भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>
कालो आणि हालोआ ची कथा
ही खूप खूप जुनी आख्यायिका आहे. आद्य दंतकथा म्हटले तरी चालेल.
हवाईयन संस्कृतीत "कालो" ( टारो प्लॅन्ट) म्हणजेच आपल्या अळू ला फार महत्त्वाचं स्थान आहे.
या बेटांवर फारसे काहीही खाण्यालायक उगवत नसताना आद्य हवाई लोकांना या झाडाने जगवलं आहे.
या लोकांच्या कल्पनाशक्तीच्या भरार्या मात्र अफाट आहेत. अळूच्या झाडाबद्दल कुणाला काही कथा सुचेल असं मला कधीही वाटलं नसतं! पण हवाईयन लोकांना सुचली ! तर अशी ही गोष्ट :
पापा उर्फ पापाहानामोकु (जिच्यातून जमीन जन्मते अशी - म्हणजे भूमी माता) आणि वाकिआ (आकाश पिता) यांनी लग्न केले. त्यांच्या मीलनातून हवाई बेटे जन्मली. त्यांना एक सुंदर मुलगीही झाली - तिचे नाव हूहोकुलानी (तार्यांनी बनलेली, स्वर्गीय अशी).
ही कन्या तरुण झाल्यावर वाकिआ चे मन तिच्यावर गेले. पापाच्या नकळत त्याने तिला प्राप्त केलेच.
** त्यावेळच्या हवाईयन समाजात भावा बहिणीचे संबंध सर्रास प्रचलित होते हे इतर कथांतून वाचलेय पण बाप -मुलीच्या संबंधांचे हे एकच उदाहरण आहे की तेही समाजमान्य होते याची कल्पना नाही. असो. **
तर वाकिआ आणि हूहो च्या मीलनातून हूहोला मातृत्वाची चाहूल लागली. पापा(भूमी)ला हे अर्थात आवडले नाही. तिच्या शापाने हूहो अपुर्या दिवसाची बाळंत झाली. तिला एक वेडावाकडा विद्रुप आणि जन्मतः मृत मुलगा झाला. हूहो आणि वाकिआ दु:खी झाले. त्यांनी त्या बाळाचं नाव हालोआनाका ठेवलं आणि त्याला भूमीच्या कुशीत दफन केलं.
हूहोला दु:खाचा विसर पडत नव्हता. ती रोज बाळाला दफन केल्याच्या जागी जाऊन मातीतून हलकेच हात फिरवी, तिथली जमीन सारवून स्वच्छ करी. आणि त्या जागेवर अश्रू ढाळत राही.
शेवटी भूमी ही हूहोची आईच! तिचे मन द्रवले. जे झाले ते तिला बदलता येणार नव्हते. पण तिने एक मार्ग शोधला हूहोचे सांत्वन करण्याचा.
बाळाला दफन केल्याजागी एक दिवस एक सुंदर हिरवा कोंब आला. तेच कालो चे म्हणजे अळूचे झाड! हूहो नेहमीप्रमाणे त्या जागी येऊन मातीतून हलकेच हात फिरवत होती. जणू काही तिच्या बाळाचे पांघरुण सारखे करीत होती! तेव्हा अचानक तिला तो हिरवा कोंब दिसला. ती हर्षभरित झाली! वाकिआला म्हणू लागली, बघ बघ आपलं बाळ किती भराभरा वाढतंय! त्याला उभं पण राहता यायला लागलं!!
(हे चित्र एका व्हिजिटर पँप्फ्लेटवर होतं, त्याचा मी फोटो घेतलाय. योग्य नसल्यास काढून टाकेन)
दोघे त्या कोंबाची नीट काळजी घेऊ लागले. त्या कोंबाचे रोप झाले. त्याची पानं हृदयाच्या आकाराची होती. त्याच वेळी हूहोला पुन्हा दिवस गेल्याची चाहूल लागली! लवकरच तिला एक छानसं सुदृढ मानवी बाळ झालं. त्याचं नाव थोरल्या भावाच्या आठवणीसाठी "हालोआ" असं ठेवलं . हाच आद्य हवाईयन मानव आणि आपला आद्य पुरुष असे हवाईयन लोक मानतात.
हालोआदेखिल आपल्या भावाची म्हणजे त्या अळूच्या झाडाची काळजी घेऊ लागला, त्याला पाणी देऊ लागला. मोठ्या भावानेही त्याला कधी उपाशी राहू दिले नाही आणि त्याच्या अन्नपाण्याची काळजी शेवटपर्यन्त घेतली.
