रिओ ऑलिंपिक्स - २०१६ सुरुवात

Submitted by Adm on 22 April, 2016 - 16:16

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा ब्राझिलमधल्या रिओ-द-जॅनिरो मध्ये भरणार आहेत. सात वर्षांपूर्वी अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी स्वत: लक्ष घालून तसेच निवडीच्या बैठकीला हजेरी लावूनही रिओ शहराने शिकागोला हरवून यजमानपद खेचून घेतले. त्यानंतर त्यांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेही यजमानपद मिळवून, यशस्वी आयोजनही करून दाखवले. पण ब्राझिलमधली राजकीय परिस्थिती, भ्रष्टाचार, ह्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत होणारा देशांतर्गत विरोध ह्यामुळे रिओचं यजमानपद नेहमीच चर्चेत राहिलं आणि ते खरच यजमानपद भुषवू शकतील का असे प्रश्न उपस्थित झाले.
ह्या सगळ्या चर्चा चालू असताना स्पर्चर्चाआणि खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. ऑलिंपिक आता उण्यापुर्‍या शंभर दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

ऑलिंपिकचे उगमस्थान असलेल्या ग्रीसमध्ये काल ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. परंपरेनुसार सुर्यकिरणांद्वारे हे ज्योत पेटवली गेली. आता ती बर्‍याच ठिकाणी प्रवास करून रिओला येईल.

http://edition.cnn.com/2016/04/21/sport/rio-2016-olympic-torch-lit/

ह्या सोहळ्यापासून येंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांचे औपचारीक 'काऊंटडाऊन' सुरू झाले. तर त्या मुहुर्तावर हा धागा!

ही स्पर्धेची वेबसाईट : http://www.rio2016.com/en

भारतात ईएअपीइन स्टार वर तर अमेरिकेत एनबीसीवर सामने दाखवले जातील.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_2016_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वातावरण तापवण्यासाठी ह्या काही लिंका -

१. गेल्यावेळच्या ऑलिंपिक स्पर्धेच्या समारोपानंतर ललिताने लिहीलेला भारी लेख - http://www.maayboli.com/node/37182

२. मुकूंदी ऑलिंपिकसंबंधीच्या लेखांची मालिका - http://www.maayboli.com/node/2072

ही जुन्या मायबोलीवरची - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/136922.html?1201344791

गेल्यावेळी सारखं सगळ्यांना वाटलं तर नंतर अ‍ॅडमिनांना नवीन ग्रुप उघडायला सांगूया.

मस्त लेखांच्या लिंक्स मिळाल्या.
धन्यवाद अडमा Happy

मान्यवर इथे लिहितील ते वाचायला आवडेलच

अरे वा वा! आला का धागा!

गेल्यावेळी विविध खेळांचे नियम वगैरे मराठीत करून टाकले होते तसं यावेळीही काहीतरी वेगळं करू या.

आणि पग्या जागा झाला....

यंदा भारता तर्फे पहिल्यांदाच एक महिला जिमनॅस्ट ऑलिंपिक्स मधे खेळणार... दिपा कर्माकर.. एकदम प्रॉमिसिंग वाटते आहे... व्हॉल्ट मध्ये सगळ्यात अवघड प्रकार करणार्‍यांपैकी एक आहे ती..

येस!
दीपामुळे भारतीय जिम्नॅस्टीक्स जगतात एकदम भारी वातावरण आहे.

श्रीयुत सलमानपंत खान यांची भारतीय ऑलिम्पिक टीमचा गूडविल अ‍ॅम्बॅसिडर म्हणून नेमणूक झाल्यामुळे भारतीय क्रीडा जगतात नाराजी पसरली आहे.

यावेळी अ‍ॅथलेटिक्समधे भारताची कामगिरी उंचावेल अशी आशा ठेवायला हरकत नाही असे वाटते आहे.

