ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय मुलानी अमेरिका अमेरिका हा घोश न करता ऑस्ट्रेलिया न्यु झीलन्ड या देशामधे एमेस करायचा विचार करावा. कारण येथील राहणीमान अमेरिकेसारखे आहे. तसेच येथील विश्वविद्यालये पण तितकीच चान्गली आहेत. शिवाय वैयक्तिक सुरक्षितता पण आहे ऑस्ट्रेलियात सध्या जवळ जवळ ५ लाख भारतीय रहात आहेत. हजारो विद्यार्थी येथील युनिव्हर्सिटित शिकत आहेत. हवामान छान आहे. तेम्व्हा अमेरिकेचा विचार सोडून देऊन ऑस्ट्रेलिया न्यु झीलन्ड या देशात शिकायला येऊन येथेच रहायचे. असा विचार करावा असे मी सुचवेन.

Svata melyashivay swarg disat nahi. Let them decide what is good for them. Konala kay tras vatel aani konala kay sukh vatel he itar kon tharavnar! Kahi lokanna shwasochshwas karaycha pan tras hot asel.

हो का?
मग इतरांना तुम्ही बोलतात तेव्हा ही ओळ लक्षात ठेवा राजसी

@नन्द्या४३
तुमच्या मताशी असहमत आहे.
कुणाला अमेरिकेला यायचे असेल, तर सध्याच्या कठीण परिस्थितीची कल्पना देणे समजू शकतो. पण अमेरिकेत येऊच नकोस हे सांगणे योग्य नाही, असे माझे मत आहे.
तूर्तास इतकेच.

Mi kuthe konala salla dila! Americela ja ka javu naka?! To each it's own. Everyone can decide for themselves is all I am saying. Don't know why offended!

<<<पण अमेरिकेत येऊच नकोस हे सांगणे योग्य नाही,>>>
बरं.
मी विसरलोच होतो. सल्ले फक्त लोकांनी मला द्यायचे असतात - सुधरा, हे योग्य नाही, वगैरे वगैरे.
नि बहुधा सर्वांना अमेरिकेलाच यायचे असते, तेंव्हा इथे येऊ नका म्हणण्यात अर्थ नाही.
शेवटी भारतीयांनाच जास्त अक्कल.

अहो सर, तुम्ही फारच मनावर घेतलं हो. मी सल्ला देत नाहीये, फक्त माझे मत दिले.
Live and let live इतका साधा हिशोब आहे.

हे काय आहे यावर बॅटरी मारा....

H-1B व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास मायदेशी परतावे लागणार
ट्रम्प सरकारच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील भारतीयांची डोकेदुखी वाढणार
https://www.loksatta.com/desh-videsh-news/new-rule-allows-deportation-if...

>>हे काय आहे यावर बॅटरी मारा....<<

दुर्दैवाने, बातमी खरी आहे. एच१ रिनुअल, एच१ एक्स्पायरी डेट पासुनच्या २४०(?) दिवसांत झालं नाहि तर डिपोर्टेशनची कारवाई होउ शकते.

नाही. नवीन नियम असा आहे की rfe आली की रेजेक्शन. आधी मुबलक वेळ द्यायचे rfe ला respond करायला आणि लोक गैरफायदा घ्यायचे.

Request For Evidence .

व्हिसा apply केलाय, पण अर्धवट माहिती दिली तर असे RFE मागतात.

देशी कन्सल्टंट काय करतात, h1 apply करतात काहीही जॉब नसताना, मग uscis चेक करून rfe पाठवे पर्यंत(४ महिने) जॉब आणि क्लायंट शोधतात. मग क्लायंट लेटर वगैरे पाठवतात.

आय.टी.चे काम आता रिमोटली होऊ शकते मग तुम्हाला H-1B पाहिजे कशाला, म्हणून क्लायंटला RFE पाठवायला पाहिजे खरंतर. कँडिडेटला त्रास कशाला?

