१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष
कधीच न सापडलेल्या पत्राचे अवशेष ( पहिल्या तीन प्रतिमा)
---------------------------------------------------------
२ .सोशल नेटवर्किंग
सेतूचा सदस्यनोंदणी फॉर्म शब्दार्थने मोबाईलवर उघडला. पण काय करावं यावर त्याचा अजूनही निर्णय होत नव्हता. तो विचारांत असतानाच पॅम्प्लेट वाटणारा मुलगा त्याच्या समोरून गेला. मोबाईलमधील Unknown Pamplet ऑप्शन ON असल्यामुळे पुढच्याच क्षणी ते पॅम्प्लेट स्क्रीनवर होतं.
--------------------------------------------------------
सावधान ! सेतूसारख्या ऑफलाइन वेबशॉप्स पासून सावधान !!
अन्न, वस्त्र, निवारा आणि आंतरजाल ह्या मानवाचा चार मूलभूत गरजा आहेत. आंतरजालाने आपलं विश्व पुर्णपणे बदलून टाकलंय. शाळा, कॉलेज, ऑफिसेस इ. मध्ये जाण्याचा त्रास वाचलाय. घरबसल्या आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आभासी विश्वात आपण तासंतास रममाण होतो, हजारो लोकांशी एकाचवेळी संवाद साधू शकतो. या वरदानामुळे समाज जवळ आलाय, मानवी जीवनाला अर्थ प्राप्त झालाय.
पण सेतू सारख्या काही विघ्नसंतोषी कंपन्या जन्माला येत आहेत त्याचा आपण निषेध करायला पाहिजे. मनुष्य आदिमानव काळात परत जावा असाच त्यांचा हेतू दिसतो. आजची संवादमाध्यमे ते बदलू पाहत आहेत. प्रत्यक्ष संवादात सुरक्षा नाही, फायरवाल तिथे काम करत नाही. त्यामुळे समाजात फूट पडू शकते, परिस्थिती विकोपाला जाऊ शकते.
म्हणूनच सुज्ञ समाजाच्या नागरिकांना, आभासी विश्वाच्या चाहत्यांना आम्ही आवाहन करत आहोत की भूलथापांना बळी पडू नका.
आपला,
जैविक डोईफोडे,
अध्यक्ष, 0101 संघटना
आंतरजाल समाज-संघटक,
( सही )
-------------------------------------------------------
पॅम्प्लेट वाचून शब्दार्थचा गोंधळ अजूनच वाढला. त्याच्या समोरच सेतूची चकचकीत इमारत दिमाखात उभी होती. त्रिमितीय वेबसाईटसारखी दिसणारी त्याची बांधणी होती. ‘सेतू : ऑफलाईन समाजबांधणी वेबमंडळ’ असा मोठ्ठा डिजिटल बोर्ड झळकत होता. काही लोक इमारतीजवळ घुटमळत होते, काही दरवाजासमोरील रोबोशी बोलून बिनधास्त आत जात होते. तो एकटक बघत होता, टिपत होता लोकांचे हावभाव.
“सर, भरणार आहात फॉर्म की खिडकी बंद करू ?” मोबाईलमधून आवाज आला.
“थोडं थांब, भरतोय.”
त्याने ‘एकदा जाऊन तर पाहू’ या इराद्याने फॉर्म भरला. लागोलाग पासवर्ड मिळाला.
इमारतीजवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे दरवाजावर रोबोट नव्हे तर जिवंत माणूस पहारा देत होता !
“सर, तुमचा मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इथेच जमा करा.” पहारेकरी अदबीने म्हणाला. शब्दार्थने नियमाचं पालन केलं.
“कृपया तुमचा पासवर्ड सांगा.”
पासवर्ड सांगताच समोरचं ‘लॉगिन गेट’ उघडलं. शब्दार्थने जरा चाचपडतच आत पाऊल ठेवलं.
