माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
काल मी पहिल्यांदाच तिळाचे
काल मी पहिल्यांदाच तिळाचे लाडू केले.
ट्रायल म्हणुन एक वाटी तिळाचेच केले. चांगले झालेत.
पण मला सॉफ्ट लाडू आवडतात. तसे न होता नेहमीच्या बाजारात मिळण्यार्या लाडूंसारखे कडक झालेत.
सॉफ्ट लाडू साठी काय ट्रिक आहे?
Chikicha gool nakaa gheu
Chikicha gool nakaa gheu.sadha gool vitaleparyat garam Kara.til vagaire ghaloon laadu karaa.
ओके देवकी. पुढचा लॉट साध्या
ओके देवकी. पुढचा लॉट साध्या गूळात करुन बघते. धन्यवाद.
सस्मित, गूळ गरम केला की तो
सस्मित, गूळ गरम केला की तो कडक होईल गार झाल्यावर.
तीळ खमंग कोरडेच भाजून गार करून त्याची पूड करायची मिक्सरवर. यात आता आवडीप्रमाणे गूळ चिरून हातानी/मिक्सरवर फिरवायचं. बांधता येईल या प्रकाराचा होतो हा तीळ-गूळ, नंतर लाडू वळायचे.
या दिवसांत आमच्याकडे आई तीळ भाजून कूट तयार ठेवते, आयत्या वेळेला गूळ चिरून घालणे आणि मिक्सरात फिरवणे हे करून ताजे लाडू करते.
तीळकूटाची लसूण-तिखट-मीठ घालून चटणीही मस्त होते.
>>>>सॉफ्ट लाडू साठी काय ट्रिक
>>>>सॉफ्ट लाडू साठी काय ट्रिक आहे?>>>>
लाडू करताना आणि वळताना मनात प्रेमळ विचार आणावेत, पोरांनी कितीही दंग केला तरी softly बोलावे, जोडीदाराने काहीही घोळ घातला तरी गुळाइतक्याच गोड शब्दात त्याच्याशी बोलावे,
अशाने मनातील softness लाडवात उतरतो
अहो सिम्बा लाडवांना
अहो सिम्बा लाडवांना भाजलेल्या तिळामुळे जो खमंगपणा येतो त्याचं तुम्ही फार गुळमुळीकरण करून टाकलं
लाडू मऊ होतात की नाही ते गुळाची काय तर्हा करतो त्यावर अवलंबून आहे. चिक्कीचा गूळ सुद्धा नुसताच वितळवून घेतला तर सॉफ्ट लाडू होतात आणि साध्या गुळाचा पक्का पाक केला तर त्याचे कडक/खुटखुटित लाडू होतात.
गुळात थोडं तूप आणि अगदी थोडं
गुळात थोडं तूप आणि अगदी थोडं (एकदोन चमचेच) पाणी घालून तो पातळ करून घ्यायचा. त्यात भाजून भरडलेल्या तिळांबरोबर दाण्याचं कूटही घालायचं थोडं - मऊ होतात लाडू/वड्या.
स्वाती +१ दा.कू ने मौ होतात
स्वाती +१ दा.कू ने मौ होतात
सिम्बा
सिम्बा
योकु, गुळ गरम करुनचीच रेस्पी वाचली होती
आता नुसता मिक्सरला फिरवुन करुन बघते थोडे लाडू.
सिंडरेला, <<<<<<<चिक्कीचा गूळ सुद्धा नुसताच वितळवून घेतला तर सॉफ्ट लाडू होतात आणि साध्या गुळाचा पक्का पाक केला तर त्याचे कडक/खुटखुटित लाडू होतात.>>>> चिक्कीचा गूळ नुसताच कसा विताळवायचा? गरम न करता का?
हाच पक्का पाक ना?
मी गरम करुन वितळवलेल्या गुळाचा थेंब पाण्यात टाकला तर गोळी तयार झाली. सुगरण रेस्प्यांची टेस्ट केली होती मी.
स्वाती, <<<<<<थोडं तूप आणि अगदी थोडं (एकदोन चमचेच) पाणी घालून तो पातळ करून घ्यायचा. >>>> पुन्हा तेच.
पातळ करुन घ्यायचा म्हणजे गरम करुनच ना? 
