक पद्धतीनी जीवन जगताना काही लोकांना खुप सुंदर अनुभव (अनुभुती?) येऊ शकतात आणि त्यामुळे ते तिथेच रमतात किंवा तिथून पुढे आणखिन चिकित्सा करायची त्यांची इच्छा मरुन जाऊ शकते. हे शक्य आहे पण वैज्ञानिक दृष्तिकोनातून ते बरोबर नाही किंवा सरळ सांगायचं तर तसं जगणं अवैज्ञानिकच. आता तुम्ही म्हणाल की काय गरज आहे? गरज आहे माझ्या मते. वैज्ञानिक दृष्टिकोन एकदा अंगिकारला की तो सतत शेवट पर्यंत राबवलाच पाहिजे कारण त्यातच तथ्य आहे.
एखादी गोष्ट कशी काम करते ह्या मागे एक किंवा अनेक रॅशनल कारणं असतात किंवा ती गोष्ट काम कशी करते हे कळत नसायला त्या मागे एक किंवा अनेक रॅशनल लिमिटेशन असतात. कारणं आणि लिमिटेशन दोन्ही नीट समजून घेतलेलच माणसाकरता योग्य असतं.
माणसानी उत्सुकता दाखवून भुकंप का होतो, अचानक वादळं का येतात अशी पुर्वी अगदी दैवी वाटणार्या आपत्तींना, रॅशनली निरिक्षण करुनच मग त्यांच्यावर कंट्रोल साधला. अध्यायत्मिक अनुभुती ही आपत्ती जरी नसली तरी त्याच्या गाभ्यामध्ये जर अवैज्ञानिक दाखले असतील तर त्याचं खंडन हे केलच पाहिजे.
हे येवढं सगळं म्हणून सरतेशेवटी हे पण सांगतो की माझं अध्यात्माशी काही वाकडं नाही आणि उलट त्यातल्या काही पद्धतींचा मला फायदाच झाला आहे. फक्त असं आहे की अध्यात्माचा ब्रँड सुद्धा चेक करुन घ्यावा कारण काही ब्रँड मध्ये वाट्टेल ते घुसडलय आणि रॅशनल माणसानी त्या गोष्टी फेस वॅल्यु वर घेऊ नये. बिना बादरायण दाखल्यांचा अध्यायत्मिक ब्रँड सुद्धा उपलब्ध आहे. रॅशनल दृष्टिकोन ठेवाल तर तोही सापडेल.
>>किंवा असंही म्हणता येइल की
>>किंवा असंही म्हणता येइल की वैज्ञानिक दृष्टिकोनाला जर अध्यायत्माची जोड लागली तर माणूस आंतर्बाह्य असा सुखी होऊ शकतो, <<
अध्यात्माचा बेस जर देव या संकल्पनेवर उभा असेल तर रॅशनल्/वैज्ञानिक दृष्टिकोनातुन अध्यात्माकडे कसं बघायचं? कारण विज्ञान "देव" मानत नाहि...
ज्या अध्यात्माचा बेस देव हि
ज्या अध्यात्माचा बेस देव हि संकल्पना आहे ते अध्यात्म नव्हे. तो भक्तिमार्ग झाला.
अध्यात्म म्हणजे स्वतः चा शोध, त्यात दुसरी इंटीटी येत नाही. बाकी अनुभव अचूक शब्दबद्ध करणे शक्य नसल्याने टर्मिनॉलॉजी चा फार गोंधळ आहे.
अध्यात्माचा बेस जर देव या
अध्यात्माचा बेस जर देव या संकल्पनेवर उभा असेल तर रॅशनल्/वैज्ञानिक दृष्टिकोनातुन अध्यात्माकडे कसं बघायचं? कारण विज्ञान "देव" मानत नाहि...>>>>> आपल्याला म्हणजे भारतीयांना बहुतांशी देव संकल्पना बेस ला असलेलेच अध्यायत्मिक ज्ञान माहित असतं. इतरही साधनं आहे आणि तोच माझा मुद्दा होता वर एग्जॅक्टली. ज्ञान मार्ग एक आहे ज्यात तुम्ही सतत स्वतःला "मी म्हणजे कोण" हे विचारत राहता. इथे देवाचा काहीस संबंध नाही, फक्त असं आहे, की हा प्रश्न सतत विचारुन जेव्हा तुम्ही शेवटी तुमच्या "मी आहे" ला म्हणजे ज्याला आपण स्वत्वाची जाणीव म्हणतो त्याची पलिकडे फक्त जाऊन फक्त "असणे" (just simply being, with no feeling of I) ह्यात स्थिरावता तेव्हा लोकांना आपण आणि बाहेरचं जग ह्यत फरक जाणवत नाही. हा एक अनुभवच आहे शेवटी.