आत शुभ्रमंद उजेडात उजळून उजळून निघालेला मोठा हॉल होता. वेगवेगळ्या रंगांच्या खुर्च्या, सोफासेट्स कलात्मकरित्या मांडलेले होते. पार्श्वभूमीला बासरीची प्रसन्न सुरावट ऐकू येत होती. हॉलला जोडून अजून काही खोल्या होत्या. त्यावर कॅरम, टेबलटेनिस, बॅडमिंटन अशा पाट्या लिहलेल्या होत्या.
हॉलमधले काही लोक त्याच्यासारखेच गोंधळलेले होते तर काही वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखे गप्पा मारत होते.
“हॅल्लो एव्हरीबडी. सेतू वेबमंडळात तुमचे स्वागत आहे.”
शब्दार्थने आवाजाच्या दिशेने पाहिलं. स्टेजवर उभा असलेला एक व्यक्ती बोलत होता… “ इथलं वातावरण पाहून नवीन मेँबर्सचा गोंधळ उडणे साहजिक आहे. कारण प्रत्यक्ष संवाद साधण्याची सवय कित्येक पिढ्यांपासून तुटली आहे. तुमचं काम मी सोपं करतो… सध्या याला ऑनलाईन सोशल नेटवर्किंग वेबसाईट समजा. तिथे जसं तुम्ही चॅटींग करता तसंच इथे बोला, गप्पा मारा. फरक एवढाच की तिकडे तुमचे डिजिटल अवतार असतात, इथे तुम्ही स्वतः आहात.
ज्यांना ऑनलाईन गेमिंगची सवय असेल त्यांना इथले खरेखुरे इनडोअर गेम्स नक्कीच आवडतील. त्यानिमित्ताने तुमचा व्यायामही होईल. या स्टेजला आपण ‘पोस्ट टाकण्याची जागा’ असं म्हणू. तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता, आपल्या मनातील विचार मांडू शकता, कला सादर करू शकता. “
त्याने प्रतिसाद आजमावण्यासाठी समोर पाहिलं
“चला तर मग… कोण आहे तयार ?”
शब्दार्थ खूप चांगलं गायचा. स्वरचित गाणी रेकॉर्ड करून वेबसाईट्सवर पोस्टायचा. तिथे त्याला खूप प्रतिसाद आणि लाइक्स मिळायचे. इतक्या लोकांसमोर तो कधी गायला नव्हता, पण त्याने हिंमत करायचं ठरवलं.
“मी तयार आहे.” त्याने हात उंचावला.
“दॅट्स माय बॉय. पुट युअर हॅण्ड्स टुगेदर फॉर धिस यंग मॅन.”
बऱ्याचजणांना याचा अर्थ लक्षात आला नाही.
“दोन्ही तळहात जवळ आणायचे आणि अशा टाळ्या वाजवायच्या .” अॅंकरने प्रात्यक्षिक करून दाखवलं. सर्वांनी त्याचं अनुकरण केलं.
शब्दार्थ स्टेजवर पोहोचला अन त्याने समोर नजर टाकली. सगळेजण त्याच्याकडेच बघत होते. हा अनुभव खूपच वेगळा होता. तो जरा घाबरला.
“कमॉन यू कॅन डू इट.”
“घाबरू नकोस मित्रा.”
प्रेक्षकांमधून प्रोत्साहनपर आवाज उमटू लागले. त्याने डोळे मिटले. जगाचं भान विसरून तो बराचवेळ गात राहिला. गाणं संपलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की टाळ्यांचा कडकडाट होतोय, वन्स मोअरची उत्स्फूर्त मागणी होतेय. आतापर्यंत त्याला भरपूर लाइक्स मिळाल्या होत्या पण आजचा प्रतिसाद अनोखा होता, अनुभूती वेगळी होती… जगावेगळी.
तो दुसरं गाणं गायला, तिसरंसुद्धा. त्याचं अनुकरण करत अजून काही लोक समोर आले, कुणी बोललं, कुणी गाणं म्हटलं, कुणी नाचलं.
शब्दार्थ बराचवेळ त्या वेबसाईट- सदृश्य इमारतीत रममाण झाला.
