श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती - आरती

Submitted by admin on 12 September, 2016 - 23:43

व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानानं गेल्या काही वर्षांत बरीच प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आभासी किंवा प्रत्यक्षातलं जग थ्री-डीमध्ये अनुभवता येतं.

या तंत्रज्ञानामुळेच 'आभाळमाया' या पुण्यातल्या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांना 'ऑक्यूलस व्हीआर गीअर'च्या मदतीनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणं शक्य झालं. आपण साक्षात मंडपात उभं राहून बाप्पाचं दर्शन घेत आहोत, असा अनुभव त्यांना आला.

'डिजिटल आर्ट व्हीआरई' ही व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी व डिजिटल आर्ट या क्षेत्रांमध्ये काम करणारी संस्था आहे. या संस्थेनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मंडपातली आरती ३६० अंशांमध्ये चित्रीत केली. गणेशोत्सवादरम्यानच्या गर्दीत गणपतीचं प्रत्यक्ष दर्शन घेणं शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती यामुळे घेता आली.

'डिजिटल आर्ट व्हीआरई' यांच्या सौजन्यानं मायबोलीकरांनाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घरबसल्या घेणं शक्य झालं आहे. त्यांनी चित्रीत केलेला व्हिडिओ मायबोलीच्या यूट्यूब वाहिनीवर आता उपलब्ध आहे.

भारतातल्या आणि परदेशातल्या मायबोलीकरांना 'ऑक्यूलस व्हीआर गीअर'च्या मदतीनंही या व्हिडिओची अनुभूती घेता येईल.

व्हिडिओच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात असलेल्या बाणांवर क्लिक केल्यास किंवा माऊसच्या मदतीनं आपल्याला ३६० अंशांतून श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या मंडपाचा देखावा पाहता येईल.

***

हा व्हिडिओ मायबोली.कॉमला उपलब्ध करून दिल्याबद्दल 'डिजिटल आर्ट व्हीआरई' यांचे मनःपूर्वक आभार.

विशेष आभार - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

***

या व्हिडिओचा प्रताधिकार 'डिजिटल आर्ट व्हीआरई' यांच्याकडे सुरक्षित आहे.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा व्हिडीयो पहाण्यासाठी 'ऑक्यूलस व्हीआर गीअर' ची गरज नाही.

१) आपण आपल्या मोबाईलवरही पाहू शकता. व्हिडीयो सुरु झाल्यावर वेगवेगळ्या कोनातून त्यावर बोट फिरवल्यावर त्या त्या कोनातून व्हिडीयो पाहतो आहे असे दिसते.

२) मी गुगल कार्डबोर्ड च्या मदतीने (किंमत $२०) हे पाहिले. एक अतिशय थक्क करून टाकणारा अनुभव होता. वेबवर बर्‍याच ठिकाणी गुगल कार्डबोर्ड $१५-$२५ मधे मिळते. इतकेच नाही तर घरी सुद्धा तयार करता येईल.

https://www.google.com/search?q=how+to+make+google+cardboard+at+home&ie=...

https://vr.google.com/cardboard/

यूट्युबवर असे अनेक ३६० व्हिडीयो उपलब्ध आहेत.