१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष
कधीच न सापडलेल्या पत्राचे अवशेष ( पहिल्या तीन प्रतिमा)
---------------------------------------------------------
२ .सोशल नेटवर्किंग
सेतूचा सदस्यनोंदणी फॉर्म शब्दार्थने मोबाईलवर उघडला. पण काय करावं यावर त्याचा अजूनही निर्णय होत नव्हता. तो विचारांत असतानाच पॅम्प्लेट वाटणारा मुलगा त्याच्या समोरून गेला. मोबाईलमधील Unknown Pamplet ऑप्शन ON असल्यामुळे पुढच्याच क्षणी ते पॅम्प्लेट स्क्रीनवर होतं.
--------------------------------------------------------
सावधान ! सेतूसारख्या ऑफलाइन वेबशॉप्स पासून सावधान !!
अन्न, वस्त्र, निवारा आणि आंतरजाल ह्या मानवाचा चार मूलभूत गरजा आहेत. आंतरजालाने आपलं विश्व पुर्णपणे बदलून टाकलंय. शाळा, कॉलेज, ऑफिसेस इ. मध्ये जाण्याचा त्रास वाचलाय. घरबसल्या आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आभासी विश्वात आपण तासंतास रममाण होतो, हजारो लोकांशी एकाचवेळी संवाद साधू शकतो. या वरदानामुळे समाज जवळ आलाय, मानवी जीवनाला अर्थ प्राप्त झालाय.
पण सेतू सारख्या काही विघ्नसंतोषी कंपन्या जन्माला येत आहेत त्याचा आपण निषेध करायला पाहिजे. मनुष्य आदिमानव काळात परत जावा असाच त्यांचा हेतू दिसतो. आजची संवादमाध्यमे ते बदलू पाहत आहेत. प्रत्यक्ष संवादात सुरक्षा नाही, फायरवाल तिथे काम करत नाही. त्यामुळे समाजात फूट पडू शकते, परिस्थिती विकोपाला जाऊ शकते.
म्हणूनच सुज्ञ समाजाच्या नागरिकांना, आभासी विश्वाच्या चाहत्यांना आम्ही आवाहन करत आहोत की भूलथापांना बळी पडू नका.
आपला,
जैविक डोईफोडे,
अध्यक्ष, 0101 संघटना
आंतरजाल समाज-संघटक,
( सही )
-------------------------------------------------------
पॅम्प्लेट वाचून शब्दार्थचा गोंधळ अजूनच वाढला. त्याच्या समोरच सेतूची चकचकीत इमारत दिमाखात उभी होती. त्रिमितीय वेबसाईटसारखी दिसणारी त्याची बांधणी होती. ‘सेतू : ऑफलाईन समाजबांधणी वेबमंडळ’ असा मोठ्ठा डिजिटल बोर्ड झळकत होता. काही लोक इमारतीजवळ घुटमळत होते, काही दरवाजासमोरील रोबोशी बोलून बिनधास्त आत जात होते. तो एकटक बघत होता, टिपत होता लोकांचे हावभाव.
“सर, भरणार आहात फॉर्म की खिडकी बंद करू ?” मोबाईलमधून आवाज आला.
“थोडं थांब, भरतोय.”
त्याने ‘एकदा जाऊन तर पाहू’ या इराद्याने फॉर्म भरला. लागोलाग पासवर्ड मिळाला.
इमारतीजवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे दरवाजावर रोबोट नव्हे तर जिवंत माणूस पहारा देत होता !
“सर, तुमचा मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इथेच जमा करा.” पहारेकरी अदबीने म्हणाला. शब्दार्थने नियमाचं पालन केलं.
“कृपया तुमचा पासवर्ड सांगा.”
पासवर्ड सांगताच समोरचं ‘लॉगिन गेट’ उघडलं. शब्दार्थने जरा चाचपडतच आत पाऊल ठेवलं.
आत शुभ्रमंद उजेडात उजळून उजळून निघालेला मोठा हॉल होता. वेगवेगळ्या रंगांच्या खुर्च्या, सोफासेट्स कलात्मकरित्या मांडलेले होते. पार्श्वभूमीला बासरीची प्रसन्न सुरावट ऐकू येत होती. हॉलला जोडून अजून काही खोल्या होत्या. त्यावर कॅरम, टेबलटेनिस, बॅडमिंटन अशा पाट्या लिहलेल्या होत्या.