‘लॉगआउट’ दरवाजातून बाहेर पडल्यावर त्याने सेतूविरोधी सगळे पॅम्प्लेट्स आणि जाहिराती डिलीट करून टाकल्या.
-----------------------------------------------------
मस्त आहे सेतू... आईला खरेच
मस्त आहे सेतू... आईला खरेच असे होईल का...
पण ते सोडा.. हा अंतिम भाग का? ...
आतापर्यंतचे सर्वच भाग मस्त
आतापर्यंतचे सर्वच भाग मस्त आणि मनोरंजक होते
तरीही मलासुद्धा प्रश्न पडलाय
.. हा अंतिम भाग का? ...
खूप आवडल्या!
खूप आवडल्या!
पण हा शेवटचा भाग नको!
वेटींग फॉर मोर!
मस्त
मस्त
मस्त
मस्त
सेतू आवडली, पुढे जाऊन हे असेच
सेतू आवडली, पुढे जाऊन हे असेच होणार यात काहीही शंका नाहीय.
पहिली समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण काहीही समजले नाही. फोटोतला बाळा गॉगल लावल्यामुळे मामाच्या भूतकाळात गेला व मामाने गुप्तहेर म्हणून केलेले खून त्याला दिसले, त्याच्या हातात आधीच लोडेड बंदूक होती, मामा जवळ येतोय हे बघून घाबरून बंदूक उडून त्याचा मृत्यू झाला व हे बघून मामाचा मृत्यू झाला एवढा अर्थबोध झाला पण यासाठी गॉगल व मामाचा भूतकाळ इथे घेण्याची आवश्यकता नव्हती, असेही ही घटना घडली असती. की मामाला आपला भूतकाळ ह्याला कळला असे वाटून त्याच्या हातून हे घडले?
मस्त!! ....हा अंतिम भाग का??
मस्त!! ....हा अंतिम भाग का??
@ साधनाजी,
@ साधनाजी,
गॉगलबद्दल असं होऊ शकतं पण पुढे वेगळं घडलं असणार. वरील पुराव्यांमध्येच लपलेली आहे कथा.
मामाचा आणि भाच्याचा एकाच दिवशी मृत्यू झाला असता तर मामांनी प्रथम पुण्यस्मरणाची बातमी कशी दिली असती.
लोडेड बंदूक मुलाच्या हातात आली असा उल्लेख आलेला नाही.
पहिली कळली नाही.
पहिली कळली नाही.
सेतु आवडली. भारी कल्पना.
अंतिम भाग का? फक्त १४च भाग लिहिणार असं काही होतं का?
इतक्यात लिखाणाला वेळ मिळणार
इतक्यात लिखाणाला वेळ मिळणार नसल्याने तूर्तास थांबतोय. पहिला सिझन संपला असं म्हणू शकतो
पुढे कथुकल्यांचा दुसरा सिझन आणण्याचा प्रयत्न असेल.
फक्त १४च भाग लिहिणार असं काही
फक्त १४च भाग लिहिणार असं काही होतं का?
>> नाही असं ठरवलेलं नव्हतं. पण ५० च्या आसपास कथुकल्या लिहण्याचं target होतं, ते पूर्ण झालं.
पुढे कथुकल्यांचा दुसरा सिझन
पुढे कथुकल्यांचा दुसरा सिझन आणण्याचा प्रयत्न असेल.>>>> छान. लवकर लिहा.
तुमच्या कथुकल्या मस्त हटके असतात.
पहिली उकलुन सांगता का?
पहिली उकलुन सांगता का?
प्रतिसादांकरीता सर्व मित्र,
प्रतिसादांकरीता सर्व मित्र, मैत्रिणी, आदरणीय यांचे मनःपूर्वक आभार. कथुकल्यांचा हा प्रवास खूप आनंददायी होता. आपल्या अनमोल प्रतिसादांमुळे लिहण्याचा हूरूप वाढला. वेगवेगळे विषय, लेखनशैली वापरता आली, लिखाणात प्रयोग करता आले. काही सुधारणा सुचवल्या, काही उणिवा ध्यानात आल्या. आपल्यासारखे श्रीमंत वाचक मिळणं लेखकाचं भाग्य असतं.
