Submitted by कायानीव on 1 August, 2017 - 01:47
कुठे जायचे ठाऊक नाही. कसे जायचे ठाऊक नाही.
प्रवास माझा सुरूच आहे, फलीत याचे ठाऊक नाही.
प्रवासात या किती सोबती. प्रत्येकाची वाट वेगळी.
भाव आगळे आस निराळी, ध्येय तयांचे ठाऊक नाही.
मी वाटाड्या मीच प्रवासी, नाही नकाशा फक्त माहिती
सतत पाहणे सतत चालणे, उगा थांबणे ठाऊक नाही
कसोट्यांची रम्य ठिकाणे, सिद्धांतांची अचूक दालने
गौप्य येथले समजून घेण्या, वेळ किती तें ठाऊक नाही
मनमौजी मी या वाटेवर, लुटत राहतो कण ज्ञानाचे
प्रवासीच नीत रहायचे मज, गंतव्याचे अप्रूप नाही
© मनीष पटवर्धन
मो. ९८२२३२५५८१
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निर्लेपपणा सुन्दर उतरलाय
निर्लेपपणा सुन्दर उतरलाय कवितेत!
यतिभंग टाळण्यासाठी एक छोटीशी दुरुस्ती सुचवू इच्छितो :
"जरी भुलविती" रम्य ठिकाणे, सिद्धांतांची अचुक दालने
गौप्य येथले समजून घेण्या, वेळ किती तें ठाऊक नाही
सुंदर रचना !
सुंदर रचना !
सुचनेबद्दल धन्यवाद अनन्त्
सुचनेबद्दल धन्यवाद अनन्त्_यात्री जी
दत्तात्रय जी धन्यवाद
दत्तात्रय जी धन्यवाद