ललीता बाबर जी सध्या मॅरॅथॉन रनिंग मधे सक्रिय होती तिने दिल्ली येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस प्रकारात स्वत:चाच विक्रम मोडत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. अधिक माहिती करता वाचा
http://www.loksatta.com/krida-news/lalita-babar-sets-national-mark-1233417/

दुती चांद हिने १०० मि. स्पर्धे मधे १६ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडला. तिची ११.३२ सेकंद ही वेळ ऑलिंपिक पात्रता वेळे पेक्षा (११.३३ सेकंद) फक्त ०.०१ ने कमी आहे.

https://in.news.yahoo.com/end-long-journey-dutee-chand-052700669.html

Darshana१५ ही रिओस्थित माबोकर रिओ ऑलिंपिकमध्ये व्हॉलंटिअरिंग करणार आहे.
प्री-ऑलिंपिक / कर्टन-रेझर म्हणून इथे काहीबाही अपडेट्स टाकण्याबद्दल तिला मेसेज केला आहे.

Darshana१५ ही रिओस्थित माबोकर रिओ ऑलिंपिकमध्ये व्हॉलंटिअरिंग करणार आहे.
प्री-ऑलिंपिक / कर्टन-रेझर म्हणून इथे काहीबाही अपडेट्स टाकण्याबद्दल तिला मेसेज केला आहे.
>>
मस्तच की ! मजा येईल वाचायला Happy

भारताची दुती चांद 100 मीटर्स स्पर्धेत रिओला पात्र झाली आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू 100 मीटरमध्ये भाग घेईल. पण दुतीचा प्रवास अतिशय खडतर होता. तिच्या प्रवासाची ही कहाणी: http://mobile.nytimes.com/2016/07/03/magazine/the-humiliating-practice-o...

उठा.. जागे व्हा... ऑलिंपिक्स दोन आठवड्यांवर आलं!!
फ्लॅग बिअरर्सची लिस्ट अपडेट व्हायला लागली.
https://en.wikipedia.org/wiki/2016_Summer_Olympics_Parade_of_Nations

भारताच्या पथकाचा ध्वजधारक अभिनव बिंद्रा असणार आहे. लंडन सारखा ढिसाळपणा न होता यंदा परेडच्यावेळी भारतीय पथकात कोणी अगांतूक मेंब्र नसतील अशी आशा आहे!!

वॉझनियॅकी आणि नदाल असे दोन टेनीसपटू यादीत दिसत आहेत.

नरसिंग यादव डोप टेस्टमध्ये नापास. सुशिल कुमार आणि नरसिंग यादव यांच्यातील नाट्यमय 'कायदेशीर' लढाईनंतर भारताकडून ७४ किलो वजनगटात निवड झालेला नरसिंग यादव ऐन तोंडावर डोप टेस्टमध्ये नापास झाला. आता त्याची रिओमध्ये भाग घेण्याची शक्यता नगण्य आहे, सुशिलदेखील रिओत भाग घेऊ शकणार नाही कारण खेळाडू नोंदणी अंतिम तारीख उलटून गेली आहे.

ट्रॅक अँड फिल्ड कोणी फॉऑलो करतय का? मो फारा यावेळीदेखील ५०००/१०००० जिंकेल काय?

नीरज चोप्रा या १८ वर्षाच्या युवकाने भालाफेकीत २०वर्ष वयोगाटात विश्वविक्रम केला तसेच सुवर्णपदक मिळवले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये विश्वविक्रम व सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याची ८६.४८मीटरची फेक रिओत भाग घेणार्‍या अनेकांच्या वैयक्तिक विक्रमापेक्षा अधिक आहे. नीरज रिओ ऑलिम्पिकला जात नसला तरी भविष्यात तो खुल्या गटात यशस्वी होवून विश्वविजेता व्हावा ही सदिच्छा.

<< मान्यवर इथे लिहितील ते वाचायला आवडेलच >> +१
पारंपारिक हॉकी आपल्याला निराश करत असलं [ यंदा मात्र चांगली कामगिरी होण्याची दाट शक्यता] तरी इतर खेळात भारतीय खेळाडू - महिला खेळाडू , हें विशेष कौतुकास्पद - खूपच पुढे सरसावत आहेत. खूप खूप शुभेच्छा.

