नैरोबी हे माझे आवडते शहर. एक कारण वर्षभर असणारे सुखद हवामान आणि दुसरे म्हणजे तिथे भरभरुन फुलणारी फुले. दूधाची, फळे आणि भाज्यांची रेलचेल ही देखील कारणे आहेतच.
मध्यंतरी एकदा व्हाया नैरोबी आलोच होतो पण त्यावेळी मोजके तास ट्रांझिट मधे होतो, शहरात जाता आले नाही.
यावेळेस माझे लुआंडा नैरोबी विमान तासभर लेट झाले आणि मला नैरोबी मधे मुक्काम करावा लागला. हॉटेल
वगैरे व्यवस्था, केनया एअरवेज ने केली होती. माझ्या हाताशी अर्धा दिवस होता आणि त्याचा भरपूर फायदा मी
घेतला.
ज्या हॉटेल मधे मुक्काम होता, तिथूनच मी एक टुअर घेतली आणि काही ठिकाणांना भेट दिली, थोडा वेळ मी ज्या
भागात ( नैरोबी वेस्ट ) रहात होतो, तिथे भटकलो. त्याची हि चित्रमय झलक.
1) साधे बाभळीचे झाड केनयात असे ताडमाड वाढते
नैरोबी शहराला जवळ जवळ लागूनच त्यांचा नॅशनल पार्क आहे. तो खुपच मोठा आहे पण त्याला लागूनच
नैरोबी सफारी वॉक, प्राण्यांचे अनाथालय वगैरे आहे. त्या पार्क मधे सिंह, बिबळे, चित्ते, हरणं, जिराफ, झेब्रा,
शहामृग वगैरे प्राणी सहज दिसतात. त्याला लागून असलेल्या एका पार्कात काही प्राणी आहेत तिथे मी भेट दिली.
तिथले प्राणी आहेत रुबाबदार पण पिंजर्यात असल्यामूळे फोटो नीट काढता आले नाहीत.
2)
3)
4)
5)
a data-flickr-embed="true" href="https://www.flickr.com/photos/dineshda/29956445810/in/album-721576750902..." title="DSCN2301">
6)
केनयामधील प्राण्यांबद्दल माझे आणखी एक निरिक्षण म्हणजे ते प्राणी विमानांना आणि माणसांना अजिबात बूजत
नाहीत. अगदी नजरेला नजर देऊन बघतात.
7) हे रानडुक्कर रस्त्यावरच होते.
8) ही पण ( शांतपणे रस्ता मोकळा व्हायची वाट बघत होते )
नंतर नैरोबीतल्या काझुरी फॅक्टरीला भेट दिली. या फॅक्टरीत सिरॅमिक चे मणी तयार करतात. हे मणी हातांनीच
तयार करतात. मग त्यांचे रंगकाम करतात. हि सर्व प्रक्रिया तिथे बघता येते. तिथे अर्थातच विक्रीव्यवस्था आहे,
पण त्यातून काही मणी निवडणे म्हणजे महाकठीण काम आहे.
9)
हि फॅक्टरी नैरोबीतल्या करेन भागात आहे. या भागात नैरोबीतल्या अतिश्रीमंत लोकांची घरे आहेत पण ती घनदाट
झाडीत लपलेली आहेत. त्या भागातून गाडीने फिरतानाही खुप छान वाटते. तिथल्या रस्त्यांचे काही फोटो देतो आहे.
10)
11)
12)
नंतर मी जिराफ सेंटर ला भेट दिली. ( हा थोडा पैसे कमवायचा प्रकार वाटला मला पण ठिक आहे )
या भागाला लागून जे जंगल आहे तिथले काही जिराफ आपल्याला जवळून बघता येतात. त्यांना हाताने भरवता येते.
