या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.
अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?
त्यावर माझे उत्तरः
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.
नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...
भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.
हे संपूर्ण उत्तर नाहीये. पुढे चर्चा होइल तसे अधिक लिहित जाईन.
हाब हा सगळा सिमेंटिक्सचा
हाब हा सगळा सिमेंटिक्सचा मामला आहे. अननोन म्हणजे दैव असे समिकरण मानले तर जितके अननोन माहीतेचे होइल तितका देव पण माहितीचा होइल. सगळा देव समजला तर माणुस दैवत्वाला पोचेल. भाषेच्या मर्यादा हा सुधा विज्ञानातील आडथळा आहेच ना.. तिथेच अडकुन बसण्यात काय अर्थ आहे. नाही आहे (नास्तिक) व काहितरी आहे (आस्तिक) दोन्ही रस्ते शेवटी द्वैत मान्य करतील किंवा अद्वैत आहे ह्या निष्कर्षाला पोहोचतील. जो पर्यंत हे होत नाही तो पर्यंत विज्ञान व अस्तिकता हे केवळ सिमेंटिक्स चे वाद आहेत. विज्ञान निर्मिती विषिष्ठ पधतीने होते ती काटेकोर असणॅ महत्वाचे बाकी इतर जीवनात काहीबाबीत तुम्ही अवैज्ञानिक असाल तर त्याने काय कात फरक पडतो?
पूर्ण पोस्टला +१ पेशवा फक्तं
पूर्ण पोस्टला +१ पेशवा फक्तं 'अवैज्ञानिक असाल तर काय फरक पडतो' सोडून. का ते खाली लिहितो आहे.
भाषेच्या मर्यादा हा सुधा विज्ञानातील आडथळा आहेच ना.. तिथेच अडकुन बसण्यात काय अर्थ आहे >> एक्झाक्टली हेच झाले मागच्या दोन अर्ग्यूमेंट मध्ये. मी अननोन म्हणजे देव नाही म्हणालो आणि तुम्ही अननोन म्हणजे देव असे मानले तर म्हणालात.. दोन्हीचा अर्थ खरं एकंच आहे.
विज्ञान अननोन म्हणतंय आणि आस्तिक देव म्हणतंय. फरक विज्ञान अननोन म्हणून सोडून देत नाहीये की गृहीत धरत नाहीये आणि आस्तिक देव म्हणत अवैज्ञानिक द्रुष्टीकोनातून बरेच काही गृहीत धरत आहे.
गृहीत धरले की पुढे जायच्या रस्त्यावर एक दगडी भिंत तयार होते जी दिवसेंदिवस ऊंच होत राहते. 'द ट्रूमन शो' फार बोलके ऊदाहरण आहे ह्याबाबतीत. भिती, श्रद्धा, देव , दैव सगळी एकाच एंटिटीची नावं वाटतात मला.
विज्ञान निर्मिती विषिष्ठ
विज्ञान निर्मिती विषिष्ठ पधतीने होते ती काटेकोर असणॅ महत्वाचे बाकी इतर जीवनात काहीबाबीत तुम्ही अवैज्ञानिक असाल तर त्याने काय कात फरक पडतो? >> असच वाटतं. अवैज्ञानिकपणा कधी मनापासून असेल, कधी स्लीपिंग पार्टनरला इंप्रेस करायला असेल कधी आणि काही असेल तर कधी भंपक असेल.
>> आस्तिक देव म्हणत अवैज्ञानिक द्रुष्टीकोनातून बरेच काही गृहीत धरत आहे.>>
पण प्रत्येक भंपक माणूस सगळं ग्रुहित धरतोच असं का अझ्युम करायचं ? अनेक दगडी भिंती फुटभराच्या उंचही असतील आणि वाढत नसतील की.
माझ्या बाबतीत, भारतात गेल्यावर आजीला आवडतं म्हणून आरतीला उभं राहून देवाला, मोठ्यांना नमस्कार इ. मी करत असे आणि ते त्या क्षणी प्रामाणिक असे 'देखल्या देवा' नक्कीच नसे असं आज वाटतं. इकडे मुद्दाम देवळात जात नाही, पण कधी गेलोच तर नमस्कार करुन दोन मिनिटं बसलं जातं. संस्कार म्हणा आणि काही म्हणा...
