रिओ ऑलिंपिक्स - २०१६ सुरुवात

Submitted by Adm on 22 April, 2016 - 16:16

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा ब्राझिलमधल्या रिओ-द-जॅनिरो मध्ये भरणार आहेत. सात वर्षांपूर्वी अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी स्वत: लक्ष घालून तसेच निवडीच्या बैठकीला हजेरी लावूनही रिओ शहराने शिकागोला हरवून यजमानपद खेचून घेतले. त्यानंतर त्यांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेही यजमानपद मिळवून, यशस्वी आयोजनही करून दाखवले. पण ब्राझिलमधली राजकीय परिस्थिती, भ्रष्टाचार, ह्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत होणारा देशांतर्गत विरोध ह्यामुळे रिओचं यजमानपद नेहमीच चर्चेत राहिलं आणि ते खरच यजमानपद भुषवू शकतील का असे प्रश्न उपस्थित झाले.
ह्या सगळ्या चर्चा चालू असताना स्पर्चर्चाआणि खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. ऑलिंपिक आता उण्यापुर्‍या शंभर दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

ऑलिंपिकचे उगमस्थान असलेल्या ग्रीसमध्ये काल ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. परंपरेनुसार सुर्यकिरणांद्वारे हे ज्योत पेटवली गेली. आता ती बर्‍याच ठिकाणी प्रवास करून रिओला येईल.

http://edition.cnn.com/2016/04/21/sport/rio-2016-olympic-torch-lit/

ह्या सोहळ्यापासून येंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांचे औपचारीक 'काऊंटडाऊन' सुरू झाले. तर त्या मुहुर्तावर हा धागा!

ही स्पर्धेची वेबसाईट : http://www.rio2016.com/en

भारतात ईएअपीइन स्टार वर तर अमेरिकेत एनबीसीवर सामने दाखवले जातील.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_2016_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल त्या लक्ष्मीने सगळा मोमेंटम घालवला Sad खर तर तिलाच पहीली या शेवटी ठेवायला पाहीजे होते एेन मोक्याच्या क्षणी तिने नेम चुकवला. ज्या ज्या वेळेस ती जास्त वेळ लावत होती त्या त्या वेळेस तिचा शॉट चुकत होता आणि तिने जास्त वेळ लावल्याने दिपिकाला वेळ अपुरा पडत होता

सर्वात जास्त वाईट इटलीच्या टिम चे वाटले अवघे 25 पाँईट हवे असताना फारच गंभीर चुक केली 10 नाही 9 नाही 7 -6 नाही सरळ 3 गुणावर निशाणा लावला आणि फायनल ला जाण्याच्या आशेवर स्वतःहून पाणी फेरले.

कोरियाने सेमीमधे तैवानच्या टीमवर मानसिक आघात केला पहिल्याच राऊंड ला सलग १० पॉईंट मारून ६० पैकी ६० गुण मिळवले (तेव्हा हवेचा झोत कमी होता) त्या धक्यामधून तैवानचे खेळाडू शेवट पर्यंत सावरलेच नाही. खर तर त्यांनी सुध्दा ६० पैकी ५० गुण मिळवले होते. पण मानसिकदृष्ट्या कणखरपणा कमी पडला.

युएस वि. व्हेनेझुएला मेन्स बास्केटबॉल सुरु आहे. काय खेळतात आपले मेन्स !! अमेझिंग !! अ‍ॅक्चुअली व्हेनेझुएलाची टीम पण नॉट बॅड !! पण युएस समोर टिकाव लागणे अवघड आहे.

काल सिंक्रोनाइज्ड डायव्हिंग बघत होते. ते प्रेक्षणीय असलं तरी अशा खेळांबद्दल मला कायम उत्सुकता वाटते. किंवा रिलेट करता येत नाही असंही असू शकतं. मागे एकदा एक विंटर ऑलिम्पिक्स मध्ये कर्लिंग बघून असाच प्रश्न पडला होता. "हा माझा खेळ" म्हणून निवडावा असं कसं काय ठरवलं जात असेल. कदाचित लहानपणापासून क्रिकेट, टेनिस, कबड्डी, खो खो, हॉकी बॅडमिन्टन, रनिंग इत्यादी पलिकडे खेळ माहितच नसल्याने हा प्रश्न पडला असेल.

जिकडे हे खेळणे शक्यच नाही तिकडे कर्लिंग सुरु झालं असेल.
काल स्विमिंग बघायला मजा आली. पोराबरोबर पहिल्यांदा बघतोय, त्याला पण आवडलं.

कालच्या स्विमिंग आणि सिन्क्रोनाइज्ड डायव्हिंग दोन्ही बघायला मजा आली. एकदम अटीतटीच्या लढती होत्या.
फेल्प्स आणि तो साउथ अफ्रिकन कोण तो, त्यांचा स्पर्धेच्या आधी काही मिनिटे असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे Happy तो सा. अफ्रिकन फेल्प्स कडे बघून काही तरी चिथावणी दिल्यासारखे हातवारे करतोय आणि फेल्प्स मात्र ब्लॅन्क , कोल्ड स्टेअर! Happy

मला सिंक्रोनाइज्ड डायव्हिंग म्हणायचं होतं; स्विमींग चुकून लिहीलं.

हे मात्र खरंय ऑलिम्पिक्स गेम्स बघणे हा मस्त अनुभव असतो. काही गेम्स बोअर होतात मला जसं वॉटर पोलो पण बरेचसे बघताना खूप मजा येते.

काल त्या २०० मीटर बटरफ्लाय मध्ये साऊथ अफ्रिकेचा तो चॅड ले क्लो कसा विचीत्र स्टेअर करत होता फेल्प्स कडे.

ऑलिम्पिक्स गेम्स बघणे हा मस्त अनुभव असतो >> +१
एकेक गिफ्टेड अ‍ॅथलीट, त्यांची मेहनत, डेडिकेशन , त्यांच्या बरोबरीने झटणारी त्यांची टीम, स्टँड मधून बघणार्‍या त्यंच्या कृतार्थ फॅमिलीज.. .. हे नुस्तं बघणंही सॉलिड इन्स्पायरिंग असतं!!

सिंक्रोनाइज्ड डायव्हिंग मधली चायनीज पेअर कसली सिंक्रोनाइज्ड होती. जणू रोबोट्सच.

NBC चे coverage आवडत नाहि मला. चांगले काहि सुरू असले कि क्मधे अ‍ॅड आलीच पाहिजे हमखास.

हो चायनीज पेअर सगळ्यांच्या फारच पुढे होती. शेवटच्या राउंड मधे ते जरा ऑफ सिन्क झाले असे मला वाटले पण पॉइन्ट्स ५७ मिळाले तरी.

जबर्‍या चालू आहे ऑलींपीक्स. काल व्हॉलीबॉल बघायला पण धमाल आली. ब्राझील टीम वॉज रीयली विथ कीलर स्पीरीट इव्हन इन दीज राउंडस. आता मस्त तापायला लागलंय वातावरण. इटस ट्रीट टू वॉच, आणि कमालीचं इनस्पायरींग आहे सगळंच.
वेटलीफ्टींग वगैरे इथे फार कव्हर होत नाही नेमकं. ते इव्हेंटस इतर वेळी तसंही बघायला मिळत नाहीत ! Sad

>> शेवटच्या राउंड मधे ते जरा ऑफ सिन्क झाले असे मला वाटले पण पॉइन्ट्स ५७ मिळाले तरी.

शेवटच्या राउन्ड मध्येही ९० च्या वरच मिळाले ना त्यांनां? त्यातल्या एकाला तर किती फ्लाइंग कीसेस् देऊ नी किती नको असं झालं होतं. चायनीज लोकं खरंच रोबॉट्स वाटतात.

एन्बीसी चं कव्हरेज तसंही अमेरिकन खेळाडूंवरच फोकस्ड असतं.

ती पहिली हिजाब घालून (अंगप्रदर्शन करायला लागणार नाही ) कम्पीट करणारी मुलगी बघितली का अमेरिकन स्क्वॉड मधली ? Happy

चायनीज पेअर कसली सिंक्रोनाइज्ड होती. जणू रोबोट्सच >>> +१

एनबीसी.कॉमचं अ‍ॅप घ्या, आपल्याला हवे ते गेम्स बघता येतात.

वेटलीफ्टींग वगैरे इथे फार कव्हर होत नाही नेमकं. >>>>> इथे म्हणजे कुठे ? टीव्हीवर? शनिवार, रविवारी दाखवलं वेट लिफटींग. मी कुठेतरी पोस्ट पण लिहिली आहे.
एनबिसी अ‍ॅप किंवा त्यांच्या वेबसाईटवर जवळ जवळ सगळ्या खेळांच लाईव्ह प्रक्षेपण आहे. ते खूप चांगलं आहे. आपल्याला हवं ते बघता येतं.

चायनीज पेअर कसली सिंक्रोनाइज्ड होती. जणू रोबोट्सच >>>> मला सगळेच चायनीज खेळाडू रोबोट वाटतात. मशिन्स सारखे. Sad

चांगले काहि सुरू असले कि क्मधे अ‍ॅड आलीच पाहिजे हमखास.>>> असामी ऑनलाईन बघ. त्यावर अ‍ॅड्स नसतात आणि अमेरिकन खेळाडू सोडून बाकीच्यांबद्दल सांगतात / दाखवतात.

परवा टीटी च्या इनिटीयल राउंडस पहत होते. कनक झा अमेरीकन टीममधला आहे त्याची मॅच होती.
पण टीटी बघायची खरी मजा चायनीज, कोरीयन आले की.त्यांच्या ग्रीप्स पासून ते गेम टॅक्ट्टीक्स, स्पीड सगळ्म्च धमाल !

मेन्स व्हॉलीबॉल पण मस्त चाललीये. मला हा खेळ आवडतोच, आणि मस्त खेळताहेत. कसल्या त्या जंप्स, सेट्स, एव्हन डीप सर्व्हीसेस Happy

मी पहिल्या दिवशी मेन्स बीच व्हॉलिबॉलची मॅच पाहिली. ब्राझिलची पेयर नंबर १ आहे. कसले सुपर्ब खेळत होते दोघेही.

युएस - कोलंबिया वीमेन्स सॉकर बघतेय! ०-१ ने मागे आहे आतापर्यन्त .
वर्ल्ड कप गाजवलेली कार्ली लॉइड इथली न्यू जर्सीतली आहे! गो कार्ली!!

कालच्या झालेल्या महिलांच्या कुस्तीच्या तीनही गटांत जपानला सुवर्ण पदक मिळाले आहे.. अजून तीन गट बाकी आहेत.. जपानला सगळीच सुवर्ण पदके मिळणार का? खेळतात फारच जबरी जपानी खेळाडू..

ब्राझिल व्हॉलिबॉलमधलं गोल्ड घेण्याच्या मार्गावर.. दोनदा फायनलला हरून आता होस्ट असताना गोल्ड म्हणजे दिवाळी होणार !!

Pages