भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> (अंडरलायईंग लॉजिकं, माझ्या घरातील साय मी नाही लावली तरी ती गरीब लोकांना थोडीच मिळणार आहे? मग मी ती तोंडाला लावली काय, आणि खाल्लं8 काय सारखंच,) <<<<
यालाच तर "भांडवलदारांमार्फत रुजवलेली स्वतःपुरते पहाण्याची उपभोग संस्कृती म्हणत नसावेत ना? Wink
बायदिवे, या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे आहे की दुध तापवायला ठेवले, तर ते उतु जाऊ(न) वाया जाऊ नये म्हणून प्रत्येक घरातील व्यक्ति काळजी घेत असते, उगाच मी त्यास पैशे मोजलेत, माझ्या घरात उतु गेले कय किंवा प्याले काय, गरिबांना थोडीच मिळणारे वगैरे बयादी सांगत तापवत ठेवलेले दुध तस्सेच उतु घालवुन करपवण्याचा अघोरी विकृत माजोरी प्रकार कोणीच करीत नाही. अपवाद असल्यास मी पाहिले नाहीयेत. जी शिस्त इथे वापरतात दुध उतु जाऊन्/करपुन वाया जाऊ न देण्याची , तीच शिस्त केक कापुन थोबाडाला फासण्याच्या वेळेस का लावली जात नाही असा विषय आहे. Happy

प्रतिसादाच्या सुरवातीस माझे वाक्य उद्धृत केले असल्याने हा प्रत्युस्ड मला उद्देशून आहे असे मी समजतो,

मी वर मांडलेले मुद्यें मला मान्य आहेत असे मुद्दाम सांगितले असताना
>>>>>
"खाण्याचा उद्देश सोडून तो थोबाडाला फासणे अन वाया घालवणे यास माजोरी नासाडी म्हणायचे नसेल, तर त्याला नाईलाज आहे.. !">>>>
हा प्रतिसाद तुम्हाला का द्यावासा वाटला?
तुम्ही माझा प्रतीसाद वाचला नाहीत? की मुद्दाम खोडसाळपणा?

लिंबूतीम्बु, तुम्ही मी काय लिहिलंय हे न वाचता उगाच पोस्टीं लिहीत सुटलाय, तेव्हा तुमच्याशी मी काही वेळ बोलत नाहीये.
पोस्ट वाचून लिहिलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद कराल तेव्हा आपण बोलू
धन्यवाद

>>>> की मुद्दाम खोडसाळपणा? <<< अजिबात नाही.
मूळ विषय कम शंका श्री ऋन्मेष यांनी काढली आहे.
इतके सारे विश्लेषण करुन देखिल त्या वाक्यात सांगितलेली बाब ही नासाडीच आहे हे (कुणाकुणाला) पटत नसेल, तर नाईलाज आहे असे अत्यंत सद्द्गतित गहिवरल्या दु:खी अंतःकरणाने म्हणावे लागत आहे.
तुमचे वाक्य चर्चेच्या ओघात संदर्भाकरता घेतले असले, व >>>> मला ऋन्मेष चा मुद्दा एका मर्यादित अर्थाने पटतो, अन्नाची नासाडी हि खूप ब्रॉड टर्म आहे, आणि प्रत्येकाच्या सामाजिक, आर्थिक बॅकग्राउंड प्रमाणे त्याची व्याख्या बदलले,<<<< तुमच्या या वाक्यात व त्या आख्ख्या पोस्टमधुन गर्भित होणार्‍या अर्थाचा प्रतिवाद असला, तरी माझी पोस्ट एकुण विषयावर आहे, कुणा एकाकरता नाही/नसते. तसेच, त्या वाक्यामधुन मी तुमचा किंवा कुणाही आयडीचा वैयक्तिकरित्या "उपमर्द" केला आहे असे मला वाटत नाही.
केक तोंडाला फासण्याचे उदाहरण प्रातिनिधिक आहे व ते कंटीन्यु केले आहे इतकेच. असो. Happy
तुम्हाला जर माझ्या पोस्ट मुळे काही त्रास झाला असेल, तर त्याबद्दल मनापासून क्षमस्व.
मी मुद्दा खोडू पहातोय, कोणत्याही व्यक्ति/आयडी बद्दल एकही वाईट शब्दही काढीत नाहीये याची कृपयाच नोंद घ्यावी ही विनंती.