त्यांना खाण्यासाठी म्हणून काहि प्रकार आपल्या हातात देतात आणि ते बघून काही जिराफ तिथे बांधलेल्या एका
गॅलरी जवळ येतात. जीभ लांब करून ते आपल्या हातातले खाणे खातात. मी तिथे ऊभा होतो, तर एका जिराफाने
माझा गालच चाटला. ( अजून शिरशिरी येते तो स्पर्श आठवून ) तिथे सुवेनियर शॉप आहे. तिथल्या झाडांवर
मला दोन वेली आढळल्या आणि त्यांची फुले फारच सुगंधी होती.
13)
14)
15) जिराफाचे अगदी जवळून दर्शन
16) तिथल्या सुवेनियर शॉपचे कल्पक डिझाईन
17 ) हिच ती सुगंधी फुले
18 ) हि फुले पण सुगंधी होती
नंतर तिथल्या हत्तींच्या अनाथालयाला भेट दिली. ही जागा पर्यटकांसाठी फक्त दुपारी अकरा ते बारा, या वेळातच
उघडी असते. या वेळात तिथे हत्तींच्या पिल्लांना दूध पाजण्याचा कार्यक्रम असतो. जवळ्यच्या जंगलातून हि आईविना
असलेली पिल्ले हाकारत आणतात. ती आणताना बालगजाननांचा भास होत राहतो. आल्या आल्या बाटलीने
जवळजवळ ५/६ लिटर्स दूध, घटाघट पितात आणि मग खेळायला सुरवात करतात. चिखलात लोळणे, अंगाला माती
फासणे, एकमेकांना ढूश्या देणे असले चाळे सुरु करतात. त्यांना बघणे फार मौजेचे असते.
हि पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना जंगलात सोडायचा प्लान आहे. माझ्या मनात मात्र वेगळे विचार आले. आफ्रिकन
हत्ती, आपल्या आशियाई हत्तींपेक्षा वेगळे असतात. ते आकाराने आणि ताकदीनेही मोठे असतात. पण ते
माणसाळत नाहीत ( म्हणजे आपल्याकडच्या प्रमाणे त्यांना देवालयांच्या सेवेला जुंपलेले नसते कि त्यांच्याकडून
ओझी व्हायली जात नाहीत. ) तरीही केनयातील हत्ती आणि तिथली माणसे यांच्यात एक भावबंध आहे. तिथल्या
वाळवंटात पाणी शोधायला हत्तींची मदत होते ( म्हणजे हत्ती जे पाणी शोधतात ते माणसे वापरतात ) आणि
कृतज्ञता म्हणून हत्तींसाठी ते लोक पाणी काढून ठेवतात. याचे चित्रीकरण बीबीसी ने ह्यूमन प्लॅनेट मधे केलेले आहे.
तर ही पिल्ले पुढे माणसांशिवाय राहू शकतील काय ? त्यांना बाकीचे हत्ती स्वीकारतील काय ?
19)
20)
21)
22 ) एका बाजूला हत्तींचा खेळ चालला होता, तर तिथल्याच एका टेबलावरून हा त्यांच्यावर लक्ष ट्।एवून होता.
त्यानंतर मी नैरोबी वेस्ट भागात भटकलो. तिथे फुललेला झकरांदा, दिल्ली सावर बघितली, जून्या सुपर्मार्केट
मधे थोडीफार खरेदी केली, तिथल्या झाडांवरची कोरी पक्ष्यांची घरटी बघितली... आणि अर्थातच फुले टिपली.
23 ) केनयामधला भरभरून फुललेला झकरांदा
24 ) झकरांदाचा क्लोज अप
25 ) हि माझ्या घरामागची गल्ली
26 ) या फुलांवर मी एक लेख लिहिला होता
27 ) हि कोरी पक्ष्यांची वसाहत
28 ) दिल्ली सावर
29 )
30 )
31 ) अगदी नखाएवढी होती हि फुले
32 ) जास्वंदीचा वेगळा प्रकार
33 )
34 )
35 )
36 )
37 ) आघाड्याचा तूरा
38 ) सुझन
39 )
40 ) अगदी खोटी वाटेल अशी, पण खरी वेल
41 )
परत कधी येऊ... असा विचार करतच विमानतळावर परत आलो.
