आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!
या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.
चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.
स्पर्धेचे नियम -
१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________
या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या
'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250
'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251
मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.
मुख्य ३ घटकांखेरीज इतर
मुख्य ३ घटकांखेरीज इतर पदार्थ कोणत्याही अक्षरापासुन असले तर चालतील ना?
अनिलचेंबुर बरोबर. टोमॅटो
अनिलचेंबुर बरोबर. टोमॅटो बद्दल, किंवा मिरचीबद्दल ठीक आहे की हेच आधी हिरवे असतात मग पिकले की लाल होतात. त्यांना आपण लाल न म्हणता पिकले टोमॅटो अथवा पिकल्या मिरच्या कदाचित म्हणु शकु.
पण भोपळ्याबद्दल तसं नाही. लाल भोपळा, दुधी भोपळा, काशी भोपळा (काशीफळ), या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, आणि ही प्रचलीत नावे आहेत.
हिरवे टोम्याटो व लाल टो याही
हिरवे टोम्याटो व लाल टो याही चवीच्या दृष्टीने भिन्न वस्तू आहेत.. त्या एकमेकाला सबस्टिट्युट होऊ शकत नाहीत .. कैरी व आंबा ..याही पाककृतीच्या बाबतीत दोन भिन्न वस्तू ठरतील.
म वरून मावा आणि ब वरून
म वरून मावा आणि ब वरून बदाम.
मस्त मिठाई होऊन जाऊ द्या.
आणि त्यावर ल वरून लवंग खोचा छानपैकी
झाले की य वरून या करत मला खायला बोलवा
सोबत, म वरून महंमद रफी घ्या ल
सोबत,
म वरून महंमद रफी घ्या
ल वरून लता घ्या,
ब वरून बालसुब्रमण्यम घ्या
य वरून याज्ञिकांची अलका घ्या..
जे काही कराल ते साग्रसंगीत होऊन जाऊ द्या
ऋ हसवलंस रे बाळा...
ऋ हसवलंस रे बाळा...
ऋन्मेष
ऋन्मेष
ऋ , सही रे . कमाल आहेस तू .
ऋ , सही रे . कमाल आहेस तू .
अरूंधती...... तुस्स्सी ग्रेट
अरूंधती...... तुस्स्सी ग्रेट हो पाजी!!! बेलवांगे!!!!!!!! येस्स्स फॉर टोमॅटो.
म वरून मिका सिंग घ्या आणि आज की पार्टी मेरी तरफसे म्हणत काय ते वाढा. (नायतर पाककृतीच्या शेवटी समोर सामानाच्या बिलाचे फोटो लावायचे.)
उप्सी डुप्सी! खरंच की!
उप्सी डुप्सी!
खरंच की! अरुंधतींनी टोमॅटोला चक्क योग्य शब्द सांगीतलाय हे लक्षातपण नाही आले.
तुम्हाला शुभेच्छा सीमंतिनी.
रंगानुसार घटक पदार्थ वेगळा
रंगानुसार घटक पदार्थ वेगळा ठरणार नाही पण लाल भोपळा हा इतर भोपळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे ल अक्षरासाठी लाल भोपळा वापरता येईल. अजून कुठलेही लाल पर्याय मिळणार नाहीत
मनीमोहोर, आपणासही शुभेच्छा
मनीमोहोर, आपणासही शुभेच्छा
या ग्रुपचे सदस्यत्व कसे
या ग्रुपचे सदस्यत्व कसे घ्यावे ? कृपया मला मदत करा....
उषा, धीर धरा... अजुन नोंदणी
उषा, धीर धरा... अजुन नोंदणी साठी खुले केले नाहीये ... शुभेच्छा!
उषा, याच पानावर अगदी वर
उषा, याच पानावर अगदी वर उजवीकडे 'मायबोली गणेशोत्सव २०१६' दिसतंय? त्यावर क्लिक करा.
उषा, 'मायबोली गणेशोत्सव २०१६'
उषा, 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
संयोजक धन्यवाद , मानव, आभार
संयोजक धन्यवाद ,
मानव, आभार
साती ताईने होम वर्क दिलाय
साती ताईने होम वर्क दिलाय .... सोनु, अकु मदतीला धावुन आल्या आणि मनोबल वाढवायला व खेळकर वातावरण ठेवायला रुन्म्या आहेच..... चला! लागा कामाला....
ब - बेसिल, ब्रोकोली, बाजरी,
ब - बेसिल, ब्रोकोली, बाजरी, बाजरी लाही, बाजरी लाही पीठ, बाजरी कुरमुरे
म - मालत्या (खीरवाल्या), मुळा, मुळ्याचा पाला, मुरमुरे, मक्याचे पीठ, मका लाही, मोरावळा, मायाळू भाजीपाला, मॅगी नूडल्स
ल - लोणकढे तूप, लसूणपात.
मंजूताई , भरत , मॅगी......
मंजूताई , भरत , मॅगी...... खुप धन्यवाद
हे म्हणजे हुशार मुला -
हे म्हणजे हुशार मुला - मुलींनी सगळ्यांना कॉप्या वाटल्यासारखं झालं
लिस्टा करा पण पदार्थ पण करा लवकर लवकर
रीये, पदार्थ असे निगुतीने व
रीये, पदार्थ असे निगुतीने व झटपट जमत असते तर लिस्टा करतच बसलो नसतो! आता नुसती मानसिक जुळवाजुळव चालू आहे!!
संयोजक, वरती म वरून म्यागी
संयोजक,
वरती म वरून म्यागी नूडल्स लिहिले आहे.
ते चालेल का?
चालत असल्यास बघा हं, मग मी पण भाग घेणार..
नाही चालणार. नूडल्स हा घटक
नाही चालणार. नूडल्स हा घटक पदार्थ आहे. म्यागी/ ट्यागी काहीही ब्रँड असो..
म्यागी/ ट्यागी >>>
म्यागी/ ट्यागी >>>
जाऊ दे ऋन्मेष, तसही शाखा Top
जाऊ दे ऋन्मेष, तसही शाखा Top Ramen खातो, मॅगी नाही.
सामिष पदार्थ वापरता येणार
सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
घोर अन्याय !
सस्मित हसू नका, ट्यागी तसेही
सस्मित हसू नका, ट्यागी तसेही चाल्ले नसतेच. मायबोलीत ट येत नाही.
आणि मानव शाहरूखने अमिताभलाही बरेचदा खाल्लेय. पण त्याचा विषय ईथे काढू नका. लोकं मला खातील.
संयोजक आभारी आहे.
एक प्रश्न?
म्यागी हा ब्रांड आहे. पण नूडल्स मुख्यत्वे ज्या धान्यापासून बनल्या असतील ते धान्य म य ब ल मध्ये ये त असेल तर चालेल का
हो. उदा. मक्याचे पीठ चालेल
हो. उदा. मक्याचे पीठ चालेल तसे मक्याच्या पिठाचे नूडल्स चालतील.
पण मिक्स पिठांचे नूडल्स चालणार नाहीत.
एवढे नव्वद झाले प्रतिसाद पण
एवढे नव्वद झाले प्रतिसाद पण अजनू रेसिपी नाही आलीय एक
Pages