अजूनही अळूच्या झाडांची हवाई बेटावर सगळीकडे लागवड केली जाते.
ज्याच्याकडे भरपूर अळूची झाडं तो सुखी असं हवाईयन समजतात. वार्यावर ती हिरवीगार पाने डोलतात तेव्हा ती हुला नृत्य करतायत असं हवाईयन लोकांना वाटतं! त्या हृदयाकृती पानांच्या मध्यभागी खूपदा पावसाच्या पाण्याचे मोत्यासारखे थेंब जमतात ते त्यांना हालोआच्या आईचे अश्रू वाटतात.
कालोच्या मुळापासून, पानापासून बनलेले पदार्थ हवाईयन लोकांचे आवडते अन्न आहे. पोइ हा घट्ट खिरीसारखा पदार्थ कालोच्या मुळापासून बनवतात, तो एक पवित्र पदार्थ समजला जातो. जेव्हा जेव्हा हवाईयन घरात पोइ बनवलं जातं तेव्हा घरात वादाला, भांडणाला मनाई असते. कारण मोठ्यांच्या समोर जोरजोरात बोलणे, वाद घालणे हे कापु आहे! आणि पोइ म्हणजे कालो हा तर सगळ्या हवाईयन लोकांचा मोठा भाऊच आहे!
--क्रमशः
मस्त गोष्ट
मस्त गोष्ट
मस्त वाटतेय ही सिरीज वाचायला.
मस्त वाटतेय ही सिरीज वाचायला.
मस्त कथा! काहीतरी मस्त वेगळं
मस्त कथा!
काहीतरी मस्त वेगळं आणि इंटरेस्टिंग वाचायला मिळतंय. टिपिकल प्रवासवर्णन नाही, त्यामुळे मजा येतेय. आणि फोटो काढून टाकू नको, ते लेखासाठी योग्यच दिसतायत.
वाचताना एखादे नाव आल्यास हा
वाचताना एखादे नाव आल्यास हा नक्की कोण माता की पिता, स्त्री की पुरुष असे पुन्हा वर जाऊन बघावे लागत होते
चीन कि कोरीया मध्यील काही आदिवासी जमातीची लोकं एका भांड्यात दगडं भरून फेकतात आणि जसा आवाज होईल ते नाव ठेवतात असे ऐकले होते..
हवाईयन लोकांमध्ये बाळाला गुदगुली करून ते हाहा हूहो जसे हसेल तसे नाव ठेवत असतील
मस्त कथा. नविनच ऐकायला मिळती
मस्त कथा. नविनच ऐकायला मिळती आहे.
आम्ही हवाई ला गेलो होतो तेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितलेले माश्याचे सगळ्यात मोठे नाव "होमुहोमुनुकुनुकुआपुआआ " (Humuhumunukunukuapua`a )आहे. हवाई स्टेट फिश आहे हा.
त्याने इतक्यादा म्हणायला लावल की लेकीला पाठ झालय
http://www.govisithawaii.com/2009/08/12/fact-41-of-50-hawaiis-state-fish/ इथे पण माहिती मिळेल ह्या बद्दल
अळु शुभ गोष्टींचं प्रतिक असेल
अळु शुभ गोष्टींचं प्रतिक असेल तर मग श्राद्धाला काय करतात यांच्यात?
टण्या
टण्या
हवाईयन श्राद्धाला अळू खायला
हवाईयन श्राद्धाला अळू खायला कापु नसावा बहुतेक
अरेच्या पण आपल्याकडेही लग्नात अळूची भाजी करतात की !
>>तुम्ही खाजरा अळु खाल तर
>>तुम्ही खाजरा अळु खाल तर १००% वेळा सुद्धा घसा खाजण्याची शक्यता आहे.
सिंडरेला, पण त्याच वेळेस बाकीच्यांचे घसे खाजत नाहीत ना. खाई त्याला खवखवे ही म्हण फक्त मलाच का लागू आहे देव जाणे.
रच्याकने, हालोआ आणि आलोहा मधे काय फरक आहे ?
"विचित्र विश्व" चे पुस्तक
"विचित्र विश्व" चे पुस्तक वाचत असल्यासारखे वाटतय.... भारी आहे... अजुन येऊद्यात.