छान लेख, आवडला आणि पटला. लेखाच्या अनुषंगाने प्रतिसादातून छान चर्चा झालेली वाचायला मिळाली.

तुम्ही आक्षेप घेतलेली पोस्ट पुनरुधृत करतो आहे.
>>>>>>>>>>>>>
>>>> आता हा मुद्दा वेगळा कि हि नासाडी, तुलनेने कमी प्रमाणात होते , मात्र म्हणून हा मुद्दा नोंदवूच नये असे नव्हे <<<<
त्या आख्ख्या पोस्टचा तर्क पुढे ताणायचाच झाला, तर "माणसाचे जगणे" हेच मुळी निसर्गाचा अपव्यय आहे अशा नि:ष्कर्षापर्यंत पोहोचावे लागेल.... आहे तयारी? Proud हिंदू धर्मात त्याचीही प्रोव्हिजन आहे, अकालि वयात सन्यास घेऊन सर्वसंगपरित्याग करुन "नासाडी" वाचविण्याची ! Lol
अहो इतकेच काय, माणसाचे मरणे देखिल हिंदू पद्धतीमध्ये मृतदेह जाळून म्हणजे सरपणाची नासाडी असे म्हणतातच की हो लोक..... असो.

विषय, खाद्य पदार्थांची "माजोरीपणे" नासाडी हा आहे, तत्कालिक भौगोलिक/नैसर्गिक/दैहिक गरज म्हणुन "पदार्थ खाणे/वस्तु वापरणे" हे नासाडीमध्ये मोजणे अपेक्षित नाही. तर, ज्या उद्देशाकरता केक बनवला आहे, तो नीट "म्यानर्स" पाळीत खाण्याचा उद्देश सोडून तो थोबाडाला फासणे अन वाया घालवणे यास माजोरी नासाडी म्हणायचे नसेल, तर त्याला नाईलाज आहे.. !
<<<<<<<<
यातिल तुमचे वाक्य संदर्भाकरता घेतले, त्याला दिलेले उत्तर म्हणा वा प्रतिवाद म्हणा वा सुचलेला युक्तिवाद म्हणा, जिथे "असो" हा शब्द आला आहे तिथवरच आहे व तुमचे बाबतीतला विषय तिथेच संपवलेला आहे..
पुढिल परिच्छेदात धाग्याच्या विषयाची आठवण करुन देऊन, मुलतः ज्यांना केकची नासाडी होत नाही असे म्हणायचे आहे, त्यांचेकरता ते वाक्य आहे, तुमच्याकरता नव्हे.

थोबादाला केक न फासण्याबद्दल जी शिस्त तुम्हाला अपेक्षित आहे, तीच शिस्त थोबाडाला साय फासण्याबद्दल पण आहे का या वर मतप्रदर्शन टाळलेत हो,
(थोबाड हा शब्द केवळ तुम्ही वापरलात म्हणून लिहिला आहे, आमच्या घरी त्याला चेहरा, म्हणतात)

मला ऋ चा मुद्दा एका मर्यादित अर्थाने पटतो >>> +१०

विषय, खाद्य पदार्थांची "माजोरीपणे" नासाडी हा आहे, >>> + 100

नरेश माने, आभार !

तुमची नासाडीची नेमकी व्याख्या काय आहे ऋन्मेषभै?
>>>
नासाडीची नाही, अन्नाच्या नासाडीची असा प्रश्न हवा. जगभरातल्या सर्व नासाड्या एकाच व्याख्येत बसवणे चूक आहे.
तर, अन्नाची नासाडी माझ्यामते तेव्हा होते जेव्हा एखादा अन्नपदार्थ भुकेल्या पोटात न जाता आणखी भलतीकडे कुठे वापरला वा टाकला जातो. भुकेले पोट असा उल्लेख मुद्दाम केलाय कारण भरल्या पोटात जात असेल तर ती देखील नासाडीच.

