या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.
अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?
त्यावर माझे उत्तरः
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.
नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...
भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.
हे संपूर्ण उत्तर नाहीये. पुढे चर्चा होइल तसे अधिक लिहित जाईन.
साशंक असणे हा वैज्ञानिक
साशंक असणे हा वैज्ञानिक प्रगतीचा पाया/ आत्मा आहे, सुमुक्ता अनुमोदन !
जे एखाद्या गोष्टीचे अस्तित्व केवळ संकल्पनेने किंवा तर्काने ठामपणे मानतात किंवा नाकारतात ते विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतात असेच म्हणावे लागेल.
सदासर्वकाळ अगदी पराकोटीची विज्ञानवादी किंवा धार्मिक भूमिका जगणारे लोक फारच कमी दिसतात. आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात अधले मधले असतो जे मलातरी व्यावहारिक जीवनात आत्यंतिक टोकाचे असण्यापेक्षा सुयोग्य वाटते.
खरा विज्ञानवादी हा साशंक असतो
खरा विज्ञानवादी हा साशंक असतो. खर्या विज्ञानवाद्याला परमेश्वर आहेच किंवा नाहीच हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण वैज्ञानिक दृष्टया काहीच सिद्ध झालेले नाही. सद्ध्या जे माहित आहे त्यापेक्षा कितीतरी गोष्टी अजून माणसाला अज्ञात आहेत त्यामुळे सद्ध्या माहित असणारी कोणतीही थियरी ही कधीही आऊटडेटेड होऊ शकते. माझ्या मते साशंक असणे हाच वैज्ञानिक प्रगतीचा आत्मा आहे.
>> सुमुक्ता, यासाठी अनुमोदन!
जे एखाद्या गोष्टीचे अस्तित्व केवळ संकल्पनेने किंवा तर्काने ठामपणे मानतात किंवा नाकारतात ते विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतात असेच म्हणावे लागेल.
>> हर्पेन, अगदी योग्य बोलला आहात
>>देव आहे असं मानल्याने
>>देव आहे असं मानल्याने संशोधनात फरक पडतो असं माणणार्यांना कसं समजवणार!!!
पुन्हा एकदा स्ट्रॉमॅन. हा दावा कोणीही इथे केलेला नाही तरिही पुन्हा पुन्हा (जाणुनबुजुन??) हा मुद्दा उगाळला जातोय.
>>आता असाही मुद्दा येऊ शकेल, देव आहे असं मानणार्या एखाद्या शास्त्रज्ञाने एखादा मुलभूत शोध लावला तर तो स्विकारावा कि नाही? कारण तो तर देव मानत होता!... काहीतरी गंडतंय का?? Lol
अजुन एक स्ट्रॉमॅन! स्वतःच हास्यास्पद दावा करायचा आणि स्वतःच गंडलेलं लॉजिक म्हणुन निकालात काढायचा.
जर एखादा स्त्री-सक्षमीकरणावर काम करणारा पुरुष स्वतःच्या घरी त्याच्या बायकोला बुरख्यात ठेवत असेल तर तिथे मुलभुत विरोधाभास आहे. याचा अर्थ असा नाही की तो त्याच्या स्त्री-सक्षमीकरणाच्या कामात कमी पडेलच. तसंच आजुबाजुला घडणार्या घटनांचं श्रेय अज्ञात शक्तीला देणारा वैज्ञानिक हा एक मुलभुत विरोधाभास आहे.
बस्स यापेक्षा सोपं करुन नाही सांगता येणार मला.
>>>माझ्या मते तरी आस्तिक्य
>>>माझ्या मते तरी आस्तिक्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन एकत्र नांदणे शक्य नाही. कारण देवाचे अस्तित्व पुराव्यानिशी निर्विवादपणे सिद्ध कुणीही केलेले नाही. तरीही देवाचे अस्तित्व मानणारी व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी कशी असेल?<<<
पण असा आग्रह का की काहीतरी एकच असले पाहिजे?
आता दोन्ही गोष्टी लोकांच्या मनात अस्तित्वात आहेत तर त्या उगाच नाकारून काय फायदा?
