' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.
त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....
माझा भाउ अमेरिकेत जाउन एम.एस.
माझा भाउ अमेरिकेत जाउन एम.एस. करायचं म्हणातोय.. जर तिकडे ट्र्म्प ने काही नियम आणाले असतील तर एम.एस. करुन ३०-४० लखांचा अपव्यय होईल का..? २ वर्शांसाठी अमेरिकेत रहाण्याचा खर्च आणि शिक्षण खर्च करणॅ योग्य ठरेल का..??
डिफाईन अपव्यय आणि योग्य.
डिफाईन अपव्यय आणि योग्य.
अपव्यय - एवढे पैसे खर्च करुन
अपव्यय - एवढे पैसे खर्च करुन तेवढे परत मिळवणारी नोकरी मिळेल का..? मिळाले तरी ट्रम्प काकांच्या नियमांमुळे येणार्या निर्बंधांमुळे त्या नोकरीतुन खर्च केलेले पैसे तरी परत मिळतील का..?
योग्य - जर घलवलेले पैसे व्याजासकट परत मिलाळे तर योग्य.. नहितर अयोग्य
कामानिमित्त मिळू शकत होते
कामानिमित्त मिळू शकत होते म्हणजे ? असे कसे शक्य होते व्हिसा शिवाय? कसले काम?
Submitted by नन्द्या४३ on 27 September, 2018 - 19:10
कामदेव शब्दात काम आहे. कदाचित त्याच कामाविषयी लिहिले असेल.
त्या कामाला अमेरिकेत कशाला
त्या कामाला अमेरिकेत कशाला यायला पाहिजे?
झक्की, पांचट विनोद करू नका,
झक्की, पांचट विनोद करू नका, मुद्द्याला धरून बोला....
पण माबोवर तशी प्रथा नाही.
पण माबोवर तशी प्रथा नाही.
एखाद्या गोष्टीचे प्रचंड चर्वितचरण झाले नि नवीन सांगायला काही उरले नाही, नि वैयक्तिक शेरेबाजी सुरु झाली की मायबोलीवर हे असेच होते.
मी मागे अनेकदा सर्व हुषार, अभ्यासू लोकांना विनंति केली होती की या चर्चामय धाग्यांचे संपादन करून त्यातून काय महत्वाचे मुद्दे निघाले, काही निर्णय ठरले का? वगैरे मायबोलीवर वेगळ्या ठिकाणी लिहा. मला तेव्हढी अक्कल नाही म्हणून, शिवाय बरेच विषय भारतासंबंधी किंवा अमेरिकेबद्दल बोलणारे भारतीय यांचेच असतात. तिथे मी काही लिहीले की मला भयताड म्हणतात. मी हा शब्द ऐकला नव्हता. मला भैत्ताड म्हणत असतील तर मी आपला भैत्ताडासारखा लिहितो, म्हणजे उगाच मला भैत्ताड म्हणणारे माझ्यामुळे खोटे पडू नयेत!!
<<<पांचट विनोद करू नका, >>>
<<<पांचट विनोद करू नका, >>>
का? त्याचा मक्ता तुम्ही घेतला आहे का?
DJ. ,
DJ. ,
भावाचा एम एस करायला यायचा प्लॅन असेल तर स्कॉलरशिप/फंडिंगची सोय हवी. किंवा भारतात/इतर देशांत नोकरी करुन थोडा अनुभव घेवून , पैसे साठवून स्वबळावर इथे येणे, उत्तम शिक्षण घेणे आणि त्या जोरावर जिथे मिळेल तिथे उत्तम नोकरी मिळवणे/ रिसर्चची संधी असेही करता येइल. एच १ ची लॉटरी असते. स्वतः खर्चाचा बोजा उचलणार असाल तर अमेरीकेत पुढे नोकरी करुन घातलेली रक्कम व्याजासह परत मिळवायची गॅरंटी नाही. त्यामुळे न पेलणारे कर्ज काढ्रन किंवा पालकांची रिटायरमेंट पणाला लावून इथे येणार असाल तर मी तरी तसे करु नये हा सल्ला देईन.