मी काही संशोधक नाही पण असतो तरी ते कामाच्या आड नक्की आलं नसतं अशी खात्री वाटते.
यावर विचार करता ती टर्म
यावर विचार करता ती टर्म (ह्युमन बॉडी, निसर्गातील बदल इ. इ.) जर ईरॅशनलच असेल तर समिकरणात बांधता येणारच नाही>>>>>>>> हे लक्षात नाही आलं अमित. एरर इर्रॅशनल कसा काय असू शकतो? तो एरर त्याच्या १०व्या डेसिमल पर्यंत मोजता यावा इतके आपले मेजरमेंट करायची साधनच अॅक्युरेट नाहीये म्हणून ते उत्तर बरोबर येत नाही असं आहे ना? आपल्याला एरर काय आहे आणि किती आहे हे अॅक्युरेटली मोजता आलं की इक्वेशन सॉल्व होतं. फक्त ते सॉल्व होऊ पर्यंत तुम्ही हँड ऑफ गॉड चा घोषा लावणार की अजून आपलं तंत्रज्ञान तितकं परफेक्ट झालं नाहीये हे स्विकारुन पुढे त्यावर काम करणार?
विज्ञान निर्मिती विषिष्ठ पधतीने होते ती काटेकोर असणॅ महत्वाचे बाकी इतर जीवनात काहीबाबीत तुम्ही अवैज्ञानिक असाल तर त्याने काय कात फरक पडतो?>>>>> तुमचा मुद्दा लक्षात आला पेशवे फक्त असं आहे तुम्ही काहीबाही कशाला म्हणता आणि लोकांसमोर काहीबाहीचे नेमके कोणते उदाहरणं समोर येतात ते. अगदी काटेकोरपणे वैज्ञानिक नाही पण तुमच्या विज्ञान उर्वरित आयुष्यामध्ये तुमचा एकंदर दृष्टिकोन वैज्ञानिक असायला पाहिजे ना? तसा नसेल आणि एकिकडे तुम्ही काटेकोर विज्ञान पाळून दुसरीकडे आजार वगैरे गीष्टींमध्ये देवावर विश्वास ठेवून चालणार हे काँट्रॅडिक्टरी बिहेवियर नाहीये का? You may ask here, what does it matter if a person doesn't really take a scientific, practical view in his life (and not just restrict it to his/her profession,passion). I think it does matter or I think it should matter to anyone. Science or rationality should always prevail, no matter what the context is because that's just how life works.
अमितनी वर लिहिलय तसं अशी टोकाचं वागणारी उदाहरणं फार नसावीत. एकतर लोकं अल्याड नाहीतर पल्याड असतात. सो जास्त ताणणार नाही हा मुद्दा.
इर्रॅशनल नंबर जसा कितीही
इर्रॅशनल नंबर जसा कितीही डेसिमल पर्यंत गेलो तरी मांडता येत नाही. (पाय, दोन चे वर्गमू़ळ ) असं काहीसं म्हणत होतो.
हार्टचे ऑपरेशन करताना किंवा अवयव ट्रान्सप्लांट करताना शस्त्रक्रीया चालू केल्यावर नक्की काय काय होउ शकतं हे अजून १०० % माहित झालेलं नसावं नाहीतर त्याचं कम्प्युटर मॉडेल करुन आपण ते केव्हाच ऑटोमेट करुन टाकलं असतं. कारण ऑटोमेट केल्यानंतर ह्युमन एरर ह्या प्रचंड मोठ्या टर्मला आपल्याला काबूत आणता येउ शकेल. त्या तुलनेत गाडी/ रस्ते हे आपणच तयार केलेले असल्याने खाचा खोचा जास्त माहित आहेत आणि त्या लिमिटेड कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, स्वतःहून इव्हॉल्व झालेल्या नाहीत त्यामुळे ऑटोमेशन बर्यापैकी सहज शक्य झाले. थोडक्यात त्या गोष्टी र्रॅशनल आहेत आणि ह्रदयाची शस्त्रक्रिया अजून तरी इर्रॅशनल. (ह्रदय केवळ उदाहरण आहे)
बुवा, पैसा हा भौतिक जगात असत
बुवा, पैसा हा भौतिक जगात असत नाही तो निसर्गात तयार होत नाही. ते एक मानव निर्मित साधन आहे. त्याच्या भोवती उभारलेल्या सिस्टीम विज्ञानाचा भाग होत नाही. तरी आज आपले सगळे आयुश्य ह्या पैश्या भोवती फिरते. त्यासंदर्भात केलेले सगळे निर्णय सिस्टिमॅटीक असतात वैज्ञानिक नाही. आपण वैज्ञानिक प्रक्रिया ह्या सिस्टीम तयार करताना वापरतोच म्हणजे पुर्णतः अवैज्ञानिक कलपना वैज्ञानिक संकल्पना वापरून बनवता येते. तेंव्हा तयार होणारे वैद्यानिक असते कि अवैज्ञानिक?