नैतिकता म्हणजे या विशाल मनात वेळोवेळी राग, लोभ, स्वार्थ, परोपकार, द्वेष, या सर्व भावना आलटून पालटून उद्भवत असतात, त्यानुसार कसे वागावे हे सांगणारी नैतिकता. विज्ञानवाद याचे जे उत्तर देत असेल ते जर समाधानकारक वाटत नसेल, तर मग काहीतरी देव, धर्म वगैरे मानायचे किंवा नाही मानले तरी पुरातन तत्वज्ञानात यात काय लिहीले आहे त्याचे प्रयोग करून तपासणे हे विज्ञानवादातच मोडते ना? त्यांचा अभ्यास करायला प्राथमिक गृहितक जर देव आहे असे मानणे असे असेल तर ते मानून पाहिलेच पाहिजे ना? पुरेसे प्रयोग त्याहि विषयात केले पाहिजेत ना?
फक्त काय आहे, फुटबॉलचे नियम वेगळे नि क्रिकेटचे वेगळे. हे ज्याला समजते तो दोन्ही खेळ कमी अधिक प्रमाणात चांगले खेळू शकतो. मग तो ठरवू शकतो की कुठल्या खेळात जास्त सराव करावा. मग तो कुठल्या तरी एका खेळाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण जर त्याला वाटले तर तो दुसरा खेळहि खेळू शकतो - बंधन आहे का काही?
तसेच विज्ञानवाद व आस्तिकता. जोपर्यंत कुठल्या मार्गाने कुठल्या ज्ञानाचा ध्यास घ्यायचा, ज्ञानाचाच की इतर कशाचा (मोक्ष वगैरे) हे ज्याचा अभ्यास जास्त होईल त्यावरून ठरणार. तोपर्यंत दोन्ही अस्तित्वात आहेत, त्यांच्या नियमांप्रमाणे त्यांचा अभ्यास करणे हे जिज्ञासू मनुष्याचे कर्तव्यच म्हणेन मी. त्याला विज्ञानवाद म्हणा किंवा आस्तिकता, पण जिज्ञासा उपजतच मनुष्यात असते.
नंद्या४३, आपल्या संपुर्ण
नंद्या४३, आपल्या संपुर्ण पोस्ट शी सहमत.
ज्या शक्तीने मदत केली -म्हणून
ज्या शक्तीने मदत केली -म्हणून तिचे अस्तित्व जाणवले हा अनुभव- तिने मुळात अडचणीत का आणले हा प्रश्न आस्तिकांना पडत नाही. पडला तर आपलेच काहीतरी चुकलंय असं समजायचं. एकदा देव मानायचा ठरवलं की अशी रेलगाडी सुरु होते. यावर विज्ञानवादी आस्तिकांचे काय मत आहे?
नाना, माझा सध्यातरी पास..
नाना, माझा सध्यातरी पास..

आणि हो...
आगाऊ अभिनंदन शंभरीसाठी
खरा विज्ञानवादी हा साशंक असतो
खरा विज्ञानवादी हा साशंक असतो. खर्या विज्ञानवाद्याला परमेश्वर आहेच किंवा नाहीच हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण वैज्ञानिक दृष्टया काहीच सिद्ध झालेले नाही.
>>>>>
या वाक्याशी आस्तिक विज्ञानवाद्यांची बाजू घेणारे सुद्धा सहमत झाले हे पाहुन आश्चर्य वाटले.
जर मी अर्थ काढायला गंडत नसेल तर ज्याने देवाला न पाहताच त्याचे अस्तित्व मान्य केले आहे तो साशंक कसा झाला?
अरे सकाळी उठून दगडाच्या मुर्तीला नमस्कार करणारयांना आपला नमस्कार कुठे पोचतोय की नाही याची जराही शंका येत नसेल तर तो साशंक कसा झाला?
आणि साशंक नाही मग तो विज्ञानवादीही नाही.
<<<ज्या शक्तीने मदत केली
<<<ज्या शक्तीने मदत केली -म्हणून तिचे अस्तित्व जाणवले ................. विज्ञानवादी आस्तिकांचे काय मत आहे?>>>
विज्ञानवादी आस्तिक म्हणवणार्या लोकांना तो पडतो. त्याचे उत्तर शोधायचा ते प्रयत्न करतात.
