आधुनिक शब्दकोशातून:
ट्र्म्पणे!
क्रियापद.
अर्थ:
१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.
२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.
३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)
४. विविध प्रकारच्या पिस्तुलांपासून ते स्वयंचलित रायफलीपर्यंत सर्व मोक्षप्राप्तीच्या साधनांचे मुक्तहस्ताने वाटप करण्याचे मनसुबे जाहीर करून, अद्याप डोकं ताळ्यावर असलेल्या सुजाण नागरिकांची काळीजे त्या रायफलीपेक्षा वेगाने धडधडवणे.
(वाचा: गावठी 'कट्टा' व शहरी 'घोडा' - लेखक: टी. डोनाल्ड)
५. काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रात लुडबूड करणे व तरीही सर्वज्ञ असल्याचे भासवणे.
उदा. वडीलोपार्जित खानावळीचा धंदा असलेल्या गणूशेटने कधी पत्र्याचा डबाही वाजवला नसताना एकदम आपल्या स्वतंत्र तबलावादनाचा कार्यक्रम जाहीर केला आणि कुठला ताल पेश करणार विचारल्यावर गणूशेट ट्रम्पला: ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’
६. लगट करणे
उदा. ‘तू सुंदर बाई आहेस आणि मी सेलेब्रिटी आहे त्यामुळे मी तुला काहीही करू शकतो’ असे म्हणून एक हिंदी पिक्चरचा नवोदित अभिनेता भर रस्त्यात एकीशी ट्रम्पू लागला. पूर्वीच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खटल्यास प्रमाण मानून ह्या खटल्याची कारवाईही तात्काळ दहा वर्षांनी व अत्यंत कडक अश्या कायद्याचा आधार घेऊन नि:पक्षपातीपणे झाली. पूर्वीच्या निकालाचेच ‘टेम्प्लेट’ डोळ्यासमोर ठेवून, ट्रम्पण्याच्या ह्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल ह्याही वेळी एक काळवीट, एक पोलीस व पदपथावरील काही गरीब लोक ह्यांना देहांताची सजा केली गेली. आता कायद्याची जबरदस्त जरब बसून तो अभिनेता त्या दुस-या सुप्रसिद्ध अभिनेत्याप्रमाणेच पुन्हा ट्र्म्पायला मोकळा झाला आहे.
(वाचा: 'पोरगा का पनवती?' - लेखक: के. सलीम)
७. कायद्यात पळवाटा शोधून, कर बुडवून, त्याचा जाहीर अभिमान बाळगून वर राष्ट्रीय कर्ज वाढले म्हणून गळा काढणे. थोडक्यात स्वत:चे काम नीट न करता दुस-याने केलेल्या कामाची हेटाई करणे.
(पहा: ‘पुरावा द्या’ फेम माननीय मफलर मुख्यमंत्री ह्यांची विधाने)
८. दुस-याच्या खर्चाने स्वत:च्या कुंपणाची भिंत बांधायच्या वल्गना करणे
(पहा: हवेत मनोरे बांधणे किंवा ‘आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले की’ असे म्हणणे)
९. एखाद्याची जात, धर्म झालंच तर वर्ण काढणे, पण देशही काढणे.
(वाचा: ‘मेक्सिकन म्हणजेच गुन्हेगार’ - लेखक: टी. डोनाल्ड)
१०. अत्यंत बिनडोक व अत्यंत स्वार्थी अश्या दोन प्रकारच्या लोकांच्या पाठिंब्यावर सत्तेची हाव धरणे व बघणा-यास ‘ह्याला हसावे का घाबरावे’ अशा संभ्रमात पाडणे
(पहा: यत्ता दुसरीतील पप्पूचा निबंध : ‘मी पंतप्रधान झालो तर..’.)
११. आधीच बदनाम असलेल्या क्षेत्रात, शेतात बैल घुसावा तसे बळजबरीने घुसून, आपल्या अश्लाघ्य व अवली आचरणाने ‘ह्याच्यापेक्षा ते परवडले’ असे वाटावयास लावणे.