हॉलमधले काही लोक त्याच्यासारखेच गोंधळलेले होते तर काही वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखे गप्पा मारत होते.
“हॅल्लो एव्हरीबडी. सेतू वेबमंडळात तुमचे स्वागत आहे.”
शब्दार्थने आवाजाच्या दिशेने पाहिलं. स्टेजवर उभा असलेला एक व्यक्ती बोलत होता… “ इथलं वातावरण पाहून नवीन मेँबर्सचा गोंधळ उडणे साहजिक आहे. कारण प्रत्यक्ष संवाद साधण्याची सवय कित्येक पिढ्यांपासून तुटली आहे. तुमचं काम मी सोपं करतो… सध्या याला ऑनलाईन सोशल नेटवर्किंग वेबसाईट समजा. तिथे जसं तुम्ही चॅटींग करता तसंच इथे बोला, गप्पा मारा. फरक एवढाच की तिकडे तुमचे डिजिटल अवतार असतात, इथे तुम्ही स्वतः आहात.
ज्यांना ऑनलाईन गेमिंगची सवय असेल त्यांना इथले खरेखुरे इनडोअर गेम्स नक्कीच आवडतील. त्यानिमित्ताने तुमचा व्यायामही होईल. या स्टेजला आपण ‘पोस्ट टाकण्याची जागा’ असं म्हणू. तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता, आपल्या मनातील विचार मांडू शकता, कला सादर करू शकता. “
त्याने प्रतिसाद आजमावण्यासाठी समोर पाहिलं
“चला तर मग… कोण आहे तयार ?”
शब्दार्थ खूप चांगलं गायचा. स्वरचित गाणी रेकॉर्ड करून वेबसाईट्सवर पोस्टायचा. तिथे त्याला खूप प्रतिसाद आणि लाइक्स मिळायचे. इतक्या लोकांसमोर तो कधी गायला नव्हता, पण त्याने हिंमत करायचं ठरवलं.
“मी तयार आहे.” त्याने हात उंचावला.
“दॅट्स माय बॉय. पुट युअर हॅण्ड्स टुगेदर फॉर धिस यंग मॅन.”
बऱ्याचजणांना याचा अर्थ लक्षात आला नाही.
“दोन्ही तळहात जवळ आणायचे आणि अशा टाळ्या वाजवायच्या .” अॅंकरने प्रात्यक्षिक करून दाखवलं. सर्वांनी त्याचं अनुकरण केलं.
शब्दार्थ स्टेजवर पोहोचला अन त्याने समोर नजर टाकली. सगळेजण त्याच्याकडेच बघत होते. हा अनुभव खूपच वेगळा होता. तो जरा घाबरला.
“कमॉन यू कॅन डू इट.”
“घाबरू नकोस मित्रा.”
प्रेक्षकांमधून प्रोत्साहनपर आवाज उमटू लागले. त्याने डोळे मिटले. जगाचं भान विसरून तो बराचवेळ गात राहिला. गाणं संपलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की टाळ्यांचा कडकडाट होतोय, वन्स मोअरची उत्स्फूर्त मागणी होतेय. आतापर्यंत त्याला भरपूर लाइक्स मिळाल्या होत्या पण आजचा प्रतिसाद अनोखा होता, अनुभूती वेगळी होती… जगावेगळी.
तो दुसरं गाणं गायला, तिसरंसुद्धा. त्याचं अनुकरण करत अजून काही लोक समोर आले, कुणी बोललं, कुणी गाणं म्हटलं, कुणी नाचलं.
शब्दार्थ बराचवेळ त्या वेबसाईट- सदृश्य इमारतीत रममाण झाला.
‘लॉगआउट’ दरवाजातून बाहेर पडल्यावर त्याने सेतूविरोधी सगळे पॅम्प्लेट्स आणि जाहिराती डिलीट करून टाकल्या.
-----------------------------------------------------
म्हणजे हे खरे लोक आहेत हे
म्हणजे हे खरे लोक आहेत हे तुम्हाला माहित होते तर.
त्या मुलाचा फोटो असाच तुमच्या माहित नसलेल्या पण माहित असलेल्या पैकी नसावा असे असावे.