जे आपल्याला माहित नाही, कळतच नाही ते नाहीच असे खरा विज्ञानवादी कसे म्हणू शकेल? अजून अभ्यास करायला पाहिजे असे वाटते, पण तोपर्यंत ज्यांनी या विषयाचा अभ्यास केला त्यांचे म्हणणे खरे मानून त्यांच्यावर विश्वास ठेवून लोक जगत असतात.
रामानुजमच्या सिद्धांतांनाहि त्याने प्रूफ दिले नव्हते, तेंव्हा जर लोकांनी ते खरे नाहीतच असे मानायचे ठरवले तर कुणि अभ्यास केला असता का?
पण लोकांनी ते खरे मानून त्याचा अभ्यास करून काही काही सिद्धांत प्रूव्ह केले.
आस्तिकता, देव, धर्म, अध्यात्म ही आजकालची उपेक्षित शास्त्रे आहेत कारण आजपर्यंतच्या ज्ञानाने त्यातले काही कळत नाही, म्हणून ती शास्त्रेच नाहीत, विज्ञानवादी लोकांनी ती मानूच नयेत असा समज आहे.
आस्तिकता, देव, धर्म, अध्यात्म
आस्तिकता, देव, धर्म, अध्यात्म ही आजकालची उपेक्षित शास्त्रे आहेत कारण आजपर्यंतच्या ज्ञानाने त्यातले काही कळत नाही, म्हणून ती शास्त्रेच नाहीत, विज्ञानवादी लोकांनी ती मानूच नयेत असा समज आहे.
>>>>>>
हे मला आस्तिकता, देव, धर्म, अध्यात्म ईत्यादींचा अभ्यास करणारयांचे अपयश वाटते. ते आजवर याच्या अभ्यासातून काहीच शोधू शकले नाहीत की काही सिद्ध करू शकले नाहीत.
नास्तिक कधीच देव नाही देव नाही असा ओरडा करत फिरत नाही. ते फक्त देव मानणाऱ्यांना एक प्रश्न करतात. सिद्ध करा. पण आजवर त्यांना कुठल्याही आस्तिकाने समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून ते नास्तिकच राहिले.
उदाहरणार्थ एकेकाळी सर्वांचाच समज होता की सुर्य पृथ्वीभोवती फिरतो. मग काही वैज्ञानिकांनी ते सिद्ध केले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि त्याची अशी सिद्धता दिली की आज ईयत्ता चौथीच्या मुलालाही ते पटते.
मात्र आस्तिक एवढ्या वर्षांच्या एकाच विषयावरच्या संशोधनातून काहीही सिद्ध करू शकले नाहीयेत.
दुर्दैवाने मी नास्तिक आहे, आस्तिक असतो तर प्रयत्नांची पराकाष्ठा करून शोधलेच असते काहीतरी..
रामानुजमच्या सिद्धांतांनाहि
रामानुजमच्या सिद्धांतांनाहि त्याने प्रूफ दिले नव्हते, तेंव्हा जर लोकांनी ते खरे नाहीतच असे मानायचे ठरवले तर कुणि अभ्यास केला असता का?
>>>
रामानुजनचे सिद्धांत जेव्हा त्याने पहिले हार्डीला पोस्टाने पाठवले तेव्हा ते सिद्धांत वापरून हार्डीला जी उत्तरे मिळाली ती तर्कसुसंगत होती. विविध इन्पुट्स देउनसुद्धा उत्तर तेच येत होते. असे असले तरी सर्व सिद्धांतांना प्रूफ नव्हते म्हणून हार्डीने त्याच्या एका सहकार्याला मद्रासला भाषणांच्या दौर्यावर असताना रामानुजनला भेटायला सांगून त्याच्या पद्धतींबद्दल, सिद्धांतांबद्दल अधिक माहिती घ्यायला लावली. त्यानंतरच त्याने रामानुजनला इंग्लंडला बोलावले. इंग्लंडला बोलावल्यानंतर हार्डीने स्वतः रामानुजनचे सिद्धांताच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने (ज्याचा उल्लेख वर अनेकदा आला आहे) सिद्धता लिहिल्या - त्यात कधी हार्डी एकटा, अनेकदा रामानुजनबरोबर हे काम झाले. काही काही हायपोथेसिस/कन्जेक्चर हे चुकीचे आहेत असेही यातून बाहेर आले.
