हा लेख किंवा कथा नाहीच, हा माझा अनुभव आहे जो इथे share करतेय. नोव्हेंबर २०१६ मध्ये आमच्यावर एक संकटच आलं होतं , साधारण अडीच महिन्यांपूर्वी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझ्या छातीत एक गाठ आली. मी स्वतः डॉक्टर आहे पण स्वतःची गाठ हाताला लागल्यावर माझ्या पोटात गोळाच आला. मी राकेश- माझ्या मिस्टरांना म्हटलं की मला गाठ लागतेय. लगेच आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. योगायोग म्हणजे ९ तारखेला माझा वाढदिवस असतो, त्याच दिवसाची अपॉइंटमेंट मिळाली.
माझे आईवडील आणि भाऊ मुंबईला असतात. माझ्या गाठीचं कळल्यावर आठवड्याच्या आत माझे बाबा भारतातून अॅबरडीनला आमच्याकडे आले. ते आले असल्यामुळे मुलांना त्यांच्याकडे ठेऊन मी आणि राकेश हॉस्पिटलला गेलो. संध्याकाळी ६:३० ला ब्रेस्ट सर्जनने मला तपासलं . टेस्ट्स होईपर्यंत काहीच सांगता येणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग त्याच हॉस्पिटलमध्ये एक्सरे आणि मॅमोग्राफी झाली. नंतर बायाॅप्सी आणि सायटॉलॉजी, बायाॅप्सी म्हणजे गाठीच्या आत बारीक सुई घालून सॅम्पल घेतात आणि सायटॉलॉजी म्हणजे सॅम्पल च्या सेल्समध्ये कॅन्सरच्या प्रकारचे बदल झाल्येत का ते बघतात. बायाॅप्सी आणि सायटॉलॉजी करताना रूममध्ये एक रेडिआॅलॉजिस्ट, एक सायटॉलॉजिस्ट, एक नर्स, राकेश आणि मी इतके जण होतो. त्या तिघी जरी मला धीर देत असल्या तरी त्यांचं आपापसातलं बोलणं ऐकून मला टेन्शन येत होतं . त्यात इथे UK मध्ये पेशंटपासून काहीही न लपवण्याची पॉलिसी असल्यामुळे रेडिऑलॉजिस्टने मला समोरची काॅम्पुटर स्क्रीन दाखवून सांगितलं की तुझ्या स्किनच्या खालच्या लेयर्समध्ये हे चेंजेस झालेले दिसून येत आहेत. हे नॉर्मल नाहीये. माझ्या पोटात खड्डा पडला. डोळ्यात पाणी आलं . डोळयांसमोर ७ आणि ४ वर्षांची माझी दोन्ही मुलं आली. राकेशचं कसं होईल, इथे परदेशात आम्ही दोघे दोन मुलांना सांभाळताना आमची वाट लागते, मला काही झालं तर हा एकटा कसं करेल..... माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं . राकेश माझ्यासोबत हात धरून उभा होता. त्याला कुठून एवढा धीर आला होता कोण जाणे !!! तो वाकून माझ्या कानात म्हणाला "बापूना हाक मार, चिंता नको, चिंतन कर" तो स्वतःसुद्धा अखंड जप करत होता. त्याच्या त्या एका वाक्याने मला धीर आला. दुसया हाताने मी माझ्या गळ्यातलं अनिरुद्ध बापूंचं लॉकेट घट्ट पकडलं आणि मनात मी जोरजोरात बापूंना हाका मारू लागले. आणि तुम्ही विश्वास ठेवा आगर नका ठेऊ पण मला असं वाटू लागलं की बापू तिथेच उभे आहेत आणि मला म्हणतायत "कशाला घाबरतेयस , मी इथे उभा आहे". दोन अडीच तास सगळ्या तपासण्या होऊन आम्ही रात्री ८:३० ला परत ब्रेस्ट सर्जनच्या क्लीनिकमध्ये गेलो. आम्ही खुर्चीवर बसायच्याही आत डॉक्टरने मला म्हटलं "माधुरी I don't like the feel of it. या टेस्ट्समध्ये दिसत नाहीये पण lobular कॅन्सर खूपदा mamo किंवा सोनोग्राफीमध्ये दिसत नाही. एक आठवड्याने सायटॉलॉजीचा रिझल्ट येईल तेव्हाच काय ते नक्की कळेल." म्हणजे एक आठवडा असं लटकलेल्या अवस्थेत राहायचं !! पण दुसरा काहीच इलाज नव्हता.