अमित, मुद्दा लक्षात आला आणि
अमित, मुद्दा लक्षात आला आणि बहुतेक इर्रॅशनल ह्या शब्दामुळे माझा घोळ होतोय. All rational arguments are not scientific but scientific arguments have to be rational. In case of the heart example, it could be called unpredictable but not irrational. Like Heisenberg explained, there is some X factor that causes an unpredictable result and we didn't see it coming because we couldn't calculate that precisely. So the heart and the elements around it are behaving rationally but it's the limitation of our scientific (medical in this case) process in this case that has brought about the uncertainty in the outcome. So the point is, there's always going to be some error but what you attribute it to is important.
पेशवे, मी जे वर लिहिलं ते तुम्ही लिहिलेल्या "काही बाबतीत अवैज्ञानिक असलं तर काय बिघडलं" ह्या वाक्याला उद्देशून होतं. I cannot get my head wrapped around how you would cite the example of money not being a scientific object but eventually being used to develop science. :D. Don't know how it is relevant to the conversation above but nonetheless, my point was more about keeping a rational viewpoint in all matters of life, that's all.
As I said above, all rational arguments are not scientific necessarily but being rational is definitely a precursor for being scientific. Why it matters, people should at the least be rational is because that eventually leads to the development of society, country so on and so forth. And finally circling back to the point of being a believer. A rational person would seldom believe in the traditional (religious or spiritual) concept of god and that's why a man/woman of science cannot or should not be an aastik (in the traditional sense of course).
ओह्ह येस. मी इर्रॅशनल शब्द
ओह्ह येस. मी इर्रॅशनल शब्द गणितात जसा वापरतात तसा वापरत होतो. इग्रजी नुसार not logical or reasonable अशा अर्थाने नाही.
कन्फ्युजन बद्दल सॉरी.
बुवा, पैसा हा भौतिक जगात असत
बुवा, पैसा हा भौतिक जगात असत नाही तो निसर्गात तयार होत नाही. ते एक मानव निर्मित साधन आहे. त्याच्या भोवती उभारलेल्या सिस्टीम विज्ञानाचा भाग होत नाही. तरी आज आपले सगळे आयुश्य ह्या पैश्या भोवती फिरते. त्यासंदर्भात केलेले सगळे निर्णय सिस्टिमॅटीक असतात वैज्ञानिक नाही. आपण वैज्ञानिक प्रक्रिया ह्या सिस्टीम तयार करताना वापरतोच म्हणजे पुर्णतः अवैज्ञानिक कलपना वैज्ञानिक संकल्पना वापरून बनवता येते. तेंव्हा तयार होणारे वैद्यानिक असते कि अवैज्ञानिक? >> काही कळालं नाही पेशवे.
जर किलोग्रॅम, मीटर, ईंच, आय क्यू, लाईट ईयर्स ह्या वैज्ञानिक संकल्पना आहेत तर पैसा ही सुद्धा एक वैज्ञानिक स़ंकल्पनाच आहे. आणि ईतर कुठल्याही वैज्ञानिक संकल्पनेसारखा तिचा प्रवास बार्टर सिस्टिम ते गाय/घोडे ते धान्यं ते सोनं ते नाणी ते नोटा ते प्लास्टिक मनी ते बिटकॉईन असा होत आहे.
माझ्या मते नंबर सिस्टिम, मानवी भाषा, मशीन्स लँगवेज सारखाच पैसा वैज्ञानिक पाया असलेली संकल्प्ननाच आहे.