कारण, तुम्ही दिलेल्या उदाहरणांमध्ये, ती ती वस्तु वापरुन आरोग्यविषयक निश्चित उद्देश साध्य होतो आहे. पण केक फासुन फक्त अन फक्त नासाडीच होते आहे. शिवाय, अंडे/बेसन्/काकडी खायला/जेवायला वाढलय अन तोंडाला फासुन घेतले असे होत नाहीये, केक मात्र कापुन खायला घेतलाय अन अत्यंत किळसवाण्या पद्धतीने घामट शेंबड्या नाकातोंडावर तेलकट केसांवर फासणे ही "विकृती" आहे.
>>>>>

हे काही पटले नाही. केकही मुद्दाम फासायलाच घेतला असेल तर त्याकेसमध्ये हे योग्य होते का?
आणि आरोग्यविषयक उद्देश साध्य करायला ते अन्नपदार्थ खाऊन ते साध्य होत नाही का? ईथे फक्त बाह्य सौंदर्यात भर टाकायला हे केले जाते.

आता फक्त "देवांच्या पुजेत वापरल्या जाणार्‍या पंचामृता" बाबत "ती नासाडीच" असा उल्लेख झाला/कुणी केला की मग धाग्याची इतिश्री झाली/सुप वाजले असे समजावे लागेल.
>>>>>>>>
काय असते हे पंचामृत? अन्नपदार्थांपासून बनवले जाते का? पूजेत ते प्रसाद म्हणून वाटले जाते वा प्राशन केले जाते, की देवावर वाहून वाया जाते? मला कल्पना नाही, पण या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर नेमके ती नासाडी धरावी की नाही हे सांगू शकेन Happy

मुळात वाढदिवस साजरा करायला कोणतीही पोषणमूल्ये नसलेला महागडा केक आणणे हाच एक माज आहे. तो तोंडाला फासणे किंवा पोटात जाणे हे त्याला फुटलेले फाटे.
>>>>>

पोषणमूल्ये हा मुद्दा ईंटरेस्टींग आहे.
पोषणमूल्ये असो वा नसो ते पोट भरणारे अन्न आहे हे पुरेसे नाही का?
आणि केकमध्ये अंडे असते, अंड्यात पोषणमूल्य नसते का? मग कोंबडीतही नसेल? मी तर यावरच जगतोय. म्हणजे मला कुपोषित घोषित करायला हरकत नाही Happy

साय, बेसन, काकडी, हळद ह्यात काही विशिष्ट गुणधर्म आहेत ज्याचा त्वचेसाठी उप्योग आहे.
केक थोबाडाला फासुन काय फायदा होतो?
>>>>>
मनोरंजन, मज्जा, धमाल... बस्स एवढाच फायदा होतो. आणि काही लोकांसाठी त्वचा सुंदर करण्यापेक्षा याचे महत्व जास्त असते Happy
बाकी म्हणूनच मग रंगपंचमीचे उदाहरण दिलेय, तिथेही केवळ धमाल मस्ती करायलाच पाण्याची नासाडी होते. दोन्ही एकच झाले ना..

आरोग्यविषयक उद्देश साध्य करायला ते अन्नपदार्थ खाऊन ते साध्य होत नाही का? ईथे फक्त बाह्य सौंदर्यात भर टाकायला हे केले जाते. >>
बरोबर आहे मुद्दा. यामुळे या चर्चेला अजून एक पैलू पडतो आहे.

म्हणजे, अन्न हे भुकेल्या पोटाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही गोष्टीसाठी वापरले तर ती नासाडीच होईल. यात अंगाला फासणे आलेच.

