Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2017 - 06:16
प्रेमतीर्थ
कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।
भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।
होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।
भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।
देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।
सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....
मिराशी - परंपरागत हक्क
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ..
मस्त ..
छानच ! विठ्ठल हे प्रेमरुप तर
छानच ! विठ्ठल हे प्रेमरुप तर श्रीकृष्ण धूर्त राजकारणी दूत, उत्तम सखा , आणि बरेच काही अशीच धारणा आहे . आपण हे प्रेमस्वरूप यथार्थ टिपले आहे . रुक्मिणीच्या प्रेमाखातर पंढरपूरात आले अन अवघ्या जगाला प्रेमाची दीक्षा दिली . म्हणूनच वारकरी सर्वांचा आदर करतात . संपूर्ण सोहळाच प्रेमाचा , आनंदाचा होतो .
विठ्ठल विठ्ठल जय हरी !!
विठ्ठल विठ्ठल जय हरी !!
मस्त....
वाह,
वाह,
खूपच छान! मिराशी म्हणजे काय?
खूपच छान!
मिराशी म्हणजे काय?
मिराशी - परंपरागत हक्क
मिराशी - परंपरागत हक्क
सर्वांचे मनःपूर्वक आभार....