आमचं आम्ही बघू

Submitted by Manaskanya on 4 August, 2016 - 11:21

हल्ली एक नवीनच उद्योग लागलाय सगळ्या जगाला सारखे आम्हाला नावे ठेवतात.

आम्हाला म्हणजे अमेरिकेला हो.

काय तर म्हणे एवढ्या मोठया ३०० मिलियन लोकांच्या देशातून आम्ही दोन अफलातून उमेदवार निवडलेत

तरी माझ्या मैत्रिणीना मी आधीपासून सांगत होते हिलरी समोर Trump च असणार

पण नाही बसल्या आपल्या Cruz आणि Rubio करत.

बघा आता जिंकला का नाही Trump.

अहो किती पैसे आहे माणसाकडे. आता त्यानेच डोकंही वापरायचं. काहीतरीच तुमचं.

असा Joker आधी बघितला नाही म्हणे. मग आता बघा ना

हिलरीने म्हणे ३०००च्या वर इमेल्सचा घोळ घातला. कळत कस नाही तुम्हाला तिला क्लीन चिट मिळालीये.

हे बघा आमचे बराकभाऊ सतत ८ वर्षे ह्या देशाचा, इकॉनॉमीचा आणि इन्शुरन्सचा भार वाहून थकले.

सुरुवातीला कसे तरुण दिसत होते. आठ वर्षात पार रया गेलीय. केस पांढरे झाले. आता बस. हा भार एकदा का त्या दोनपैकी एका वृद्ध खांद्यावर टाकला की बराकभाऊ मोकळे

त्यांची जेष्ठ कन्या Harvard ला जाणार. त्याआधी एक वर्ष ती घरीच राहून आपल्या आईबाबांसोबत वेळ घालवणार आहे

हिलरीला मदत करायला बिल आहेच. त्याला किती म्हणून आठवतात ते जुने दिवस. पुन्हा एखादी मोनिका मिळेल. किती खुशीत आहे गडी

Trump च तर काय. काहीही बोलला तर त्याची तीन मोठी मुलं आहेतच सांभाळून घ्यायला. आता तर त्याची दुसरी कन्या पण सज्ज आहे आपल्या सावत्र बहीण भावांना मदत करायला. अमेरिकन भाषेत हिला Half Sister म्हणायचं बरं का.

शिवाय त्यांची सुविद्य (?) पत्नी मस्त कॉपी करते. अगदी मिशेलवाहिनी सारखंच सगळं सांभाळू शकते. तशीच बोलते. किती साम्य आहे ना त्यांच्या बोलण्यात.

ह्या सगळ्यात तुमची आमची आणि सगळ्या जगाची छान करमणूक होतेय. 'Trump and Hillary कॉमेडी Show began . टॅक्स फ्री एंटरटेनमेंट आहे.

आता आमचं आम्ही काय ते बघून घेऊ नोव्हेंबर मध्ये.
तोवर तुम्ही हसा उगीच नावं ठेवू नका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॅक्स फ्री एंटरटेअनमेंट बघत आहोतच.

पण नंतर ट्रंपकार्डाचा भुर्दंड पडू नये अमेरिकनांना एवढीच सदिच्छा!

(नैतर आम्ही भारतीयांनी काय भजं करून ठेवलंय स्चतःचं ते बघताय ना!)

छान लिहीले आहे ताई. पटले. मला असा धागा काढायचा होता ट्रंप जोक्स्चा . दोनी पैकी कोणीच नको असा काही चॉइस असतो का? काहीतरी रिझोलुशन पास करून ओबामा साहेबांनाच एक्स्टेंड करता आले तर बरे होईल. पण ते होणे नाही. जे जे होईल ते ते बघावे.

ते मेलनिया वहिनींचे फोटो पण परत प्रदर्शित केले ते मात्र आजिबात पटले नाही. इतके लो लेव्हल वागू नये असे वाटले.

मेलनिया वहिनीं (?) नाही मेलनिया काकु. सध्या त्यान्चा immigration चा प्रश्न चर्चेत आहे.

राजकारण सगळीकडे सारखेच आहे. २००८ साली ओबामा कॅम्पेन ने असेच बिल आणि मोनिकाचे फोटोज आणि news पब्लिश केले होते. हिलरी primary नॉमिनेशन्स जिंकू नये म्हणून. ओबामांच्या birth सर्टिफिकेटचा घोळ तर ८ ही वर्ष पुरला

अमा, गॅरी जॉन्सन म्हणून एक लिबर्टेरियन पार्टीचा उमेदवार आहे. पण त्याला सपोर्ट नाही अजून.
https://www.johnsonweld.com/

काहीतरी १५ टक्क्यांचा फंडा आहे. तेवढ्या लोकांनी पोल्स मधे याला सपोर्ट दिला तर हा प्रेसिडेन्शियल डीबेट्स मधे त्या दोघांबरोबर दिसेल. ते इंटरेस्टिंग होईल.

काही मजेदार कॉमेन्ट्स आहेत त्याच्या पेज वर. उदा:
"I hear that Donald Trump is watching the Olympics tonight. He's seeing how high the Mexican pole vaulters go." - Gov. Gary Johnson

He's seeing how high the Mexican pole vaulters go." - Gov. Gary Johnson >> Lol सही आहे!