फक्त पाणी नव्ह्तं घातलं.
मी गुळ गरम करुन वितळवताना एक लहान चमचा तुप घातलं होतं. शिवाय शेंगदाणे भरड कुटुन घातले होते. आणि डाळं पण.
धन्यवाद.
.>>>> चिक्कीचा गूळ नुसताच कसा
.>>>> चिक्कीचा गूळ नुसताच कसा विताळवायचा? गरम न करता का? >>>> गरम न करता कस्काय वितळवायचा बरं
:विचारात पडलेली बाहुली:

पक्क पाक केला म्हणूनच लाडू
पक्क पाक केला म्हणूनच लाडू कड्डक झाले ना.
मी साधा गूळ बुडबुडे येऊ लागेपर्यंतच गरम करतो. ( मायक्रोवेव्ह) मग त्यात आधीच भाजून घेतलेले तीळ, डाळं, इ. घालून पुन्हा किंचित चटका देतो.
तूपपण मस्ट.
चिक्कीचा गूळ वितळेपर्यंतच गरम करायचा.
ओके भरत. मग माझा पक्का पाक
ओके भरत. मग माझा पक्का पाक झाला होता वाटतं. आता फक्त वितळेपर्यंत गरम करुन बघते.
धन्यवाद सगळ्यांना.
"पाक" म्हणजे सगळ अवघड असतय
"पाक" म्हणजे सगळ अवघड असतय बघा , नावच किति अवघड आहे .
सस्मित, ती गोळी कडक झाली
सस्मित, ती गोळी कडक झाली (खाऊन बघायची, कटकन मोडली पाहिजे) तरच पक्का पाक झाला. नुसतीच गोळी झाली असेल तर वड्या चिवट होतात.
एका कढईत चमचाभर तूप, २-३ चमचे पाणी आणि गूळ घेऊन, कढई स्टवटॉपवर ठेवून, गॅस/इलेक्ट्रिक स्विच काय असेल ते ऑन करून कढई तापू द्यायची मग गूळ वितळायला लागतो.
धन्य्वाद सिंडरेला.
धन्य्वाद सिंडरेला.
इथे सांगेन केल्यावर.
काल केले लाडू. हवे तसे सॉफ्ट
काल केले लाडू. हवे तसे सॉफ्ट झाले.
धन्यवाद सिंडरेला.
एकाच बॅटरचे २ केक करताना
एकाच बॅटरचे २ केक करताना वेगवेगळ्या आकाराचे २ ट्रे वापरले. एक थोडा खोल होता, दुसरा उथळ. २५ मिनिटं २०० डिग्रीला ठेवल्यावर खोल ट्रेमधला केक मस्त फुगला, मस्त खमंग वास आला, म्हणून बाहेर काढला. गार झाल्यावर तो पार खाली बसला, आणि मधून जो आधी छान फुगून आलेला भाग होता, त्याचा चक्क खड्डा झाला.
मी जरा बाजूला टुथपिक घालून पाहिली होती, तिथे मस्त झाला होता केक, पण मधला (दबलेला) भाग आतून कच्चा राहिला होता. उथळ ट्रेमध्ये त्याच सेटिंगला छान झाला केक. मला खोल ट्रेचा आकार जास्त आवडतो. त्यात केक नीट भाजला जायला काय करावं लागेल?
"पाक" म्हणजे सगळ अवघड असतय
"पाक" म्हणजे सगळ अवघड असतय बघा , नावच किति अवघड आहे .>>>>>
सिर्फ नाम काफी है... कितीही काळजी घेतली तरी तो रुसणार म्हणजे रुसणार...
मी पर्वा तीळपट्टी बनवायला घेतली, यु ट्यूबवर पाहून. साखरेच्या पाकात लिंबू रस टाका म्हटलेले, मी दुर्लक्षित केले. कमेंट्स पण वाचल्या नव्हत्या हे सांगणे नलगे. साखरेच्या पाकात तीळ टाकून फिरवायला लागल्यावर डोळ्यासमोर साखरेचे बुरा साखरेत रूपांतर झाले व तिळ पट्टी भुगा होऊन कढईत फिरायला लागली. माकाचू म्हणत कमेंट्स वाचल्या तेव्हा कळले की लिंबू पिळले असते तर साखरेचे परत क्रिस्टल झाले नसते.