तेव्हा सर्व कन्जेक्चर, नंबर सेरीजचे फॉर्मुले मान्यताप्राप्त वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करून त्याची सिद्धता शोधली.
रामानुजन सांगतो म्हणुन किंवा त्याला न्यामगिरी देवी सांगते म्हणुन ते खरेच आहे असे समजून हार्डीने काम केले नाही. हार्डीला रामानुजनला हे कसे सुचते याबद्दल नेहेमीच कुतुहल राहिले. मात्र त्याला जे सुचते त्यामागची कारणपद्धती शोधण्याचा शक्य तितका प्रयत्न त्याने केला, देवी त्याला हे सांगते म्हणुन त्याला ते सुचते असे तो म्हणाला नाही.
रामानुजनच्या आयुष्यात धर्म/कर्मकांडे तसेच देवावरची श्रद्धा हे कुठेच फायद्याचे ठरले नाही, उलट हानिकारकच ठरले. त्याचबरोबर ज्या प्रथा, मोरल्स त्याच्या आईला तिच्या धर्माने (तेव्हाचा सनातन हिंदू धर्म) शिकवल्या त्यांचा त्रासच रामानुजनला झाला.
जे कळत नाही त्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे तत्त्व आहे असे वर अनेकदा आले आहे. जे कळत नाही त्याचा उद्गाता, नियंत्रक कुणी एक शक्ती आहे हे 'सत्य' मानून पुढे जाणे याला देवावरचा विश्वास / आस्तिक असणे असे वरच्या चर्चेत म्हटले आहे. ही श्रद्धा/विश्वास हा विज्ञानाच्या मूलभूत विचारसरणीच्या विरोधात आहे. देव आहे हे गृहीतक मांडून पुढे त्यावर शोधकार्य बेतणे (व तसे करताना ते गृहीतक आहे याचा विसर पडू न देणे) याला कुठल्याही रॅशनल विचार करणार्या माणसाचा विरोध नसावा.
हे गृहीतक नसून सत्यच आहे असे जेव्हा मांडले जाते तेव्हा मग 'हार्डी'सारख्या विवेकवादी रॅशनल माणसाचे उदाहरण अविवेकवादी विचाराला पुढे करताना देण्याचे पाठबळ मिळत असावे.
जगात कुणीही पूर्ण विज्ञानवादी
जगात कुणीही पूर्ण विज्ञानवादी किंवा पूर्ण आस्तिक-नास्तिक नसतो. जे स्वतः ला असे समजतात ते स्वतः ची चुकीची समजूत करून घेत असतात.
चांगल्या पोस्टी टवणे सर.
चांगल्या पोस्टी टवणे सर.
जे आपल्याला माहित नाही, कळतच नाही ते नाहीच असे खरा विज्ञानवादी कसे म्हणू शकेल? अजून अभ्यास करायला पाहिजे असे वाटते, पण तोपर्यंत ज्यांनी या विषयाचा अभ्यास केला त्यांचे म्हणणे खरे मानून त्यांच्यावर विश्वास ठेवून लोक जगत असतात.
रामानुजमच्या सिद्धांतांनाहि त्याने प्रूफ दिले नव्हते, तेंव्हा जर लोकांनी ते खरे नाहीतच असे मानायचे ठरवले तर कुणि अभ्यास केला असता का?>>>>>>>>> पेशवे ह्यांचा ह्या संधर्भात दुसरा लेख आहे त्यात त्यांनी विज्ञानाची चौकट म्हणजे काय हे दर्शवणार्या दोन लिंक दिल्या आहेत. आता आपल्याला जे माहित नाही, कळत नाही म्हणजे नेमकं काय माहित नाही आणि काय कळत नाही ह्याची व्याख्या निर्माण करताना परत त्या चौकटीत राहूनच ती निर्माण केली पाहिजे. माहित नाही आणि कळत नाही म्हणून आपण आपल्या बुद्धीला जे बरोबर वाटेल ते निष्कर्ष काढू शकत नाही. अध्यायत्म आणि धर्म संबंधित लिखाणांमध्ये, अध्यायत्मिक/धार्मिक जीवन जगताना आलेल्या अनुभवांमध्ये ही गल्लत फार वेळा केली जाते. थोडक्यात आलेल्या वैयक्तिक अनुभवांवरुन त्यांना जगाचं रहस्य कळलं अशी समजूत पण सर्रास करुन घेतली जाते जी अत्यंत चुकीची आहे.