१२. गंभीर समस्येवर ‘रोग परवडला पण औषध नको’ असे अघोरी उपाय सुचवणे.
उदा. त्या ठिकाणी, फुले आंबेडकरांच्या राज्यातला एक अत्यंत सुसंस्कृत व विनयशील नेता, दुष्काळाने हवालदिल झालेल्या जनतेला उत्तर देताना त्या ठिकाणी ट्रम्पला: ‘आता मी काय धरणात... ’. हे पहिल्या धारेचे विधानामृत ऐकून अर्धमेल्या झालेल्या जनतेने त्या सुसंस्कृत व विनयशील नेत्याला विचारलं ‘कसं सुचतं हो तुम्हाला? काकांनी सुचवलं तसं वाचन वाढवलेलं दिसतयं. काय… वाचताय काय सध्या?’ तेव्हा तो अत्यंत सुसंस्कृत व विनयशील नेता पुन्हा त्या ठिकाणी ट्रम्पला : ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’
- राफा
>>>> ट्रम्पजींवर <<<<< गुड
>>>> ट्रम्पजींवर <<<<<
गुड मॅनर्स... जी जी हांजी हांजी... ! 
सपना, राफा हे मायबोलीचे खूप
सपना, राफा हे मायबोलीचे खूप जुने आणि विनोदी लिखाणासाठी माबोवर खूप प्रसिद्ध असे सदस्य आहेत. त्यांना प्रसिद्धीसाठी काही करण्याची गरज नाहीये.
शुगोल. ठीक आहे. मागे घेते
शुगोल. ठीक आहे. मागे घेते शब्द.
पन ट्रम्पजींना संधी देण्याआधीच त्यांची टिंगल टवाळी केलेली मला नाही आवडली. भारतातही मोदीजींच्या बाबतीत असंच चालू आहे.
आता काळा पैसा शेकोटीत जाळायला लागल्यावर मोदीजींचं कौतुक करताहेत. काहींना अजूनही समजत नाहीये. विनोदामुळे अशा महान व्यक्तीमत्वांकडे पाहण्याचा अँगल बदलतो असं वाटतं.
एखादी व्यक्ती महान आहे याची
एखादी व्यक्ती महान आहे याची आपल्याला खूणगाठ पटणे महत्वाचे. मग इतर कुणी कितीका नावं ठेवेना!!
ट्रंपच्या बाबतीत त्याला कुणी महान म्हटलं तर त्यालाच ते पटणार नाही याची मला खात्री आहे.:डोमा:
शुगोल, अगदी! राफा,
शुगोल, अगदी!
राफा, नेहमीप्रमाणेच रॉकिंग __/\__
सपना हरिनामे | 10 November,
सपना हरिनामे | 10 November, 2016 - 08:28
ट्रम्पजींवर टीका करून प्रसिद्धी मिळवणे हा एकच हेतू दिसतोय.
<<
इम्मॉर्टल प्रतिसाद.
limbutimbu | 10 November,
limbutimbu | 10 November, 2016 - 08:49
>>>> ट्रम्पजींवर <<<<< हाहा गुड मॅनर्स... जी जी हांजी हांजी... ! डोळा मारा
<<
अन हा! उफ्फ! अल्टिमेट
आता "राजा तशी प्रजा" नियमा
आता "राजा तशी प्रजा" नियमा प्रमाणे, सगळी अमेरिका "ट्रम्पू" लागणार आहे काय ?
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
शुगोल, विशेष आभार प्रसिद्ध ठरवल्याबद्दल ( असे झाले की हमखास 'अरे मी एक नामांकित वकील आहे, फारसं कुणाला माहिती नाहीये ते' आठवतं
) . शिवाय अतिविशेष आभार मला 'तपोवृद्ध' न ठरवल्याबद्दल 
हाहाहा! छानच लिहीलय.
हाहाहा! छानच लिहीलय.
>>>>>बघणा-यास ‘ह्याला हसावे का घाबरावे’ अशा संभ्रमात पाडणे>> LOL
हे वाचायचं राहिलं होतं.
हे वाचायचं राहिलं होतं.
(No subject)
हे कसं मिसलं होतं?
Pages