काय मग शेवटी आपल्याला कोण
काय मग शेवटी आपल्याला कोण व्हायचयं? अस्तिक नास्तिक की अज्ञेयवादी?
डोंट वरी आपल्याला गरजे प्रमाणे या गटातून त्या गटात जायची मुभा आहे. आता पक्ष बदलला तर तुम्हाला त्या त्या गटातील बुजुर्ग गद्दार म्हण्णार नाहीत पण 'कच्च मडकं' म्हणतील.
या चर्चेतील सर्वांनी एक पुस्त्क जरुर वाचावे
विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा- मे.पुं.रेगे
प्रकाशक-लोकवाङ्मय गृह
विशेषतः त्या पुस्तकातील विभाग तिसरा
मी अस्तिक का आहे?
परंपरागत श्राद्ध
देवाशी भांडण
धार्मिक श्रद्धा आणि ईश्वराचे अस्तित्व
जुनी प्रतिक्रिया पेस्टवत आहे.
जुनी प्रतिक्रिया पेस्टवत आहे. सारख सारख तेच तेच असत ना!
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही लोक मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो.
आता पक्ष बदलला तर तुम्हाला
आता पक्ष बदलला तर तुम्हाला त्या त्या गटातील बुजुर्ग गद्दार म्हण्णार नाहीत पण 'कच्च मडकं' म्हणतील. >>>
कच्चं मडकं असणार म्हणूनच तर म्हणतील ना!!!
पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद..
पक्कं मडकं असण्यापेक्षा कच्चं
पक्कं मडकं असण्यापेक्षा कच्चं असलेलं बरं... साशंकता नावाची लवचिकता असलेली बरी.
घाटपांडे, वरची पोस्ट फारच
घाटपांडे, वरची पोस्ट फारच जनरलायझेशन नाही का? एकुणात त्या पोस्टचा सूर असा आहे की विवेकवादी, नास्तिक हे स्वतःची बौद्धिक खाज भागवायला बिचार्या आस्तिक, देवभोळ्या लोकांवर तुटून पडतात. थोडक्यात जगातले यच्चयावत सुधारक या कॅटेगरीत येतील.
याच पोस्टमधला पहिला परिच्छेद गोलमटोल शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण आहे. विवेक/वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा, त्या विचारसरणीने विचार करणारा मनुष्य एखादी शक्यता नाकारताना ती का नाकारत आहे याचे तार्कीक स्पष्टीकरण देऊनच नाकारतो. तसे केले नाही तर तो/ती रॅशनल विचाराने वागत नाहिये. आणि तसे असेल तर मूळ गृहीतकच खोटे ठरते आहे की ती व्यक्ती रॅशनल आहे.
दळण दळाव तितक कमीच आहे. असो
दळण दळाव तितक कमीच आहे. असो
घाटपांडे, ती पोस्ट नेमकी
घाटपांडे, तुमची पोस्ट नेमकी कोणाला उद्देशून आहे? वर मी आणि इतर काही लोकांनी लिहिलय त्याला उद्देशून आहे का? मला समजत नाहीये नेमकं.
वैद्यबुवा, त्यांनी आपले एक
वैद्यबुवा, त्यांनी आपले एक जनरल मत मांडले आहे. त्यांनी सांगितले तसे लोक असतात.

आणि टवणे सर, मला ते जनरलायझेशन वाटत नाही. पण काही लोक तसे वागतात हे मात्र खरे.
नि फक्त विवेकवादी नास्तिकच नव्हे तर आस्तिक लोकसुद्धा अश्या टो़काची भूमिका कधी कधी घेतात.
त्यांची संख्या कमी असली तरी दुर्दैवाने ते सनसनाटी असल्याने त्याला प्रसिद्धि मिळते. अशी भूमिका न घेणार्यांबद्दल लिहायचे काय? ते सनसनाटी नसते.
मग आपल्याला फक्त पहिल्या प्रकारचे लोक दिसतात. कदाचित वरची काही मते अशी टोकाची असतीलहि असे त्यांना वाटले म्हणून त्याम्नी लिहीले. बरे झाले.
तसा मी - आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! असाच आहे, पण काही लोकांनी ते मान्य केले आहे, माझ्याबद्दल! उदा. मी!