आता रामानुजनांना त्यांच्यावर झालेल्या संस्कारांनुसार त्यांच्या डोक्यात येत असलेल्या विचारांचं श्रेय जर देवाला द्यायचं असेल तर ते तितकंसं समजायला अवघड नाही पण ह्याचा अर्थं ते मानत होते तो देव अस्तित्वात आहे असं नाही.
चर्चा वाचली.
चर्चा वाचली.
घरी घातली असेल तर आय डोंट केअर.
मी जे काही काम करतो/ रिसर्च करतो तो माझ्याकडून देव/ देवी/ कुठली शक्ती करवून घेते या लेव्हलची आस्तिकता आज कुठे संशोधकांमध्ये अस्तित्वात आहे का? असेल तर मला खरच आश्चर्य वाटेल. नसेल तर ज्या गोष्टीवरुन जग मूव्ह ऑन झालं आहे त्यावर आपण चर्चा का करतोय? दुर्दैवाने इस्रोच्या हेडने भर कॅम्पस मध्ये पूजा घातली असेल तर हे यातच येईलच
विज्ञानाचा पुरस्कर्ता/ रॅशनल विचार करणारी देव आहे/ नाही यावर ठाम नाही हे ठीकच. पण या (अस्तित्वाच्या) प्रश्राचं उत्तर माहित नाही म्हणून ते होकारार्थी घेउन तसं ती कामाच्या ठिकाणी वागायला लागली तर मग कठीण आहे. एलिअन आहेत/ नाहीत नक्की माहित नाही, म्हणून त्यांना संदेश पाठवणं/त्यांचा शोध घेणे वि. ते आहेतच समजून रोज सदानकदा त्या अॅक्टीव्ह रिसर्च मध्ये सहभाग नसणार्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत सुटणे, त्यांच प्रॉपर्टीज ठरवणे, त्यांचे वागणे, संकेत ठरवत सुटणे हे जसे वेडगळपणाचे तसेच.
आज कुठल्या लोकशाही देशात, लॅबमध्ये वैज्ञानिकाने देवाच्या अस्तित्वा संबंधी कसं वागलं पाहिजे याचे काही नियम आहेत का? नसावेत. कारण ते बेसिक चार्टर ऑफ राईट्सच्या विरोधी असतील आणि घटनेत बसणार नाही.
सर आणि बुवा, छान लिहिताय,
सर आणि बुवा, छान लिहिताय,
नंद्याभौ, तुमचा ज्या अध्यात्माकडे रोख आहे तो खरेतर विज्ञानाचाच एक भाग आहे, पण त्याला फार अडम्बर चिकटल्याने त्यातले विज्ञान पुढे येत नाही.
रुन्मेष, देवाचं अस्तित्व सिद्ध करणे जाऊद्या, पण अध्यात्मतले बऱ्याच गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात (जसे शारीरिक, मानसिक गुणावगुण असतात) त्यामुळे त्याचे नियम बनवणे शक्य झालेले नाही तसेच वर म्हटल्याप्रमाणे थोड्या वैयक्तिक अनुभवाने संपूर्ण सत्यच कळले असे प्रिचिंग लोक करायला लागतात, फार थोडे अंतिम सत्यपर्यंत पोचु शकतात कारण त्यांनी त्यांचा शोध थांबवला नसतो.
बऱ्याच गोष्टींची सरमिसळ होण्याचा हा विषय आहेच, त्यामुळे काही अवांतर आले असल्यास क्षमस्व.
समजा जगातले सारे ज्ञान
समजा जगातले सारे ज्ञान क्षणार्धात लुप्त झाले. माणसांच्या डोक्यातूनही ते पुसले गेले. आणि माणसांना पुन्हा सारे शोध नव्याने लावावे लागले. तर आज जे शोध लागले आहेत ते हजारो वर्षांनी का होईना तसेच लागतील का?