रिमिटली होते हे सांगून गव्हरमेंटने आहेत ते जॉब आउटसोर्स करायचे Rofl ट्रंप बावळ्या असला तरी इतका पण नाही हो.
अप्रत्यक्षरित्या असे झाले तर नवल नाहीच.

अमेरिकेत शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर ताबडतोब मायदेशी परतावे लागणार आहे असे कळले. हे खरं आहे का?

शिक्षण संपल्यावर विद्यार्थ्यांना ओपिटी वर काम करता येते. त्याची मुदत संपायच्या आत एच१ करणे आवश्यक होऊन बसते. पूर्वी हे बरेच स्मूथ होते , आता एच १ मिळणे अवघड झाले आहे. ओपिटी वर पण काम करण्यासाठी कडक नियम आहेत. उदा. एखाद्या कंपनीने जॉब दिला तर त्यांच्या कॅपस वरच तुम्हाला काम करणे आवश्यक असते. एखाद्या कन्सल्टन्सी ने हायर केले आणि त्यांच्या क्लायन्ट कडे प्लेस करणे असे करता येत नाही. त्यामुळे ओपिटी वर काम मिळने अवघड होऊन बसते. माझ्या ओळखीत एका मुलीला MS झाल्यावर भारतातील ओरॅकल च्या अनुभवामुळे इथे एका मोठ्या आय्टी कन्सल्टिंग कंपनीत लगेच जॉब ऑफर मिळाली , ते तिचा एच १ पण करणार होते पण लीगल डिपार्ट्मेन्ट च्या हरकतीमुळे ऑफर मागे घेण्यात आली. कारण जॉब त्या कन्सल्टिंग कंपनीच्या हेड ऑफिस मधे नसून कोणत्या ना कोणत्या क्लाय्न्ट साइट लाच असणार होता.
हल्ली भारतातून अमेरिकेत अंडरग्रॅड साठी सुद्धा मुले येत आहेत. मास्टर्स साठी तर पूर्वीपासूनच येत होती. असे ऐकले की पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरात "अमेरिकन युनिवर्सिटीज मधे गॅरंटीड अ‍ॅडमिशन" मिळवून देणार्‍या कन्सल्टिंग कंपन्या आहेत ज्या त्यासाठी ५० हजार ते ८० हजार रु. च्या घरात कन्सल्टेशन फिया आकारतात! खरे खोटे माहित नाही. खरं तर कितीही लो स्कोर्स असले तरी कुठल्या ना कुठल्या दुयाम तिय्यम दर्जाच्या युनिवर्सिटी मधे अ‍ॅडमिशन मिळणे ही काहीच मोठी गोश्ट नाही. पण याचा अर्थ असा नाही की ती डिग्री घेऊन तुमचे करियर वगैरे होईल! केवळ अमेरिकन डिग्री हवी म्हणून कुठल्यातरी किरकोळ अनरेप्युटेड युनि. मधे डिग्री घेण्यासाठी इतका प्रचंड पैसा खर्चून भारतातून अमेरिकेत यावे का ( आणि आफ्टर ऑल दॅट एच १ अजिबात न होण्याची रिस्क घ्यावी का) हा विचार आता एच १ मिळणे इतके अवघड असताना पालक आणि मुलांनी नक्की करावा.

मै शी संपूर्ण समहत.
पण हे कोणाला सांगुन पटत नाही हा अनुभव गेल्याच रविवारी घेतला. यायचं असेल तर या, अनुभव घ्या. काही फायद्याचं झालं तर उत्तमच आहे, पण डाउन साईड माहित असू द्या इतकं सांगितलं तरी राग येतो लोकांना.

अमेरिकेत शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर ताबडतोब मायदेशी परतावे लागणार आहे असे कळले. हे खरं आहे का? >> हे असेल तर आश्चर्य आहे. कारण या विद्यार्थ्यांवर केलेली इन्वेस्टमेण्ट परत मिळणार नाही.

हे असेल तर आश्चर्य आहे. कारण या विद्यार्थ्यांवर केलेली इन्वेस्टमेण्ट परत मिळणार नाही.

Excuse me, but the amount of money they charge for education, and the horor stories i hear about debt due to education loans, are false? And america actually spends tax dollar on Pg education?