गौरी, माझं असं एक दोन दा
गौरी, माझं असं एक दोन दा झाल्यावर मैत्रिणींनी दिलेल्या टिप्स
रेसिपीत वेळ दिली आहे तितक्याच टेम्प ला बेक करा
कन्व्हेक्शन मध्ये उंच तिवई येते त्यावर ठेवून बेक करा
वेळ झाल्यावर ओव्हन थांबवून ओव्हन मध्येच निवेपर्यंत राहू द्या(गरम गरम केक काढायची घाई केली की नाइफ टेस्ट यशस्वी होऊनही आतला भाग प्रवाही मिळतो)
जर काही फ्रुट वगैरे घालत असाल तर फ्रुट मधला मॉश्चर कंटेंट लक्षात घेऊन बॅटर दिलेल्यापेक्षा थोडे घट्ट बनवा, किंवा सुकी कॅन्ड फळे वापरा.
बाकी टिप्स इथल्या बेकसम्राज्ञी देतीलच.
मी_अनु, दोन्ही घाण्यात फरक
मी_अनु, दोन्ही घाण्यात फरक फक्त ट्रेच्या आकाराचा. (दोन्ही ट्रे निवायच्या आधी बाहेर काढले होते, आता निवेपर्यंत आत ठेवायचं लक्षात ठेवीन. तिवया दोन आहेत, त्यातली कमी उंचीची वापरली (दोन्हीला). ती पण दुसरी वापरून बघते.)
ट्रे डीप असेल तर क्वांटिटि
ट्रे डीप असेल तर क्वांटिटि जास्त, शिजायला वेळ जास्त लागेल.
हो अनु. पण ट्रे डीप असला तरी
हो अनु. पण ट्रे डीप असला तरी बॅटर तेवढंच बसतं (लांबी रुंदी कमी). वरून एकदम सुंदर गोल्डन ब्राऊन वगैरे आणि आत कच्चा हा प्रॉब्लेम आहे. माझ्या अवनला एवढा खोल ट्रे झेपत नाही असं दिसतंय.
बॅटर तितकं असेल तरी
बॅटर तितकं असेल तरी कन्व्हेक्शन ओव्हन चे लाल होणारे ग्रिल बहुधा फक्त टॉप आणि मागच्या बाजूला थोडे असते.त्यामुळे ट्रे आणि बॅटर च्या खोलीचा इफेक्ट होत असावा.
कॉलिंग बेक एक्स्पर्ट्स.
मेदुवड़े अतिशय तेल पीत आहेत
मेदुवड़े अतिशय तेल पीत आहेत
डाळ वाटून आम्बवुन घेतली आहे
काय करू
मेदुवडया ची व्ययस्थित रेसिपी कोणी सङ्गेल का
उडीदडाळ २ तास भिजवून अगदेवे
उडीदडाळ २ तास भिजवून अगदी थोड्याच पाण्यात वाटायची.त्याचे वडे तळायचे. तेल नाही पित.
डाळ कमीत कमी पाणी घालून
डाळ कमीत कमी पाणी घालून वाटायची.
पीठ आंबवायचं नाही.
अप्पेपात्रात करता येतात का ते बघा.
तांदळाचं पीठ/रवा घालून बघा.
डाळ वाटून आम्बवुन घेतली आहे
डाळ वाटून आम्बवुन घेतली आहे
काय करू >>>> पिठाचे पोळे (धिरडी) काढा.
मेदुवड़े अतिशय तेल पीत आहेत
मेदुवड़े अतिशय तेल पीत आहेत
डाळ वाटून आम्बवुन घेतली आहे
काय करू>> त्यात थोडे उडदाच्या डाळीचे कोरडे पीठ घालून जरा घट्ट करून घ्या आणि मग वडे तळा
तांदळाचे पिठ टाकुन इडली पण
तांदळाचे पिठ टाकुन इडली पण होईल.
आदु, डाळ आंबवली असेल तर
आदु, डाळ आंबवली असेल तर नक्कीच वडे तेल पिणार आणि बर्याचदा तेलात विरघळतात.
Pages