प्रिय मायबोलीकर, हा माझा मायबोलीवर तसेच कुठंही जाहीरपणे लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न तरी काही चुकल्यास सांभाळून घ्या, समजावून सांगा. धन्यवाद.
प्रपोज
ती म्हणजे कॉलेजक्विन होती..कॉलेजमधली सर्वांत सुंदर मुलगी..गेली दोन
वर्षं आम्ही सोबत होतो आणि तेव्हापासून आमची दोघांची सुंदर मैत्री होती.
कॉलेजलाईफचा शेवटचा महीना चालू झाला.. यानंतर आमचे पुढील मार्ग वेगवेगळे असणार
होते. गेल्या दोन वर्षांत अनेकदा मतभेद, कडाक्याचे भांडणं होऊनही आमची मैत्री
टिकूनच राहीली होती. उलट उत्तरोत्तर ती बहरतच गेली. खरं म्हणजे तिनं खुप
जाणीवपूर्वक हि मैत्री जपली होती आणि मी मात्र तीला जपलं होतं..in fact माझं
तिच्यावर खुप प्रेम होतं पण ते कधीच तिला सांगितलं नाही..तिला ते कधी जाणवलं
असेल की नाही माहीत नाही पण माझी कधीकधी खुप तारांबळ उडायची तिच्यावरचं प्रेम
लपवताना..मित्र म्हणायचे, 'सांगून टाक तीला एकदाचं..सांगितल्यानं मन हलकं
होत..' पण तशी हिम्मतच कधी झाली नाही..
आता मात्र जाणिव व्हायला लागली, 'संपली सोबत' अशी..कधीकधी खुप अस्वस्थ
वाटायचं..मित्रांमध्ये असूनही एकेकटं वाटायचं..असं वाटायचं की सांगावं
तीला..आणि एके दिवशी खुप विचार करून निर्णय घेतला, सांगायचंच तिला असा..
Degree चा शेवटचा पेपर संपला त्या दिवशी सर्वजण वर्गाच्या बाहेर
पडलो..एकदोन मित्रांना पुढं काय होणार ते माहीत असल्यानं त्यांनी आधीच
ठरल्याप्रमाणे बाकीच्या ग्रुप ला घेऊन तिथनं कल्टी मारली..आता आमच्या campus
च्या आवारात मी, ती आणि तिची एक जवळची मैत्रिण असे तिघंच होतो..त्या
मैत्रिणीला आमच्या दोघांपासून कटवायची जबाबदारी आगोदरच एका मित्रानं घेतली
होती..ठरल्याप्रमाणं त्यानं तिला फोन केला..फोनवर बोलताऐकता त्या मैत्रिणीनं
माझ्याकडं एक तिरपा कटाक्ष टाकला, हलकसं हसली आणि मला डोळा मारत 'बेस्ट लक'
अशी थंब ची खुण करत आलेच परत असं म्हणून ती तिथून हलकेच निसटली..
आता आम्ही दोघंच उरलो. मी मनात शब्दांची जुळवाजुळव करत होतो..ति मात्र
शांत होती..एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी गंभिर!
"संपलं कॉलेज.." मी म्हटलं.
"हम्म.." ती.
"मग आता पुढं?.." माझा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न.
"काही नाही..आता लग्नं!" तीचं खळाळून हसणं..खरं म्हणजे या निरागस हसण्यानंच
मला वेड लावलं होत...भान हरवून मी तिचं हसणं बघत रहायचो..
"आSS..??" माझं भुवया वर घेत आश्चर्य व्यक्त करणं.
"हम्म" शांत होत तिचा प्रतिसाद.
"अगं ऐक तर.." मी.
"हो..काय?" ती.
खरं म्हणजे नेमकी कशी सुरूवात करावी हेच मला कळत नव्हतं..इतक्या दिवसांची
मैत्री जी होती..