Which investment are you talking about?

भारतीय पालकांनी त्यांच्या मुलांना अमेरिकेत सेटल होतील या आशेने केलेली खर्चिक इन्व्हेस्टमेंट म्हणायचं आहे का तुम्हाला?

भारतीय पालकांनी त्यांच्या मुलांना अमेरिकेत सेटल होतील या आशेने केलेली खर्चिक इन्व्हेस्टमेंट म्हणायचं आहे का तुम्हाला?>>
हेच असावं.

SAT देऊन अमेरिकेत undergradला यायचं प्रमाण वाढत चाललं आहे पण फी भरमसाट असते आणि undergrad courses साठी assistantship (teaching assistantship, research assistantship) पण सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे जो भारतीय पालकांचा खर्च होतो तो अमेरिकेच्या खिशात जातो.
Graduate कोर्सेस मधे बहुतेक जणांना teaching assistantship, research assistantship मिळते आणि फीमधेही थोडी सवलत मिळू शकते. पण यात गोम अशी आहे की हे लोक अगदी नगण्य पैशात राबवून घेतले जात. प्रोफेसर लेक्चर देऊन जातात आणि हे लोक undergrad students ना शिकवणं, मदत करणं, grading, lab घेणं ही सगळी ढोरमेहनत करतात, जी करण्यासाठी तिकडे लोक hire करायला कितीतरी जास्त खर्च येईल. त्यामुळे अमेरिका या लोकांवर काडीचीही इन्वेस्ट्मेंट करत नाही. त्यांनाही आपला फायदा बघायचा आहे ना Happy

आ.रा.रा - पीजी बद्दल माहीत नाही. मी हायस्कूल नंतर पुढे चार वर्षे पब्लिक कॉलेजेस मधे शिक्षण होते त्याबद्दल बोलतोय. तेथे युनिव्हर्सिटीचा पैसा वापरला जातो (फी च्या व्यतिरिक्त, फी कमी असते प्रायव्हेट पेक्षा).

मागे जेव्हा व्हिसाचा कोटा कमी केला होता, तेव्हा अशा विद्यार्थ्यांना त्यातून वगळले होते ते ही याच कारणाकरता. यांचा कोटा वेगळा होता.

दुर्दैवाने अनेक वेळा, अनेक प्रकारे, अनेक कंपन्यांनी, अनेक लोकांनी, अनेक वर्षांपासून एच १ बी पद्धतीचा पराकोटीचा दुरुपयोग आणि गैरफायदा घेतलेला आहे.
अर्थात सर्व गोष्टी कायदेशीररित्या, प्रामाणिकपणे करणारे ही असंख्य आहेत.

आधीपासून असलेले नियम जे पूर्वी काटेकोरपणे कदाचित पाळले जात नसत आणि त्याउप्पर अजून कडक नवीन नियम आणि अटी, अशा पद्धतीने सध्याची अंमलबजावणी सुरु आहे.

जो पर्यंत सध्याचे सरकार अमेरिकेत आहे तो पर्यंत यामध्ये फरक पडण्याची शक्यता नाही.

वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे सध्या नवीन एच १ बी मिळवणे हे पूर्वी इतके सोप्पे राहिलेले नाही.
त्यानंतरची पायरी, अमेरिकेचे कायदेशीर नागरिक बनण्यासाठी लागणार वेळ हा ही बराच वाढला आहे, जन्माने भारतीय असलेल्या उमेदवारांसाठी.

अर्थात आज ही अनेक जण यातून जातात आणि ही प्रक्रिया पूर्ण करतात.

बाहेरुन आलेल्या मुलांकडून जास्त पैसे मिळतात आणि यु. ते कमावण्याच्या मागे असतात याबद्दल दुमत नाहीच. युसी मध्ये (बर्कली/ एलए नाही, इतरही युसी) लोकल मुलांना जागा मिळवणं/ टक्का घसरणे बद्दल मध्यंतरी बर्‍याच बातम्या यायच्या.

Pages