आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!
या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.
चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.
स्पर्धेचे नियम -
१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________
या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या
'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250
'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251
मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.
संयोजक आपला निर्णय अंतिम आहे
संयोजक आपला निर्णय अंतिम आहे . पण मला वाटत पावाचा मुख्य घटक कणीक किंवा मैदा पाहिजे. पाव करायला यीस्ट्ची गरज असते अगदी मान्य पण पाव कशा पसून करतात याला यीस्ट हे उत्तर योग्य होणार नाही तसे तर पाण्यावाचून ही पाव करण्य अश्क्य आहे म्ह्णून पावाचा मुख्य घटक पाणी ठरत नाही तसेच आहे हे . पावाचा मुख्य घटक मैदा किंवा कणीक हे जास्त योग्य आहे. उपमा ही मीठाशिवाय होणार नाही म्हणून उपम्याचा मुख्य घटक मीठ नाही ना म्हणत आपण
सीमंतिनी, लाल, हिरवा, पिवळा
सीमंतिनी, लाल, हिरवा, पिवळा सगळे टोमॅटोच आहेत. कुठल्याही रंगाला स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही
मनीमोहर, फक्त पावापुरतं यीस्ट महत्त्वाचं आहे म्हणून तो मुख्य घटकात धरत आहोत आणि मुख्य घटक तीन आहेत त्यामुळे त्यांचे प्रमाण कमीजास्त चालणार आहे. मीठ अत्यावश्यक असले तरीही तो उपघटक आहे त्यामुळे त्यावर बंधन नाही.
कोण बनणार मामा म य ब ल .. मा
कोण बनणार मामा
म य ब ल .. मा य बो ली .. वाह संयोजकांच्या कल्पकतेची झलकिया दिसायला सुरुवात
ब वरून डबल ब बोंबील बटाटाच पहिला आठवलेला. पण गणपती स्पेशल शाकाहारी स्पर्धा आहे हे नंतर ध्यानात आले. आणि त्यानंतर ही पदार्थ खायची नाही तर पदार्थ बनवायची स्पर्धा आहे हे ही ध्यानात आले. त्यामुळे आपण ईथे फक्त प्रेक्षक !
तर मामा लोक, मस्त डोळ्यांचे पारणे फिटतील असे फोटू टाका. कदाचित तुमच्या या पाकृ पाकृ मध्ये लग्नातील जेवणाचा स्पेशल मेनू मिळून जाईल
सर्वांना आल द बेस्ट !
ममो, मीठ न घालताही उपमा
ममो, मीठ न घालताही उपमा बनतो. ज्यांना मीठ खाणे वर्ज्य आहे ते बिनमिठाचा उपमा खाऊ शकतात. मीठ नसले तर काहीही बनणार नाही असे नाही तर बनलेले आपण खाऊ इच्छिणार नाही. बाकी पदार्थाच्या बाह्यरूपात काही फरक पडत नाही.
यीस्ट नसेल तर पाव फुगणार नाही. जो पदार्थ तयार होईल त्याला आपण पाव म्हणणार नाही आणि मीठ अगदी योग्य असले तरीही तो खाल्ला जाणार नाही.
अगं आणि तसेही तीन मुख्य घटक हवेत ना. म्हणजे मोदकाचे तीन मुख्य घटक विचारले तर तांदूळ पिठी, ओले खोबरे आणि गुळ म्हणता येतील तसे पावाचे मैदा, यीस्ट आणि खुमारी वाढवण्यासाठी अजून एक काहीतरी घेता येईल ना.
अरे अरे नो टॉमटो.. मग आता
अरे अरे नो टॉमटो.. मग आता लिची मार्टीनी विथ बर्फ लिहावे लागणार.
सी, मार्टिनी हा घटक
सी, मार्टिनी हा घटक नाही..
कृपया आपल्या कल्पना इथे फोडू नका. स्पर्धेसाठी वापरा
चायपे चर्चा चालु है.
चायपे चर्चा चालु है.
सी
सी
मस्त! कल्पना आवडली!
मस्त! कल्पना आवडली!
सीमंतिनी
सीमंतिनी
भर घाला, मी एडिटते.
भर घाला, मी एडिटते.
मका
मखाणे
मटार
मटकी
मसुर
मशरूम
मलई
मनुके
मावा
माठ
मिरची
मी
मुळा
मूग
मेथी
मैदा
मोहरी
मोसंबी
मौ
मं
य
या
यि
यीस्ट
यु
यू
ये
यै
यो
यौ
यं
बर्फ
बदाम
बटाटा
बत्तासे
बडीशेप
बटरस्कॉच, ब्राऊन शुगर (??)