अपव्यय - एवढे पैसे खर्च करुन
अपव्यय - एवढे पैसे खर्च करुन तेवढे परत मिळवणारी नोकरी मिळेल का..? मिळाले तरी ट्रम्प काकांच्या नियमांमुळे येणार्या निर्बंधांमुळे त्या नोकरीतुन खर्च केलेले पैसे तरी परत मिळतील का..? >>
पैसे खर्च करून चांगले शिक्षण मिळते.. नोकरी नाही. खर्चलेल्या पैशांचा आणि नोकरीचा काही संबंध नाही कारण नोकरी साठी चांगल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान लागते, आधी केलेल्या पैशांचा खर्च नाही.
पैसा खर्च ते पैसा वसूल ह्याच्या मधल्या शिक्षण-बिक्षण/जडण-घडण/वॅल्यूज-ज्ञान मिळवण्याच्या क्षुल्लक स्टेपला ऑप्शनला टाकावयाचे असल्यास पैसे खर्च (निदान गुंतवणूक तरी म्हणा, तेवढेच जीवाला बरे वाटते) करून पुन्हा ते खर्चलेले पैसे मिळवायचे हा द्राविडी प्राणायाम का करावा ?
ट्रम्प काकांच्या नियमांमुळे येणार्या निर्बंधांमुळे>> शिक्षण/नोकरी हा आयुष्यभराचा प्रश्न आहे निदान ३०-४० वर्षांच्या प्रवासाचा... ट्रंप काका आज
घरात आहेत ऊद्या नाहीत, कोणी सांगावे?
योग्य - जर घलवलेले पैसे व्याजासकट परत मिलाळे तर योग्य.. नहितर अयोग्य > जगाच्या पाठीवर खर्च केलेले पैसे परत कुठे आणि कसे मिळवता येतात? ते ही विथ गॅरंटी? विद्यार्थ्यांकडे कमॉडिटी म्हणून कसे बघता येते? घोड्यांच्या रेस मध्ये असते किती पैसे लावले म्हणजे किती परत मिळतील.
माफ करा.. पण खेद वाटला शिक्षणाप्रती असा अप्रॉच बघून.
थोडक्यात चांगले शिक्षण मिळवायचे असेल तर जरूर या.. पैसे मिळवायचे असतील तर साध्या लॉटरीच्या तिकिटाचं खर्च आणि वसुलीचं गुणोत्तर जास्त फायद्याचं राहिल. स्वाती ह्यांचा प्रतिसाद जास्त प्रॅक्टिकल आहे.. मी लिहिलेले वाचून सोडून द्या.
अमेरिकेत सध्या भारतीय मुलांना
अमेरिकेत सध्या भारतीय मुलांना (भारतीय पासपोर्ट) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ एच १ बी व्हिसा वर नोकरी मिळणे पूर्वी इतके सहज राहिलेले नाही. त्याची कारणे या आधी इथे चर्चिली गेली आहेत.
याचा अर्थ असा नाही की नोकऱ्या मिळणे बंद झाले आहे. फक्त पूर्वी इतके सहज सोपे राहिलेले नाही इतकेच. .
इतरांनी लिहिल्याप्रमाणे, खूप जास्त आर्थिक तडजोडी न करता सहज पैशाची सोय होत असेल तर इथे येऊन २ वर्ष शिक्षण घेणे आणि नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात काही हरकत नाही.
रिस्क नक्की आहेच की उत्तम शिक्षण मिळालं तरी त्याचा उपयोग करून घेऊन अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी कदाचित मिळणार नाही, अस होण्याची शक्यता तुमच्या निर्णय प्रक्रियेत नक्की विचारात घ्या.
चांगले शिक्षण मिळवायचे असेल
चांगले शिक्षण मिळवायचे असेल तर जरूर या >>> हेसुद्धा खूपच सब्जेक्टिव नाही का ? अमेरिकेत आले म्हणून चांगले शिक्षण मिळेलच याची काय खात्री देणार ? कुठली युनिवर्सिटी, कॉलेज त्यावर अवलंबून असेल बरेच.
हल्ली अंडरग्रॅड आणि ग्रॅड स्टडीज बाहेरच्या देशात करायचा ट्रेन्ड भारतात वाढलेला दिसतो. पण तिथल्या कन्सल्टिंग कंपन्यांचा ( कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट)फक्त कुठल्या का होईना अमेरिकन युनिवर्सिटीत अॅडमिशन करून देणे अन त्यासाठी भरपूर पैसे घेणे इतकाच हेतू असतो. वास्तवात वाटेल त्या, डीसेन्ट रेटिंग नसलेल्या नो नेम युनिवर्सिटीत आलात तर पैशापरी पैसे जाणार आणि नोकरी, व्हिसा सोडा पण चांगले शिक्षण मिळेल याचीही काही गॅरेंटी नाही. तेव्हा नीट विचार करून डोळसपणे अभ्यास करून मग ठरवा यायचे की नाही ते.
