बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कडवे वाल भिजत घातले आहेत. गटगपर्यंत त्याला चांगले बोटभर मोड येतील मग त्यांची उसळ करुन आणेन, अगदी आग्रहच केलात तर. Proud

अगदी आग्रहच केलात तर >>>> तशरिफ आणि रिकामं पोट याव्यतिरिक्त का-ही-ही आणायचं नाही असा हुकूम आहे म्हणे ना?

गटग होणार म्हणून शिळंपाकं खपवू नये.

एवेएठिला मोकळेच सोडणार का मग >> बापरे. केस मोकळे म्हणलं की अंगात देवी येणार. Proud

तेव्हा 'डबे' आणू नयेत.. >> मी रिकामे डबे आणणार . मला घासफूस, समुद्री भाज्या , बिन पायाचे, ४-८-१०- अनेक पायांचे समुद्री प्राणी - सर्व काही चालेल.

ओ मी सोशली लिबरल आहे. कडवा हिंदुत्ववादी ही पदवी भलत्याच चष्म्यातून माझ्याकडे पाहणार्‍यांनी मला दिली आहे.

सोशली लिबरल, इकॉनॉमिकली कन्झर्वेटिव्ह. Happy
पण केदार भाऊ, तुम्ही एकदा तरी शाखेत गेल्यामुळे, मोदींना चांगले म्हटल्यामुळे, काँग्रेसला वाईट म्हटल्यामुळे, सोनियाजींना वा राहुलजींना वंदन न केल्यामुळे तुम्ही पापं काही केले तरी धू शकत नाही. भगवा रंग लागलाच बुडाला एकदाचा (पुर्वी तो शिवाजी पार्कात मान्यवरांच्या तश्रीफला लागला होता म्हणे वसंतसेनेमुळे).

लोल टण्या.

अहो राजकारण नाही ते. चष्मे आणत आहोत. वसंत सेना रेफ. Lol

जसे ईबांचे राहता चाचा तसे
समुद्रीचाचा म्हणजे गोगा रे

याये रे याये रे
जोर लगा के नाचो रे....

काही नाही , र्हिदममदी होतं म्हणून चाल लावून गाणं पुर्ण केलं. बाकी चालू द्या.
Proud

चाचा आणि चाचा - लिहिताना चमच्यातला च की चिवड्यातला च ते सांगावे ना नीट.
गोगा चमच्यातले वाटतं Happy

समुद्रीचाचा म्हणजे गोगा रे >> जॉनी डेप टाइप मेकप , हेअर आणि कपडे का ? गोगांच्या मुलींनी वाचलं तर खैर नाही गोगांची ! कम्प्लीट मेक ओव्हर करुन देतील वडलांचा Light 1

गोगा दात्ये पंचांग वापरत असतील तर मग पंचाईत व्हायची ना. काकवा सगळ्या भमे करून येणार आणि गोगा नार्मल.

Pages