फार पुर्वी जेव्हा हे अनुभव लोकांना आले तेव्हा त्यांनी त्यांच्या आकलानानुसार त्या भोवती थियरी लिहिली. आता ती थियरी नीट बघितल्यास लक्षात येतं की ती काही फार रॅशनल नव्हती. आता विज्ञानाच्या सहाय्याने माणसाची कवटी फोडून त्याच्या मेंदूचा भरपूर अभ्यास झालेला आहे.
त्या रिसर्च मधून अगदी सहज कळू शकतं की शेवटी ती अनुभुती सुद्धा एक मेंटल स्टेट आहे. देव ही कॉन्सेप्ट न वापरता सुद्धा अध्यात्मिक जीवन जगता येऊ शकतं.
खुप योगाभ्यास करणार्या बर्याच लोकांना ही स्टेट एक दिवशी अचानक येते, येऊ शकते. त्याला कुंडलिनी अवेकनिंग म्हणतात. आता त्या भोवती सुद्धा बरीच तांत्रिक वगैरे थियरी लिहिली गेलेली आहे. चक्र, नाडी वगैरे. पण बघायला गेलं तर योगाभ्यासात सेंट्रल असं काय आहे? श्वासावर नियंत्रण आणि त्याही पेक्षा श्वासावर लक्ष केंद्रित करणे. बराच काळ खुप योगाभ्यास करुन एकदम अचानक तुमचा सेन्स ऑफ सेल्फ ड्रॉप होऊ शकतो. आपल्याला आश्चर्य वाटतं पण आपण ह्या स्वत्वाच्या जाणीवेशिवाय आरामात (खरं तर आणखिन आनंदात) जगू शकतो ही वस्तुस्थिती आहे.
वैद्यबुवा, मेन्टल स्टेट चा
वैद्यबुवा, मेन्टल स्टेट चा विज्ञानाशी काहीच संबंध नाही का? कवटी फोडून मेंदू बघितला म्हणजे सगळं झालं? इतकं सिम्प्लीफिकेशन अपेक्षित नाही.
इतकं सिम्प्लीफिकेशन अपेक्षित
इतकं सिम्प्लीफिकेशन अपेक्षित नाही.>>>>> कोणाला अपेक्षित नाही?
मेन्टल स्टेटचा पुर्णपणे विज्ञानाशी संबध आहे, दुसरा कोणताच म्हणजे युनिवर्स, देव कशाशीच संबंध नाही.
फार पुर्वी जेव्हा हे अनुभव
फार पुर्वी जेव्हा हे अनुभव लोकांना आले तेव्हा त्यांनी त्यांच्या आकलानानुसार त्या भोवती थियरी लिहिली. आता ती थियरी नीट बघितल्यास लक्षात येतं की ती काही फार रॅशनल नव्हती. आता विज्ञानाच्या सहाय्याने माणसाची कवटी फोडून त्याच्या मेंदूचा भरपूर अभ्यास झालेला आहे.
त्या रिसर्च मधून अगदी सहज कळू शकतं की शेवटी ती अनुभुती सुद्धा एक मेंटल स्टेट आहे.
>> या वाक्यांवरुन असं जाणवतं की मेन्टल स्टेट चा रॅशनलिटीशी (थोडक्यात विज्ञानाशी) संबंध असत नाही, ती सब्जेक्टीव आहे. कारण कवटी फोडून मेंदूचा अभ्यास हा उल्लेख आपण केल्याने तसे वाटले. "मेंदूत तसं काही नाही, मनाचे खेळ आहेत झालं" असा आविर्भाव वाटला. तसे नसेल तर माझ्या समजण्यात चूक असू शकते.
