खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजिबात जमत नाही केक, मी कधीच नाही केला, खरं तर काल वाढदिवस होता लेकाचा >>>> अगदी धनुडी, मलाही हीच अडचण आली. मुलीचा वाढदिवस आहे म्हणून गुलाब जामुन केले. तिला केक हवा होता. पण न आणने च योग्य वाटले.
चंपा केक खूप सुरेख. वरचे सगळे पदार्थ यम्मी दिसत आहेत.
20200422_180845_0.jpg

चितळे चे छोटे पाकीट . भारतीय सामानही नाही आता फार आणि पेशन्स पण.

धनुडी रसगुल्यांची रेसिपी द्यायची विसरले...सॉरी... हे घ्या :

१ १/२ लिटर दुध उकळुन घ्या. गॅस बंद करुन त्यात १/४ लिंबाचा रस घालुन दुध फाडुन घ्या. फाटलेलं दुध कॉटनच्या कापडानी गाळुन घेऊन ३-४ वेळा पाण्यानी निट धुऊन घ्या. नंतर एक ग्लास थंड पाणी घालुन पनीर मधलं सर्व पाणी काढुन घ्या. आता हे पनीर तळहातानी १५-२० मिनिटं मळुन घ्या. याला थोडे कष्ट लागतात..नाहीतर मिक्सरवर थोडं फिरवुन घ्यायचं... Wink यात २ चमचे मैदा घालुन छान मळुन घ्यायच. आणि छोटे छोटे गोळे बनवुन घ्यायचे... एका भांड्यात १/२ कप साखर घेऊन त्यात १ कप पाणी घालुन उकळी काधुन घ्यायची... ऊकळी आली की मग त्यात बनवलेले गोळे घालुन १०-१५ मिनिटं झाकण लावुन शिजवुन घ्यायचे.. मग गॅस बंद करुन परत १०-१५ मिनिटं झाकुन ठेवायचं.

यात रसगुल्ले सॉफ्ट होण्याकरता पनीर / फाटलेलं दुध निट मळुन घेणं खुप गरजेचं आहे.

मी अर्ध्या लिटर दुधाचे बनवले होते ते साधारण ८-९ झाले होते.. हे गोळे पाकात टाकुन शिजवल्यावर फुगतात आणि साधारण तिप्पट होतात आकाराने.. त्यामुळे छोटेच बनवा..साधारण २४-२५ होतिल कदाचित.

Amrita.. mala pan rasgulle khup avadtat.. mazyakade 1/2 ltr..amul fat free tetra pack ahe..tyache hotil ka ?

मी अर्ध्या लिटर दुधाचे बनवले होते ते साधारण ८-९ झाले होते.. हे गोळे पाकात टाकुन शिजवल्यावर फुगतात आणि साधारण तिप्पट होतात आकाराने.. त्यामुळे छोटेच बनवा..साधारण २४-२५ होतिल कदाचित.>>>>>मी पण अर्ध्या लिटरचेच करून बघीन, तू वर लिहीताना दिड लिटर दूध उकळून घ्यायला सांगितलस ना म्हणून विचारलं किती होतात साधारण? ८ -९ पण पुष्कळ झाले, थँक्यू

>>> सगळ्याच गोष्टी अफलातून! मलापण झंपीसारखा प्रश्न पडलाय. <<<<
अर्रे, वस्तु मिळत नाही म्गणून नाही म्हटलं पण संपले सामान तर कोण ते सजून-नटून( मास्क, हातमोजे, कोट) घालून बाहेर पडणार आणि रिस्क घेवून सामान आणणार... त्यात बाई नसल्याने कामं वाढणार आहेच.
बाकी, कोणी करेना का काय ते... मी आपली सहज गंमत म्हणून मीम टाकली आणि शंका व्यक्त केली.
मजा करा!

अरे! आम्हाला पण रोज आंबे मिळत आहेत !? कर्नाटक सरकारच शेतकऱ्यांना मदत करते आहे . आंबे विकायला आणि इतर सगळे seasonal produce विकायला. शेतकरी direct ट्रक भरुन माल अपार्टमेंट मध्ये विकायला येत आहेत. आत्ता पर्यंत हिरवी-काळी द्राक्षे, पेरू, musk मेलोन, कांदे (100रु ला 6kg Happy ), आंबे, टोमॅटो हे सर्व शेतकरी आलेत. आंब्यांची वेबसाइट आहे.