स्वस्त नाहीं, कमी महाग म्हणून एवढी आणलीय ! पण म्हणून,
ऑलिंपिक पदकं मिळवून आणल्यासारखं माझ्याकडे बघूं नकोस !
aikataay.JPG

द्युती चंद'वरचा हा लेख आताच वाचला.

From the food she eats to water she drinks, Dutee keeps a close watch on everything. The 20-year-old does not know where, and how, she might get ‘trapped’ again. If she thought her return to the squad would be smooth, the constant fear and paranoia is making the comeback rather difficult even as she chases an Olympic berth in individual and team events.

<< द्युती चंद'वरचा हा लेख आताच वाचला.>> बापरे ! आधींच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या या द्यूतिला स्पर्धक म्हणून कसल्या अग्निदिव्यातून जावं लागलंय ! तिला रिओसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
[ इंग्लिशमधे तिचं नांव 'Dyuti' असं लिहीणंच योग्य ठरावं ]

रोमेनियाची फ्लाग बेअरर आहे कॅटॅलिना पोनोर. यंदाचं तिचं चौथं ऑलिंपिक. ती बॅलन्सिंग बीम चॅम्पियन आहे. लंडन ऑलिंपिकला बीमच्या फायनलला ब्राँझ मेडल थोडक्यात हुकलं होतं. तिसर्‍या क्रमांकासाठी अमेरिकेची राईजमन आणि तिच्यात टायब्रेक झाला होता, पण टायब्रेक राऊंडमधे राईजमनने बाजी मारली. चायनाच्या छोट्याश्या डेंग लिनलिनने क्वालिफाईंग राऊंडमध्ये सर्वाधिक स्कोर करणार्‍या चायनाच्याच सुई लूला मागे टाकत गोल्ड मेडल पटकावलं होतं. सुई लूला सिल्वर तर राईजमनला ब्राँझ मेडल मिळालं होतं.

नीरज चोप्राला ऑलिंपिकमधे वाईल्ड-कार्ड एंट्री मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल असं (बहुतेक भा.ऑ.सं.ने) म्हटलं आहे. असं करू नये अशी हे वाचल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया झाली. ऑलिंपिकमधे भाग घेण्यासाठी शारिरीक तयारीइतकीच मानसिक तयारीही महत्त्वाची. इतक्या ऐनवेळी त्याला त्या दिशेला खेचू नये असं वाटलं मला.

यादवचा गेम केला, कारण त्याची आणि त्याच्याबरोबर रुम मधे राहणार्‍याची दोघांची टेस्ट फेल आली आहे.

यादवला खायला काही दिले असेल आणि त्याने रुममेट बरोबर ते नकळत शेअर केले असेल.

असा ही एक पॉईंट येतो

लले, उलट त्याचं मानसिक संतुलन शाबूत ठेवण्यासाठी भाऑसने(च) वाईल्ड कार्डसाठी प्रयत्न करायलाच हवेत. कारण ही संधी गेली तर पुढची संधी थेट चार वर्षांनी, ही गॅप मोठीच आहे.

वाडा नी जर आक्षेप घेतला तर नाही जाता येणार नरसिंग यादवला..

रच्याक.. आज पासून ऑलिम्पिक्सला सुरुवात होत आहे हो....

फूटबॉलच्या ग्रुप मॅचेस आज पासून सुरु होणार आहेत...

गेली काही वर्षे माझे ऑलिंपिक टिव्हीवर बघणेही होत नव्हते.. ते आता होईल.

नादीया कोमोनिच चा पराक्रम त्या वर्षी टिव्हीवर बघितलेले आहेत का कुणी इथे ? तिचे पुनरागमन देखील मी बघितले. तिच्यावर एक टी व्ही सिरियल पण दाखवली होती ( यू ट्यूबवर आहे ती. )

यंदा टीव्हीवर लाईव्ह बघणे जरा मुश्किल दिसतय.. ब्राझिल आणि भारतात १० तासांचा फरक आहे.. बहुतेक प्रक्षेपण रात्रीच होणार..

Pages