विषय, खाद्य पदार्थांची "माजोरीपणे" नासाडी हा आहे
>>>>
हे नाही पटले. मी पहिल्याच पोस्टमध्ये म्हटले आहे की माझ्याकडूनही काही नासाडी होते. पण मला कुठलाही माज नाही. काही नासाडी चुकीच्या सवयींनी होते तर काही वेळा बाह्य घटकांमुळे तशी परीस्थिती निर्माण होते.
बाकी जे माजोरडेपणे नासाडी करतात त्यांचा माज तर काही तुम्ही ईथे चर्चा करून उतरवू शकणार नाही.
त्यापेक्षा चुकीच्या सवयी कश्या बदलता येतील यावर चर्चा करा त्याचा फायदा होईल.
जसे मला या निमित्ताने माझ्या काही चुकीच्या सवयींची जाणीव झाली, लक्षात आल्या, तर मी यापुढे काळजी घेऊ शकतो.
तसेच तुम्हालाही जर एखादी अशी सवय असेल, जसे की देवाच्या मुर्तीवर दूधाचा, तूपाचा अभिषेक आणि मग ते दूध-तूप वाया जाणार वगैरे तर यापुढे ते टाळा. (हे एक उदाहरण म्हणून दिले)

बाकी केक तोंडाला फासने ही नासाडी नाही हे मी कुठेही म्हटलेले नाहीये. फक्त माझ्या हातून या आधी अश्या प्रकारची नासाडी झालीय हे कबूल केले आहे आणि त्या गटात मोडणार्‍या ईतर नासाड्या दाखवल्या आहेत. त्यातही जाओ पहले ऊस आदमी की साईन लेके आओ असा अविर्भाव नाही Happy

पण बहुतेक सुरुवातीपासूनच माझ्या पोस्ट असेच काही डोक्यात ठेवून वाचल्या जात आहेत Happy

मी लहान होतो तेव्हा मला दूधावरची साय खूप आवडायची. हो, मोठे होता होता आपण ती तोंडात अगदी पाल आल्यासारखे थुकून टाकतो एवढी ती आपली नावडती होते ती गोष्ट वेगळी, पण ते एक साय आवडायचे वय होते. त्यावेळी जेव्हा मी ती सुरुवातीला आमच्याच घरात काही वयात आलेल्या भावंडांना ती साय तोंडाला फासलेली पाहिलेले तेव्हा मनात अगदी हाच विचार आला, की अरे ही मला खायला मिळाली असती तर मला किती मजा आली असती, यांनी ती तोंडाला लावून अशी घाण का केली?
बस्स थोडे लहान मुलांच्या नजरेतून जग बघायची गरज आहे, बरेच नासाड्या दिसतील ज्यात आपणही सामील असतो..

ऋनम्या आज काय सुट्टी काय? केक तोंडाला फसायला वेगळा मागव्लायस की एकच? इथे पोस्टी पाडु नको. जा केक ऑर्डर कर. गिफ्ट खरेदि कर. Wink Happy

रुन्म्या, Wink मनोरंजनात्मक धागा विनोदी कडे जाणारे दिसतेय....
दोन भाग करा जस्टीहायेबल नासाडी व अन..... धार्मिक, सौंदर्य, इ. इ. असे उपभागही होतील...

बेसन हळद साय असा लेप चेहर्‍याला लावुन कुणाची त्वचा तुकतुकीत, मुलायम, उजळ होत असेल तर ती नासाडी नाही होणार.

अन्नाची नासाडी माझ्यामते तेव्हा होते जेव्हा एखादा अन्नपदार्थ भुकेल्या पोटात न जाता आणखी भलतीकडे कुठे वापरला वा टाकला जातो.>>>>
यात एखादा भूकेला म्हणजे कोण? मनुष्य प्राणी की मनुष्येतर प्राणी सुद्धा? अन्न उरले आणि ते मनुष्येतर प्राण्याला खायला दिले तर ती नासाडी होईल की न होइल?

