आज कोडै टूरचा शेवटचा दिवस. सकाळी 9 वाजता मला त्रिचीची ट्रेन पकडून ड्युटी सुद्धा जॉईन करायची आहे. 80km चा प्रवास 4 तासात पूर्ण करायचा आहे. काल जो प्लॅन केला होता, तो प्रत्येक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. वेळ न घालवता मी लगेच फ्रेश झालो. सायकलची वॉटर बॉटल मध्ये गुलकोज मिक्स केल. थंडी आहे म्हणून स्वेटर घातले. 4:45 झाले पण माझे पाय काही रूम मधून निघत नव्हते. आज मला काही हि केलं तरी करेक्ट 5 ला निघायला पाहिजेे होत.
पण अंगात मस्ती रूम मधेच फोटो काढत बसलो. शेवटचा दिवस आहे ना !!!! रूम मध्येच 5 वाजले. पाच वाजता सायकल चालवायला सुरवात करायला पाहिजे होती पण मी आजून रूम मधेच होतो, डोक्यात फक्त आता ट्रेन आणि ड्युटी सुटणार याचाच विचार येऊ लागला. मग गडबडीत बॅग्स घेतल्या आणि चेक आऊटसाठी गेलो. हॉटेल मॅनेजर तर नव्हता. पण एक मुलगा होता त्याला झोपेतून उठवून चेक आऊट केल.
भाहेर आजुन अंधारच होता. अंधारामुळे मी टॉर्च लावला. ग्राउंड फ्लोअरला गेलो सायकल काढली. आधीच अंधार आणि त्यात मी टॉर्चच्या साह्याने सायकलला बॅग फिट करू लागलो, जर कोणी मला बघितलं असत तर नक्कीच मी चोर वाटलो असतो !!
फटाफट, टॉर्च हँडल होल्डर मध्ये सेट केला. जराशी पाऊसाची रिमझीम चालू झाली पण आता माझ्याकडे त्या रिमझीम कडे बघण्यासाठी वेळ नव्हता. सायकल चालू करण्याआधी एक फोटो घेतला. मेन रोड वर आलो. तिथे चहाच दुकान जस्ट उघडल होत. हॉटेल वाला म्हटला थांब 10 मिनिट. पण हिते मी आधीच 15 मिनिट लेट झालोय. म्हणून मी लगेच घाट उतरण्यास चालू केला. पुढे टॉर्च आणि मागे प्यानियर बॅगला रिफ्लेक्टर असल्याने सेफटीची काळजी नव्हती.
खर तर हि माझी पहिली मॉर्निंग राईड आहे, पण नाईट राईड पेक्ष्या काही कमी नाही. रोडच्या एका बाजुनी मोठे आणि उंच झाडे, दुसऱ्या बाजुनी खोल दरी,रोड वर लाईटचे पोल नसल्याने बघेल तिकडे अंधारच अंधार आणि रोड वर मी एकटाच. टॉर्च लाईट फक्त अर्ध्याच रोड वर प्रकाश टाकत होता. टॉर्चच्या प्रकाशाने रोडच्या मध्ये आणि दोन्ही बाजूंनी रेडियम चमखू लागले.त्यामुळे मला रोड किती बारीक-मोठा आहे ते कळू लागले. तरी पण जोपर्यंत उजडत नाही तोपर्यंत मला स्पीड वाढवता येणार नाही. कारण मला माझी सेफटी महत्वाची आहे. फक्त 2 ते 3 गाड्या मला क्रॉस झाल्या.
आणि अवघ्या 20 मिनिटात मी सिल्वर फॉल्स पाशी आलो.