आध्यात्मिक जीवन जगायला देव ह्या संकल्पनेची गरज नाही ह्यावर आपले एकमत आहेच. अध्यात्म आणि देव संकल्पना ह्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ऑकल्ट बाबतीत सरमिसळ करणे नेहमीचेच असल्याने आध्यात्मात देव घुसडला गेला आहे उगाच आणि भक्तिमार्गात आध्यात्म.
खुप योगाभ्यास करणार्या बर्याच
खुप योगाभ्यास करणार्या बर्याच लोकांना ही स्टेट एक दिवशी अचानक येते, येऊ शकते. त्याला कुंडलिनी अवेकनिंग म्हणतात. >>>
कुंडली अवेकनिंग हि योगाभ्यास सुरू केल्यानंतरची एकदम प्राथमिक पण महत्वपूर्ण स्टेज झाली. खरा योगाभ्यास त्यानंतर सुरू होतो. आपण म्हणता तशी तांत्रिक थिअरी जरूर रचली गेलीये पण ती नुसता शब्दांचा काथ्याकुट नाहीये तर ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांनी तो शब्दांत मांडला आहे आणि काहीजणांनी गुढ भाषेत त्या पुढील योगाभ्यासासाठी मार्गदर्शन ही केलेलं आहे. जे स्वत: ला पराकोटीचे विज्ञानवादी म्हणवून घेतात त्यांनी जरूर हा अभ्यास करावा. यावर कुणाचंही नियंत्रण नाहीये.
े
नानाकळा, बरोबर. मला
नानाकळा, बरोबर. मला विज्ञानाशी, रॅशनॅलिटीशी संबंध आहे, असं म्हणायचं होतं.
"मी" आणि त्या पलिकडचं जग हे एकत्र होणं किंवा मी अशी जाणीव नष्ट होणं ही खुप युफॉरिक स्टेट आहे. आणि त्याला संपुर्णपणे वैज्ञानिक असं स्पष्टिकरण असताना सुद्धा जो माणूस त्यातून जात असतो त्याला विज्ञानाचा बेस नसेल तर त्याच्या बेसिस वर तो आपल्याला ब्रम्हांडाचं मूळ कळालं असा समज सहज करुन घेऊ शकतो. पुर्वीच्या काळी तेच झालं आहे.
आता विज्ञान इतकं पुढं सरकल्यामुळे आपल्याला ते करायची गरज नाही.
राहूल, मी वर एकदा ते क्लियर केलेलं आहे. कोणी स्वतःला विज्ञानवादे म्हणवून घेत असेल तर त्यांना कोणाच्या थियरीजना वेड्यात काढायचा हक्कं मिळत नाही. फक्त रितसर, बॅलन्स्ड चर्चे मध्ये जर कोणी ह्या थियर्या विज्ञानापलिडच्या आहेत किंवा त्या पेक्षा अॅडवानस्ड आहेत असं म्हणत असेल तर मग काउंटर आर्ग्युमेंट्स करता येतील. एरवी तुम्हाला ह्या थियरीज वापरुन गूढ अनुभव येत असतील आणि ते तुम्हाला खुप आवडत असतील तर ठीकच आहे. नन ऑफ एनिबडीज बिजनेस.
आता आपण वेगळ्या विषयाबद्दल
आता आपण वेगळ्या विषयाबद्दल बोलत आहोत.देव व विवेकवाद यात अध्यात्म हा तिसरा भिडू आहे खरं तर....
"मी" आणि त्या पलिकडचं जग हे एकत्र होणं किंवा मी अशी जाणीव नष्ट होणं ही खुप युफॉरिक स्टेट आहे.
>> युफॉरिक स्टेट हे एक जबाबदार विधान म्हणावं का अशी मला वैयक्तिक शंका आहे. युफॉरिक म्हणजे वेडसर किंवा वेडी माणसे असे मला ठावूक आहे, त्यापेक्षा वेगळं काही म्हणताय का आपण? तसे म्हणत असाल तर माझा आक्षेप असेल.