येस्स लागतीलच. कारण विश्वाचे रुप तेच राहणार.
पण आज आपण देवाचे जे रूप मानतो ते तसेच शोधले गेले असेल का?
नक्कीच नाही. कारण ती एक कल्पना आहे. ती काहीतरी नवीनच असेल..
पण मग मुळात देव म्हणून काही असतो हेच शोधले गेले असेल का? तर येस्स, कारण ती मानसिक गरज आहे, आणि ती पुर्ण करायला देव या संकल्पनेचा शोध लागला असेलच. फक्त कोणी आता गाईला गोमाता मानते तेव्हा बकरीला बकरीमाता मानले गेले असेल ईतकेच.
हे एक उदाहरण आहे, पटकन हेच सुचले.
नसेल तर ज्या गोष्टीवरुन जग
नसेल तर ज्या गोष्टीवरुन जग मूव्ह ऑन झालं आहे त्यावर आपण चर्चा का करतोय? >>>>> जग?
अंतर, काळ आणि वेगाचे गणित काय
अंतर, काळ आणि वेगाचे गणित काय आहे?
Distance = Speed x Time.
d = v * t
हे काळ आणि वेगाचे गणित मांडून दोन गाड्या एकमेकांना धडकणार की नाही हे मी समीकरण पेपरवर सोडवून सांगू शकतो. कंट्रोल्ड परिस्थितीत प्रात्यक्षिक करून सिद्धं करून दाखवू ही शकतो.
रिअल लाईफ सीनॅरिओ मध्ये त्या १००% धडकतीलंच का? तर नाही. वैज्ञानिक समीकरणानुसार त्या धडकायलाच हव्या होत्या पण काही तरी घडले आणि १० से.मी. अंतराने त्या धडकल्या नाहीत.
कदाचित वार्याचा वेग जास्तं होता, टायर्सचं मटेरिअल वेगळं होतं , रोड सरफेस वेगळा होता, वेगवेगळ्या वेळी ब्रेकवर लावलेली मसल पावर वेगळी होती असे काहीही वैज्ञानिक कारण असू शकते.
पण जिथे १००% मी धडकायलाच हव्या होत्या तिथे न धडकल्याने आणि त्याची कारणे माहित नसल्याने मी 'हँड ऑफ गॉड' म्हणून मोकळा होतो.
मग पुढे मी माझ्या ह्या 'हँड ऑफ गॉड' ची वॅल्यू माझ्या काळ आणि वेगाच्या समीकरणात पकडू लागतो.
d = ( v * t ) + ६
ती शेवटची एरर टर्म (ज्याला तुम्ही 'हँड ऑफ गॉड' म्हणू शकता) आहे.
ऊद्या मला रोड सरफेसमधल्या फरका बद्दल कळाले तर मी तो फॅक्टर एरर टर्म मधून वजा करून 'हँड ऑफ गॉड' चे अस्तित्व कमी करू शकतो.
वार्याचा वेग समीकरणात टाकून 'हँड ऑफ गॉड' अजून लहान होईल. मग टायर्स, 'मसल पावर' वगैरे कंट्रोल करून 'हँड ऑफ गॉड' चे अस्तित्व जवळजवळ शून्य पर्यंत कमी करू शकतो.
पण समजा असे न करतकरता, १० से. मी. ही 'हँड ऑफ गॉड' ची वॅल्यू पुढच्या वेळी समीकरणात गृहीत धरून पुन्हा प्रयोग केला आणि ह्यावेळी गाड्या एकमेकांना धडकल्या तर मी 'देव माझ्यावर रूसला, नशीब खराब होते, श्र्द्द्गा कमी पडली असा काहीही निष्कर्ष काढतो.
एरर टर्म ('हँड ऑफ गॉड') ची वॅल्यू रॅशनली शोधायची सोडून मी ईरॅशनल विचार करायला लागलो की मग त्या 'हँड ऑफ गॉड' वरचा माझा विश्वास अजूनाजून वाढत राहणार.
डेल्टा वरुन समजावणे मस्त आहे.