इंटरेस्टिंग कथा! तिथे मग
इंटरेस्टिंग कथा!
तिथे मग खतखतं, फदफदं, वड्या इत्यादीचं हवाइयन रुप असेल ना.
इथे सगळ्यांनी अळवाच्या
इथे सगळ्यांनी अळवाच्या पोस्ट्स टाकल्याच आहेत तर माझीही भर... पोईची चव कशी असते मै ?
छान कथा! अजून वाचायला
छान कथा!
अजून वाचायला आवडतीलच.
रच्याकने, अळूचं फदफदं कसं करतात?
खूप्पच सुरस आहे ही लोककथा..
खूप्पच सुरस आहे ही लोककथा.. आवडली!!!
हा पण भाग छान. वडिलांनी
हा पण भाग छान. वडिलांनी मुलीचा उपभोग घेणे ह्याला धार्मिक सँक्षन असलेले बघून कसे तरी झाले.
तिथे आळू आवडते हे वाचून ग्रेट वाटले. आता आळू वडी एकदा करीन आणि हुला नृत्य करून खाईन.
म्हणजे आपल्या मोठ्या भावाला
म्हणजे आपल्या मोठ्या भावाला कापून, शिजवून खातात ते लोक?
लोककथा खूप मस्त आहे. आकाशातून पडणार्या पावसामुळे जमिनीवर सहज आणि विपुल प्रमाणात उगवणार्या वनस्पतीला मोठ्या भावाप्रमाणे मानणे भारीच आवडले.
तिकडे पण भाजीचे, वडीचे, शोभेचे (लाल / पांढरे ठिपके असलेले) असे अनेक प्रकार आहेत का ? पोई अळकुड्यांपासून करतात की अळूचा एक मोठा कंद मिळतो त्यापासून ?
"होमुहोमुनुकुनुकुआपुआआ "
"होमुहोमुनुकुनुकुआपुआआ " (Humuhumunukunukuapua`a >>>>>>>>माझ्या मुलींना पण हे बोलता येते एका कार्टून सेरिअल मध्ये ऐकले आहे त्यांनी आणि मी पण.
मस्त.... छान माहिती पूर्ण लेख
मस्त.... छान माहिती पूर्ण लेख ☺
पूर्ण मालिका खूप सुरेख आहे.
पूर्ण मालिका खूप सुरेख आहे. राजकन्या, राक्षस अगदी परिकथेतलेच. गंमत वाटते वाचताना. इथे आवर्जून दिल्याबद्दल आभार, नाहीतर जगाच्या पाठीवर अशा गोष्टी सांगणारी खेडी आणि लोक आजही आहेत हे खरे वाटले नसते.
वडिलांनी मुलीचा उपभोग घेणे
वडिलांनी मुलीचा उपभोग घेणे ह्याला धार्मिक सँक्षन असलेले बघून कसे तरी झाले.>>>>>>>>>>>
आपल्या समाजातल्या चालीरीती आणि त्याप्रमाणे तयार झालेले आपले मन, आपण दुसऱ्या समाजातल्या चालीरीतींनी का म्हणून विचलित करून घ्यायचे? मला तरी काही वावगे वाटले नाही त्यात. माझ्या डोक्यात नातेसंबंधांच्या ज्या कल्पना आहेत त्यांच्याशी जगातील प्रत्येक कोपऱ्यातल्या लोकांच्या कल्पना जुळाव्यात अशी कल्पना करणेही मला चूक आणि अन्यायकारक वाटते.
मस्त. मलाही फदफदंच आठवलं.
मस्त.
मलाही फदफदंच आठवलं. (बाकी, अळू खाजू नये म्हणून आपल्या चिंचेसारखं ते लोक तिथे काय घालत असतील?)
मस्तच! आपल्याकडे अळवाचे तिखट
मस्तच!
आपल्याकडे अळवाचे तिखट च पदार्थ जास्त असतात का? त्यांच्याकडे (पॉलिनेश्यन) जास्त गोड असावेत का अळूचे पदार्थ?
ते पोइ कुठे दिसले नाही मला
ते पोइ कुठे दिसले नाही मला त्यामुळे त्याची चव माहित नाही. चित्र बघून फारसे अॅपेटायजिंग वाटले नाही टु बी ऑनेस्ट ! चिकट आणि ब्लँड चव असते म्हणे. एकदा कालो चिप्स दिसल्या होत्या त्या बर्या वाटल्या मात्र.
Pages