घरी परत येताना मी राकेशला म्हटलं ,"मी बाबाना सांगते की आईला आत्ताच्या आत्ता बोलावून घ्या. मला आत्ता आईची खूप गरज आहे". घरी पोहोचल्यावर एकमेकांना उसना दिलासा देत सगळे झोपलो. इतक्या टेन्शनमुळे राकेशने स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घेतलेला केकसुद्धा आम्ही कापला नाही . तसेच झोपलो .
जराही घाबरू नकोस - भाग १
Submitted by आनन्दिनी on 27 January, 2017 - 05:52
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे !आता मला टेन्शन आलयं ..
बापरे !आता मला टेन्शन आलयं .... पुढचा भाग लवकर टाका ताई...
तुम्ही ठीक तर आहेत ना??
कावेरि तू किती गोड आहेस गं
कावेरि तू किती गोड आहेस गं
पुढचे भाग टाका.ब्रेस्ट कँसरवर
पुढचे भाग टाका.ब्रेस्ट कँसरवर बरीच महीलामंडळी अनभिज्ञ असतात ,त्यांना डीटेल्स कळतील.
आणि हो..हे बाबा बुवा ब्रह्मचैतन्य का कुणी त्यांचे कल्ट बनू नका,तुमच्यासारखे शिकलेले ,परदेशात राहणारे लोक त्यांच्या नादी लागत असतील अवघड आहे.
सिं जि +१. काळजी घ्या.
सिं जि +१. काळजी घ्या.
काळजी घ्या. आशा करतो या
काळजी घ्या. आशा करतो या लिखाणाचा शेवट गोड असेल.
@ सिंजि,
ताकद ही श्रद्धेमध्ये आणि विश्वासामध्ये असते. मग ती श्रद्धा तो विश्वास देवावर ठेवा किंवा बापूंवर. प्रत्यक्षात चमत्कार कोणीच करत नाही. पण कोणाचे मनोबल याने वाढत असेल आणि संकटाचा सामना करायचे धैर्य मिळत असेल तर काय वाईट आहे.
असो,
ब्रेस्ट कॅन्सरबद्दल हल्ली गेल्या काही वर्षात फारच ऐकू येते. पण डिटेलवार कारणे, परीणाम, उपचार माहीत नाही. पुढील भागाच्या प्रतीक्षेत ...
ताकद ही श्रद्धेमध्ये आणि
ताकद ही श्रद्धेमध्ये आणि विश्वासामध्ये असते. मग ती श्रद्धा तो विश्वास देवावर ठेवा किंवा बापूंवर. प्रत्यक्षात चमत्कार कोणीच करत नाही. पण कोणाचे मनोबल याने वाढत असेल आणि संकटाचा सामना करायचे धैर्य मिळत असेल तर काय वाईट आहे.>>> याचाच फायदा हे बापू लोक घेतात. सगळे कष्ट लोकांचे आणि नाव बापूंचे
बोलो, बापू कि जय हो!!!
रुन्मेश्भोउ +१.
रुन्मेश्भोउ +१.
तुम्हा सर्वांच्या
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभार. आज भारतात भोंदू बाबांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे बाबा,बापू म्हटलं की बरेच लोक critic होतात आणि हे योग्यच आहे. कोणावरही अंधविश्वास टाकणं चूकच !
similarly जगात खूप वाईट विकृत पुरुष आहेत. रेप करतात, ऍसिड फेकतात. मग सगळेच पुरुष वाईट आहेत का? आवश्यक आहे ते पटकन विश्वास न टाकता, डोळसपणे निर्णय घेणं. गुरूच्या बाबतीतही कोणी म्हणतंय म्हणून कोणी विश्वास ठेऊ नये. त्या 'गुरु'चे आचार विचार कसे आहेत ते पाहावं, वाचावं , त्यांचं कार्य कसं आहे ते पाहावं ,त्यात तथ्य असलं, ते योग्य वाटलं, आणि आपल्याला अनुभव आला तरच आपण विश्वास टाकावा. मी अनिरुद्ध बापूंचे असंख्य अनुभव घेतले आहेत. आणि तरीही तुम्ही त्यांना मानावं असा माझा जराही आग्रह नाही कारण तुम्ही कुठे अनुभव घेतला आहेत?