डेल्टा वरुन समजावणे मस्त आहे. हे उदाहरण प्रचंड आवडलेले.
वर अश्विनीने काहीतरी अज्ञात गोष्टीने मिरॅकल घडून आले वाचल्यावर हेच मनात आलेले. आज 'ते' नक्की का घडले ते विशद करता आले नाही तरी आणखी रिसर्च केल्यावर कदाचित तुमच्या बाबतीत जे घडले ती सॅन्डर्ड प्रॅक्टिसही बनू शकेल.
भारी समजवलं हाबं!
भारी समजवलं हाबं!
जबरदस्त समजावलं, हाब!
जबरदस्त समजावलं, हाब!
खूप धन्यवाद!
मस्त पोस्ट हाब!!
मस्त पोस्ट हाब!!
हाब एरर टर्म ची कल्पना योग्यच
हाब एरर टर्म ची कल्पना योग्यच पण ते ह्या इकेवशन ला लागू होऊ शकत नाही असे वाटते.
बरोबर पेशवा! नाही होत... कारण
बरोबर पेशवा! नाही होत... कारण ६० चा स्पीड ६० चाच असतो मग त्यात रोड सरफेस, टायर, वारा वगैरे सगळे येते हे मान्यं आहे.
पण ६० चा कंटिन्यूअस स्पीड हे बेस अॅझंपशन आहे (हायपोथेटिकल) जे रिअल लाईफ सिनॅरिओ मध्ये तंतोतंत मिळवणे अगदी ह्याच कारणांमुळे अशक्य आहे.
बहुसंख्य समीकरणांमध्ये एरर टर्म, डेल्टा, नॉईझ टर्म असतेच जी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल ची सेमारेषा कळण्यास जरूरी आहे.
मला वाटतं ज्या प्रकारे तो +६
मला वाटतं ज्या प्रकारे तो +६ लिहिलय ते कंपॅटिबल नाहीये एक्वेशन आणि उदाहरणाच्या फॉरमॅटशी असं म्हणत आहेत पेशवे.
हे ओवर सिंप्लिफिकेशन आहे हे खरं आहे पण समजवायला म्हणून चांगलं आहे.
>> एरर टर्म ('हँड ऑफ गॉड') ची
>> एरर टर्म ('हँड ऑफ गॉड') ची वॅल्यू रॅशनली शोधायची सोडून मी ईरॅशनल विचार करायला लागलो की मग त्या 'हँड ऑफ गॉड' वरचा माझा विश्वास अजूनाजून वाढत राहणार.
साध्या भाषेत, जिथे प्रयत्नवाद संपतो तिथे (बव्हंशी, हताश होऊन प्रयत्न सोडून दिल्याने) दैववाद सुरु होतो.
हाब मान्य. त्यातुनही तुम्ही
हाब मान्य. त्यातुनही तुम्ही जिला नोइझ टर्म म्हणता ते रॅडम व्हेरिएशन जनरली अपेक्षीत रिसल्ट मधे आलेले न्युन दर्शविण्यासाठी वापरली जाते किंवा मिळणार्या निकालाची एक रेंज ठरवण्या साठी. बहुतांश विज्ञान हे येणार्या निकालाच्या व त्याच्या रेंज विषयी आधीच भाश्य करते. मिरेकल तेंव्हा होते जेंव्हा ह्या रेंजच्या फारच बाहेर, आणि अपेक्षित निकालाच्या विरुद्द पण हवा असलेला निकाल मिळतो तेंव्हा. ज्या कारणाने हा नवीन निकाल मिळाला ते कारण चिमटीत पकडता आले तर विज्ञानाची झेप प्रगती होते. नाहीतर तो सिंग्युलर इव्हेंट विज्ञान भाषेत आउट्लायर व रोजच्या दैनंदिन जीवनात चमत्कारच (ओऊटलायर + सेन्से ओफ ऑ) असतो. भावनिक रिस्पोन्स वर इतका संशय कशाला?
