एक पाऊस असाही

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 June, 2017 - 02:18

धुरकट झालं सारं
भरारलं वारं
मोतीपवळ्याचं लेणं
उतरलं धरतीवर
वीज लकाकता आकाशी
अवघी धरा उजळली
माय लेकराची मग
मनोमन भ्याली
पाखरू बावरे
घरट्यातच वावरे
उब घराचीच करी
सर्वा आश्वस्त
उधानलं नदी नालं
ओढ कशी आवरु
सासुरवाशीण सई
लगबगीत माहेरा जाई
असा ओलेता उत्सव
झाले हिरवे रान
शिळ घालिते कसे
आज उनाड मन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults