एक नवीन सुरुवात

Submitted by Abhishek Sawant on 24 June, 2016 - 03:00

एक नवीन सुरुवात
मळ्यातल्या प्राथमीक शाळेच्या थंड गार फरशीवर अंक्या टॉवेल टाकून चपलाची ऊशी करुन मस्त पहुडला होता. माए महिना अस्ल्याने शाळेला सुट्टी होती. अंगाची लाही लाही करणार्‍या उन्हातही शाळेतल्या थंड वातावरणामुळे त्याच्या डोळ्यावर झापड येऊ लागली. शाळा तशी छोटीशीच, सगळे मिळुन तीन वर्ग होते शाळेत त्यातले दोन तर कधीच ढासळले होते. एकाच वर्गात पहिली ते चौथी असे वर्ग भरत असत. शाळेच्या भिंतीवर कुणातरी गावातल्याच एका पेंटर ने रेखाटलेले भारताचा अणि महाराष्ट्राचा नकाशे, भारताचे संवीधान, राष्ट्रगीत हे सगळं न्याहाळत तो बसला होता. गारव्याला आलेल्या एका खरजुल्या कुत्र्यामुळे अंक्याची तंद्री भांगली. तसा तो त्या कुत्र्याच्या मागे चप्पल घेऊन धावला आणि शिव्या देत त्याला पार कुंपणाच्या बाहेर हाकलवुन दिले. परत येऊन तो पहुडणारच इतक्यात लांबुन एक पांढरी शुभ्र कार धुरळा ऊडवत येताना त्याला दिसली तो कुतुहलाने कार कडे पाहू लागला कार अंक्या जवळच येऊन थांबली. चालकाने जेव्हा काच खाली केली आणि अंक्याला हात केला तेव्हा त्याला कळाले की तो त्याचा मित्र पंकज जो इंजीनियर झाला होता आणि मोठ्या शहरामध्ये नोकरीला गेला होता. कार जशी थांबली तसा अंक्या पुढे गेला नम्स्कार चमत्कार झाल्यानंतर तो नंतर भेटू म्हणून सांगून निघून गेला. तसा अंक्या परत आपल्या जागेवर येउन बसला पण आता त्याचे मन उद्वीग्न होते, कसल्या तरी विचारात तो गुंतला होता. तो स्वतःच्या आयुष्याला दोष देत होता.
अंकुश पवार वय वर्षे ३४-३५ की ३६ काही फिक्स नाही, तमाम खेडेगावातल्या लोकांसारखा त्याचा वाढ्दिवस म्हणजे १ जुनच तो पण मास्तरांनीच शाळेच्या अ‍ॅडमीशन च्या वेळेला ठरवलेला. सडपातळ बांधा पण तेव्हढेच पिळदार शरीर. डोक्यावर विरळ झालेले केस त्यातुन डोकावणारे तीन चार पांढरे केस. अंगावर मळकटलेला शर्ट, जागोजागी फाटलेली पॅन्ट, शेतात, यारीवर काम करुन राकट झालेले हातपाय. तीशी ओलांडली तरी अजून लग्नाचा पत्ता नव्हता. असा हा अंकुश पवार उर्फ अंक्या भुतकाळच्या आठवणीं मध्ये गढून गेला होता.
एका मध्यम वर्गीय शेतकरी कूटुंबात जन्माला आलेल्या अंक्याचे बालपणी फार काही कौतुक असे झालेच नाही कारण आधीच घरात खाणारी तोंडं पाच त्यांचेच कसेतरी भागायचं शेतीच्या तुटपुंज्या मिळकतीवर त्यात आणि आता अंक्याची भर. तरिही अंक्या त्या वातवरणात जगायला शिकत होता. त्याच्या बापाने मळ्यातल्याच शाळेत घातलं, पहिल्या पहिल्यांदा तो रडारड करत होता नंतर तो दररोज शाळेत जाउ लागला. अंक्या हुशार होता आणि त्याचे नवीण गोष्टी शिकण्याचे कौशल्य, त्याची स्मरणशक्ति यामुळे तो गुरुजींचा लाडका झाला. चौथी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याला गावातल्या शाळेत घालायचे ठरले पण पैश्याअभावी त्याचा बाप तयार नव्हता. त्यावेळी त्याला गुरूजींनी मदत केली. आणि त्याची शाळा चालू झाली नवीण शाळा नवीन मित्र यांच्यात तो रमला. आणि इथेच त्याचे आयुष्य फसले.
ते म्हणतात ना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो याचीच प्रचीती त्याला पुढे येणार होती. तीन चार उनाडक्या करणार्‍या टवाळ पोरांबरोबर त्याचा ग्रूप जमला. त्याला एक एक प्रसंग आठवत होता. पकया, सुर्‍या, जगदाळ्या आणि बाब्या असा ग्रुप होता त्यांचा, किती मस्त दिवस होते ते. मग त्यानी शाळेला दांडी मारून रानात भाटकायला सुरुवात केली. भूक लागली की चोरी करायला चालू केली. पोरींवर लाईन मारणे त्यांच्या खोडी काढणे अशी त्यांची टवाळगीरी चालू झाली. अंक्या ने नकार दिला की पक्या त्या शिव्या देत असे “ चलए हाँडग्या काय भेत्र हाय रे ह्ये”. मग अंक्याचा पण नाइलाज व्हायला. असं करत करत कसातरी अंक्या सातवीत पोहोचला. पण तिथून पुढे काय त्याची गाडी रेटना झाली. मग मास्तरांचा ही नाइलाज झाला. बापानेही शेतातल्या कामाचे कारण सांगून त्याला सरळ शाळा सोड म्हणून सांगीतले.
तेव्हापासून जो शेतात राबतोय ते आतापर्यंत फक्त आणि फक्त कष्टच त्याच्या वाट्याला आले. असाच ऊदास बसला असताना तिथे समोरच्याच घरातला एक माणुस आला त्याची चाहूल लागली आणि अंक्या भूतकालातून भाविष्यकाळात अवतरला.
“ काय काय पावणं? आज येळ झाला? लै काम हाय जणू यारीवर अंक्याने त्याच स्वागत केलं, तो माणूस घरजावाई म्ह्णून आला होता या गावात, तो येऊन २५ वर्षे झाली तरी सगळे त्याला अजुनही पावणं असच हाक मारत असत.
पावणा खाकरुन बडका टाकून म्हणाला, “ तेच्या आईला लावला......, मालक काय जाऊ देतयं व्हय” त्यानं खांद्यावरचा टॉवेल काढला आणि जमिन झाडून टॉवेल आंतरुन त्यावर बसला. त्यांन खिशातून बटवा काडला प्लॅस्टीकच्या पिशवीतून चार खाउची पानं काढली, त्यावर नखाने चुन्ना लावला, बटव्याच्या एका कप्प्यातून थोडी कातही घेतली. आणि अडकीत्ता घेऊन तो सूपारी कातरु लागला. त्याने ते सगळं पान बांधले आणि स्वतः एक खाऊन आंक्या कडं हात केला. तर याची पुन्हा तंद्री लागलेली. शेवटी त्याला हालवल्यावर त्याचे लक्ष गेले मग अंक्या पण थोंडात पान धरून ऊठून बसला.
पानाच्या पिचकार्‍या शाळेच्या कट्ट्याशेजारी व्रुक्षारोपण म्हणून लावलेल्या झाडाला रंगवत होत्या. एक पिचकारी मारून पाव्हण त्याला म्हणाला, “ काय र अंक्या काय विचार करत असतयस, काय पैशाची तंगी हाय काय? काय लगीनघाई झाल्या तूला?” अंक्यान त्याच्या कड एक कटाक्ष टाकत “न्हाय” म्हणून सांगीतलं. पन पाव्हना काय याला सोडायच्या मनस्थीतीत नव्हता. त्यान परत विषय काढला. “ व्हय रं परवा तू न पक्या सांगलीला गेलता न्हाव, तीथ काय शोट झाला की काय” आणि तो हासू लागला. “मी जरा वाईस डुलका काढतो, तुम्ही बी झोपा” असे म्हणून तो आपल्या टॉवेल वर जाऊन झोपला. तसा पाहूना ही जरा चरकला कारण अंक्या असे कधीच बोलत नसे. अंक्या एक हात ऊशाला आणि एक हात डोळ्यावर ठेऊन झोपायचा प्रयत्न करू लागला. पण त्याला विचार भेडसावत होते.
आपण पण अभ्यास केला असता तर त्या पंकज इंजीनीयर असतो, कार मधून फिरलो असतो. हे आपलं असे का झालं का आपल नशीबच खराब आहे. आपल्याला भुलवणार्‍या मित्रांची का आपण चूक केली वाहवत जाऊन? असा विचार तो करत असावा. जसजसा विचार केला तसा त्याला त्रास होऊ लागला. त्याने ते सगळे विचार मनातून काढून टाकले त्याने खाली आंतरलेला टॉवेल झाडला आणी कसल्याश्या निर्धाराने त्याने घरची वाट धरली. तो पुन्हा जिद्दीने सुरुवात करणार होता, प्रगतशील शेतकरी होणार होता, शेती करुन, सावकराची कर्ज फेडून, तो पण आता कार घेणार होता. एक नवी सुरूवात तो करणार होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users