एरर टर्म ('हँड ऑफ गॉड') ची
एरर टर्म ('हँड ऑफ गॉड') ची वॅल्यू रॅशनली शोधायची सोडून मी ईरॅशनल विचार करायला लागलो की मग त्या 'हँड ऑफ गॉड' वरचा माझा विश्वास अजूनाजून वाढत राहणार. >> यावर विचार करता ती टर्म (ह्युमन बॉडी, निसर्गातील बदल इ. इ.) जर ईरॅशनलच असेल तर समिकरणात बांधता येणारच नाही (ईरॅशनल नंबर प्रमाणे) थोडक्यात त्याचं रॅशनल समिकरण बनवताना हायर पॉवर समिकरण बनवून अधिकाधिक 'जवळ' जाता येईल. हाच डेल्टा जेव्हा शून्य होईल तेव्हा ती टर्म ईरॅशनल रहाणारच नाही तर रॅशनल बनेल.
इथे एक खरोखर घडलेला किस्सा
इथे एक खरोखर घडलेला किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही:
गावात एक वायरमन होता. खांबावर खूप मोठ्या तारांच्या अत्यंत क्लिष्ट भेंडोळ्यात कुठेतरी बिघाड होऊन अख्ख्या गल्लीची वीज गायब झाली. झाले. लगबगीने वायरमनला बोलावणे धाडले गेले. तो आला. खांबावर चढला. अर्धा तास खटाटोप केला. खाली उतरताना म्हणाला,
"मी माझ्या परीने शक्य ते सर्व केले आहे. आता ज्याच्या नशिबात आहे त्याच्या घरातली वीज सुरु होईल"
मला वाटते या वायरमन ने विज्ञानवाद आणि आस्तिकता यातील फरक नेमकेपणाने स्पष्ट केलाय
पेशवा आणि अमितव तुमच्या
पेशवा आणि अमितव तुमच्या दोन्ही पोस्टला अनुमोदन.
डेल्टा किंवा एरर टर्म प्रॅक्टिकली शून्य असेलंच असं नाही, कारण एका सिंगल ईवेंट ला अॅफेक्ट करणारे अगणित फॅक्टर्स असू शकताततंच. संशोधक त्यातल्या त्यात माहित असलेल्या महत्वाच्या सगळ्याच फॅक्टर्सना विचारात घेवून एक्स्पेक्टेड रिझल्टसाठी समीकरण मांडायच प्रयत्नं करतात. काही वेळेस ह्या फॅक्टर्स मधला सबंध तत्कालिक असतो, काही वेळेस कॉजल रिलेशन नेमके ऊलटे असते , कधी कधी 'हँड ऑफ गॉड' चा परिणाम एवढा मोठा असतो की बाकी महत्वाचे फॅक्टर्स गौण ठरतात.
ऊदा जुन्या काळात जी-एम च्या पाँटिआक गाडीचे ऊदाहरण माहितंच असेल.
गाडीचा ओनर मुलांसाठी आईस्क्रीम घ्यायला गेला आणि त्याने गाडी पार्क करून वॅनिला फ्लेवर विकत घेतला की गाडी चालूच होत नसे पण स्ट्रॉबेरी फ्लेवर्स घेतले की गाडी लगेचच चालू होत असे. निष्कर्ष मुलांनी वॅनिला फ्लेवर खाऊ नये म्हणून देव गाडीच्या माध्यमातून संदेश देत आहे.
जी एम च्या संशोधकांनी जेव्हा ह्या अॅनोमली मागचा शोध घेतला गेला तेव्हा असे लक्षात आले की वॅनिला हा सर्वात फेवरिट फ्लेवर असल्याने तो हातासरशी ऊपलब्धं असे आणि पटकन देता येई पण स्ट्रॉबेरी देण्यासाठी दोन-तीन मिनिटे जास्तं लागत. गाडीच्या ईंजिनात स्टार्ट होण्यासाठी एक स्पेसिफिक टेंपरेचर लेवल अपेक्षित असल्याने वॅनिला आईस्क्रीमसाठी लागणार्या कमी वेळात हॉट वेपर लॉक होऊन ते कूल डाऊन होत नसे आणि म्हणून स्टार्ट होत नसे. स्ट्रॉबेरी साठी लागणारा दोन-तीन मिनिटे जास्तीचा वेळ ईंजिनाला थोडे कूल डाऊन होण्यासाठी पुरेसा होता.
अननोन म्हणजे देव/दैव आहे असे नाही !!
Pages