आता गाठीबद्दल .... बापूनी मॅलिग्नन्ट (कॅन्सरची) गाठ बिनाइन (साधी) केली असं मी कुठे म्हटलंय. जर माझ्या नशिबात कॅन्सरची गाठ असती तर त्याच्याशी लढायला बापूनी मला मनःसामर्थ्य दिलं असतं. बापूंच्या भक्त परिवारामध्ये अनेक कँसर survivors आहेत. आईवडील जसे मुलांना स्वातंत्र्य देतात पण अडचणीत मुलांना मदत करतात तसेच सद्गुरू शिष्याना पूर्ण कर्मस्वातंत्र्य देतात. गाठ हा माझ्या या किंवा पूर्व जन्मातील माझ्या कर्मांमुळे मला आलेला भोग होता. पण त्या प्रसंगी मला जे मनाचं बळ आवश्यक होतं ते पुरवायला माझी गुरुमाऊली धावून आली. शरीराचे भोग राम कृष्ण किंवा मोठमोठ्या संतांनीसुद्धा भोगलेच ना.
मी अँटिबायोटिक्स का घेतली? जपच का नाही केला? कोणतेही 'सद्'गुरु कर्माचा त्याग करून फक्त देव देव करत बसा असं कधीच सांगत नाहीत. मला माझी कर्म चोख करायलाच हवीत. गायत्री मंत्राचे कितीतरी फायदे आता scientifically सिद्ध होत आहेत. पण मी ऋषी मुनींसारखी जपतप, स्नानसंध्यावाली lifestyle फॉलो करत्येय का ? नाही ना मग त्या मंत्रांचा त्यांना मिळत होता तेवढा फायदा मला कसा मिळेल? मला औषधांचा सहारा घ्यायलाच हवा.
भक्तांचे बरेच अनुभव अभक्तांच्या दृष्टीने योगायोग 'coincidence ' असतात. तर या 'coincidence ' बद्दल जगविख्यात सायंटिस्ट आईन्स्टाईन सांगून गेलाय 'Coincidence is God's way of being anonymous' 'योगायोग म्हणजे देवाने अदृश्य रूपाने केलेली लीला'
मी डॉक्टर आहे त्यामुळेच आयुष्य हे किती uncertain आहे हे मी जवळून बघितलंय. आणि मनुष्याचं कर्तृत्व किती सीमित आहे हेसुद्धा मी अनुभवलंय. ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर सॉक्राटिस ने म्हटल्याप्रमाणे 'I know that I know nothing.' चा अर्थ मला कळला आहे. सायन्स, मेडिकल नॉलेज जगातील प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू शकत नाही. द्यानेश्वरांनी रेड्याकडून वेद कसे वद वाले , तुकारामाच्या गाथा पाण्यावर कश्या तरंगल्या सायन्स हे कसं सांगणार....
रामकृष्णांना देव मानणं ठीक आहे पण मिशावाला आपल्यासारखा माणूस, त्याला देव मानायचं म्हणजे .... जेव्हा कृष्ण अस्तित्वात होता तेव्हा तोही हाडामासाचा मनुष्यच होता. अर्जुनाने त्याला देव मानून स्वतःचा उद्धार करून घेतला तर दुर्योधनाने आयुष्यभर त्याला गवळी म्हणून हिणवून स्वतःच्या आयुष्याची माती केली. मी अर्जुनाला फॉलो करत्येय. तुमचं तुम्ही ठरवा.
"बापूना हाक मार, चिंता नको,
"बापूना हाक मार, चिंता नको, चिंतन कर" ek Vishwas Asava Purta .. Karta Harta Guru Aisa... Ambadya .. Nathsavidh
अशाच गाठींचा त्रास माझ्या
अशाच गाठींचा त्रास माझ्या पत्नीला होता व ती खूप हैराण होती. दोन लहान मुलांची आई कर्करोगाच्या शंकेने खूप हादरुन गेली होती. नुकतीच स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकलेल्या स्त्रीचं दु:ख तिनं पाहिलं होतं.
तेव्हा पुण्याचे एक आयुर्वेद डॉक्टरांचे उपचार घेतले. ते म्हणाले हार्मोनचा प्रकार आहे. जर बायोप्सी केली तर कर्करोग नक्की होईल.
वर्षभर त्यांची औषधे घेतली वीस बावीस वर्षे झाली कोणताही त्रास नाही. गाठी नाहीश्या होऊन गेल्या.
बाप रे!
बाप रे!