Karnataka State Mango Board is helping mango farmers sell their mangoes to Bangalore apartments as shops are closed due to lockdown. Apartments can request for the mango mini truck to come to their apartment by sending the following details:

Apartment name, address, contact name and contact person,
Estimated number of buyers.

These mango growers are GAP certified and bring the fruit directly from the farm. Therefore, these are fresh and juicy.

Mangoes come in 3kg packets. https://karsirimangoes.karnataka.gov.in/

गुलाबजाम कसले मस्त दिसतायत ...
थालीपीठ , इडली चटणी सांभार भारी एकदम ..

Aai g aambyache photo taku naka re!
Jale pe namak bota hai ++++++++++१११

मी हा धागा उघडायला आणि तो आंबा फोटो माझ्या मुलीने पाहायला एकाच गाठ पडली ... सुरूच झालाय तिचं I want Mango r8 now !!!!

हायला केळीच्या पानावर थालिपीठ कसलं दिसतंय! दुसरं लाल रंगाचे थालिपीठ पण! तिसरा फोटो कसला आहे कळत नाही,
इडली चटणी सांबार पण मस्त, चटणी चा रंग मस्त आलाय इडल्या लुसलुशीत दिसताएत.
रच्याकने तो तिसरा फोटो कसला आहे (विचार करणारी बाहूली) सांगू नका सांगू नका मला

ते लाल रंगाचं थालीपीठ साधं तांदळाचं आहे. तांदळाचं पीठ, कांदा, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ आणि चिमूटभर साखर. छान केळीच्या पानावर थापून तव्यावर सोडायचं. खरपूस भाजून लगेच खाऊन टाकायचं. दही, चटणी, साखर किंवा चहा....कशासोबतही मट्ट करायचं.
तो तिसरा फोटो बर्याच जणांची 'दुखती रग' आहे असं दिसतंय. ";)"

महाराष्ट्र सरकार कधी आम्हाला अशी मदत करणार Uhoh किती दिवस झाले कोणतंच फळ बघितलं नाही. कलिंगडाला तर उचक्या येत असतील ईतकी आठवण येते त्याची.

महाराष्ट्र सरकार कधी आम्हाला अशी मदत करणार Uhoh किती दिवस झाले कोणतंच फळ बघितलं नाही. कलिंगडाला तर उचक्या येत असतील ईतकी आठवण येते त्याची.>>>>> कलिंगड सर्रास मिळतय गं चंपा, गोरेगावात तरी मिळतय

काय मस्त झणझणीत मिसळ Happy आता व्यवस्थित मिसळ करणं आलं. नाहीतर फक्त उसळीत, कांदा, टोमॅटो टाकत होते. शेव/ फरसाण मिळणं बंद झालंय Sad बघू.

धनुडी आमच्याकडे बाजारात मिळत असेल पण तिथे रुग्ण सापडल्यामुळे आम्ही जाणं बंद केलंय. खाली एक भाजीवाला येतो त्याच्याकडून भाजी घेतो फक्त.

मुंबईत अनेक ठिकाणी असे टेंपो बोलवून भाज्या व फळे मिळायची सोय आहे. मी मी फळं भाजीवाल्या एका साइटवरून आंबे मागवले. एक दिवस उशिरा का होईना पण मिळालेत.

गेल्या दोन दिवसात बनवलेले पदार्थ
पावभाजी
PavBhaji.jpeg

साबुदाणा वडा , ओले खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी

Sabudana vada.jpeg

कसूरीमेथीची पापडी

papadi.jpeg

छोले , रोटी आणि केशर श्रीखंड

chole.jpeg

हो की, छळच नाहीतर काय? मिसळपाव तर्री, पाभा, साबुदाणा वडा, कसूरीमेथीची पापडी आणि ते श्रीखंड असलेलं जेवणाची ताट! रोजचा छळ
रच्याकने भरत कुठच्या फळभाजी वाल्या साइटवरून तुम्ही ते हे मागवलं?

Pages