मी फॉल्सचे फोटो घेण्यासाठी थांबलो. मी फॉल्सच्या शेजारच्या पुलावर जाऊन 2 ते 3 सेल्फी घेतल्या. अंधार असल्याने सल्फी काही खास नाही आली. हॉटेल सोडल्या पासून मला पहिल्यांदा हिथे माणसे रोडवर दिसली. त्यांना बघून जरा बरे वाटले. हे सारे सुर्योदयाची वाट बघत आहेत. ते फॉल्स बघून कोडैला जाणार. त्यातले काहींनी फॉल्स बघायचा सोडून माझ्या सायकलला बघायला सुरवात केली. 15 ते 20 जण सायकलला घेरा करून बघू लागले. मी परत आलो तर सगळे सायकल बाघण्यात वेस्थ झाले होते. मी सायकल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो पण कोणी वाट देतच नव्हतं. त्यावेळी गर्दीतल कोणीतरी म्हटल याची सायकल आहे. आधी मी माझ्या सायकल पर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत होतो. पण कोणीच वाट दिली नाही आणि कोणीतरी याची सायकल आहे म्हटल्या म्हटल्या क्लायमॅक्स बदलला. सारे जण बाजूला झाले, मला सायकल पर्यंत वाट दिली आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे फिरल्या. सायकल पर्यंत पोहोचतो ना पोहोचतोय तोपर्यंत काहींनी तमिळ मध्ये प्रश्न विचारायला सुरवात केली.मला जादा तमिळ येत नसल्याने (कालचा अनुभव होताच) मी थोडक्यात उत्तरे देण्याचा प्रयत्न करु लागलो. तिथून निसटत पाय कडून मी पुढच्या प्रवासाला निघालो .
उतार असल्याने मी 30 ते 32 च्या स्पीड ने सायकल चालवु लागलो. पण थोडे पुढे गेलो ना गेलो टर्न येत होते. असाच एक टर्न घेताना दोन गाड्या थांबल्या होत्या, येवड्या अंधारच्या गाड्या का थांबल्या आहेत बाघण्यासाठी स्पीड कमी केलं. नजरे मध्ये चहाच दुकान पडलं. विचार करायच्या आत मनानेच urgent ब्रेक लागला. आधीच तर उशीर झाला होता आणि आता चहासाठी वेळ वाया जाणार. उगीच एक मन दुसऱ्या मनाला समजूत घालत होत. टेन्शन नको घेऊ वेळेत पोहोचशील.
गाडी मधल्या दोन्ही फॅमिली थंडी मध्ये चहाचा आनंद घेत होते. महिला मंडळी दुकानापाशी चहा घेत होत्या. आणि पुरुषमंडळी दरीचा बाजूला सेफ्टी कंपाऊंड वर उभा राहून चहाचे घुटके घेत होते, ते आपण किती उंचावर आहोत हे अंधारातच न दिसून सुद्धा शोधायचा पर्यंत करत होते! जर अंधार नसता तर तिथे उभा राहण्याचं कोणी डेरींग सुद्धा केलं नसत.
दुकानात आजीबाई एकट्याच चहा बनवत होत्या. ते दुकान तरी कुठलं, दोनी बाजुनी फाटक्या ताडपद्री लावल्या होत्या. मागे तर डोंगरच होत. सायकल बाजूला लावली आणि आजीबाईला एक कप चहा सांगितला. तोपर्यंत मी सायकलचे ब्रेक वायर नीट आहेत का ते बघितले. सेफटी महत्वाची आहे. चहा प्यायला आपण सुद्धा तिकडेच कंपाऊंड पाशी जावं अस मनात आलं, पण वेळ नसल्यामुळे , सायकल पाशीच चहा घेतला. चहाच्या टेस्ट ने घरची आठवण आली. दुकानात घरच्या सारखा चहा! आजीबाईचा हतचा चहा मस्त आहे म्हणून परत एक कप चहा घेतला. अजीबाईंकडे फक्त दुकान टॉप क्लासच नव्हतं , पण चहाला तोड नाही. चहाचे पैसे दिले आणि सायकल चालवायला सुरवात केली.
आता उजडू लागलं. पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला. रस्ता नीट दिसु लागला. आता मी स्पीड वाढवायला सुरवात केली. सायकल आता 40 च स्पीड पकडू लागलं. आता रस्त्यावर गाड्यांची वर्दळ वाढली.
