मजा घेत वाचा
कामावर जायलाऽऽऽऽ...
उशीर व्हायलाऽऽऽऽ...
कामावर जायला, उशीर व्हायला.,
लावतोय रिक्षावालाऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..
साडेआठ वाजताऽऽऽऽ...
आलेय नाक्यालाऽऽऽऽ...
साडेआठ वाजता, आलेय नाक्याला,.
वाजले की आता बाराऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..
...
तर लोकहो,
दुपार तशी मस्त होती, पण गर्लफ्रेंड आपली, (रुनम्याची हो) त्रस्त होती
पोहोचायचे होते टायमावर, पण सारी लाईने व्यस्त होती
रिक्षा काही मिळत नव्हती, वेळ नुसती पळत होती
दिसत होती लांबून लांबून, पण येत नव्हती थांबून थांबून
जायचे होते तिला जिथे,
रिटर्न भाडे नव्हते तिथे
डबल भाडे द्यावे लागेल,
शेअरींगवाला घ्यावा लागेल
तीन गुणा लगान सारखा,
टोल चौपट द्यावा लागेल
अर्ध्या रस्त्यावर सोडेन तुला,
तिथून चालत जावे लागेल
पैसे सुट्टे आधीच काढा,
नसल्यास ताई रस्ता सोडा
रिक्षा पिवळी, पोर सावळी
उन्हात थांबून पडली काळी
दया कोणाला येत नव्हती
माया तर एक मेमसाब होती
याडं लावलंऽऽ याड लावलं रेऽऽ
रिक्षावाल्यांनी या याड लावलं रे ....
अन फायनली .......
गर्लफ्रेंड अखेर वैतागली, आणि लावला तिने फोन..
म्हणजे आपल्या रुनम्यालाच हो, आणखी आहे कोण?
लाईट कॅमेरा अॅक्शन मुजिक ..
नात्याला काही नाव नसावेऽऽ तू ही रे मेरा रुनम्याऽऽ
नाक्याला तुझी वाट बघतेऽऽ लौकर ये रे रुनम्याऽऽ
तर लोकहो,
पाऊस आला जोरात, आणि मडके गेले वाहून
अर्धी मुंबई तुंबली, तरी रुनम्या आला धावून
आला तर आला, वर बोलतो कसा ..
लाईट कॅमेरा अॅक्शन नाचो ..
उरात होतेय धडधड लाली गालावर आली
रिक्षा नाही सापडली आन आठवण माझी झाली
लई दुरून आलोया, गाव फिरून आलोया
आनं तुझ्याचसाठी रिक्षावाली घेऊन आलोया ..
तर लोकहो,
रिक्षा आली, रिक्षावालीही आली
महिला शक्ती, इथेही सरस झाली
पण स्टोरी ईथेच, दि एण्ड नाही झाली
संगीतिका अभी.... बाकी है मेरे दोस्त !
लाईट कॅमेरा अॅक्शन, धरा ताल
हे मीटर धावे तुरूतुरू
आता झाले नाही सुरू
तरी बत्तीस कसे दाखवते हे..
रुनम्याला समजेना
गर्लफ्रेंडला उमजेना
तरी द्यावे लागणार होतील तितके
आईचा घो
व्होट अपील झकास रे रुन्म्या
व्होट अपील झकास रे रुन्म्या पण
देव करो, आणि तुमचा पहिल्या तीनांत क्रमांक न येवो. आम्हांस तुमच्या विरहाची कल्पनाहि करवत नाही. >>>> यालाच अनुमोदन
ऋ, माझं मत तुलाच. ऑफर कायच्या
ऋ, माझं मत तुलाच.
ऑफर कायच्या काय आहेत. पण तु असंच लिहिलयंस हे माहित आहे.
एक म ल ब य पाकृ पण लिही की
एक म ल ब य पाकृ पण लिही की पिंट्याला हाताशी घेउन.
मका - फ्रीजात सापडलेले आठच मक्याचे दाणे
लसुण - टोपलीत सुकलेले दोनच लसणीच्या पाकळ्या
बटाटा - टोपलीत दुर्लक्षित राहिलेला एकच बटाटा
य काय ते तु ठरव
Jamalay
Jamalay
मस्तय हे ऋन्मेऽऽष स्मित
मस्तय हे ऋन्मेऽऽष स्मित
सस्मित+1 खूप दिवस झाले
सस्मित+1
खूप दिवस झाले पिंट्या दिसलेला नाहीये.
लै भारि boss
लै भारि boss
लै भारी मित्रा! मस्तंच!
लै भारी मित्रा! मस्तंच!
सही जमलंय . व्होट अपील पण लय
सही जमलंय .
व्होट अपील पण लय भारी .