अहो माझी ती जुनी प्रतिक्रिया
अहो माझी ती जुनी प्रतिक्रिया आहे. ऐसी अक्षरे वर पण अशा प्रकारच्या चर्चा कायम होत असतात. तिथे लिहिलेली आहे. ती समयोचित म्हणून इथे टाकली आहे. कुणा एकाला ती उद्देशून नाही. जनरल आहे. पण प्रत्येक जण आपण त्या प्रतिक्रियेत आहोत का हे पहातो आहे. सश्रद्ध अश्रद्ध अस्तिक नास्तिक या सर्व प्रकारात असे अतिरेकी लोक असतात. नंद्या ४३ ने मला काय म्हणायचे आहे ते बरोबर लिहिले आहे
अधिक उत्सुकता असेल तर http:/
अधिक उत्सुकता असेल तर http://aisiakshare.com/node/2323 येथील चर्चा झाली होती त्यातील ही प्रतिक्रिया आहे
घाट्पांडे, एकंदरित तुमचा रोख
घाट्पांडे, एकंदरित तुमचा रोख, इतर कोणी आस्तिक असेल तर त्यांच्याशी चर्चा करताना किंवा संवाद साधताना म्हणा संयम आणि compassion (मराठी शब्द सुचेना आता) दाखवले पाहिजे असा आहे ना? ते एकदम बरोबर आहे पण वरच्या चर्चेत कोणीच संयम सोडून आस्तिकवादाला धोपटलं वगैरे नाहीये मग तुम्ही एकदम ही प्रतिक्रिया तुमच्या खणातून काढून इथे का बरं चिकटवली? वरुन तसं करताना पुढे "सारखं तेच तेच असतं ना..." हे पण लिहिलं. पुढे इथे धुमाकूळ घातला कोणी मग हवं तर चिकटवा पण तसं नसेल आणि पोस्टी वाचायचा संयम नसेल तर आपलं सर्वाधिक खपाचं औषध, त्यांना तो आजार नसताना, लोकांच्या तोंडावर मारण्याआधी थोडं थांबा कृपया.
वैद्यबुवा माझ्या जनरल मत
वैद्यबुवा माझ्या जनरल मत असलेल्या प्रतिक्रियेची आपल्याला फारच दखल घ्यावीशी वाटली या बद्दल धन्यवाद!
अहो पण इथली चर्चा तशी नवीन
अहो पण इथली चर्चा तशी नवीन आहे आणि भाषेचा सूर सुद्धा अगदी संयत आहे मग त्या बॅकड्रॉप वर तुमची ही प्रतिक्रिया रेलेवंट तर नाहीच पण उगाच इतरांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्याबाबत सुनवणारी वाटली म्हणून लिहिलं खरं.
थोडक्यात मला या संबधी एक
थोडक्यात मला या संबधी एक जनरल मत मांडावस वाटल ते आपल्याला रेलेवंट वाटल नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात.
Everyday - we make irrational
Everyday - we make irrational choices in d guise of science's byproduct - TECHNOLOGY.
We know we are in middle of ६थ mass extinctions. By our choice manय species on whom our existence depends are getting closer to extinction. Our oceans are getting heavily polluted.. Lands are getting poisoned , ice caps are melting..our rivers are dying.
All of this due to over use of science's byproduct - technology.
And despite knowing this - we want newer cellphone models, bigger homes, better(!) Cars, trendier clothes even though our wardrobes are full. We are killing our own planet - the one that is required for us to survive. Everyday - knowingly because of our desires /wants and not for our real needs. And then we talk about rationality!
Very scientific people fighting here..can u analyze and see whether whatever I m saying is true or not. If it's true - will u rationally resist all temptations - give up ur ways of lives, ur road trips, ur comforts ur wants? That is very rational thing to be done.
If u think I am talking bullshit - u can verify with scientific methods. If u find it true - make rational decision.
If we can't do, what's the use of tark__ karkashyata?
nom to anyone though my words may seem to be harsh.
I believe humans are rational base d on their comforts.