फार सुंदर
फार सुंदर
व्वा !!! मस्त फोटो आहेत
व्वा !!!
मस्त फोटो आहेत सगळेच. ती वेल तुम्ही सांगूनपण खरी वाटत नाहीये .
इशूला जिराफ फार आवडले .
सही , मस्त फोटोज आणि माहितीही
सही , मस्त फोटोज आणि माहितीही .
दिनेशदा मस्त फोटोज!!! ती
दिनेशदा मस्त फोटोज!!!
ती वेल तुम्ही सांगूनपण खरी वाटत नाहीये .>>>उजु,+१
सुंदर
सुंदर
3, 15, 26, 30,36, 40 हे फोटो
3, 15, 26, 30,36, 40 हे फोटो अप्रतिम
सुंदर फोटो तिथले प्राणी आहेत
सुंदर फोटो
तिथले प्राणी आहेत रुबाबदार पण पिंजर्यात असल्यामूळे फोटो नीट काढता आले नाहीत. >>>> नशीब समजा ते आत आहेत नाहीतर त्या सिंहाचे फोटो काढायला आपण तेथे शिल्लक तरी राहाल का.....
मस्त आहेत फोटो सगळे. ती
मस्त आहेत फोटो सगळे. ती शेवटची वेल खूप मस्त. काही फुले पाहून आपल्याइथेही तिथली काही फुले दिसतात असे वाटले।
अहाहा... भारि सफर घडवलीत. इथे
अहाहा... भारि सफर घडवलीत. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी त्या जिराफाला तुमच्याबद्दल इतके ममत्व का दाटून आले असावे बरे?
एखादे हत्तीचे पिल्लु घेऊन यावे असे वाटतय....
जंगली (रान)डुक्कर पहिल्यांदाच असे बघितले फोटोत. आजवर प्रत्यक्ष बघायचा योग नाही आला, म्हणजे लिंबीच्या शेताजवळ त्यांच्या झुंडीची चाहुल बरेचदा घेतली आहे, लांबुन हाकलली आहेत पण प्रत्यक्ष नजरेत पडली नाहीत. अन ही रस्त्यावर मोकाट? भिती नाही वाटत कुणाला?
पुनर्भेट मस्तच प्रचि २३
पुनर्भेट मस्तच
प्रचि २३ सुंदर फुलं
मस्त फोटो व माहिती.. आवडले.
मस्त फोटो व माहिती..
आवडले.
ते जिराफांच्या माना वाकवून 'Shop' लिहायची कल्पना जबरि आहे.
सुंदर फोटो!!!
सुंदर फोटो!!!
दिनेशदा,लेख नेहमीप्रमाणे
दिनेशदा,लेख नेहमीप्रमाणे आवडेल असाच.जिराफ,रानडुक्कर,जास्वंद वैशिष्ट्यपूर्ण वाटले.
एका जिराफाने माझा गालच चाटला.
एका जिराफाने माझा गालच चाटला. अहो दिनेश दा ति मादा जिराफ होति तुम्हि येवढे छान जेवन बनवता हे तिलहि महित असेल .
फोटो आनि महिति मस्त.
वाह! मस्त.
वाह! मस्त.
मस्त फोटोज आणि माहितीही .
मस्त फोटोज आणि माहितीही .
व्वा !!! मस्त.
व्वा !!!
मस्त.
खुप सुंदर!!!
खुप सुंदर!!!
खुपच छान भेट झाली की! जिराफ,
खुपच छान भेट झाली की! जिराफ, हत्तीची पिल्ले, वनराज, जॅकरान्दा आणि ती शेवटची नाजुक वेल...सगळेच फोटो सुन्दर!