थंडगार हवा होती. मी तर मोठं मोठे श्वास घेऊ लागलो, कारण अशी थंडगार आणि स्वछ हवा मला घाट उतरल्यावर भेटणार नव्हती. रासत्यावर माणसे नव्हती. मी हाच घाट चढून आलो, चढताना स्पीड फक्त 7 ते 8 च होत आणि मी आता 40 च्या स्पीड ने चालोय. एक पेंडल न मारता सायकल जर 40च स्पीड पकडत असेल तर त्याचा आनंद सायकल चालवणाऱ्यालाच कळू शकतो! खूप आनंद झाला, येवडा झाला कि मी मोठं मोठयाने जोरात आनंदाने ओरडू लागलो. जस कि मी कुठली तरी म्याचच जिंकली होती. मी सेलीब्रेशनच्या मूड मध्ये येवडा आंधळा झालो कि माझ्याकडे रानात जाणाऱ्या 2 ते 3 बायका बघू लागल्या. ह्या 2 ते 3 बायका आता तरी रोड वर नव्हत्या आणि अचानक कश्या आल्या या विचाराने मी त्यांच्या कडे बघत ओरडण बंद केलं, त्या पण माझ्या कडे बघून हसायला लागल्या. मी मनात म्हटलं आपल्याला हिते कोण ओळखणार आहे. परत जोरात ओरडत सेलिब्रेशन चालू केले.
घाट चढताना पाऊस पडत होता म्हणून लांबचे काही दिसत नव्हते , पण आज मात्र वातावरण साफ आहे.
डोंगरांची एका पाटोपाट एक रंगच लागलीय अस दृश्य दिसले. म्हणून मी थांबून फोटो घेतले ज्यादा वेळ ना घालवता लगेच सायकल चालवायला घेतली.
घाट चढत असताना 8 उतार मोजले होते, आता मात्र तेच 8 उतार चढ झाले आहेत. सात वाजताच त्यातल्या काही चढानी माझा घाम कढला. चॉकलेटच सुद्धा दीड किलो वजन वाढल होत. एका ठिकाणी थांबून स्वेटर काडून बॅग मध्ये ठेवला. आणि तहान लागली होती म्हणून सायकलला लावलेली वॉटर बॉटल घ्यायला गेलो तर बाघतोय बॉटल गायब! डोक्या मध्ये विचार सुरु झाले , कुठे नक्की विसरली असेल बॉटल… डोक्याने उत्तर तर लगेच शोधून काढले सुद्धा !!!रूम मध्ये नुसतेच फोटो काढत बसल्याने उशीर झाला होता, नंतर मी सगळ्या बॅगा घाईगडबडीत घेतल्या आणि चेक आऊट केलं, पण बॉटल मात्र रूम मधेच राहिली…मी काही बॉटल आणण्यासाठी माघारी जाणार नव्हतो. मला फक्त ट्रेन आणि ड्युटी डोळ्यांसमोर दिसू लागले. मग रिजर्व वॉटर बॉटल बॅग मधून काढली, पाणी पिलो आणि लगेच पुढचा प्रवासाला निघालो.
घाटाच्या उतरणे माझी सायकल तस चांगलं स्पीड पकडत नव्हती. आणि मी जर याच स्पीडने जाऊ लागलो तर मी ट्रेन पकडू शकणार नाही. म्हणून वळण झाल रे झालं कि मी लगेच जोरात पेंडलिंग करायला लागलो. परत वळण आलं कि ब्रेक मारून वळण सेफ मध्ये पार करु लागलो. परत जोरात पेंडलिंग(कॉन्टिणुऊस सायकलिंग). अस मी घाट उतरण्यापर्यंत केलं. फास्ट चालवण्याच्या नादात माझे पाय दुखायला लागले. पण डोक्यात एकच गोष्ट, ट्रेन आणि ड्युटी ..! मी पायाकडे लक्ष द्यायचेच नाही अस ठरवलं...