आणि त्याला संपुर्णपणे वैज्ञानिक असं स्पष्टिकरण असताना सुद्धा
>> या वैज्ञानिक स्पष्टीकरणाबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे का? वाचायला मिळाली तर आनंद वाटेल.
जो माणूस त्यातून जात असतो त्याला विज्ञानाचा बेस नसेल तर त्याच्या बेसिस वर तो आपल्याला ब्रम्हांडाचं मूळ कळालं असा समज सहज करुन घेऊ शकतो. पुर्वीच्या काळी तेच झालं आहे.
>> इथे काहीतरी गोंधळ होतोय असं वाटतंय.
आता विज्ञान इतकं पुढं सरकल्यामुळे आपल्याला ते करायची गरज नाही.
>> काय करायची गरज नाही?
वैद्यबुवा, थोडं सविस्तर मांडाल तर समजायला मदत होईल.
ह्या थियर्या
ह्या थियर्या विज्ञानापलिडच्या आहेत किंवा त्या पेक्षा अॅडवानस्ड आहेत असं म्हणत असेल
>> खरे तर असे कोणी म्हणत नाही, खरे योगी किंवा अध्यात्मिक तर असे कधीच म्हणणार नाहीत. ते नेहमी एकच म्हणतील की दिलेल्या नियमांनुसार प्रयोग करा. अनुभव येतो. हे विज्ञानाच्या नियमांप्रमाणेच आहे. आणि असे प्रयोग करण्यासाठी पात्रतेचे (वेडसर व मानसिक रुग्ण सोडले तर) कसलेही बंधन कोणावरही नाही.
ही युफोरियाची डेफिनिशन.
ही युफोरियाची डेफिनिशन.
a feeling or state of intense excitement and happiness.
ह्या अर्थानी म्हणालो. वेडेपण ह्या अर्थानी नाही.
या वैज्ञानिक स्पष्टीकरणाबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे का? वाचायला मिळाली तर आनंद वाटेल.>>>>> ते तुम्हाला शोधावं लागेल. मी इकडे तिकडे रँडम आर्टिकलं वाचतो. पण माहिती उपलब्ध आहे हे नक्की.
काय करायची गरज नाही?>>>>>> काही अध्यात्मिक पद्धती वापरुन जर युफॉरिक अनुभव आला म्हणून काही "देव" हा बेस असलेल्या किंवा इतर गूढ स्पष्टीकरणं असलेल्या थियरीज खर्या आहेत असं मानायची गरज नाही.
खरे तर असे कोणी म्हणत नाही, खरे योगी किंवा अध्यात्मिक तर असे कधीच म्हणणार नाहीत>>>>> यु वूड बी सर्प्राईज्ड.
मध्यंतरी सर्न (एल एच सी) प्रयोगांमध्ये मध्ये हिग्स बोसॉन पार्टिकल सापडला तेव्हा मी भारतात होतो. टिव्ही वर इतर फिजिसिस्ट लोकांबरोबर सदगुरुंना पण आमंत्रण दिलं होतं. इथे अमेरिकेत दिपक चोप्रा अगदी रुटिनली नडभिडत असतो फिजिस्ट लोकांना.
काही अध्यात्मिक पद्धती वापरुन
काही अध्यात्मिक पद्धती वापरुन जर युफॉरिक अनुभव आला म्हणून काही "देव" हा बेस असलेल्या किंवा इतर गूढ स्पष्टीकरणं असलेल्या थियरीज खर्या आहेत असं मानायची गरज नाही.
>> हेच वैज्ञानिक थियरीज बाबत म्हटल्या जाऊ शकते, हो ना? कारण त्या थिअरीज असतात. नियम नव्हे.
जसे प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त आहे ही थियरी आहे. जोवर प्रकाशापेक्षा वेगवान सापडत नाही तोवर आपण हेच मान्यता घेऊन व्यवहार करणार. पण प्रकाशाचा वेग मोजलाय व तो सर्व काळात सर्व परिस्थितीत एकच आला तर तो वेग हा शाश्वत नियम झाला. तो डावलणे शक्य नाहीच.
तेव्हा जोवर नियम सिद्ध होत नाही तोवर थियरीज खर्या मानायच्या का खोट्या हा प्रश्न गैरलागू आहे.