आभार सर्वा,चे ति वेल तर मी
आभार सर्वा,चे
ति वेल तर मी मनोमन चोरुन आणली आहे. केनयात असताना मी आणि मीनाभाभी अशी कुंपणालगत छान वेल दिसली कि तिथे छत्री खाली टाकायचो आणि छत्रीसोबत एखादे रोप उपटून घ्यायचो. मग छत्रीत लपवून ते रोप आणायचो.
केनयातले पक्षीही माणसांना बिचकत नाहीत. ते फोटोतले पक्षी रस्त्यावरच्या ट्राफीक मधून बिनधास्त पायी पायी फिरतात. त्यांचा विंगस्पॅन सहज मीटरभर असतो.
मोठी माकडे आणि रानडुक्करे, बहुदा नॅशनल पार्कच्या सीमा जुमानत नाहीत. कुठेही रस्त्यावर दिसतात. पण हल्ला वगैरे करत नाहीत.
ती जिराफं पण माणसांना चांगलीच सरावलीत. आपण खाऊ भरवला नाही तर आपणहून जवळ येतात आणि असा पापा घेतात !!!
दिनेशदा, मस्त सफर घडवलित !
दिनेशदा, मस्त सफर घडवलित !
सिरॅमिकचे मणी पाहून व्हेनिस
सिरॅमिकचे मणी पाहून व्हेनिस मधल्या मुरानो मण्यांची आठवण झाली
अहाहा..मस्त फोटो..सुंदर
अहाहा..मस्त फोटो..सुंदर फुलं..ती वेल तर एखादं पेंटिंग च वाटत आहे..
बेबी एलीफंट्स,प्रेमळ जिराफ, मोकाट बोअर्स.. किती मज्जा.. कोरी पक्ष्यांची वसाहत बरीच मोठी दिसतेय..
रंगीत मणीही सुर्रेख .. सिरॅमिक चे..म्हंजे बर्यापैकी जड असतील..
मस्त वाटलं फोटो पाहुन...
मस्त वाटलं फोटो पाहुन...
@ दिनेश., सर्व प्रकाशचित्रे
@ दिनेश., सर्व प्रकाशचित्रे छान आहेत. फुले तर एकाहून एक सुंदर!!
एक शंका! रानडुकरे मोकाट फिरताहेत. ती हल्ला करत नाहीत का?
मस्त. मणी आणि प्राणी माझे
मस्त. मणी आणि प्राणी माझे दोन्ही आव्डी चे विषय. हे मणी कुठे ऑनलाइन मिळतील का? लगेच मुंबई
नैरोबी भाडे बघून ठेवले. कब तोबी जावेंगे. नक्की. दिल्ली सावर व ३३ नं फोटोतल्या पिंक कलरची साडी चायना सिल्क नायतर शिफॉन काय मस्त दिसेल.
नैरोबीत खायचे काय?
डोळ्यांना सुंदर मेजवानी आहेत
डोळ्यांना सुंदर मेजवानी आहेत सर्व फोटो !!! वेलीचा फोटो खासच ...
काय सुरेख फोटो आणि वर्णनही...
काय सुरेख फोटो आणि वर्णनही... चेंडु जास्वंद खुप आवडला आणि तो तुर्रे वाला पक्षी पण...
दिनेशदा, मस्त सफर घडवलित !
दिनेशदा, मस्त सफर घडवलित ! >>>>+११११
http://www.kazuri.com अमा, या
http://www.kazuri.com
अमा, या साईटवर ते मणी मिळतील. तिथेच मग्ज वगैरे पण बनवतात. सर्व मणी मात्र हातानेच बनवतात साचे क्वचितच वापरतात. ति सर्व प्रोसेस तिथे बघता येते. किमती फार नाहीत.
ती रानडुक्करे मी अनेकदा बघितली आहेत तिथे. रस्ता क्रॉस करण्यासाठी, तो मोकळा व्हायची वाट बघत असतात. अजिबात हल्ला करण्याचा पवित्रा नसतो. तिथे त्यांना कुणी त्रास देत नाही आणि तीही कुणाला त्रास देत नाहीत.
Pages