ब्ल्यू बेरी
बा
बांबू (कोवळा)
बिस्किट
बीट
बु
बुंदी
बू
बेसन
बेदाणे
बेलफळ
ब्रेड ( पाव म्हणजे लादी पाव. ब्रेड म्हणजे स्लाईस ब्रेड. पण हे कदाचित नाही चालणार)
बै
बोरे
बौ
बं
लसूण
लवंग
लस्सी
ला
लिची
लिंबू
ली
लु
लू
ले
लै
लोणी
लौ
लं
चार पैकी, कुठल्याही तीन
चार पैकी, कुठल्याही तीन अक्षरांचे घटक हे मुख्य घटक म्हणून असलेच पाहिजेत. असेच ना? बरोबर ना.
माझ्या प्रश्णाचे उत्तर द्या ना संयोजक...
पण य वरून काय असेल?
पण य वरून काय असेल?
यवतमाळतांदुळ, यवतमाळकणीक,
यवतमाळतांदुळ, यवतमाळकणीक, यवतमाळपोहे, यवतमाळटोमॅटो, यवतमाळभोपळा, यवतमाळवांगी, यवतमाळदूध, यवतमाळदही, वगैरे......
स्पर्धकांनी पुरावा म्हणुन यवतमाळचे परतीचे तिकीट आणि यवतमाळच्या दुकानात जिन्नस खरेदी केल्याची पावती यांचे स्प्ष्ट प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
येरवडातांदू़ळ, येरवडाकणीक,
येरवडातांदू़ळ, येरवडाकणीक, ........ चालेल का?
मानव, मग म वरून मानव यांनी
मानव,
मग म वरून मानव यांनी विकत घेतलेले सारे जिन्नस घेऊया. तुम्ही ते विकत घेत असतानाचा सेल्फी टाका बरं
यवतमाळ तांदूळ मग मळलेली कणीक
यवतमाळ तांदूळ मग मळलेली कणीक सारखे होइल.
येसवार मसाला?
तांदूळ 'बासमती' चालतील 'यव'
तांदूळ 'बासमती' चालतील
'यव' चालतील
कुणाला 'याम' नावाचे कंद नाही
कुणाला 'याम' नावाचे कंद नाही का सुचले?
येसूर नावाचा मसाला सूचला नाही
येसूर नावाचा मसाला सूचला नाही का?
दिनेशदांच्या लेखनात जा,
दिनेशदांच्या लेखनात जा, कुठल्याही अक्षरावरून सापडतील मुख्य पदार्थ!
झंपींनी लिहीलाय येसवार मसाला,
झंपींनी लिहीलाय येसवार मसाला, तोच येसूर मसाला.
यंण्दाच्या गणेशोत्सवामध्ये
यंण्दाच्या गणेशोत्सवामध्ये मैदा, यीस्ट हेच कॉम्बिनेशन हिट जाईल असा आमचा अंदाज.
संयोजक, म पासून मलई चालेल का?
संयोजक, म पासून मलई चालेल का? की तो हिंदी शब्द होतो?
तसेच दलिया ला लापशी रवाही म्हणतात, मग ल पासून ते चालू शकेल का?
मला मेंबर करा
मला मेंबर करा
ल - लाही / लाहीपीठ म -
ल - लाही / लाहीपीठ
म - मेतकूट
म - मोसंबे
म - मलई
म - मनुका
म - मसूर / मसूरडाळ
म - मूग
म - मोड आलेले मूग / मटकी
म - मटार, मटकी डाळ, मोड आलेली मेथी
म - मोहाची फुले
म - मोहरी, मिरी, मिरची
म - मध
ब - बेरी
ब - बिरड्या
ब - बेलवांगे (टोमॅटो)
ब - बत्तासा
ब - बिब्बा
ब - बेलफळ
ब - बोरकूट
ब - बहावा मगज
ब - बाळकैरी / बाळबटाटे
ब - बेहडा
ब - बेदाणा
ल मध्ये लाल भोपळा चालेल का
ल मध्ये लाल भोपळा चालेल का संयोजक ?
आशिका, लापशी रवा नाही चालणार.
आशिका, लापशी रवा नाही चालणार. शहाळ्यातली मलई म्हणजे पातळ खोबरं चालेल. साय नाही चालणार.
लाल भोपळा नाही चालणार.
लाल भोपळा , दुधी भोपळा या
लाल भोपळा , दुधी भोपळा या भिन्न वस्तू आहेत, नुसत्या भोपळा एका शब्दात त्या कशा इन्क्युड होतील?
हो मला ही तसंच वाटतंय,
हो मला ही तसंच वाटतंय, अनिलचेंबूर
Pages