हेच वैज्ञानिक थियरीज बाबत
हेच वैज्ञानिक थियरीज बाबत म्हटल्या जाऊ शकते, हो ना? कारण त्या थिअरीज असतात. नियम नव्हे.>>>>>> Now I think we are going in circles. I don't know what you are trying to prove. so I guess, this my cue to stop.
I think some things just need to be contemplated. You get some information and then you think about it. I think we have had a good discussion. There's nothing more to add.
Now I think we are going in
Now I think we are going in circles. I don't know what you are trying to prove.
>> नाही, मी काहीही प्रुव करत नाहीये. रादर, तुमच्याबाजूने ह्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करतोय. मला माझी मते लादायचीच असती तर हा धागा आणि हे डिस्कशन केलेच नसते, तुम्हालाही ते पहिल्याछूट लक्षात आलेच असते.
-------------- अध्यात्म आणि विज्ञान यावर वेगळा धागा जरा वेळाने काढेन, इथे चर्चा नको -------------
फेअर इनफ नानाकळा.
फेअर इनफ नानाकळा.
Now I think we are going in
Now I think we are going in circles.
अध्यात्म आणि विज्ञान यावर वेगळा धागा जरा वेळाने काढेन, इथे चर्चा नको >> असं कसं बुवा ? शेवटी 'तुमचे विज्ञान आणि आमचे विज्ञान' असा धागा निघाला, तुमच्या विज्ञानात तुम्ही न्यूटन आणि आईन्स्टाईन बद्दल बोलले आणि आमच्या विज्ञानात आम्ही पुष्पक विज्ञान आणि रजनीकांत बद्दल चर्चा केली आणि धागा शेवटी शाहरूखच्या रा-वन वर आला की मग तुम्ही Now I think we are going in circles असे म्हणू शकता, तोवर ही चर्चा चालूच राहिली पाहिजे.
बुवा, नाना हलकेच घ्या
अध्यात्म आणि देव संकल्पना
अध्यात्म आणि देव संकल्पना ह्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत. >>>
नाना, आपल्याला अध्यात्म मान्य आहे, देव नाही.
येथे एक आवर्जून ध्यानात घ्यायलाच हवं.
देव संकल्पना कुठून येते ते जमलं तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
योगाभ्यासात जे सप्तचक्रे वैगरे उल्लेखलं गेलंय त्याचा थोडक्यात मागोवा घेऊयात.
शरीरात मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार हि सात चक्रे सांगितली गेलीयेत.
कुंडली ही जी काही संकल्पना आहे तिचं स्थान मुलाधार चक्रात आहे. आता हे मुलाधार चक्र शरीरातील गुदा आणि लिंग वा योनी यांच्या मध्ये येतं. लिंगाच्या वर स्वाधिष्ठान चक्र आहे. बेंबीमध्ये मणिपुर, ह्रदयस्थानी अनाहत, गळ्यामध्ये विशुद्ध, भ्रूमध्यात आज्ञाचक्र तर सर्वांत वर डोक्यात(भोवर्याचं ठिकाण वा आसपास) सहस्रार चक्र.
कुंडलिनीच्या जागृतीनंतर (after awakening) तिचा प्रवास मुलाधार→स्वाधिष्ठान → मणिपुर→अनाहत→विशुद्ध→आज्ञा→सहस्रार असा उर्ध्वदिशेनं होतो.
पण हा प्रवास सोप्पा नाहिये.
सुक्ष्म पातळीवरील शरीररचनेत येथे एक गोची झालेली आहे. कुंडलिनी आणि स्वाधिष्ठान हा जो काही प्रदेश आहे तो 'कामक्षेत्रा' चा आहे. आणि माणूस येथेच गंडतो. म्हणजे ज्या ठिकाणाहून आध्यात्मिक उन्नत्तीला सुरूवात होणार असते त्याच ठिकाणी माणसांच मन वासनेत अडकून पडतं आणि योगमार्ग किंवा भोगमार्ग यांपैकी एकाचीच निवड होते!!