पहिली प्रायोगिक कथा आहे.
पहिली प्रायोगिक कथा आहे. त्यांना आपण विखुरलेले अवशेष म्हणू शकतो. तारखा मुद्दाम टाकलेल्या नाहीत. परंतू काळजीपूर्वक बघितल्यास आणि तर्कसंगती लावल्यास काय घटना घडली असेल याचा अंदाज नक्की बांधता येईल. प्रयत्न करा, नाहीतर मी उलगडून सांगतोच
विनयजी मी तुमच्या
विनयजी मी तुमच्या कथुकल्यांचा पंखा आहे. लवकरच सिझन 2 येऊ द्या. प्रतीक्षेत...........
ठीक आहे, परत प्रयत्न करते
ठीक आहे, परत प्रयत्न करते समजावून घ्यायचा.
हा भाग अंतिम आहे हे वाचून
हा भाग अंतिम आहे हे वाचून वाईट वाटले. सगळ्या कथूकल्या वाचल्या छान आहेत.
फक्त आत्ता मला नं १ ची कथा दिसत नाहीये. पण दुसरी आवडली.
अजुन पुढे लिहा.
पहिली दोन पाने म्हणजे एकाच
पहिली दोन पाने म्हणजे एकाच पानाचे मधून उभे फाडलेले दोन भाग आहेत.
वडीलानी डायरी लिहायचं सुचवलं म्हणून पोरगा लिहितो पण त्याला लिहायचा कंटाळा आहे. मामाकडे येताना डायरी आणली नाही पण आज काहीतरी वेगळाच अनुभव आला म्हणून तो लिहून काढला (कुठतरी दुसरीकडे, डायरीत नाही) . पतंगासाठी डोरा शोधताना तो मामाच्या खोलीत गेला, ट्रंक कुलूपबंद नव्हती, ती उघडली. आत गॉगल्स होते, गम्मत म्हणून एक लावला, गॉगललास बटनहोते ते दाबल्यावर समोर चलचित्र दिसायला लागले. प्रत्येकात मामा माणसे मारताहेत. हे बघून पोरगा घाबरून घराबाहेर पळाला व गोठ्याकडे बसून हे लिहू लागला.तोच मामांचा आवाज आला, ट्रंक उघडली गेलीय हे लक्षात आले, कोणी उघडली असावी याची चौकशी सुरू झाल्यावर पोरगा लिखाण अर्धेच टाकून पळाला. पळत असताना बहुतेक त्याचा पाय सापावर पडून तो मेला. लिखाण कुणालाही सापडले नसणार. नंतर वर्षभराने ते मामाना मिळाल्यावर मुलगा कुठल्या परिस्थितीत मेला हे कळल्याने धक्का बसून त्यांचा मृत्यू ओढवला.
माझा हा तर्क. तरी काही प्रश्न उरले.
1. मुलाने गोठ्याच्या बाजूला बसून लिहिले. प्रथम पुण्यस्मरणानंतर मामांचा मृत्यू 19 जून ला झाला , म्हणजे मुलाचा मृत्यू एप्रिल/मे मध्ये झाला असणार. शाळेच्या सुट्टीत तो मामाकडे आला असणार. म्हणजे लिखाण होऊन त्यावरून 1 पावसाळा लोटलाय. मग कागद पावसाळ्यात टिकले कसे
2. मामा प्रगतिशील शेतकरी होते म्हणजे गोठ्यात कायम येणे जाणे असणार, मग मुलाने लिहिलेले कागद इतक्या उशिरा का सापडावेत?
मी वर फाडलेले म्हटलेय ते फोटो
मी वर फाडलेले म्हटलेय ते फोटो कसा काढलाय त्याचा अंदाज यावा म्हणून. पान फाडलेले नाहीय पण फोटो काढताना तसे काढलेत. तिसरा फोटो त्याच पानाचा अखंड फोटो आहे.
विनयजी आतापर्यंतच्या सर्व कथा
विनयजी आतापर्यंतच्या सर्व कथा या अप्रतिम होत्या दुसरा सिझन लवकर येऊद्यात...प्रतिक्षेत आहोत...