जे काही कराल ते त्यात रॅशनल
जे काही कराल ते त्यात रॅशनल व्यु ठेवणे ह्याचा सायंटिफिक गोष्टी किंवा टेक्नॉलॉजी वापरण्याचा काय संबंध? हे बरोबर आहे, की कुठल्याही सवयीच्या आहारी जाणं हे रॅशनल नाहीये पण चर्चेचा मुद्दा तो नाहीये. सायन्सच्या फिल्ड मध्ये काम करणार्यांनी किंवा स्वतःला विज्ञानवादी समजणारे आस्तिक असू शकतात का? हा आहे. एखाद्या गोष्टीची सवय असणे किंवा नाद असणे हा पुर्णपणे वेगळा मुद्दा आहे. सेल फोन एवेजी सिग्रेट, तंबाखू काहीही रिप्लेस केलं तरी चालेल.
आता बघा स्वतःला विज्ञानवादी समजणारा माणूस घरात व्रत वैकल्य करत असेल, पुण्याचा प्रसाद अन पापाचे धपाटे देणार्या देवावर विश्वास ठेवत असेल तर ते बरोबर आहे की नाही अशी चर्चा सुरु होती.
Vaidyabuva - my point is out
Vaidyabuva - my point is out so called rationality is used only based on our convenience.
Rational asane ani scientific view balagane - hatat haat dharun jate na?
Nusat ahari janyacha prashna nahiye. We can see our kids future with the current scientific data available and we still don't bother to change our ways of life. That's very irrational I feel. But our rationality is at peak when we question god. It diminishes when it comes to our own behavior and its impact.
Everything is driven based on convenience
The way a few folks choose comfort (like my example above)- few choose religion/karmakaneld' etc.
" जिनके Ghar shishe ke hote hai" types
Vaidyabuva - my point is out
.
Vaidyabuva - my point is out
Double post. Marathi typing la problem yetoy.
हा विचार म्हणून मला कळाला पण
हा विचार म्हणून मला कळाला पण ते पुर्णपणे फ्री विल ह्या कॅटेगरीत जात असल्यामुळे चर्चेशी संबंधित नाही वाटत मला. फ्रि विल पेक्षा तुम्ही कोणत्या प्रकारचा देव मानता आणि एरवी दैनंदिन आयुष्यात तुमचा गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे हा प्रश्न आहे. हायझनबर्ग नी उदाहरण दिलं त्यात हँड ऑफ गॉड चा उल्लेख आहे. त्या हँड ऑफ गॉडला तुमच्या आयुष्यात किती महत्च आहे, कुठ कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही हॅंड ऑफ गॉड आहे असं विचार करुन स्वतःला समजवता, हा प्रश्न आहे.
तुम्ही सांगत आहात त्या इररॅशनल वेज ऑफ लाईफ ह्या इररॅशनल आहेत असं पण बर्याच लोकांना माहित असतं (ते रॅशनल असतात खरं तर पण सवयीने जखडलेले असतात) , तरी ते त्या सोडत नाहीत. पण त्याचा आणि ते देव मानतात की नाही ह्याचा संबंध नाही. ह्या चर्चेत तरी नाही.
नानबा, आपला मुद्दा बरोबर आहे
नानबा, आपला मुद्दा बरोबर आहे पण ह्या धाग्याचा विषय तो नाही. तसेच तंत्राचा विज्ञानाशी संबंध असतोच असे नाही. विज्ञानाशी संबंधित अनेक गैरसमजांपैकी हा ही एक समज. ज्याने कुणी आग निर्माण करण्याचा शोध लावला, चाकाचा शोध लावला ते देखील टेक्नॉलॉजीच.
टेक्नॉलॉजी हा इंग्रजी शब्द नेहमी इलेक्ट्रॉनिक्ससोबतच येत राहीला असल्याने आपण ह्या शब्दाची इमेजरी (संबंधित चित्रे) ही इलेक्ट्रॉनिक्स शी संबंधित समजतो. पण हात न वापरता चमच्याने अन्न खाणे ही देखील टेक्नॉलॉजीच आहे. केसांना कंगवा वापरुन सरळ करणे, विहिरीतून रहाटेने पाणी काढणे, अगदी ओंजळीत पाणी घेऊन पिणे सुद्धा तंत्रच आहे. म्हणजेच साध्या मराठी भाषेत तंत्रज्ञान. विज्ञान समजो न समजो, पण तंत्रज्ञान बहुसंख्यांना समजतं व वापरता येतं, तेव्हा तंत्रज्ञान वापरतात म्हणून कोणी विज्ञानवादी होत नाही.
Pages