जर तुम्ही मुलाधारावर प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित केलं तर काही दिवसांच्या अभ्यासानंतर तेथे स्पंदनं (vibrations) सुरू होतात. जर कुंडलिनीची जागृती झाली तर ती स्पंदनं वरच्या दिशेनं स्वाधिष्ठानाकडे सरकतात. पण याचदरम्यान माणसाच्या मनांतील कामभावना प्रबळ होतात. त्यांवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवावं लागतं आणि हे नियंत्रण मिळविण्यासाठी यौगिक आभ्यास करणारे साधक एकांतात जाणं पसंत करतात. एकंदर कुंडलिनी चा स्वाधिष्ठानापर्यंतचा प्रवास अवघड आहे. हा सगळा सप्तचक्रांचा प्रवास ज्यांनी पुर्ण केलेला आहे अशांनी (उदा. ज्ञानेश्वर-ज्ञाननाथ)सामान्य माणसाला भक्तीच्या मार्गावर गुरफटून टाकून तो प्रवास जास्त आणि क्लिष्ट विचार न करता सहज करता यावा अशी सोय भक्तिमार्ग दाखवून केलेली आहे आणि माझ्या मते 'देव' हि संकल्पना येथे निर्माण होते आहे.पण असं नाहीये कि भक्तीमार्गाला जायलाच हवं, न जाताही हा प्रवास करता येतो.
आता जे या मार्गांनी गेले ते आध्यात्मातील अधिक प्रगत लोकं होते. अशा लोकांना आपण योगी, सिद्ध वैगरे संबोधतो.(मला येथे ज्ञानेश्वरांचेच उदाहरण अपेक्षित कारण आजही अशी दुर्मिळ माणसं असली तरी आसारामा सारख्या ढोंग्यांनी लावलेला कलंक बघता कुणाचं नाव घेणं वादाला कारण ठरेल.)
त्यांचा योगाभ्यास एवढा हायर स्टेजला पोहोचला कि ते सामान्य जनांवर प्रभाव टाकायला लागले. (हा प्रभाव नुसता सामाजिक किंवा दिखावू नाहीये) अशा लोकांनी जर सामान्य माणसाच्या नुसत्या डोक्यावर जर हात ठेवला तर तात्काळ त्या माणसाची कुंडलिनी जागृत होऊ शकते. (शकते हा शब्द फक्त यासाठीच वापरला कारण त्या सिद्ध वैगरेंची तशी इच्छा असेल तरच) आणि सुरूवातीच्या योगाभ्यासाच्या सगळ्या स्टेज स्किप होतात. लोकांना जे निरनिराळे चमत्कारिक अनुभव आले वैगरे जे आपण ऐकतो ते दरवेळी खोटं, थोतांड, लबाडी वैगरे नसतं. (खोटे अनुभव पसरवले जातात ते फसवणूक, लुबाडणूक करण्याच्या उद्देशाने पण खरे अनुभवही असतात.) खरे अनुभव निखळ असतात. त्यात हातचलाखी नसते, स्वार्थ नसतो, फसवणूक नसते. हे चमत्कार त्यांना (सिद्धांना) जे higher order चं योगविज्ञान माहीती झालं ते वापरून केलेले असतात. (वैज्ञानिक लोकांनी ह्या विज्ञानवादी म्हणून आणि अभ्यास करून ह्या योगविज्ञानाचा किस पाडून शास्त्रीय भाषेत त्याचं विश्लेषण जरूर करावं त्यामुळे प्रचलित विज्ञान खुप पुढे जाण्यास मदतच होईल.)
भगवान विष्णु, भगवान शंकर वैगरे ज्या देवांच्या प्रतिमा आपण (समाजानं) निर्माण केल्या ते लोकं हे योगविज्ञानात कल्पनातीत प्रगती केलेली माणसं असावीत. त्यामुळेच त्यांना योगेश्वर वैगरे उपाध्या लावल्या गेलेल्या असतील. ज्या पुराणकथा आहेत ती रूपकं असतील किंवा सहज कुणाच्या काही हाती लागू नये यासाठी गोलमटोल भाषेचा वापर करून निर्मिलेलं साहित्य असेल. पुर्णपणे खोटंही नसेल आणि पुर्णपणे खरंही नसेल.
―₹!हुल
े
Pages