मी वर फाडलेले म्हटलेय ते फोटो
मी वर फाडलेले म्हटलेय ते फोटो कसा काढलाय त्याचा अंदाज यावा म्हणून. पान फाडलेले नाहीय पण फोटो काढताना तसे काढलेत. तिसरा फोटो त्याच पानाचा अखंड फोटो आहे.>>>
मामाचे आणि भाच्याचे आडनाव सेम कसं असेल?
पहिल्या कथेतल्या बातमीत
पहिल्या कथेतल्या बातमीत ऊल्लेख आलेली खेडेकर, सारडा वगैरे सगळी, ही खरी माणसे आहेत? पहिले नाव बदलल्यासारखे वाटत आहे तरी, ही खरी जिवंत राजनैतिक माणसे आहेत हे माहित आहे. असे करण्याचे कारण?
साधनाजी,कथा बरोबर ओळखलीत.
साधनाजी,कथा बरोबर ओळखलीत.
आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नांबद्दल :
ज्या वर्षी प्रथम पुण्यस्मरण झालं त्याच वर्षी मामांचा मृत्यू झाला हे कशावरून ? कदाचित ते नंतर बऱ्याच वर्षानी वारले असतील, heart attack येऊन.
शेवटची बातमी येवढ्यासाठी दिली की घोरपडे गुप्तहेर होते हे कळावं
भाचा पळाला, मामा येतोय हे बघून त्याने हातातला कागद फाडून फेकून दिला असेल, जो नंतर कुणालाच सापडला नसेल. कारण तसं असतं तर मामावर बालंट आलं असतं पण तसं काही दिसत नाही.
चंद्रभान भाचा नाहीये,
चंद्रभान भाचा नाहीये, पुण्यस्मरण मामांनी दिलाय असे विनय म्हणालेत, म्हणजे चंद्रभान घोरपडे हे मामा. पुढच्या बातमीत चंद्रशील ही टायपो असावी. नाहीतर मग चंद्रभान मुलाचे वडील. आडनावे एक असू शकतात. ती वेगळीच असायला हवीत असा नियम नाहीय.
धन्यवाद विनय ...
धन्यवाद विनय ... मिलीटरीतल्या तंदुरुस्त मामांना जरा लवकरच मारलंत तुम्ही. वय इतकं कमी दिलं नसतं तर मी मामा धक्क्याने गेले म्हटले नसते.
पहिल्या कथेतल्या बातमीत
पहिल्या कथेतल्या बातमीत ऊल्लेख आलेली खेडेकर, सारडा वगैरे सगळी, ही खरी माणसे आहेत?
>> नाही हो. निर्मलाताई खेडेकर, संजय सारडा आणि इतर सगळी नावे काल्पनिक आहेत. या नावांच्या राजकीय व्यक्तींना मी तरी ओळखत नाही
सॉरी. चंद्रशील ही टायपो आहे.
सॉरी. चंद्रशील ही टायपो आहे. त्याऐवजी चंद्रभान अशी सुधारणा केली आहे.
नाही हो. निर्मलाताई खेडेकर,
नाही हो. निर्मलाताई खेडेकर, संजय सारडा आणि इतर सगळी नावे काल्पनिक आहेत. या नावांच्या राजकीय व्यक्तींना मी तरी ओळखत नाही >>> आं भलताच योगायोग, सायकीक वगैरे पावर आहे की काय तुमच्याकडे... खर्याखुर्या चिखली तालुक्यात खरोखर खेडेकर, बोंद्रे हे आमदार आहेत हे तुम्हाला माहित नव्हते?
http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/chikhli.html
खर्याखुर्या चिखली तालुक्यात
खर्याखुर्या चिखली तालुक्यात खरोखर खेडेकर, बोंद्रे हे आमदार आहेत हे तुम्हाला माहित नव्हते?
>> हो, पण ते रेखाताई खेडेकर आणि राहुल बोंद्रे आहेत. मी वेगळी नावे वापरली आहेत.
Pages