पेरूमल मलै (Perumal malai) पाशी आलो. लक्षात आले कि घाट चढताना हिते जेवण करणार होतो पण मतदानामुळे मला जेवण मिळालंच नाही. परत जोरात सायकलिंग करत पुढे गेलो .नंतर पन्नईकडू (pannaikadu) लागल . मी हिते फक्त चहा पिला होता. नंतर लागल कुंबरै (Kumbarai) बस स्टँड. या जागेत माझी खास आठवण होती. त्याच बस स्टँडने जोरदार पाऊसापासून मला वाचविले होते. नंतर आले ते दम दम रॉक व्हिएव पॉईंट (DUM DUM ROCK VIEW POINT).मला रॅट तैल व्हिएव पॉईंट धुके असल्यामुळे बघायला भेटले नव्हते पण आज मात्र वातावरण साफ आहे, पण वेळे अभावी आज सुद्धा बघता येणार नाही. नंतर हा हा म्हणता चेक पोस्ट सुद्धा आला. एका पाटोपाट एक एक असे गावे पार झाली. Teni dindigul हायवे पर्यंत तसा उतारच आहे. पण मी 40 च्या स्पीड ने चालवण्याचा पर्यंत करु लागलो.
7:50 ला मी वतलागुंडूला (batalagundu) आलो.
कोडैला जाण्यापूर्वी मी एक मंदिरात आलो होतो. म्हणून मी जाताना सुद्धा जाऊ का नको याचा विचार करु लागलो. वेळ झाला होता, पण माझे मन मानले नाही मंदिर येताच सायकल बाजूला लावली, मंदिरात गेलो. दर्शन घेऊन परत सायकल चालवायला सुरवात केली.
आता फक्त 20km राहिले आहे. आणि माझ्या हाता मध्ये एक तास आहे. सुरवातीला तर मला हे टार्गेट वेळेत पूर्ण करीन अस वाटू लागलं, पण 5 km पुढे गेल्यावरच माझा डावा पाय बेंडच होत नव्हता. माझ्या या कॉन्टिणुऊस सायकलिंग पद्धतीमुळे माझा डावा पाय लॉक झाला. मी लगेच बॅगेतून स्प्रे आणि knee cap काढली. गुडघ्या भवति स्प्रे मारला आणि knee कॅप चढवला. मसल रिलीफचे मुमेन्ट केले आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो.
घाट चढताना गुडघे दुःखले नाहीत पण उतरताना मात्र दुखले. माझी मलाच विश्वास बसत नव्हता. पण knee कॅप आणि स्प्रेचा फायदा झाला. गुडघा दुखण्याचा नादात मी लॉंग रूटचा रास्ता पकडला . सिटीच्या भहेरून मी स्टेशनला 9:05 am पोहोचलो.
लगेच पार्सलसाठी स्टेशन मास्टर कडे गेलो . त्या मास्टरने आधी टोलवा टोलवी केली. म्हणाला "पार्सलसाठी कर्मचारी नाहीत". तेंव्हा मी कोडै वरून सायकल वर आलोय अस सांगितल्यावर तो तयार झाला.
मी लगेच पार्सलचे फॉर्म भरून सगळ्या प्रोसेस केल्या आणि सायकल 3 नंबर प्लॅटफॉर्म वर स्वतः आणली. आजून मी नाष्टा केला नाही. ट्रेन करेक्ट 10 वाजता आली. सायकल पार्सल बोगी मध्ये लोड केली आणि मी दुसऱ्या बोगी मध्ये बसलो. दिंडीगुल मध्ये मी नाष्टा केला. त्रिच्या मध्ये मी 1 वाजता पोहोचलो. तिथल्या पार्सल ऑफिसर ने मला विनाकारण 1 तास थांबवल. मला त्याचा खूप राग आला पण नाइलाजाने गप बसावे लागले. आजून 18 किलोमीटर लांब माझी रूम आहे आणि 4:30 ला ड्युटी जॉईन करायची आहे आणि हा ऑफिसर आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत होता. 2 वाजता मला माझी सायकल मिळाली. परत सायकलला बॅग्स फिट केल्या आणि रूम कडे निघालो. 3 वाजता मी रूम वर पोहोचलो. परत सायकलच्या बॅग्स काढल्या . अंघोळ केली आणि हॉटेला जेवण केल.
