का स्वतःशी बोलताना

Submitted by कायानीव on 28 July, 2017 - 07:05

का स्वतःशी बोलताना लोचने पाणावली
अन मनीचे सत्य कळता वेदना झंकारली

मी तुझा होणार नाही माहिती आहे तुला
का मनी गं तू उगाचच मूर्त मम साकारली

सागराची लाट वेगे कातळाला भेटली
मोडल्यावर ती परत का सागरी सामावली

आसमंती ही गिधाडे, आज का घोंघावती
जीव माझा जात असता, का मनी आल्हादली

वास्तवाच्या या जगी मी, भासमानी राहिलो
भौतिकाला पारखा पण, मी कला जोपासली

©मनीष पटवर्धन
+919822325581

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults