साहित्य :
स्लाईस ब्रेड : ५-६
उकडलेले बटाटे : मध्यम ४-५
वाफवलेले मक्याचे दाणे : १/४ वाटी
वाफवलेले मटार : १/४ वाटी
लोणी : ३-४ चमचे
आलं - लसूण - मिरची (ठेचून) - १ मोठा चमचा
अर्ध्या लिंबाचा रस
कोथिंबीर : १/२ वाटी
मीठ : चवीनुसार
साखर : चिमुटभर (ऐच्छिक)
रवा / ब्रेड्क्रम्स : (ऐच्छिक) २ चमचे
टोमॅटो सॉस
कृती :
१) मक्याचे दाणे व मटार थोडे चेचून घ्या. बटाटे किसून किंवा मॅश करून घ्या. त्यात चेचलेले मक्याचे दाणे व मटार घाला. ठेचलेली आलं - लसूण - मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. मीठ, साखर घाला.
२) सगळं नीट एकत्र करून घ्या. स्लाईसला एका बाजूला लोणी लावून त्याचे उभे तुकडे करून घ्या. उगीच कडा काढू बिढू नका. उलट कडा असलेल्या सोप्या जातात. दुसर्या बाजूला हे बटाट्याचं मिश्रण लावा. मिश्रण लावलेली बाजू रव्यात / ब्रेड्क्रम्स मधे घोळवा.
३) तव्यावर लोणी लावलेली बाजू आधी आणि मिश्रणाची बाजू नंतर अशा खमंग भाजून घ्या.
टोमॅटो सॉस किंवा कुठ्ल्याही डीप बरोबर वाढा.
४) तळले तर अजून छान लागेल, पण डाएट बाजूला ठेऊन खावे. बटाटा आणि ब्रेड दोघही तेलपिपासू आहेत.
सोपी कृती फोटो मस्त तोंपासू
सोपी कृती
फोटो मस्त तोंपासू दिसतोय.
केली पूर्ण! चुकून अर्ध्या त
केली पूर्ण! चुकून अर्ध्या त संपादित झाली
~साक्षी
छान आहे पाकृ, मस्त दिसताहेत
छान आहे पाकृ, मस्त दिसताहेत ब्रेड फिंगर्स.
मस्त आहे पाकृ
मस्त आहे पाकृ
छान आहे पाककृती. ब्रेड -
छान आहे पाककृती. ब्रेड - बटाटा राममिलाई जोडी आहे. नक्की यम्मी होणार.
धन्यवाद सगळ्याना!
धन्यवाद सगळ्याना!
यम्मी रेसिपी नक्की ट्राय करेल
यम्मी रेसिपी नक्की ट्राय करेल लवकरच .
टेस्टी दिसतेय पाक कृती
टेस्टी दिसतेय पाक कृती अगदी!!!
तोंपासु पाककृती.
तोंपासु पाककृती.
यम्मी रेसिपी
यम्मी रेसिपी
फोटो मस्त तोंपासू दिसतोय.
फोटो मस्त तोंपासू दिसतोय.
मस्त!
मस्त!
टेस्ती अन सोपी .. छान छान..
टेस्ती अन सोपी .. छान छान..
मस्त आहे ही आयडिया! छान
मस्त आहे ही आयडिया! छान दिसतायेत
सोप्पी आणि टेस्टी पाककृती.
सोप्पी आणि टेस्टी पाककृती.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
मस्त आणि चटपटीत....तोंपासु!!!
मस्त आणि चटपटीत....तोंपासु!!!
मस्त एकदम क्रिस्प दिसताहेत.
मस्त एकदम क्रिस्प दिसताहेत. फिंगर्स भाजल्यावर कट केली ना? की ब्रेडच्या स्लाइस आधी कापून घेतल्या?
भरत, धन्यवाद! आधी लोणी लवून
भरत,
धन्यवाद!
आधी लोणी लवून कट केली, मग बटाटा मिश्रण लावले, मग रव्यात घोळवून भाजली. आधी भा़ऊन कट करणे थोडे कठीण जाईल.
~साक्षी
मस्त रेसिपि आहे साक्षी.
मस्त रेसिपि आहे साक्षी.