कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600
कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628
कुर्ग सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/60630
कुर्ग सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/60635
कुर्ग सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/60648
कुर्ग सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/60649
संध्याकाळी घरी आलो तर गरमागरम कॉफीने स्वागत झालेच. हवा एकदम गार झाली होती. पावसाची लक्षणे
दिसत होती. काका म्हणाले चल आमची बाग फिरवून आणतो. काकांच्या मागे डोंगर उतरताना माझी धांदल !
काका कोयता घेऊन भराभर पुढे जाऊन वाटेतली झाडे साफ करत होते. आणि झाडी एवढी दाट कि मी जरा
रेंगाळलो असतो तर हरवलो असतो.
शेवटी एका पेरूच्या झाडाखाली मी थांबलोच. किती दोडे पेरू खाल्ले त्याला गणतीच नाही. मग संत्र्याच्या
झाडाखाली पण तसेच. एवढे करून परत केळी खायचा आग्रह. तो घड झाडावरच पिकला होता. मग काकांनी
तो घडच तोडून घेतला.
पावसाची लक्षणे होती म्हणून मी कॅमेरा घेतलाच नव्हता. घरी आलो तर राजेंद्र म्हणाला कि तूझी चप्पल रक्ताने भरलीय, काटा लागला का बघ. बघितले तर एक जळू होती. ती त्याने काढली पण रक्त थोडा वेळ वहात राहिले.
विना वेदनेचे असे रक्त वाहताना बघून मजा वाटत होती... ( असो तिथे दाट जंगलात शिरत असाल, तर काळजी
घ्या. )
काका दिवसभर बाहेर असायचे, पण दिवसभरात रोहिणीने काहितरी शिकार केली असावी कारण एका पक्ष्याच्या
नख्या, दोरीला टांगून वाळत घातल्या होत्या, मागे त्या पक्ष्याची पिसे पण वाळत घातली होती
तिथले लोक असेच लढवय्ये आणि शूर आहेत. हसतमुख आणि अगत्यशील असले तरी रोजच्या आयूष्यात त्यांना
असे प्रसंग फेस करावेच लागतात. रस्त्यावर फारसे लाइट्स नाहीत आणि अंधार पडत आला होता तरी तिने,
आपल्या मुलाला काहीतरी आणायला बाईकवरुन पिटाळलेच ( मुलाचे वय १५/१६ असावे )
तेवढ्यात लाईट गेले. सगळीकडे पांढरा अंधार भरून राहिला. धुके जमू लागले होते. इमर्जन्सी लाईट आणून दिला
तिने पण मी तो रुम मधे ठेवला आणि वातावरणाचा आनंद घेत राहिलो.
थोड्याच वेळात जेवण आले. जेवणात सुरणाची भाजी होती आणि एक खास लोकल प्रकार होता. तिथे एका
वेगळ्या प्रकारचे आंबे होतात. त्याला ते लोक वाईल्ड मँगो म्हणतात, मीठात मुरवलेले ते आंबे मला तिने आणून
दिले. आपल्याकडच्या मीठात मुरवलेल्या कैर्यांपेक्षा फारच वेगळी चव होती त्याची. आंबट गोड असा तो
प्रकार होता. मी परत विचारले तर म्हणाली कि फक्त मीठच घातलेय त्यात.
मी जेवताना तिचा मुलगा माझ्या आजूबाजूला वावरत होता, कारण अंधारात तिथे मोठे मोठे पतंग आणि टोळ
वावरत होते. तो त्यांचे मोबाईलने फोटो काढत होता ( कि माझे रक्षण करत होता ? )
दुसर्या दिवशीची सकाळ, खुपच प्रसन्न होती.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९) कुठल्याही दिशेने गेलो कि असेच ओढ लावणारे रस्ते..
१०)
११) कॉफीची पाने
१२)
१३)
माझा पाय तिथून निघतच नव्हता. मी तिला सांगितले कि तूझ्या हातच्या जेवणाची चव मी कधी विसरणार नाही.
तिने पण नक्की परत ये, असे सांगितले.
मग दहाच्या दरम्यान आम्ही निघालो. राजेंद्र मला कावेरी नदीच्या किनारी घेऊन गेला.
१४) इथे प्रवाह संथ दिसला तरी जवळच उतार आहे आणि तिथे राफ्टींग ची सोय आहे.
१५) नदीच्या पलिकडच्या किनार्यावर दूबारे एलिफंट कँप आहे. तिथे बोटीने नेतात.
पण ते मला जरा भंपक वाटले कारण म्हैसूर ला होणार्या विजयादशमीच्या सोहळ्यासाठी तिथले बहुतेक हत्ती नेले
होते आणि तशी कुठलीही सूचना तिथे देत नव्हते. पार्किंग, बोटींग आणि त्या कँपचे मात्र पैसे घेत होते.
१६)
१७)
१८) तिथे विस्तीर्ण जागा आहे आणि हत्ती असतील तर त्यांच्याशी खेळायची ( ?) सोय आहे
१९)
२०)
काल घेतलेले मसाले मला पुरेसे वाटले नाहीत म्हणून परत एकदा शॉपिंग केले. काचुमपल्ली नावाचे खास व्हीनीगर
घेतले. ( १ रुपया प्रति ग्राम ) स्थानिक चॉकलेट्स घेतल्या. मराटी मुग्गा नावाचा एक वेगळाच मसाला घेतला.
( तो वापरला कि त्याचा फोटो टाकतो )
मला सिल्क च्या साड्या घ्यायच्या होत्या. तिथल्याच एका सरकारी दुकानात त्या उत्तम प्रतीच्या मिळाल्या.
बहिणीला घेतलेली साडी इतकी तलम आहे कि काडेपेटीत मावेल ( मोठी काडेपेटी ) आणि किमती ३/४
हजारातच होत्या. १५ मिनिटात ४ साड्या खरेदी केल्या मी
चंदनाची खोडे पण तिथेच मिळाली.
२१) परत निघताना खरेच उदास वाटत होते.
२२)
२३) वाटेत मात्र खुपच ट्राफीक लागले. जोडून आलेल्या रजा, म्हैसूरचा महोत्सव यामूळे लोक बाहेर पडत होते. राजेंद्र बँगलोरचाच रहिवासी असल्याने त्याने गल्ली बोळातून मला हॉटेल वर आणून सोडले.
परत यायच्या वेळेची खात्री नसल्याने मी त्या संध्याकाळचे तिकिट काढले नव्हते. बँगलोर विमानतळाजवळ एक
हॉटेल बूक केले होते. ते मात्र तितके चांगले नव्हते. शिवाय आणखी एक घोळ आहे. त्या विमानतळावरून
परतताना १२० रुपयांचा टोल द्यावा लागतो आणि आपल्याकडूनच तो वसूल केला जातो ( आमच्या मुंबईत
नाही हो असले काही. ) त्यामूळे १० किमी पेक्षा कमी अंतरासाठी मला तब्बल ५५० रुपये द्यावे लागले.
बॅंगलोर ला ही फुले दिसली.
२४) विमानतळावर दसर्यानिमित्त अशी सजावट होती
२५)
मी जशा साड्या विकत घेतल्या होत्या तश्याच साड्या विमानतळावर ६ ते ८ हजारात होत्या !! त्या विमानतळा बाहेर
एक मोठ्या दगडांची टेकडी पुर्वी बघितली होती, ती पण आता हळू हळू नष्ट होत आहे.
पण एकंदर कुर्ग ची सहल अविस्मरणीय झाली. माझ्या आयूष्यात कुठल्याच ठिकाणी परत जायचे योग सहसा येत
नाहीत.. पण कुर्ग अपवाद ठरावा हि ईच्छा !
राजेंद्रचा फोन नंबर +९१ ९९८०९३८८९
तो बंगलोर चाच आहे. कुर्ग किंवा बंगलोर ला जायचे असेल तर तो सर्व व्यवस्था करू शकतो.
रोहिणीचा नंबर + ९१ ८७६२२ ८००३०
स्पाईस मॉल ने सांगितलेय कि ते मसाले कुरीयर ने पाठवू शकतात. त्यांचे नंबर वसंत + ९१९४४८५४८६३७ ते लोक मसाल्यांच्या मळ्यातही नेऊ शकतात ( संपर्क पवन + ९१९४८२१८४४३२ )
सर्व जण उत्तम हिंदी बोलतात.
तेव्हा नक्की विचार करा कुर्ग ला जायचा.
समाप्त
साडी चे फोटो?
साडी चे फोटो?
सुंदर मालिका दिनेशदा! इतक्या
सुंदर मालिका दिनेशदा!
इतक्या छान मालिकेबद्दल धन्यवाद!
(कर्नाटक राज्यातर्फे!)
सुंदर मालिका दिनेशदा >
सुंदर मालिका दिनेशदा > +१
कुर्ग एक निवांत हिलस्टेशन आहे. परत परत जाण्या सारखे.. मी मंगलोर हून गेलो होतो... त्यामुळे घाटातला सुंदर प्रवास अनुभवला होता..
सुंदर लेखमाला... कूर्ग ला
सुंदर लेखमाला...
कूर्ग ला जावेसे वाटले एकदम.
१५ मिनिटात ४ साड्या खरेदी केल्या मी >> फोटो असते तर अजुन मज्जा आली असती
सुंदर लेखमाला अगदी. मीपण
सुंदर लेखमाला अगदी.
मीपण साडीचे फोटो शोधत होते, मला साडी नेसायला नाही आवडत पण फोटो बघायला आवडतात.
वा! प्रत्येक भाग उत्सुकता
वा! प्रत्येक भाग उत्सुकता वाढवत नेणारा होता, आणि अंतिम भाग येऊच नये अस वाटत होतं! सुन्दर वर्णन त्याला साजेशे फोटो ! अप्रतिम !!
साडी चे फोटो?
साडी चे फोटो?
छान झालीये तुमची ही सहल. २
छान झालीये तुमची ही सहल. २ आणि ३ नं फोटो अगदी सुंदर वातावरण दाखवतायत.
काय नीरव शांतता आणि स्वच्छ गाळलेली हवा असेल तिथं! पुणेकर किंवा कोणत्याही अति प्रदुषित शहरातल्या लोकांना तिथं श्वास घ्यायला त्रास होईल बहुतेक.
साड्यांचे फोटो का नाही टाकले? निदान उल्लेख तरी करायचा नाही मग.
खूपच छान लेखमाला. जेव्हा
खूपच छान लेखमाला. जेव्हा केव्हा जायचं ठरवू तेव्हा खूपच उपयोग होईल आम्हाला!
सुंदर लेखमाला. दिनेशदा,
सुंदर लेखमाला.
दिनेशदा, तुम्ही जे वर्णन आणि फोटोद्वारे कुर्गची ओळख करून दिली आहे त्यामुळे कुर्गला भेट देणे आता एकदम नक्की.
अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो.
अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो. तिथे जायची उत्सुकता वाटतेय.
अतिशय मस्त झाली ही
अतिशय मस्त झाली ही कुर्गमालिका,
मला खरंच कुर्ग ला जावे वाटते आहे.
दिड वर्षाच्या मुलाला घेऊन जमेल का आम्हां दोघांना ???
अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो.
अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो. खूप छान झाली आहे लेखमाला
आम्हाला जायचं आहे..तेव्हा नक्की उपयोग होईल. धन्यवाद !
छान आहे वर्णन ....पिसे वाळत
छान आहे वर्णन ....पिसे वाळत घालून त्याचे काय करणार होती रोहिणी?
साडीच्या दुकानाचे नावही सांगुन ठेवा
ही मालीका वाचून कुर्गला जायची
ही मालीका वाचून कुर्गला जायची इच्छा होतेय. सुंदर.
साडी चे फोटो?+ १०००
साडी चे फोटो?+ १०००
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
मस्त फोटो आणि वर्णन ही ,
मस्त फोटो आणि वर्णन ही , मालिका छानच झालीय . हे वाचून आता कूर्ग ला जावं असं वाटतंय.
आभार सर्वांचे, साड्या
आभार सर्वांचे,
साड्या ज्यांच्यासाठी आणल्या होत्या त्यांना दिल्याही, म्हणून फोटो नाहीत ( एक टिपीकल साखरसाडी होती, गर्द हिरव्या रंगाला लाल डिझाईनचे काठ आणि त्याखाली जरीची बॉर्डर, दुसरी गर्द वायंगी रंग आणि त्याला जरीचे काठ. तिसरी मोरपिशी रंगात विणलेले डीझाईन आणि त्याला गर्द निळे काठ आणि शेवटची सिल्क प्रिटेड , क्रीम कलरची होती ) तिथे एक सरकारी मोठे दुकान आहे. राजेंद्र घेऊन जाईल
अंकु, अगदी लहान मुलाला लागणारी औषधे आणि बेबी फुड जवळ ठेवा. मग काहिही प्रॉब्लेम नाही. तूम्ही जी टॅक्सी
कराल ती कायम तूमच्या सोबतीस असते.
अमि, तो पक्षी कुठला होता मला ओळखता आला नाही. गर्द तपकिरी रंगाची फुटभर लांब पिसे बहुतेक् शोभेसाठी ठेवणार असेल.
