कबड्डी....खेळ बदलणार

Submitted by मी चिन्मयी on 11 July, 2016 - 15:04

क्रिकेट....फुटबाॅल....ऑलिंपिक....या मोठ्या मोठ्या नावांमधे एक नाव पुसट होत गेले ते म्हणजे कबड्डी. आज अगदी पहिल्या इयत्तेत शिकणार्या मुलाला विचारले 'बाळा तुझा आवडता खेळ कोणता?' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट'!!! अगदी एका जागी बसणारा बाळ असेल तर काही विडिओ गेम्सची पण नावं सांगेल. पण त्याला कबड्डी या खेळाचे नावही माहिती नसेल.

कबड्डी हा खर्या अर्थाने मातीशी जोडलेला खेळ आहे. पूर्वी मातीतच खेळला जायचा. काळानुसार आता मातीच्या जागी 'मॅट' आली. पण खेळाची मजा आणि चुरस काही बदलली नाही. फारशी(माझ्यामते थोडीही) प्रसिद्धीची झलक न लाभलेला हा खेळ आणि तो खेळणारे नव्हे जिवंत करणारे खेळाडू यांच्याबद्दल थोडेसे बोलावे म्हणून हा प्रयत्न.मी काही खेळातली उत्तम जाणकार वगैरे नाही किंवा खेळाडूही नाही. तरीही मागील 2 वर्षांत कबड्डीने चाहते खेचून आणलेत त्यापैकी मी एक.

इथे नक्की कबूल करावेसे वाटते की 2 वर्षांपूर्वी पर्यंत कबड्डी ही national च नाही तर international level ला खेळली जाते हे मला माहिती नव्हते. आणि कबड्डीचा world cup असतो हे तर त्याहून माहिती नव्हते. अशी परिस्थिती असताना भारताने आजपर्यंत जवळजवळ 7 वेळा हा world cup जिंकलाय हे कुठुन माहिती असणार? Asian cup, South asian cup यात सुद्धा भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे, हे आता इंटरनेट चाळल्यावर कळते आहे. आणि अशी स्थिती फक्त माझी नाही तर अनेक लोकांची आहे. कारण हा खेळ फक्त तो खेळणार्या खेळाडूंनाच माहिती असल्यासारखा होता. आणि खेळच ओळखीचा नाही तर खेळाडू कुठून ओळखीचे असणार. क्रिकेटीअर्सची नावे घडाघडा बोलून दाखवता येतात पण कबड्डीपटू कोण आहेत याचा पत्ताच नाही.

पण आज हे चित्र थोड्या प्रमाणात का होइना बदलताना दिसते आहे. आणि त्याचे पूर्ण श्रेय जाते '' प्रो कबड्डी लीग" ला. या लीग ने खेळाला एक नवीन प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून दिला आहे. आणि हा खेळ लोकांच्या आणखीन जवळ आणून ठेवला आहे. प्रेक्षक गर्दी करत आहेत. आणि खेळाडू आता हिरो बनत आहेत. या लीगच्या मागे अनेक लोकांची मेहनत आणि चिकाटी आहे. कारण लीग उभी करणेच पुरेसे नव्हते. तर प्रेक्षकांची पसंती आणि उपस्थिती सुद्धा गरजेची होती. आता हे उद्दिष्ट साध्य होताना दिसते आहे. 8 टीम्स सोबत कबड्डी लीग चे 3 सीजन पूर्ण झाले. चौथा सीजन आता थाटात सुरू आहे. परिस्थिती चांगल्याकरिता पालटली आहे...खेळाची आणि खेळाडूंचीही.

एका माहितीपटात मी प्रो कबड्डीच्या एका सदस्याची मुलाखत पाहिली. त्यांचे एक वाक्य अगदी छान लक्षात राहिले.."जेव्हा प्रेक्षक फक्त खेळ न पाहता अंपायर होतात,तिथे आमची सगळी मेहनत सफल होते. कारण त्यांनी खेळ फक्त पाहिलेला नसतो तर समजून घेतलेला असतो." याच माहितीपटात अनुप कुमार या एका उत्तम खेळाडूने आपले मनोगत मांडले. तो म्हणाला, " आधी आम्हाला फार कोणी ओळखतच नव्हते. World cup जिंकल्यावरही त्याची दखल घेतली गेली नव्हती. पेपरच्या एका कोपर्यात एक छोटीशी बातमी एवढेच त्याचे महत्त्व होते. पण आता वेळ बदलली आहे. आता प्रसिद्धी मिळते आणि पैसाही. आता आम्हालाही कळू लागले आहे मोठ्या लोकांमधे कसे उठा-बसायचे."

टीव्हीवर ही लीग अगदी सर्रास पाहिली जाते. 4 भाषांमधे अनेक देशांमधे याचे प्रसारण केले जातेय.आमच्या घरात तर जेवणाच्या वेळासुद्धा पुढे-मागे सरकल्यात. 40 मिनीटे डोळ्यांच्या पापण्यासुद्धा लवताना विचार करतात. 'सुपर रेड', 'सुपर टॅकल', डू ऑर डाय रेड' असे शब्द ओठी खेळू लागलेत. लीग संपल्यावर टीव्हीवर काय बघायचे असे प्रश्न पडू लागलेत. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आपली एक जागा निर्माण करण्यास हा खेळ पुढे सरसावला आहे. आणि त्यात तो यशस्वी होईल यात शंका नाही...कारण खिळवून ठेवेल तोच खरा खेळ!!!

ता.क.- मनजीत छिल्लर आणि अजय ठाकूर माझे पर्सनल फेवरेट आहेत. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

[{(mumba vs tbc) winner vs (delhi vs tbc)winner} winner vs (gujrat vs tbc) looser] आणि नंतर फायनल, असं असेल तर तीन खेळायला लागतील ना?

म्हणजे बघा मुंबा जर पहिला सामना जिंकली तर दुसरा सामना दिल्ली आणि विरोधी संघातील जो जिंकेल त्याच्यासोबत खेळायला लागेल, नंतर तिसरा सामना गुजरात आणि विरोधी संघ हरेल त्याच्यासोबत आणि नंतर चौथा फायनल, असं असेल ना?

Line drawn... Game on...
आजपासून सुरू लोकहो.

कबड्डी खेळ खरोखर सुंदर आहे आणि गावागावात खेळला जाणारा खेळ आहे. पण या खेळातून माघार घेण्यासारखी कारणे सुद्धा खूप आहेत. पहिला म्हणजे FAVOURATISM . अनेक निवड चाचण्या (जिल्हास्तरीय) होतात त्यामधल्या बहुतांशी वशिलेबाजी चालते. निवडक खेळाडूंनाच पुढे येण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेक खेळाडु गुणवत्ता असुनही डावलले जातात. इंटर्नल पॉलिटिक्स, जातीवाद, भांडण तंटे, खेळाखेळात एखाद्या खेळाडूला कसे जख्मी करता येईल अशी प्रवृत्ति आणि त्याच बरोबर एवढा वेळ देऊनही हातात तर काही लागत नाही आणि एखादा अपघात होऊन कायमचा दुखापतग्रस्तपणा येण्याची भीती ही आणि अशी अनेक कारणे या खेळाला मागे पाडण्यासाठी कारणीभुत आहेत.

Pages