काही क्षण असेच शांततेत गेले..मला वाटतं तिलाही पुढील अंदाज आलेला
असावा..एव्हाना आम्ही चालतचालत campusच्या lawn वर आलेलो होतो.
झटकन पुढं होत मी तिच्या मार्गात आडवा उभा राहीलो..ती थबकली..थांबली..हसू
दाबत, 'काय रे?' म्हणाली.
"Love u.." माझ्याही नकळत माझ्याकडून पट्कन शब्द निघून गेले..आता माझं सगळं
लक्ष तिच्यावर लागलं होतं..कान तिचं बोलणं ऐकण्यास उत्सुक होते..मन शांत झालं
होतं..ती काय बोलेल, हो किंवा नाही अशी भितीची जाणिव आजिबात नव्हती. सगळं
ध्यान तिच्यावरच होतं..
क्षणभरच पण अगदी शांतपणे तिनं डोळे मिटले..स्त्रीसुलभ भावना चेहऱ्यावर दाटून
आल्या..गुलाबी गालांवर लालसर छटा पसरली..एक हलकसं स्मित चेहर्यावर आलं आणि
लाजून चूर होत तीनं नजर खाली झुकवली.
किती सुंदर दिसत होती ती! असं तिचं रूप गेल्या दोन वर्षांत मी कधीच
बघितलं नव्हतं..त्या चेहर्यावर काय नव्हतं?..शांतपणे वाहणार्या झर्याचं
गांभीर्य होतं त्यावर..मावळतीच्या सुर्याची पश्चिम दिशेकडं पसरत जाणारी लालिमा
होती त्या गोबर्या गालांवर..एखाद्या मंदिरातील देवीच्या मुर्तीचं पावित्र्य
होतं दिसण्यात..प्रेमाविष्कार, त्याचं सौंदर्य तिच्या रूपानं मी प्रथमच पहात
होतो..
आता शब्द मुक झाले..दोन मिनिटं अशीच शांततेत गेली..ती दोन मिनिटं मला दोन
तासांप्रमाणे भासली..मग मात्र तिनं सावकाशपणे मान वर करून वरती
पाहीलं..मानेनंच नाही अशी खुण करत एक गोड हसू देत आणि 'वेड्या' अस पुटपुटत
तीनं मला एका हातानं तिच्या मार्गातनं बाजूला सारलं आणि ती चालायला लागली..
मी फक्त बघतच राहीलो..पण क्षणभरच..
"अगं पण.." तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत मी म्हटलो..ती थांबली..मागे वळून
पाहत तिनं,
"वेड्या इतके दिवस लावलेस बोलायला? एवढा घाबरतोस मला?.." असं हसत विचारलं.
मी समाधानाचं हसलो..किती मस्त भावना होती ही!..मला वाटतं,'आपण कुणालातरी
आवडतो' हि भावना, जगातली सर्वांत सुंदर भावना असावी.
"घरी ये माझा हात मागायला.." गोड लाजून आणि हसतहसत, बोलत तिनं माझा निरोप
घेतला..
एका दिव्यातून बाहेर पडलो होतो..आता पुढचं नवं लक्ष होतं...
ऋन्मेऽऽष, आपले २६ अनुभव
ऋन्मेऽऽष, आपले २६ अनुभव येऊदेत..एकेक करून.. खुपजण वाट बघतायत. Wink>> म्हणजे अजून २६ धागे
धन्यवाद! अक्षय आणि सोनाली
धन्यवाद! अक्षय आणि सोनाली
म्हणजे अजून २६ धागे
अरे! हे कसं मिसलं माझ्याकडून?
अरे! हे कसं मिसलं माझ्याकडून?
फार सुंदर लिहिलंय. 'Love you' म्हटल्यावर 'वेड्या इतके दिवस लावलेस बोलायला' ह्या दोन संवादामधला दोन मिनिटांचा काळ आपण फार छान चित्तारलाय. आपले विचारणे, आता काय होईल ह्या तुमच्या मनातल्या भावना, तुमचे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर बदलत जाणाऱ्या प्रतिक्रिया, त्या पाहून तुमच्या मनात उचंबळणाऱ्या भावना, आणि शेवटी होकार देताना तिच्या होणाऱ्या प्रतिक्रिया. हा सगळा दोन मिनिटांचा काळ आम्हीसुद्धा तुमच्या बरोबर जगलो.
