Submitted by र।हुल on 7 August, 2017 - 07:32
दादा म्हणोनी बाप्पास हाक मारते
कान्हा म्हणोनी भावास साद घालते
अबोल हे शब्द भावना मनांत दाटते
का नसे दादा मला,मनांत खंत वाटते
दुर त्या सिमांवरती मृत्यू सोबतीनं खेळे
बसुनी घरांत आपुल्या काढणे सोपे गळे
शस्त्र हातांत घेऊनी दिवस रोजच मावळे
झाडांत त्या गर्द साजरे राख्यांचे सोहळे
माया काळजांत दाट नात्यांची घर करते
मानल्या भावाची मी मनांत वाट बघते
पांचालीस राखणार्या कृष्णास मी आठवते
भावाबहिणीचे हे बंधन सार्यांत ओढ लावते
―₹!हुल / ७.८.१७
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय भारी लिहिलस रे...
काय भारी लिहिलस रे...
रडवणार बहुतेक मला आज.. मी आजच्या दिवशी तरी कधी रडत नाही..पण....
तुम्हाला शीघ्रकवीचा दर्जा
तुम्हाला शीघ्रकवीचा दर्जा द्यायला हवा.........
व्वा राहुल अप्रतिम!
व्वा राहुल अप्रतिम!
छान जमलय
छान जमलय
धन्स कावेरी, पद्मसर, अक्षय,
धन्स कावेरी, पद्मसर, अक्षय, अंबज्ञजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी कवी नाहिये हो...लहान आहे अजून खुप...
व्वा! दादा, काय लिहिलंयस!!
व्वा! दादा, अप्रतिम लिहिलंयस!!
धन्स सायु
धन्स सायु