4:15 ला चॉकलेट घेऊन मी कंपनीत गेलो. मित्रांना टी ब्रेक मध्ये चॉकलेट दिले. मित्रांना तर खरेच वाटेना ....त्यांना मग सगळे फोटो दाखवू लोगलो. मी घरी फोन करून या तीन दिवसांची टुर कशी झाली ते सांगितल. घरचे सुरवातीला जरा नाराज झाले पण परत खुश झाले.(50-50)
माझी मलाच विश्वास बसत नाही कि मी आज सकाळी कोडैला 5 :15 होतो, जे माझ्यापासून 225km वर आहे, आणि आता मी त्रिची मध्ये 4:30 ला नाईट शिफ्ट करतोय.
ह्या टूर पासून मी एकच गोष्ट शिकलो परिस्थितीला तोंड देणे.परिस्थितीला समोर गेले तरच कळेल कि ती किती सोपी किंवा अवघड आहे. जर मी पाऊस पाडतोय म्हणून वतलागुंडू मधूनच माघारी आलो असतो तर???? आज हा लेख मी लिहिलाच नसता....
tour details
दिवस १
त्रिची ते कोडै रोड स्टेशन .......ट्रेनने
कोडै रोड स्टेशन ते वतलागुंडू 20km ...सायकलीवर
दिवस २
वतलागुंडू ते कोडै 59km in 7hrs... सायकलीवर
दिवस ३
कोडै फिरणं
दिवस ४
कोडै ते कोडै रोड स्टेशन ८०km in 4hrs. सायकलीवर
कोडै रोड स्टेशन ते त्रिची जंकॅशन ट्रेनने
त्रिची जंकॅशन ते जय नगर (रूम)18km 1hrs
आणि शेवटी ४:३० ला ड्युटी ......
सोलो सायकल राईड प्लान करताय???
टीप:-
1) जिथे जाणार आहेत तिथला रोड कसा आणि किती km आहे याची माहिती घेणे आवश्यक. (गूगल मॅप्स वरून) आणि जर का कोणी ओळखीची वेक्ती असेल तर उत्तमच.
2)ट्राफिक किती असत?
3)हॉटेल कशे आहेत?
4)हॉटेलला पार्किंगची सोय आहे का? *सायकल पार्किंगसाठी
5)दिवसाचे किती किलोमीटर टार्गेट ठेवणार? बरेचशे मी नेट वर लेख वाचले, त्यात ते 100km, 150km असं दिवसाला टार्गेट पूर्ण करतात. लक्षत ठेवा लिहिणाऱ्याच आणि तुमच ठिकाण वेगवेगळी असतात, आणि जर तेच लोकेशन असेल तर त्याचा आणि तुमचा स्टॅमिना वेगवेगळा असू शकतो.
6)टूरचे नेहमी छोटे छोटे भाग करा ..
7)जेवण कुठे करणार हे आधीच ठरवा आणि हो बॅकअपसाठी तुमच्याकडे थोडे energy bars ठेवा.
8)रिपेअर किट
9) सगळ्यात महत्वाचे म्हणजे सायकल रोडच्या एका साईडनेच चालवा....सेफ्टी महत्वाची आहे ....
@मनोज. धन्यवाद
@मनोज. धन्यवाद
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
@जाई. .. धन्यवाद ...
@जाई. .. धन्यवाद ...
@जाई. .. धन्यवाद ...
@जाई. .. धन्यवाद ...
चला आमचीही फ्री मध्ये टुर
चला आमचीही फ्री मध्ये टुर झाली तुमच्याबरोबर. राईड इंट्रेस्टिंग होती , मजा आली वाचायला.
आणि सेफ्टी महत्वाची आहेच त्यामुळे जे जे सेफ्टीगियर्स लागतील ते नक्की वापरा.
Thanx @ shree
Thanx @ shree
Pages