कुर्गला जायचे ते तिथले निवांतपण अनुभवण्यासाठीच. काही टुरिस्ट अॅट्रॅक्शन्स वगळून तिथल्या मळ्यातून भटकणे
जास्त योग्य असे मला वाटते. तिथल्या पावसाचाही अनुभव घ्यावा असे वाटतेय.
कसले फोटो आहेत आणि वर्णन ही
कसले फोटो आहेत आणि वर्णन ही
मस्त फोटोज , ते धुक्याचे
मस्त फोटोज , ते धुक्याचे जास्त आवडले .
१५ मिनिटात ४ साड्या खरेदी केल्या मी >>> इथल्या बायांनी हे वाक्य बघितलं नाही दिसतयं.
अहाहा.. सुंदर फोटोज.... त्या
अहाहा.. सुंदर फोटोज.... त्या घराने तर अक्षरशः मोहात पाडलंय..
श्री ..
बघ की.. चांगले ४,५ तास हवेत ना चार्र्र चार्र साड्या निवडायला...
खूप सुंदर लेखमाला !
खूप सुंदर लेखमाला !
सुंदर लेखमाला.खरंच
सुंदर लेखमाला.खरंच
धन्यवाद , दिनेशदा,
धन्यवाद , दिनेशदा, कुर्गबद्दलची ओढ अशी छान द्विगुणीत केल्याबद्दल !
संपूर्ण मालिका मस्त झाली.
संपूर्ण मालिका मस्त झाली. माझ्या ८ वर्षापूर्वीच्या कुर्गसहलीच्या आठवणी ताज्या झाल्या. अजूनही सगळे रस्ते तसेच निवांत सुंदर आहेत.
तिथून आम्ही कुठल्याशा पुरातन मंदिरात गेलेलो. मंदिरात नेहेमीचीच गर्दी होती आणि कुंडात लोक कसेही आंघोळ वगैरे करत होते. त्यामुळे मंदिराचे काही विशेष वाटले नाही. पण मंदिराच्या मागच्या बाजूला एक उंच पर्वत होता ज्यावर चढायला पायऱ्या होत्या. तो खुपच उंच भाग होता आणि वरून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू तिन्ही राज्यातले प्रदेश दिसत होते. तिथे खूप छान वाटले.
तिथून आम्ही कुठल्याशा पुरातन
तिथून आम्ही कुठल्याशा पुरातन मंदिरात गेलेलो. मंदिरात नेहेमीचीच गर्दी होती आणि कुंडात लोक कसेही आंघोळ वगैरे करत होते. त्यामुळे मंदिराचे काही विशेष वाटले नाही. पण मंदिराच्या मागच्या बाजूला एक उंच पर्वत होता ज्यावर चढायला पायऱ्या होत्या. तो खुपच उंच भाग होता आणि वरून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू तिन्ही राज्यातले प्रदेश दिसत होते. तिथे खूप छान वाटले.>>>>>>
हे तलकावेरीचं वर्णन वाटतंय. कावेरी नदीचा उगम आहे इथे. त्या डोंगरावरुन आसमंत फार छान दिसतो
खूप छान होती ही मालिका.
खूप छान होती ही मालिका. कुर्गबद्दल पुन्हा ओढ लागली. धन्यवाद दिनेशदा!
परत आभार, हो हे बहुतेक
परत आभार,
हो हे बहुतेक तालकावेरीचेच वर्णन वाटतेय. तिथे जाण्यासाठी जीप घ्यावी लागते. साधी गाडी जात नाही.
पण राजेंद्रच्या मते, मी ज्या स्थानिक टेकडीचे फोटो टाकले होते, तिथूनही तसेच दृष्य दिसते ( म्हणून आणि वेळ नव्हता म्हणूनही मी तालकावेरीला जाणे टाळले )
त्या टेकडीवर मात्र आम्ही पायी पायीच गेलो होतो ( रस्त्यालगतच आहे ) पण त्या जागेला काही खास नाव नाही !
सुंदर मालिका दिनेशदा! >>>
सुंदर मालिका दिनेशदा! >>> +१
तुमच्या हल्लीच्या प्रवास-मालिकांत एक dream leisure seat असते - अशक्य हवीहवीशी वाटणारी. या मालिकेत ती २ नं.च्या फोटोत आहे.
पाचव्या फोटोतली 'लाल रेशमी पाकळीवरती थेंब बावरी नक्षी' खूपच सुंदर.
Pages