ऋन्मेष जबरदस्त दोन ऑफर
ऋन्मेष जबरदस्त

दोन ऑफर म्हणून आठ वेगवेगळ्या ऑफरा ठेवल्यास की बाळा
मस्त जमलय..
मस्त जमलय..
हे भारी जमलय ऋन्मेऽऽष
हे भारी जमलय ऋन्मेऽऽष
हेहे... मस्त जमलय...
हेहे... मस्त जमलय...
सस्मित भारीच, ऋ gf मध्ये मग्न
सस्मित भारीच, ऋ gf मध्ये मग्न असताना, पिंट्याची आठवण करून दिलीत.
अनूताई, दोन काय आणि आठ काय,
अनूताई, दोन काय आणि आठ काय, त्या ऑफर फक्त धागा वर काढायला आणि प्रतिसाद वाढवायला दिल्या होत्या. धाग्यावरचे वाढते प्रतिसाद हेच माझे बक्षीस असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटले की ही स्पर्धेची एंट्री असल्याने कोणी याचे विडंबन नाही केले
पिंट्या सध्या सुखात आहे,
पिंट्या सध्या सुखात आहे, त्याच्या आईच्या हातचे खातोय, पण तरी येईल कधीतरी लवकरच माझ्याही हातचे खायला., वाईट वेळ कोणावर सांगून येते का..
ऋन्मेष संगीतक आणि प्रतिक्रिया
ऋन्मेष
संगीतक आणि प्रतिक्रिया दोन्ही मस्त....
संपादीत करताना (फारसे जमले
संपादीत करताना (फारसे जमले नाही असे वाटल्याने) कापलेले गाणे - धागा वर आणायला टाकतोय - सैराटच्या चालीत..
रिक्षा पिवळीs.. पोरं कवळीs..
जपून चालवा ताssई
पोटाला बसती, हादरे रिक्षा
खड्ड्यामधुनी जाई
ओ रिक्षाss वाल्या ताईss
मला नाहीsss घाईss
मला पोचवाss घरी सुखरूप
वाट बघतेयss आई
अस्सा ग बया कां ss ... तू ब्रेक मारला..
खुप मस्त जमले आहे.. कविता
खुप मस्त जमले आहे.. कविता टाइप प्रकार असल्याने हा ऋन्मेषचा प्रांत नाही,तर एंट्री येणार नाही,असे वाटले होते. पण इथे देखील बाजी मारली..!
स्पर्धेसाठी खुप शुभेच्छा!!☺
छान
छान
Runmesh bhau..Tumach likhan
Runmesh bhau..Tumach likhan lay bharrii aahe..infact me tumache likhan ani tyavarche replies vachnyasathich maayboli var yeto.
Tyaach kay aahe mi eka USFDA aproved MNC madhye kaam karto..tyamule kamache tension 8 tass duty ani sandhyakali 6 vajta mazya GOA madhlya FLAT var pohochto.
Tyananatr GIRLFRIEND barobar bolne. Tila reply dene, gifts dene yatun vel kadhun tumch likhan vachato.
Hahaha..tumachyach style madhye lihlay bagha jamalay ka? Hi lekhanshaili ata Runmesh lekhanshaili mhanun famous honar.
Jokes apart..I am fan of ur sporting nature. Its great how you take jokes on u sportingly..hatsoff
मस्त! व्होट अपील तर लयंच
मस्त! व्होट अपील तर लयंच भारी! रुन्म्याच्या खिलाडू वृत्तीची फैन
मंजूताई
माणिकमोती, ऋन्मेषने पावसावर
माणिकमोती, ऋन्मेषने पावसावर वगैरे कविता केल्यात, मागे माबोवर वाचल्या होत्या असं आठवतंय.
अंजू हो, पण ते असेच टाईमपास
अंजू हो, पण ते असेच टाईमपास होते. एखाददुसरी चारोळी जमलीही असेल पण माणिकमोती म्हणतात तसे कवितेच्या राज्यात मी परप्रांतीयच आहे. गणेशोत्सव स्पर्धा उपक्रमात भाग घ्यायचे या हेतूपायी पद्यात लिहिले गेले.
बाकी काही लोकांनी वोट अपील जरा जास्तच सिरीअसली घेतलेय
वोट अपिल सिरीयसली घेतलंय हे
वोट अपिल सिरीयसली घेतलंय हे खरंय
. दिसतंय ते.
तुमच्या ऋन्मेऽऽष | 13
तुमच्या ऋन्मेऽऽष | 13 September, 2016 - 22:57 या पोस्टीत तुमच्या प्रथम क्रमांकाचे मर्म आहे हे कळले.
(No subject)
धन्यवाद संयोजक आता पाहिले
धन्यवाद संयोजक

आता पाहिले हे.. लय भारी जमलेय.. लग्गेच डालो करतो
माझा आंतरजालीय शोध घेताना आता हे सर्टीफिकेट सुद्धा सापडेल
Pages