मी मागे एकदा लिहीलं होतं -
मी मागे एकदा लिहीलं होतं - ह्याच धाग्यावर की नाही ते आठवत नाही. मी पाहिलेले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअर्स, जे ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं, त्याच क्षेत्रात - त्याच लेव्हल चं (म्हणजे मास्टर्स डिग्री / पी.एच. डी. करून, त्यच्च लेव्हल चं अॅनलिटीकल, हार्ड कोअर इंजिनीरिंग, अॅकेडेमिया ई.) काम करताहेत, त्यांना व्हिसा चा प्रॉब्लेम झालेला नाहीये. पण जे स्वतःचं शिक्षणाचं क्षेत्र सोडून, सरसकटपणे 'आय.टी.' कडे वळलेत, त्यांना जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. माझा सँपल सेट आणी अनुमान, सर्वसमावेशक असल्याचा माझा दावा नाही, पण एक निरीक्षण नोंदवलंय.
हो मैत्रेयी ते ओघाने आलेच...
हो मैत्रेयी ते ओघाने आलेच... आधी मोठे प्रश्न सोडवत सोडवत तुलनेने लहान प्रश्नांकडे वळावे असा विचार करून तेवढ्या खोलातले प्रश्न विचारले नाहीत. आधी 'अमेरिकेत जाऊन ऊच्चशिक्षण नेमके का घ्यायचे आहे' हा कळीचा प्रश्न सोडवला की पुढचे प्रश्न सोडवणे जास्त सोपे आहे.
फक्त 'पैशांचा पुरेपुर परतावा' हेच एक धोरण असेल तर मग विसा, लॉटरी, ट्रंप, डिग्री, कॉलेज ह्यातून येणार्या रिस्क संदर्भात आणि सर्वात महत्वाचे 'अमेरिकाच का?' हे प्रश्न पडूच नयेत.
<<< कामदेव शब्दात काम आहे.
<<< कामदेव शब्दात काम आहे. कदाचित त्याच कामाविषयी लिहिले असेल. >>> कमरेखालचा वार. निषेध.
स्वाती, असुफ, हाब, मै +१
स्वाती, असुफ, हाब, मै +१
पर्याय ओपन ठेवा. आणि लोन काढणार असाल तर रिस्क काय आहेत याची त्या मुली/ला ला कल्पना द्या. आणि जबाबदारी फक्त आणि फक्त तिची असेल हे सांगा. नंतर रडत याने मला हे सांगितलं त्याने ते सांगितलं, नियम बदलले, असले प्रकार करुन मनस्ताप होउ नये. मी नीट विचार करुन निर्णय घेतलेला, तो चुकला... आता प्लान बी/ सी वर्क आउट होतोय का बघू.
>> स्वाती२ << धन्यवाद..!
>> स्वाती२, असुफ, हाब, म, अमितव << धन्यवाद..!
Pavilion Data Systems सान
Pavilion Data Systems सान होजे . या कंपनीशी संबंधित कोणी आहे का इथे ?
बा.का. नाव ऐकले नव्हते
बा.का. नाव ऐकले नव्हते आत्तापर्यंत पण सहज कुतूहल म्हणून चेक केले तर स्टोरेज सिस्टीम्स मधली कंपनी वाटत आहे.
क्लायनर पर्किन्स या नावाजलेल्या फण्डिंग कंपनीच्या वेबसाइटवर त्यांच्या इन्वेस्टमेण्ट्स असलेल्या कंपन्यांच्या यादीत हे नाव आहे.
https://www.kleinerperkins.com/partnerships/hardtech/
ही तीच कंपनी आहे हे गृहीत धरून लिहीतोय.
धन्यवाद दूरान्त
धन्यवाद दूरान्त
https://www.ndtv.com/opinion
https://www.ndtv.com/opinion/indian-american-family-visited-delhi-for-h1...
"https://www.ndtv.com/opinion
"https://www.ndtv.com/opinion/indian-american-family-visited-delhi-for-h1..."--->अमेरिकेत १९ वर्षे वास्तव्य आणि त्यात PhD असूनदेखील अजूनही ग्रीन कार्ड मिळालेलं नाहीये म्हणजे कमाल आहे. मी ऐकलेलं की PhD झाल्यावर साधारण वर्षात मिळून जातं ग्रीन कार्ड.