>>>> अन्नाची नासाडी माझ्यामते तेव्हा होते जेव्हा एखादा अन्नपदार्थ भुकेल्या पोटात न जाता आणखी भलतीकडे कुठे वापरला वा टाकला जातो.>>>>
यात एखादा भूकेला म्हणजे कोण? मनुष्य प्राणी मनुष्येतर प्राणी सुद्धा? अन्न उरले आणि ते प्राण्याला खायला दिले तर ती नासाडी होईल की न होइल? <<<<<
(वर घेतलेला संदर्भ "विषयाचा चर्चेकरता" घेतलेला असुन "ते लिहिणार्‍या निव्वळ आयडीकरता/आयडीला उद्देशुन लिहिण्यासाठी" नाही)

एकंदरीत चर्चेने घेतलेले "वळण" बघता आता मलाही निरनिराळे प्रश्न पडू लागले आहेत... जसे की...
१) अन्न म्हणजे काय?
२) भुकेल्याची व्याख्या काय?
३) नासाडी म्हण्जे काय ते वर दिलेच आहे... पण ती फक्त मनुष्य प्राण्याच्या दृष्टिने बघायची का अन्य प्रत्येक सजिवाच्या? म्हणजे असे की "मनुष्यप्राणी" हा जर कुणा नरभक्षकाचे "खाद्य असेल" व त्या कुणाच्या दृष्टीने मनुष्यप्राणी कडीकुलुपात बंदिस्त राहुन कालांतराने म्हातारा होऊन मरत असेल, तर त्या नरभक्षक सजिवाचे दृष्टीने त्याचे अन्नाची नासाडीच होईल ना? मग ही नासाडी देखिल टाळायची का? टाळायची असेल, तर कशा प्रकारे?
४) ही भूकेची बाब - तत्वे, फक्त अन्नाबाबतच बघायची की बाकीच्या इच्छा आकांक्षा मनोराज्ये स्वप्ने यांचेबाबतीतही लावायची?
५) जसे वर लिहिलय की रंगपंचमीमध्ये पाण्याची नासाडी होते, तर मग काही अब्ज माणसे रोजच्या रोज आंघोळ करुन पाण्याची नासाडी करतात, त्याचे काय करायचे? कारण नैसर्गिकदृष्ट्या माणूस हा "प्राणी" आहे, व जगातील कोणताही प्राणी "स्वतंत्ररित्या आंघोळीचे चोचले" वगैरे करत नाही, अन केलेच तर फक्त पाणी वापरित नाही, जसे की हत्ती/गेंडे चिखल/धुळ अंगावर उडवुन घेऊन आंघोळ करतात ....
६) स्वःच्छतेच्या अतिरेकी कल्पनांमुळे पाण्याची जी नासाडी होते तिचे काय करायचे? (पाण्याचे उदाहरण अन्नपदार्थातील महत्वाचा घटक म्हणून घेतोय) जसे की, टॉयलेट मधे गेल्यावर दरवेळेस अडिच तिन लिटर पाणी फ्लश केले जाते.... साबण/डिटर्जंट/सोडीयम सिलिकेट/शांपु वगैरे घटकांमुळे कपडे/अंग धुताना गरजेपेक्षा कितीतरी अधिक पाणी वापरले जाते. याचे काय करायचे?
बाकी कुणालाही अशा नासाडीबद्दलच्या बाबी आठवत असतील तर कृपयाच इथे मांडाव्या ही विनंति.

चेहऱ्याला केक लावून कोणाचे मनोरंजन होत असेल, धकाधकीच्या जीवनात कोणा मरगळलेल्या मनाला उभारी मिळत असेल, मित्रांबरोबर धमाल केल्याचे समाधान मिळत असेल तर ती नासाडी धरावी का?

लिंबु कपड्यांचा मुद्दा घ्या यादीत. तिकडे लोकांना नेसायला नीट कपडे मिळत नाहीत आणि इकडे लोक ज्यात दोन पँट्स होउ शकतील त्याची एकच जीन्स पँट शिउन घालतात, घरात गालीचे काय वापरतात, पडदे काय लावतात, जाडजूड गाद्या काय शिउन घेतात.