तो फोटो माझाच आहे ( लहानपणीचा
घाबरू नका. त्या फोटोतल्या व्रात्य मुलाला मी चांगलाच ओळखतो. त्याच्या मोठ्या व्हर्जनला रोज सकाळी आरशात बघतो
विनय, तुमचा स्वतःचा फोटो आहे
विनय, तुमचा स्वतःचा फोटो आहे तो??
(No subject)
Lol घाबरू नका. त्या फोटोतल्या
Lol घाबरू नका. त्या फोटोतल्या व्रात्य मुलाला मी चांगलाच ओळखतो. त्याच्या मोठ्या व्हर्जनला रोज सकाळी आरशात बघतो >>
छान होता उपक्रम. मजा आली.
विनय, तुमचा स्वतःचा फोटो आहे
विनय, तुमचा स्वतःचा फोटो आहे तो??
>>हो
पहिली कथा लिहायची पद्धत फारच
पहिली कथा लिहायची पद्धत फारच आवडली.
हा सीझन छान झाला. तुमच्या कल्पना वेगळ्या, फ्रेश आहेत. सगळ्या कथुकल्या जमल्या, कळल्या असं नाही, पण वाचायला मजा आली. सीझन २ घेऊन अवश्य परत या.
Lol घाबरू नका. त्या फोटोतल्या
Lol घाबरू नका. त्या फोटोतल्या व्रात्य मुलाला मी चांगलाच ओळखतो. त्याच्या मोठ्या व्हर्जनला रोज सकाळी आरशात बघतो >> मला घाबरण्यासारखे काही नाही निष्चिंत असा., तुम्ही काल्पनिक म्हणत खर्या लोकांची नावे टाकलीत ती ओळखल्यानंतर हात वर केले. नावं टाकण्यात गैर काही नव्हते पण खर्या व्यक्तींकडे अंगुलीनिर्देश करण्याचे काही कारण नव्हते, चुकून झाले तर तसे मान्य करणेही शक्य होते.
तुम्ही दुसर्याचा न टाकता स्वतःचा फोटो टाकलात हे चांगलेच केले.
तुम्ही का एवढं टेन्शन घेताय
तुम्ही का एवढं टेन्शन घेताय पण.
मी काल्पनिक म्हणत खऱ्या लोकांची नावे टाकली हा आपला गैरसमज आहे. (निर्मलाताई खेडेकर आणि राजेश बोँद्रे या नावांचे राजकारणी अस्तित्वात नाहीत)
एका आडनावाचे हजारो लोक असतात जगात.
मी अंगुलीनिर्देश केला असं तुम्हाला वाटत असेल तरीपण यात आक्षेप घेण्यासारखी काहीच गोष्ट नाही. कारण मी त्यांच्याबद्दल अनुद्गार काढलेले नाहीत, उलट एका शहीद सैनिकाच्या कार्यक्रमाला मानाने बोलावलंय.
तुम्ही रमेश इंगळे ऊत्रादकर यांची सुप्रसिद्ध निशाणी डावा अंगठा कादंबरी वाचा किंवा चित्रपट बघा. त्या वेळच्या कित्येक राजकारणी लोकांशी, अधिकार्यांशी मिळतेजुळते आडनावं सापडतील तुम्हाला.
अजूनही अशी बरीच उदाहरणं आहेत. साहित्यात ह्या गोष्टी चालत असतात.
असो.
वा!
वा!
हा सीझन छान झाला. तुमच्या
हा सीझन छान झाला. तुमच्या कल्पना वेगळ्या, फ्रेश आहेत. >> + १००
सीझन २ च्या प्रतिक्षेत..
भारंभार धाग्यांमध्ये हा मिस
भारंभार धाग्यांमध्ये हा मिस झाला होता.. आज चुकून दिसला कथा सेक्शन मध्ये गेलो तेंव्हा...
मस्त आहेत कटहुकल्या
भारंभार धाग्यांमध्ये हा मिस
भारंभार धाग्यांमध्ये हा मिस झाला होता.. आज चुकून दिसला कथा सेक्शन मध्ये गेलो तेंव्हा...
मस्त आहेत कटहुकल्या << +१
पहिली कॉमेंट वाचुन थोडी कळली. दुसरी आवडली.
दुसर्या सिझन च्या प्रतिक्शेत.
अरे वा सीजन २ येणार आहे का...
अरे वा सीजन २ येणार आहे का.... हे वाचून छान वाटले... प्रतीक्षेत
Pages