ट्रम्प आल्यावर २०१६ नंतर visa साठी अडकलेले मात्र अनेक आहेत हे नक्की.
https://www.mygcvisa.com
https://www.mygcvisa.com/calculator/ नुसार EB2 साठी प्रोसेसिंग डेट १ मे २००९ ला करंट आहे. (पी.एच.डी. बहुतेक EB1 मध्ये येतात आणि EB1 साठी प्रोसेसिंग डेट १ डिसेंबर २०१४ ला करंट आहे .) मग इतके दिवस त्यांनी ग्रीनकार्डासाठी अॅप्लिकेशन केले नाही का? प्रत्येकाची केस वेगळी असू शकेल. केवळ १ बातमी वाचून ट्रंपला सगळ्यासाठी जबाबदार धरणे योग्य नाही. आणि तसे पण Permanent residency is not a matter of right.
That's six months of school
That's six months of school missed. Six months of work missed. Six months in the same two shirts and same two pairs of pants.>> आर्टिकल मधल हे वाक्य वाचुन हसु आल, घ्या की अजुन कपडे, काय प्रॉब्लेम आहे? एनिवेज कुणाला कशाच तर कुणाला कशाच
१९ वर्श? मग उशिरा केल का ग्रिन कार्डला अप्लाय? या सिच्युएशन मधे खुप फॅमिली आहेत
विचित्र सिस्टिम आहे आणि ती
विचित्र सिस्टिम आहे आणि ती तशीच रहाणारे. कोणीही प्रेसिंडेंट असो.
सहा महिने तेच कपडे घालणे वेड्याचा बाजार!
Phd in progress asel.
Phd in progress asel.
आणि PhD डिपेंडंट स्पाऊसची आहे
आणि PhD डिपेंडंट स्पाऊसची आहे असा समज झाला माझा.
जुलै मध्ये माणूस भारतात गेला
जुलै मध्ये माणूस भारतात गेला आणि ऑक्टोबर मध्ये त्याचे सहा महिने पूर्ण झाले........ म्हणूनच महाराजा संत मिकासिंग म्हणून गेले... ढिंकचिका ढिंकचिका ए ए ए....
आता लिंक चालत नाही असं दिसतंय
आता लिंक चालत नाही असं दिसतंय. मी आधी वाचलं तेव्हा पत्नी पी एच डी असून एच फोर वर आहेत. सो त्याचा ग्रीन कार्डशी संबंध नाही.
सीमंतिनी
मूळ बातमी इथली आहे
मूळ बातमी इथली आहे
एन्डीटीव्हीने सिंडिकेटेड फीड म्हटलंय. फक्त शीर्षक बदललंय. त्यात our country’s dysfunctional immigration system बदलायला हवं होतं हेही विसरलेत.
बातमीतला भावनिक आणि नाटकीय भाग सोडून देऊ.
हे पुढलं बरोबर (खरं याअर्थी)) आहे का?
And they were faithful in keeping all their paperwork up-to-date: Mazumdar's H1B visa, designed for skilled workers, and Menon's H4 visa, the spousal companion to an H1B. He has to return to India every three years to have his passport restamped and the visa renewed.
the couple applied for green cards eight years ago.Because there's a major backlog of highly educated, highly skilled people from India seeking green cards, their wait could be anywhere from 75 to 115 years.
Right after he got to India in July, Mazumdar dropped off his passport and paperwork at the U.S. Embassy in New Delhi, as he had done many times before. he received an email, eight days later, saying that his passport was ready. But when he went to pick it up, there was no stamp. Instead, he got a letter saying he needed to come in for an interview. So he went the next day, had a straightforward interview, got fingerprinted, and got a document telling him everything is being held up.
The family canceled their August 13 plane tickets back to D.C. and hired an immigration lawyer. They prowl the online immigration forums for ideas, where hundreds of other H1B families are experiencing the same nightmare
The State Department keeps returning Mazumdar's emails with a warning that "before making inquiries about status of administrative processing, applicants should wait at least 180 days from the date of interview or submission of supplemental documents, whichever is later."
And even after those six months, there's no guarantee that this hard-working family will be able to come back home to America.
बातमीवरच्या प्रतिक्रियांवरून यात काही नवीन नाही असं काही लोक म्हणताहेत, तर काहींना यात ट्रंप अँगल दिसतोय.
Pages