>>>> अन्नाची सर्वात जास्त नासाडी तर गोदामातील उंदीर करत असावेत <<<
हा देखिल पॉईंट आहे, पण " त्यास नासाडी कसे काय म्हणता येईल? शेवटी ते अन्न भुकेल्या उंदरांच्या मुखी पडत आहे ना.... !" Proud
कपड्यांचा मुद्दा इथे गैरलागु होईलसे वाटते कारण "कापुस" हे कुणाचे अन्न नाही/नसावे. असलेच अन्न तर कापसावर पडणार्‍या कीडींचे अन्न असेल.... बघा बोवा... ! मला तर काय सुचतच नाही. कारण आपण कापड वापरले, तर कापडासाठी/गादीगिरद्यांसाठी कापुस वापरणारच, अन त्या "भुकेल्या कीडींच्या तोंडचा कापसाचा घास पळवुन त्याची कापड/गाद्यांमधे नासाडी करणार".... Uhoh

४) ही भूकेची बाब - तत्वे, फक्त अन्नाबाबतच बघायची की बाकीच्या इच्छा आकांक्षा मनोराज्ये स्वप्ने यांचेबाबतीतही लावायची?>>>>

या वरुन कपड्याचा मुद्दा सुचवला होता.
पण तरीही राहुच द्या. एकदमच विषयांतर नको यावर सहमत.

बस्स थोडे लहान मुलांच्या नजरेतून जग बघायची गरज आहे, बरेच नासाड्या दिसतील ज्यात आपणही सामील असतो. >>>> सहमत.

बाकी कुणालाही अशा नासाडीबद्दलच्या बाबी आठवत असतील तर कृपयाच इथे मांडाव्या ही विनंति. >>>
बरोबर, पण त्या मुळे चर्चा 'पर्यावरण रक्षण' या अधिक व्यापक विषयावर जाईल जो एका स्वतंत्र धाग्याचा वि. आहे. तशी भरपूर चर्चा पूर्वी झालेली आहे.
अर्थात, महत्वाच्या विषयावर पुन्हा करायलाही काही हरकत नसावी.

यात एखादा भूकेला म्हणजे कोण? मनुष्य प्राणी की मनुष्येतर प्राणी सुद्धा? अन्न उरले आणि ते मनुष्येतर प्राण्याला खायला दिले तर ती नासाडी होईल की न होइल? >>

मला वाटते की यात सर्व सजीव प्राणिमात्र धरण्यात यावेत. एका सजीवाचे उरलेले अन्न दुसर्‍या सजीवाला दिल्यास ते सत्कारणी समजावे.

शेवटी ते अन्न भुकेल्या उंदरांच्या मुखी पडत आहे ना..>>>>>
+
मला वाटते की यात सर्व सजीव प्राणिमात्र धरण्यात यावेत. एका सजीवाचे उरलेले अन्न दुसर्‍या सजीवाला दिल्यास ते सत्कारणी समजावे.

बरोबर.
आणि अन्न वाया गेले म्हणजे काय तर ते कुणा मनुष्यच्या वा इतर गाई म्हशी कुत्रे मांजर पक्षी वगैरेंच्या पोटात गेले नाही एवढेच?
जे गेले नाही ते नासते.
नासते म्हणजे काय त्यावर सूक्ष्म जीवजंतू किटाणु ताव मारतात. हे जीव जंतु टाकलेल्या अन्ना सारख्या ऑर्गॅनिक कचर्‍याला इनॉर्गॅनिक पदार्थात बदलवून ते मातीत मिळवतात ज्याची स्वपोषी वनस्पतींना गरज असते. अशा रितीने ते हे जीवजंतू अन्न साखळी पूर्ण करतात.

म्हणुन मुळात जास्त शिजवूच नये. जर जास्त शिजवल्या गेले की ते उरल्यावर मग हळहळण्यात, तिकडे लोक उपाशी मरतात घाला पोटात म्हणत्यात अर्थ नाही.
जो पर्यंत रोटी बँक सारखा प्रकार सुरु करुन उरलेले अन्न ज्यांना खायला मिळत नाही त्यांच्या पर्यंत पोचवत नाही तो पर्यंत ते आपल्याच पोटात ढकला की टाऊन द्या, सारखेच आहे. (उलट पोटात ढकलल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता).

Pages