हा आनंद आम्हाला मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद.
इतकी सुंदर आणि सविस्तर
इतकी सुंदर आणि सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सचिनजी..
छान
छान
पहिलाच प्रयत्न खुप छान झालाय.
पहिलाच प्रयत्न खुप छान झालाय. जुने दिवस आठवले. मस्त लिहलय.
छान लिहिले आहे !!!!
छान लिहिले आहे !!!!
शुलु, निर्झरा आणि dabbu
शुलु, निर्झरा आणि dabbu प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
मला वाटतं,'आपण कुणालातरी
मला वाटतं,'आपण कुणालातरी

आवडतो' हि भावना, जगातली सर्वांत सुंदर भावना असावी. खरय
मस्तच

धन्यवाद सा ने..
धन्यवाद सा ने..
मस्तच ...पुढील भाग येऊदेत
मस्तच ...पुढील भाग येऊदेत
राहुल, पुढच्या भागाची वाट
राहुल, पुढच्या भागाची वाट पाहतोय.....
आज घे मनावर...
धन्यवाद किरण, पद्मसर...
धन्यवाद किरण, पद्मसर...
khup chan lihilayes, keep it
khup chan lihilayes, keep it on..
पुढचा भाग टाका लवकर आणि
पुढचा भाग टाका लवकर आणि जमल्यास भाग थोडे मोठे लिहा.....पुलेशु.
अर्चना पुरानिक, अजय
अर्चना पुरानिक, अजय प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय
धन्स सायु
धन्स सायु
खुप सुन्दर !! I was
खुप सुन्दर !! I was imagining the beautiful situation while reading.
Keep on writing !!
परत वाचली.. अभिनंदन 50 पूर्ण
परत वाचली.. अभिनंदन 50 पूर्ण झाले आज
भारी जमलीय कथा, आवडली.
भारी जमलीय कथा, आवडली.
अभिनंदन फिफ्टी झाल्याबद्दल..
अभिनंदन फिफ्टी झाल्याबद्दल..
आता तु.सो. लिहि...
निलया, परी धन्यवाद..
निलया, परी धन्यवाद..
च्रप्स, मेघा पुन्हा धन्यवाद..
चांगलं लिहिलंय. फक्त ते हात
चांगलं लिहिलंय. फक्त ते हात मागायला ये म्हणणं खटकलं.
धन्यवाद सस्मित! फक्त ते हात
धन्यवाद सस्मित!
त्यासाठीच तर केला होता सगळा अट्टहास!!!
फक्त ते हात मागायला ये म्हणणं खटकलं. >>>>
हात मागायला ये असा श्ब्द
हात मागायला ये असा श्ब्द प्रयोग खटकला असं म्हणायचंय मला.
मराठीत मागणी घालणं म्हणतात ना.
हम्म! चालायचंच! जसं आलं तसं
हम्म! चालायचंच! जसं आलं तसं उतरवलं.
मस्त रे भावा..लय भारी.. आणखी
मस्त रे भावा..लय भारी.. आणखी येऊ दे.
मस्त लिहीलय..वर्णन सुरेख आहे.
मस्त लिहीलय..वर्णन सुरेख आहे....किती गोड....पुभाप्र....
व्वा क्या बात है! अशी कथा तर
व्वा क्या बात है! अशी कथा तर कधीच नव्हती वाचली.
दिल खुश हो गया यार! शब्दच नाहीत वर्णन करायला..
जगातल्या सर्वात मोठ्या महामुर्खालाच तेवढं ही कथा आवडनार नाही.
.... (तात्पर्यः आता तरी पुढचा भाग लिहा!)
Pages